Shree Ganesh Mandir Sansthan, Ganesh Peth, Vatsagulma, Washim

  • Home
  • India
  • Washim
  • Shree Ganesh Mandir Sansthan, Ganesh Peth, Vatsagulma, Washim

Shree Ganesh Mandir Sansthan, Ganesh Peth, Vatsagulma, Washim श्री सिद्धिविनायक, श्री गणेश मंदिर संस्थान, गणेश पेठ, वत्सगुल्म (वाशिम) - ४४४५०५

This is the only one official page.

गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻
16/08/2026

गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻

गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻​श्रावण विनायकी चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायकाचे हे विलोभनीय आणि सुंदर दर्शन घडवल्याबद्दल मनाप...
16/08/2026

गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻

​श्रावण विनायकी चतुर्थीनिमित्त श्री सिद्धिविनायकाचे हे विलोभनीय आणि सुंदर दर्शन घडवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री गणेश मंदिर संस्थान, गणेश पेठ (वाशीम) येथील बाप्पाचे हे रूप अत्यंत प्रसन्न आणि मनमोहक दिसत आहे.

​तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला श्रावण विनायकी चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना आरोग्य, सुख-समृद्धी आणि शांती लाभो हीच प्रार्थना. 🌸✨

🍂🌺संकष्टी चतुर्थी🌺🍂 रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६चंद्रोदय वेळ:  रात्री ९.३३ वा. (पुणे) सर्व भाविकांना संकष्टी चतुर्थीच्या मंग...
02/08/2026

🍂🌺संकष्टी चतुर्थी🌺🍂
रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६
चंद्रोदय वेळ: रात्री ९.३३ वा. (पुणे)
सर्व भाविकांना संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

#वाशिम
#गणेश

05/05/2026
जय पुष्टीश्वर भगवन् दुर्मतिसंहरणा !गणराजा पंचारती करितो तव चरणा !आज नववर्षातील पहिला श्रीगणेश जन्मोत्सव. भगवान पुष्टिपती...
01/05/2026

जय पुष्टीश्वर भगवन् दुर्मतिसंहरणा !
गणराजा पंचारती करितो तव चरणा !
आज नववर्षातील पहिला श्रीगणेश जन्मोत्सव. भगवान पुष्टिपती जन्मोत्सव.

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत.

यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. 🙏🏻

🙏🏻

23/04/2026
जय गजानन 🙏🏻जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत न...
19/04/2026

जय गजानन 🙏🏻

जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. वैशाख शुक्ल तृतीया या तिथीचा कधीही क्षय होत नाही, म्हणून तीला अक्षय तृतीया म्हणतात.

आजच्या दिवशी केलेल्या संकल्पांचा कधीही क्षय होत नाही अशी अनुभुती आहे आणि म्हणूनच आज तुमच्या भविष्याच्या दृष्टीने नविन संकल्प धरा.

अक्षय्य तृतीया म्हणजे सुख आणि समृद्धीचे प्रतीक. या मंगल दिनी सर्वांचे संकट दूर होऊन आपल्या जीवनात स्थैर्य, समृद्धी व आनंदाची भरभराट होवो ही सदिच्छा.

💐 आपणांस सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 💐

प्राचीन संस्कृत साहित्याचे सुबोध मराठीत रसग्रहण घडविणारे सर्वप्रथम आणि एकमेव युट्युब चॅनेल.जगभरातील हजारो संस्कृत प्रेमी...
09/04/2026

प्राचीन संस्कृत साहित्याचे सुबोध मराठीत रसग्रहण घडविणारे सर्वप्रथम आणि एकमेव युट्युब चॅनेल.
जगभरातील हजारो संस्कृत प्रेमींच्या सातत्यपूर्ण वृद्धिंगत प्रतिसादाने संपन्न या चैनल वर आपणास,
नीतिशतकम् ,
मेघदूतम् ,
अभिज्ञान शाकुंतलम् , स्वप्नवासवदत्तम् ,
वेदांतसार ,
अवधूत यदू संवाद अर्थात श्री दत्तगुरूंचे २४ गुरू ,
रसास्वाद अन्योक्तींचा
अशा विविध विषयांवर
५५० पेक्षा अधिक निःशुल्क व्हिडिओ उपलब्ध आहेत.
~ विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड

https://youtube.com/channel/UCz4E-rpbr6mqlY5jLUxP8_A?si=pZQ-cVQgukzq10ct

जरूर सबस्क्राईब करावे.
आपल्या संपर्कातील अधिकाधिक सुयोग्य व्यक्तींना शेअर करावे ही नम्र विनंती.

संस्कृत साहित्य रसग्रहण द्वारा विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड Girvan Vani

Address

Ganesh Peth
Washim
444505

Telephone

9850971209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ganesh Mandir Sansthan, Ganesh Peth, Vatsagulma, Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share