Vastu - Houston Maharastra Mandal

Vastu - Houston Maharastra Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vastu - Houston Maharastra Mandal, Hindu temple, 3515 US-90 ALT, Rosenberg, TX.

To serve the Maharashtrian community in the Greater Houston area by providing a physical space to preserve their cultural heritage, enhance togetherness, and support activities that will benefit the greater Houston community.

Namaste, You’re warmly invited to a one‑of‑a‑kind cultural experience that brings the soulful spirit of Pandharpur to Ho...
04/21/2026

Namaste,

You’re warmly invited to a one‑of‑a‑kind cultural experience that brings the soulful spirit of Pandharpur to Houston in a program called Chala Pandhari.

Join us for an evening filled with sing‑along bhajans, energetic abhangs, and immersive storytelling in English, led by none other than Harikatha exponent from India, U.E. Sindhuja Katha Sinddhu
Her captivating narration and abhang renditions will guide us through the essence of Bhakti in a way that’s accessible, joyful, and deeply engaging.

Come experience music, stories, devotion, and community — all in one place. This program is open for all for free of cost. However we request that you register for the event using the link below.

Program - Chala Pandhari
Date - Sunday May 3rd
Time - 4:00 to 6:00 PM

Register - https://forms.gle/GA8ZrJA46M1fp5yNA

Thank you
Vitthal Rukmini Mandir Committee

नमस्कार,मे महिन्यात आपल्या मंदिरात तीन अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवार मे ३ - चला पंढरी - संध्या ४ ते ...
04/14/2026

नमस्कार,

मे महिन्यात आपल्या मंदिरात तीन अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

रविवार मे ३ - चला पंढरी - संध्या ४ ते ६
तामिळनाडूतील प्रसिद्ध अभंग गायीका सौ सिंधुजा आपल्या मंदिरात हरिकथा सादर करणार आहेत. हा कार्यक्रम इंग्रजी मध्ये असणार आहे व त्यातील अभंग मराठी मध्ये असतील.

रविवार मे १० - श्री गजानन विजय ग्रंथ पारायण
गजानन महाराज (शेगाव) यांच्यावर आधारित गजानन विजय ग्रंथाचे पारायण सकाळी ९:०० पासून संध्याकाळी ६:३० वाजे पर्यंत असेल. सौ पडवळ ताई ज्यांचा गजानान विजय ग्रंथ मुखोदगत आहे त्यांच्या बरोबर पारायण करण्याची संधी मिळणार आहे.
RSVP link : https://forms.gle/g5Bmton8yAXQZaaD8

मंगळवार मे २६ - प्रवचन - संध्या ६ ते ८
श्री मकरंद बुवा रामदासी ह्यांचे प्रवचन आपल्या मंदिरात आयोजित करण्यात आले आहे.

हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. अधिक माहितीसाठी मंदिरात
संपर्क करा.

धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

03/28/2026
आजचा रामनवमी कार्यक्रम 🙏🏽
03/28/2026

आजचा रामनवमी कार्यक्रम 🙏🏽

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते॥नमस्कार,मार्च महिन्यात आपल्या मंदिरात ह...
03/03/2026

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते॥

नमस्कार,

मार्च महिन्यात आपल्या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करत आहोत. मासिक कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त मंदिरात ह्या महिन्यात चैत्र नवरात्र घटस्थापना, अष्टमी कुमकुमार्चन, गुडी पाडवा कार्यक्रम, आणि राम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राम नवमी उत्सव निमित्त नाम जप संकल्प सांगता सुद्धा करण्यात येणार आहे.

सर्व कार्यक्रमांची अधिक माहिती लवकरच देण्यात येईल. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मंदिरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू.

