परमात्मा एक सेवक उमरेड परिसर

  • Home
  • India
  • Umred
  • परमात्मा एक सेवक उमरेड परिसर

परमात्मा एक सेवक उमरेड परिसर उमरेड मधील भगवतकार्य चर्चाबैठक हवनकार्य माहिती व फोटो

उमरेड परिसरातील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत होणारे भगवतकार्य, चर्चाबैठक, हवनकार्य याबाबत माहिती व कार्यक्र्माचे क्षणचित्रे या फेसबुक पेजवर प्रसारित करण्यात येईल.

[ मौदा आश्रम येथील क्रीडा स्पर्धेत उमरेड परिसरातील बालसेवकांची उत्तम कामगिरी ]महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित पर...
27/01/2026

[ मौदा आश्रम येथील क्रीडा स्पर्धेत उमरेड परिसरातील बालसेवकांची उत्तम कामगिरी ]

महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना, मौदा येथे विविध क्रिडा व कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील चित्रकला स्पर्धेत उमरेड परिसरातील बालसेवकांनी उत्तम कामगिरी केली. चित्रकला स्पर्धेतील ११ ते १५ वर्षे वयोगटात उमरेड मंगळवारी पेठ येथील रहिवासी बालसेविका कु.वनश्री दिलीप बेले हिने द्वितीय स्थान पटकावले. तसेच वर्षे १६ ते अमर्यादित वयोगटात मंगळवारी पेठ उमरेड येथील रहिवासी बालसेवक अमन दिलीप बेले ह्याला तृतीय पुरस्कार मिळाला.

ह्या दोन्ही भाऊ - बहिणीचे खूप खूप अभिनंदन...!!

नमस्कार...!!!

[ शाखा उमरेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने झेंडावंदन कार्यक्रम संपन्न ]आज सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्...
26/01/2026

[ शाखा उमरेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने झेंडावंदन कार्यक्रम संपन्न ]

आज सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत शाखा उमरेड च्या वतीने महानत्यागी बाबा जुमदेवजी स्वप्नपूर्ती साकार भवन येथे झेंडावंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी नागपूर मंडळाचे संचालक श्री. ईश्वरजी चिचघरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला उमरेड शाखेचे अध्यक्ष श्री. गुणवंताजी भोयर, उपाध्यक्ष श्री.मिलिंदजी माकडे, कोषाध्यक्ष श्री. नितीशजी कळंबे, उमरेड शाखेचे इतर संचालक, माजी पदाधिकारी, मार्गदर्शक, उमरेड शाखेचे विद्यार्थी युवक मंडळ, मालेगाव येथील स्वयंसेवक टीम, सेवक, सेविका व बालसेवक उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे नक्की बघा.

नमस्कार ....

21/01/2026
[परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर शाखा उमरेड च्या वतीने व सेवकांच्या सहकार्याने मौदा आश्रम येथे श्रमदान]रविवार, दिन...
19/01/2026

[परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर शाखा उमरेड च्या वतीने व सेवकांच्या सहकार्याने मौदा आश्रम येथे श्रमदान]

रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ ला परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम पावडदौना मौदा येथे उमरेड परिसरातील ६३ सेवकांनी शाखा उमरेडच्या वतीने श्रमदान उपक्रमात सहभाग घेतला.
यातील काही क्षणचित्रे...
नमस्कार...

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर च्या आदेशानुसार शाखा उमरेड च्या वतीने सेवक माहिती पत्रक ऑनलाईन भरण्याकरिता शनिवार,...
21/12/2025

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर च्या आदेशानुसार शाखा उमरेड च्या वतीने सेवक माहिती पत्रक ऑनलाईन भरण्याकरिता शनिवार, दिनांक 20/12/2025 रोज शनिवार ला एक दिवसीय कॅम्प लावण्यात आला होता
या कॅम्प मध्ये सेवकांनी 117 सेवकांनी लाभ घेतला त्या बद्दल सर्व सेवकांचे शाखा उमरेडच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद

[ शाखा उमरेड परिसरात ऑनलाईन सेवक माहिती फॉर्म श्रमदान शिबिर ]परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत...
23/11/2025

[ शाखा उमरेड परिसरात ऑनलाईन सेवक माहिती फॉर्म श्रमदान शिबिर ]
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत असलेल्या सर्व त्यागी सेवकांना आपली व कुटुंबाची माहिती नागपूर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन सेवक माहिती फॉर्म च्या माध्यमातून भरण्याबाबत नागपूर मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने उमरेड परिसरातील सेवकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यास मदत व्हावी या उद्देशाने शाखा उमरेड अंतर्गत पदाधिकारी व होतकरू युवा सेवकांनी श्रमदान केले. या श्रमदान शिबिराला उमरेड परिसरातील सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शाखा उमरेड चे पदाधिकारी, संचालक, मार्गदर्शक व सेवक - सेविका उपस्थित होते.

