Shri Swami Samarth Kendra, Expert International School, YK Nagar, Virar - W

  • Home
  • India
  • Virar
  • Shri Swami Samarth Kendra, Expert International School, YK Nagar, Virar - W

Shri Swami Samarth Kendra, Expert International School, YK Nagar, Virar - W This Page belong to Akhil Bhartiya Shri Swami Samartha Gurupeeth, Trambkeshwar under Shri Swami Samartha Kendra [Expert International School] Virar West

दिनांक :- 25/01/2026 रोजी संपन्न झालेल्या हळदीकुंकू समारंभ काही क्षणचित्रे
27/01/2026

दिनांक :- 25/01/2026 रोजी संपन्न झालेल्या हळदीकुंकू समारंभ काही क्षणचित्रे

07/12/2025
दत्त जयंती प्रित्यर्थ गुरुचरित्र पारायण यज्ञयाग आणि अखंड नामस्मरण सोहळा दिवस पहिला
29/11/2025

दत्त जयंती प्रित्यर्थ गुरुचरित्र पारायण यज्ञयाग आणि अखंड नामस्मरण सोहळा दिवस पहिला

16/10/2025
II श्री स्वामी समर्थ II *दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा प्रश्न सोडवणारा आणि समाधान देणारा मार्ग आहे. त्य...
16/10/2025

II श्री स्वामी समर्थ II

*दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा प्रश्न सोडवणारा आणि समाधान देणारा मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या समाजातील अधिकाधिक लोकांना या*मार्गाची माहिती करून द्यावी. हीच खरी गुरुसेवा आणि जनसेवा आहे.*

*मार्गातील १८ सेवा विभागांद्वारे लाखो लोकांच्या जीवनातील अडचणी दूर होत आहेत आणि लोकांना आनंद आणि समाधान मिळत आहे.*

👉 *घरातील प्रत्येक व्यक्तीने दिंडोरी प्रणित आपल्या मार्गाच्या प्रचार व प्रसारासाठी नक्की करावा. श्री स्वामी समर्थ* 🙏

🌹 *श्री स्वामी समर्थ* 🌹*अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपिठ त्र्यंबकेश्वर, नाशिक*               *आयुर्वेद विभाग**श्री ...
16/10/2025

🌹 *श्री स्वामी समर्थ* 🌹
*अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपिठ त्र्यंबकेश्वर, नाशिक*

*आयुर्वेद विभाग*

*श्री दिपावली संच व सुगंधी उटणे*
दिपावलीच्या पर्व काळात अभ्यंग स्नानासाठी दिपावली संचातील *सुगंधी उटणे* लावण्याचा्ये *वैद्यकीय फायदे* खालील प्रमाणे 👇
1. अभ्यंग स्नानासाठी वापरण्यात आलेल्या उट ण्यामध्ये herbs ( वनस्पती औषधी ) असल्याकारणाने शरीराचे शुद्धीकरण होते (detoxification ) व विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते
2. उटण्या मध्ये तेल घालून शरीराला मसाज केल्याने शरीरातील रक्त भिसरण ( blood circulation होण्यास छान मदत होते
3. उटण्या मधील छान सुगंधित वासामुळे ( aroma ) मानसिक तणाव कमी होतो,व शरीराला विश्रांती मिळते.
4. शरीरातील त्रिदोष वात पित्त कफ समतोल होण्यास मदत होते
*उटणे पॅकेट केंद्रात उपलब्ध आहेत*
*।।श्री स्वामी समर्थ।।*

*🪔‼️श्री स्वामी समर्थ।‼️🪔*🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔*🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती🛑**आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा ...
08/10/2025

*🪔‼️श्री स्वामी समर्थ।‼️🪔*
🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔
*🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती🛑*

*आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीं विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे.* *जर परमपुज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करुन दिपावलीत सेवा केली, तर गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपादृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होईल.*

*🛑 दिपावलीची सेवा करावयाचा कालावधी 🛑*

*💫👉प्रारंभ-* सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2025 कालाष्टमी)

*💫👉समाप्त-* सोमवार , दि. 21 नोव्हेंबर 2025 अमावस्या)

*🛑या नऊ दिवसात दररोज करावयाची सेवा🛑*

*💫👉घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढावी व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गाईचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळद-कुंकू वाहावे.*

*💫👉दररोज देवांसमोर गायीचा शुद्ध तुपाचा दिवा व धूप लावावा व घरात गोमूत्र शिंपडावे.*

*💫👉कमळगठ्ठा मणींची सेवा- अष्टमी पासून ते अमावस्या पर्यंत या ८ दिवसात कमळगट्टाचे दररोज २ मणी हातात घेऊन*
*षोडशी मंत्र-१६ वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र-१ माळ, कमलात्मक मंत्र-१ माळ*
*हि सर्व सेवा करावी व ते मणी एका डबीत बाजूला ठेवावेत. अशी १६ मण्यांची रोज दोन याप्रमाणे ८ दिवसात सेवा पुर्ण करावी.*

