समर्थ सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठानची स्थपना २००४ साली झाली. वसईतील हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं मंडळ आहे.मंडळा तर्फे आरोग्य सेवा, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप,अनाथ आश्रमातील मुलांना मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच तुळशी विवाहच्या कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त करून देतांना विभागतील 500 नागरिक या कार्यक्रमात उपस्थित असतात.तसेच वर्षभर वरील कार्यक्रम होत असताना मुख्य कार्यक्रम म्हणजे गणेशोत्सव हा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडतो.गेल्या वर्षी 2016 मध्ये वासईमध्ये उत्कृष्ट मूर्ती म्हणून दुसरे पारितोषिक मंडळाला मिळाले.गणरायाची विसर्जन मिरवणूक अतिशय भव्य आणि आकर्षक असते.हे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत असतात.
समर्थ सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठान
अध्यक्ष- संजय गुरव
कार्यध्यक्ष- संतोष पार्टे
सचिव - प्रमोद प्रभू
खजिनदार- आनंद वळसंगे