18/02/2023
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात २४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.
मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,' असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी
शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते. एकादशीचे माहात्म्य अगाध आहे. संपूर्ण कल्याणासाठी अवश्य महिन्यातील दोन एकादशी उपवास नक्की करावा. व्रत करतांना नियम पाळणे आवश्यक आहे. या दिवशी मद्यपान, निंदा, अभक्ष्य , चोरी, निंदा, देव गुरू ब्राह्मण यांची निंदा करू नये. ब्रह्मचर्य पालन करून अतिशय मनापासून व्रत करावे.
आज विजया एकादशी पासून आपण दर महिन्याला येणाऱ्या २ एकादशी कथा पाहणार आहोत. दर एकादशीला कथा शेअर केली जाईल.
आज विजया एकादशी ची कथा थोड्याच वेळात शेअर केली जाईल. संपूर्ण एकादशी माहात्म्य कथासार या पुस्तकात असणाऱ्या कथा आपण इथे पाहणार आहोत. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकादशी माहात्म्य पोहोचवावे ही नम्र विनंती.
धन्यवाद 🙏