*💫👉वरील मंत्रांच्या स्वाहाकारा नंतर पुन्हा कमलात्मक मंत्र १६ वेळा म्हणून कमळगठ्ठयाचा प्रत्येकी १ मणी अग्नीवर "स्वाहा" म्हणून टाकावा.*
*या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता मानसिक शांती उन्नती होते.*

*‼️श्री स्वामी समर्थ‼️*

*॥ श्री स्वामी समर्थ ॥**_मुल्यसंस्कार, शिशु संस्कार, गर्भ संस्कार, युवा प्रबोधन पालकत्व किती महत्त्वाचे आहे ❓_*🔰 महिला अ...
03/10/2025

*॥ श्री स्वामी समर्थ ॥*

*_मुल्यसंस्कार, शिशु संस्कार, गर्भ संस्कार, युवा प्रबोधन पालकत्व किती महत्त्वाचे आहे ❓_*

🔰 महिला अत्याचाऱ्याच्या घटनांची कारणे शोधली असताना अहवालामध्ये परिवार-पालक व पाल्यांच्यात विसंवाद, सोशल मीडिया अतिरेक, योग्य जीवनदर्श त्यांच्यासमोर मांडले जात नाहीत, बेरोजगारी अशी कारणे आढळतात.

🔰 यावर उपाय म्हणजे पालक पाल्य समुपदेशन, स्वसंरक्षण प्रशिक्षण, good touch-Bad Touch यांची ओळख, चांगले वाचन, मूल्यसंस्कार अभाव, नीतिमूल्ये शिकवण, योग्य जीवनादर्श समोर मांडले जावेत, नात्यांची ओळख करून देणे आवश्यक आहे.

🔰 मुलांमध्ये पर्यावरण विषयी जागरूकता आजच निर्माण करायला हवी.

🔰 प्रत्येक केंद्रामध्ये मूल्यसंस्कार विभाग सक्षम व्हायला हवा.

🔰 ज्या ठिकाणी वर्ग नाहीत त्या ठिकाणी वर्ग सुरू व्हायलाच हवेत.

🔰 *मूल्यसंस्कार प्रतिनिधी* थोडक्यात *समाजसुधारकांचे भूमिकेतून कार्य* करीत असतो त्यामुळे या विभागात कार्य करणाऱ्या प्रथम प्राधान्य दिले जाते.

*🔰देशातील दुर्दैवी घटना केवळ संस्कार थांबवू शकतात. कोणतेही सरकार नाही.....आदरणीय श्री नितीन भाऊ*

*🔰 देशातील दुर्दैवी घटना घडल्यावर निषेध करणे, राग व्यक्त करण्यापेक्षा ते घडू नये यासाठी कोणी काम करताना दिसत नाही. हे सर्व थांबवण्याची क्षमता फक्त मूल्यसंस्कार प्रतिनिधींमध्येच आहे...आदरणीय श्री नितीन भाऊ*

*🔰 "सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास" या भावनेतूनच कार्य आपल्याला कार्य करावयाचे आहे*

चला तर 5 ऑक्टो. विरार.. ला🚩

स्थळ :- एक्स्पर्ट इंटरनॅशनल स्कूल, वाय के नगर, विरार (पश्चिम)

*🚩अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर🚩**🪭स्वयंरोजगार विभाग🪭**⭕श्री अनंत धागा⭕**भारतीय सण-उ...
01/09/2025

*🚩अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर🚩*

*🪭स्वयंरोजगार विभाग🪭*

*⭕श्री अनंत धागा⭕*

*भारतीय सण-उत्सवात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. भाद्रपदातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते. ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या या पूजेसाठी महत्त्वाचा पवित्र धागा म्हणजे अनंत धागा होय.*

*🏮धागा परिधान केल्याचे होणारे लाभ🏮*

*🔹भगवान विष्णुंची अनंत स्वरूपात पूजन केल्याने विशेष आशिर्वाद प्राप्त होतात.*
*🔹लक्ष्मी मातेची कृपा होते*
*🔹दुःख/संकटे/अडचणी दूर होतात.*
*🔹सुख-समाधान-शांती प्राप्ती होते.*

*🏮घरातील सर्वांनीच अनंत धागा आवर्जून धारण करावा.🏮*

*देणगी मूल्य रुपये :- १५/-₹*

*श्री अनंत धागा मर्यादीत संख्येत उपलब्ध असल्याने त्वरीत ऑर्डर करा.*

*🔹श्री अनंत धागा घेण्यासाठी आपल्या परिसरात असणाऱ्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र किंवा शाॅपीमध्ये उपलब्ध कृपया लवकरात लवकर संपर्क करावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏.*
*9096158841*

Address

Y. K. Nagar
Virar
401303

Telephone

+918830384232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Swami Samarth Kendra, Expert International School, YK Nagar, Virar - W posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share