श्रीकृष्णार्पणमस्तु ||

धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
०३/०३/२६

आज गणेश जयंती
01/23/2026

आज गणेश जयंती

आज संकष्टी चतुर्थी निमित्त महागणपती अभिषेक करण्यात आला.
01/06/2026

आज संकष्टी चतुर्थी निमित्त महागणपती अभिषेक करण्यात आला.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति॥एक लक्ष नाम जप संकल्पविठ्ठल रुक्मिणी मंदिर नवीन ...
12/31/2025

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति॥

एक लक्ष नाम जप संकल्प

विठ्ठल रुक्मिणी मंदिर नवीन वर्षात एक नवा उपक्रम घेऊन येत आहे. ग्रेगोरियन नूतन वर्ष दिवस जानेवारी १ म्हणजे उद्या पासून ते राम नवमी मार्च २७ पर्यंत, एक लक्ष (१,०८,०००) नाम जप करणार आहोत.

या ८५ दिवसात उपासकांनी कोणत्याही मंत्राचा जमेल तेवढा नित्य जप करून झालेल्या जपाची नोंद दर रविवारी गुगल फॉर्म मध्ये करावी. या जपला काही बंधन नाही. जेव्हा, जसा, जितका शक्य होईल तेवढा जप करावा. ज्यांना मंदिरात येऊन जप करायचा आहे त्यांच्यासाठी मंदिरात जप माळ उपलब्ध करण्यात येतील.

कलियुगात ईश्वराशी जोडण्याचे नाम जपात अमर्याद आणि अलौकिक सामर्थ्य आहे, असे सर्व संतानी आपल्याला सांगितले आहे. तेंव्हा आपण सर्वांनी मिळून जपाची संख्या जोडून हा संकल्प नक्कीच पूर्ण करू.

जप नोंदण्याचा फॉर्म - https://forms.gle/RwEtSxkm2EM81qPs5

नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म।
नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे ।। ज्ञा १०ः२३३ ।।

धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
१२/३१/२०२५

आपला आठवड्याचा जप नोंद करण्यासाठी

|| त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे ।|नर्मदा परिक्रमा - अनुभव कथन नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीच्या काठाने केलेली ए...
12/13/2025

|| त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे ।|

नर्मदा परिक्रमा - अनुभव कथन

नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीच्या काठाने केलेली एक आध्यात्मिक यात्रा आहे.

भरतखण्डात नर्मदेपेक्षाही आकार विस्तार नि लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या तरी त्यांचं आकारमान आणि विस्ताराच्या मोजमापांपेक्षा नर्मदेचं प्राचीनत्व नि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व अशा वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते.

श्री दिलीप व सौ नम्रता जोशी यांनी नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ९६ दिवसात ३५०० किमी (२१७५ मैल) पायी नर्मदा परीक्रमेला केली. यात आलेले दिव्य अनुभव ऐकायला जरूर या.

तारीख - डिसेंबर २०, २०२५
वेळ - संध्याकाळी ५:००
ठिकाण - विठ्ठल रुक्मिणी मंदिर

धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

*वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्*। *देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरूम्*।।नमस्कार,मोक्षदा एकादशी / गीता जयंती च्या पव...
11/23/2025

*वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्*।
*देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरूम्*।।

नमस्कार,

मोक्षदा एकादशी / गीता जयंती च्या पवित्र दिवशी अखंड गीता पारायणा साठी आमंत्रण. मित्र, परिवारासह गीता म्हणायला / ऐकायला नक्की या!!

*महत्व* - या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गीतेचा उपदेश केला.

*कार्यक्रम*
सकाळी ९ः१५ वा दिंडी
सकाळी ९ः३० वा अखंड गीता पारायण
दुपारी १ वा नंतर आरती व प्रसाद भोजन

गीता जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया खालील लिंक वर रजिस्टर करा.

https://forms.gle/7CmiPNTZoVu1iRte8

धन्यवाद
विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती

07/06/2025

Ashadhi Mahapuja 🙏🏽

Address

3515 US-90 ALT
Rosenberg, TX
77471

Opening Hours

Monday 11am - 12:30pm
Tuesday 11am - 12:30pm
Wednesday 11am - 12:30pm
Thursday 11am - 12:30pm
Friday 11am - 12:30pm
Saturday 10am - 12:30pm
5pm - 7:30pm
Sunday 10am - 12:30pm
5pm - 7:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vastu - Houston Maharastra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Vastu - Houston Maharastra Mandal:

Share

Category