श्री जीवदानी देवी, विरार

  • Home
  • India
  • Virar
  • श्री जीवदानी देवी, विरार

श्री जीवदानी देवी, विरार Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री जीवदानी देवी, विरार, Religious organisation, विरार, (मुंबई , महाराष्ट्र ) तालुका/वसई, जिल्हा/ठाणे, Virar.

The Goddess rests in a temple situated 1400 steps above the ground on a hill that forms a part of the satpuda rang in virar,a northern Mumbai suburb,about 60 kms away from Mumbai. कथा आई जीवदानी मातेची
ईश्वर सजीव आणि निर्जीव स्वरुपात संपूर्ण विश्वात व्यापून राहिला आहे. अशी ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना पूर्वापार आहे. ईश्वराचे नामःस्मरण हे मानवाच्या जीवनाचे एक नैसर्गिक कर्मच होऊन गेले आहे. अस्थिक तर ईश्वराचे स्मरण करीत असतातच पण स्वतःला नास्तिक म्हणणारे हि नकळत देवाचे नाव घेत असतात. ईश्वराच्या साकार अवस्थेची पूजा-अर्चा फार पूर्वी पासूनच आहे. या देवता काही दृश्य तर काही अदृश्य रुपात आहेत. देवांची पूजा हि एकप्रकारची शक्तीपुजाच होय. जंगल संस्थेच्या नोंदणीनुसार जीवदानी डोंगर कमपार्टमेंट हा ११३५ मध्ये अंतर्भूत असून त्याचे क्षेत्र मात्र ३७५ हेक्टर आहे. हा डोंगर साधारण चंदनसागर, नारंगी व विरार गावाच्या क्षेत्रात येतो.गडाची उंची पायथ्यापासून ९०० फुट असून गडाला १४०० पायऱ्या आहेत. पायथ्याशी जयपूर येथे घडविलेली पांढरीरंगाची श्री गणेशाची मूर्ती आहे. या ओंकार स्वरूप गणेशाच्या शीतल दर्शनाने प्रसन्न झालेले भाविक गडाच्या पायऱ्या चढू लागतात. प्राचीन काळापासून समझ आहे कि, खऱ्या मनोभावाने कोणत्याही देवतांचे पूजा-अर्चा,नमःस्मरण केल्यावर त्या देवता चमत्कार करू लागतात व आपल्या परम भक्तांना विविध रुपात दर्शन देतात.
अशा देवतां मध्ये विरारची जीवदायिनी 'श्री आई जीवदानी माता 'आहे. विरार हे पश्चिम रेल्वेचे शेवटचे उपनगरीय स्टेशन आहे. विरार रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर आई जीवादानीचे वास्तव्य आहे. मातेच्या वास्थव्याच्या अनेक अस्थायिका आहेत त्यापैकी हि एक आहे.....
फार वर्षापूर्वी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात एक अनोळखी गाय नित्यनेमाने चरण्यासाठी येत असे. पण ती गाय कोणाची ते काही त्याला समझले नाही.दिवसभर ती चरायची आणि संध्यासमयी निघून जायायची. एक दिवस तो शेतकरी तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती गाय पूर्वे कडील डोंगरावर चढू लागली, तसा तोही तिच्या बरोबर चढून गेला. डोंगरावर जिथे मैदानी जागा होती, तिथे ती गाय थांबली. त्याच क्षणी एक तेजस्वी स्त्री तेथे प्रकटली. शेतकऱ्याला वाटले हीच त्या गायीची मालकीण असावी. त्याने लागलीच त्या स्त्री जवळ इतक्या दिवसांच्या चाऱ्याचे पैसे मागितले.
पैसे काढून त्या शेतकऱ्याच्या हातावर ठेवणार तोच शेतकरी म्हणाला, बाई मी अस्पृश्य आहे मला स्पर्श करू नकोस. शेतकऱ्याच्या तोंडून हे शब्द निघताच न निघता ती स्त्री अदृश्य झाली.शेतकरी 'आ ' वासून बघतच राहिला. त्याच क्षणी त्या गायीने खर्डा हंबरडा फोडला आणि तिने स्वतःला खोल दरीत झोकून दिले. त्या गायीच्या बलिदानाचे रहस्य अजूनपर्यंत कोणालाही उलगडले नाही. पण तिने आपल्या जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवादानीचा डोंगर व तेथे निवास करणारी आदिमाता 'श्री आई जीवदानी देवी ' म्हणून सर्वमुखी झाली. आणि आजवर लाखो भक्तगण तिच्या दर्शनासाठी येतात. कोण नवस घेऊन तर कोण नवस फेडण्यासाठी येतात. मंदिराच्या वरील बाजूस काळभैरव देवाचे, कालिका मातेचे मंदिर आहे आणि मंदिराच्या डावी बाजूस आपले बलिदान दिलेल्या त्या गायीचे मंदिर देखील दिसून येते. संपूर्ण विरारचे लक्ष्य वेधून घेणारा 'ओम' तितकाच आकर्षित आहे. अशी हि आदिमाता आई जीवदानी कोळी-आगरी बांधवांच्या हाकेला नेहमी धावून येते. आय माउली श्री जीवदानी आईचा उदो उदो,,,...... श्री जीवदानी माते की जय !
आई जीवदानी भक्तांसाठी काही महत्वाच्या सूचना :-
अभिषेक : पहाटे २.३० ते ४.०० पर्यंत.
वस्त्रालंकार : पहाटे ४.०० ते ५.०० पर्यंत.
महाआरती : पहाटे ५.०० ते ५.२० पर्यंत.
दर्शनार्थ सुरुवात : पहाटे ५.२० नंतर सकाळी ११.४५ पर्यंत.
देवीस विश्रांती : सकाळी ११.४५ ते दुपारी १२.०० पर्यंत.
दर्शन : दुपारी १२.०० ते दुपारी २.०० पर्यंत.
बंद : दुपारी २.०० ते ३.०० पर्यंत.
सांझ आरती : संध्याकाळी ७.३० ते ७.४५
दर्शन करिता मंदिर बंद : रात्री ८.०० नंतर.

Address

विरार, (मुंबई , महाराष्ट्र ) तालुका/वसई, जिल्हा/ठाणे
Virar
401303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री जीवदानी देवी, विरार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share