वर्धनगड एक गाव Vardhangad

वर्धनगड एक गाव Vardhangad छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्ह्यातील वर्धनगडकिल्ला.
वर्धनगड एक गाव
(1)

30/03/2026
जुने विसरून नवे स्वीकारूया मनातील कडूपणा मागे सोडूया जशी गुढी उंच तशी स्वप्ने असावी यशाची शिखरे तुम्ही नेहमी पादाक्रांत ...
19/03/2026

जुने विसरून नवे स्वीकारूया
मनातील कडूपणा मागे सोडूया
जशी गुढी उंच तशी स्वप्ने असावी
यशाची शिखरे तुम्ही नेहमी पादाक्रांत करावा
गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🚩🚩🚩🚩🚩

अखंड हरिनाम सप्ताह 2026
18/03/2026

अखंड हरिनाम सप्ताह 2026

03/03/2026

ढोल-ताशांच्या गजरात, रंगांच्या उधळणीत —
महाराष्ट्रातील धुलीवंदन म्हणजे परंपरा आणि उत्साहाचा जल्लोष!
सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

To the beats of dhol and tasha, in a vibrant splash of colors —
Dhulivandan in Maharashtra is a grand celebration of tradition and festive spirit!
Heartfelt Dhulivandan wishes to everyone!

सातारा-अक्कलकोट व सातारा-हैदराबाद बस फेऱ्यांन दरम्यान वर्धनगड येथे विनंती बस थांबा मंजूर केल्याबाबत महाराष्ट्र राज्य मार...
03/03/2026

सातारा-अक्कलकोट व सातारा-हैदराबाद बस फेऱ्यांन दरम्यान वर्धनगड येथे विनंती बस थांबा मंजूर केल्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (सातारा विभागीय कार्यालय) यांचे मनस्वी आभार.
शिवस्पर्शाने पावन झालेल्या वर्धनगड किल्ल्यावरती राज्यातून विविध भागातून गड पाहण्यासाठी लोक येत असतात त्यांच्या प्रवासाबाबत होणाऱ्या अडचणी तसेच गावातील लोकांना सोयीचा बस थांबा उपलब्ध व्हावा . सदर अडचणी संदर्भात ग्रामपंचायत किल्ले वर्धनगड यांनी पत्रव्यवहार करून सदर अडचण दूर केली आहे.

01/03/2026

प्रेस नोट
सातारा

विषय : इराण-इराक येथील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

इराण-इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराक येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इराक येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.

सदर बाबीची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी केले आहे.

नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :
• जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा नियंत्रण कक्ष : 02162-232175 / 02162-232349
• सातारा पोलीस नियंत्रण कक्ष : 02162-233833
• मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321590561

शिवजयंती उत्सव समिती किल्ले वर्धनगड (पंचक्रोशी) आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला..!🚩🚩त्याच्यासाठी म...
28/02/2026

शिवजयंती उत्सव समिती किल्ले वर्धनगड (पंचक्रोशी) आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला..!🚩🚩
त्याच्यासाठी मावळ्यांनी शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी देणगी स्वरूपात हातभार लावला व हे कार्य पूर्णत्वास नेण्यास कष्ट घेतले त्या सर्वांचे शिवजयंती उत्सव समितीतर्फे मनःपूर्वक आभार..👏🏻
सन २०२६ साठी जमा झालेली वर्गणी व खर्च शिल्लक अहवाल सादर करत आहोत..!
🙏🏻सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🏻

26/02/2026

वर्धनगड किल्ल्याचा सायंकाळी घेण्यात आलेला व्हिडिओ.
एकदम मस्तपैकी शांत वातावरण.
#वर्धनगड_किल्ला

वर्धनगड गावचे सुपुत्र ऑननरी लेफ्टनंट श्री विजय पोपट पाचांगणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार संभारंभ शुक्रवार दि.20/02/2026 रो...
20/02/2026

वर्धनगड गावचे सुपुत्र ऑननरी लेफ्टनंट श्री विजय पोपट पाचांगणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार संभारंभ शुक्रवार दि.20/02/2026 रोजी आयोजित केला आहे.
वर्धनगड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ च्यावतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा...!

Address

Vardhangad Tal-Khatav Dist-Satara
Wardhangarh Fort
415501

Telephone

7038979197

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वर्धनगड एक गाव Vardhangad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category