Shree Ekveera Sansthan Vadodara

Shree Ekveera Sansthan Vadodara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Ekveera Sansthan Vadodara, Vaghodia.

06/12/2022
06/03/2022

॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ श्री एकवीरा देवै नमः ॥
श्री एकवीरा देवी संस्थान, वडोदरा
ज्यांची कुळदेवी आई एकवीरा देवी आहे, असा ह्या विश्वातील समग्र महाराष्ट्रीयन समाज ठिकठिकाणी वसला आहे. गुजरात मध्ये देखील आहे. अशा कुटुंबियांसाठी गुजरात राज्या मधील "संस्कार नगरी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडोदरा शहरात आई एकवीरा देवीचे मंदिर निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
आई एकवीरा देवी चे मंदिर महाराष्ट्रात कारला तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिरडी जवळ ऊक्कळगांव, दक्षिण गुजरात मध्ये वलसाड-धरमपुर रोडवर आले आहे. परंतु वृद्ध, मुले तसेच अन्य अवस्थाधीन भक्तांना अगदी जवळ पडावे, आपल्या कुलदेवीचे दर्शन सुलभ व्हावे ह्यासाठी वडोदरा मध्येच एक मंदिर निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ह्या मंदिर परिसरात लग्नासाठी हॉल, भक्तांसाठी निवास व्यवस्था (भक्त निवास), धार्मिक-आध्यात्मिक ग्रंथालय, महाप्रसादालय, पाण्याचे अमृत कलश ईत्यादींची सोय करण्याचे देखील स्फुरले आहे. ह्या सात्विक विचाराचे प्रत्यक्षात रूपांतर होईल ह्यासाठी आपणा सर्वांचा पाठींबा मिळेल अशी आग्रहपूर्ण विनंती.
वडोदरा हे गुजरात मध्ये अगदी मध्यभागी आहे, त्यामुळे संपुर्ण गुजरात राज्य आणि शेजारील मध्यप्रदेशात स्थायी झालेल्या महाराष्ट्रीयन समाजासाठी देवी-दर्शन अति अनुकूल होईल. अशा मंगलमय विचारास साकार करण्यासाठी वडोदरा, गुजरात, भारतातील आणि भारता बाहेरील समस्त महाराष्ट्रीयन समाजाचे भक्तगण ह्या पवित्र अशा आध्यात्मिक, धार्मिक व सामाजिक उन्नतीच्या कार्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची योग्य सांगड घालून जीवन जगावे असे आपले सर्वच संत सांगत आले आहेत. आनंद सर्वोत्तम आहेच, परंतु दुसऱ्यांना आनंदित करण्यात प्राप्त होणारा आनंद सर्वात अधिक आहे. योग्य समय आणि धैर्य विवेकपुर्ण निर्णय घेण्यास सहायक होतात, हे आपण सर्वच जाणता. सोने जुने झाले तरी ते सुवर्णच राहते, भक्तीभावाचे देखील तसेच आहे. दैवतांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ हे मिळतेच पण मनात त्याची कामना ठेवू नये. म्हणजेच निष्काम सेवा करणे महत्वाचे आहे. काही वेळेस उशीर होईल पण ते मिळणारच. निस्वार्थ-निष्काम सेवा दैवतास अतिप्रिय आहे.
हातात हात घेतला तर मैत्री होते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्यही शक्य होते. कारण त्यामुळे एक न तुटणारी अखंड मानव-श्रृंखला (चेन) तयार होते. आपण सर्व मिळून अशीच एक मानव-श्रृंखला रचुया मंदिर निर्माणासाठी !
शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणून अध्यात्मशास्त्र देखील एक विज्ञान आहे, ते कळण्यासाठी ते समजून घेणे आवश्यक आहे. पौराणीक मंदिरांविषयी संशोधनानंतर जाहिर झालेले शास्त्र-विज्ञान आपणा सर्वांस परिचित आहे.
ह्यासाठी सर्व भाविक भक्तगणांस नम्र विनंती आहे की त्यांनी मला म्हणजे प्रशांत जे.भीसे ह्यास व्हाटस्‌एप/ टेलीग्राम/एस.एम.एस./मेल पैकी कुठल्याही माध्यमातून माहिती पाठवावी. माझा मोबाईल नंबर- 9638075866 किंवा मेल आईडी- [email protected] यांवर आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल/फोन नंबर वगैरे सविस्तर माहिती पाठवावी ही विनंती.
आपणा सर्वांचा संकल्प, सहयोग, कर्तव्यनिष्ठा हाच आपल्या सर्वांची कुलदेवी "एकवीरा देवी" च्या मंदिर निर्माणाचा पाया आहे. त्यास बळकट करण्यासाठी, ह्या सद्‌विचारपूर्ण संकल्पनेस आपण सर्वांनी सोशल मीडिया द्वारे पुष्टी द्यावी, जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा तसेच सर्वांनी आपापल्या परीने तन-मन-धनाने आपल्या कुलदेवी "आई एकवीरा देवी"च्या मंदिर निर्माण कार्यात जोमाने सहभागी व्हावे अशी नम्र विनंती. आपल्या ह्या निरागस, निष्काम, शुद्ध संकल्पास "आई एकवीरा देवी" सिद्धी प्रदान करो, सार्थक करो हीच प्रार्थना. ह्या शुभकार्यास "आई एकवीरा देवी"चा आदेश समजुन सर्वांनी ह्यात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती.

Address

Vaghodia
390019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ekveera Sansthan Vadodara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Ekveera Sansthan Vadodara:

Share