आपणही अजूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरलेल्या नसेल तर नागपूर मंडळाद्वारे प्रकाशित परिपत्रकानुसार अचूक माहिती भरून आपल्या सेवक कुटुंबाची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी.
नमस्कार...!!!

[ उमरेड शाखेच्या नवनियुक पदाधिकारी संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न ]आज बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी परमपूज्य...
12/11/2025

[ उमरेड शाखेच्या नवनियुक पदाधिकारी संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न ]

आज बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत शाखा उमरेड च्या शाखा पदाधिकारी संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा ' महानत्यागी बाबा जुमदेवजी स्वप्नपूर्ती साकार भवन ' गिरड रोड, उमरेड येथे संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त शाखा पदाधिकारी, संचालक, आजी - माजी संचालक, मार्गदर्शक, ज्येष्ठ सेवक, युवा सेवक - सेविका उपस्थित होते.
याप्रसंगी काही क्षणचित्रे.

नवनियुक्त शाखा पदाधिकारी
१) श्री. गुणवंता गंगाराम भोयर - शाखा कार्याध्यक्ष
२) श्री. मिलिंद रामाजी माकडे - शाखा उप- कार्याध्यक्ष
३) श्री. विलास राजकुमार तुळशीकर - शाखा सचिव
४) श्री. अरविंद सिताराम रेवतकर - शाखा सहसचिव
५) श्री. नितीश प्रकाश कळंबे - शाखा कोषाध्यक्ष

नवनियुक्त शाखा संचालक
६) श्री. मृणाल नरेशराव सहारकर
७) श्री. महेश चांगोजी मंगरूळकर
८) श्री. बापुराव आत्माराम हिंगे
९) श्री. कृष्णा देवराम बारई
१०) श्री. हर्षल बबनराव वाघमारे
११) श्री. विलास राजेराम लांबट

नमस्कार...

नमस्कार...!!!

[ उमरेड शाखेच्या वतीने महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यस्मरण व माल्यार्पण कार्यक्रम ]...
03/10/2025

[ उमरेड शाखेच्या वतीने महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यस्मरण व माल्यार्पण कार्यक्रम ]

आज दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत शाखा : उमरेड च्या वतीने मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यस्मरण व बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन तसेच माल्यार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम उमरेड शाखा अंतर्गत असलेल्या महानत्यागी बाबा जुमदेवजी स्वप्नपूर्ती साकार भवन, गिरड रोड, उमरेड येथे सकाळी ९:०० वाजता आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी नागपूर मंडळाचे संचालक श्री. ईश्वरजी चिचघरे, उमरेड परिसरातील मार्गदर्शक, जेष्ठ सेवक, सेविका, युवा सेवक सेविका तसेच नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे..
नमस्कार...

[ नागपूर मंडळाच्या नवनियुक्त संचालक व जेष्ठ मार्गदर्शकांचा उमरेड परिसरातील सेवकांच्या वतीने सत्कार] परमपूज्य परमात्मा एक...
20/05/2025

[ नागपूर मंडळाच्या नवनियुक्त संचालक व जेष्ठ मार्गदर्शकांचा उमरेड परिसरातील सेवकांच्या वतीने सत्कार]

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर च्या २०२५ ते २०३० साठी कार्यकारी संचालक मंडळ यांची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विजय झालेल्या नवनियुक्त संचालक मंडळ व ज्येष्ठ मार्गदर्शक यांचा नागरी सत्कार समारंभ आज दिनांक २० मे २०२५ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी स्वप्नपूर्ती साकार भवन,उमरेड येथे पार पडला. उमरेड शहरातील गंगापूर परिसरातून विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व रॅलीची सांगता महान त्यागी बाबा जुमदेवजी स्वप्नपूर्ती साकार भवन, उमरेड येथे करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक श्री.मारोतरावजी राऊत, नवनियुक्त संचालक, उमरेड परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक, उमरेड शाखेचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, जेष्ठ सेवक - सेविका, युवा सेवक- सेविका व बालगोपाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सेवकांसाठी अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमरेड परिसरातील युवासेवकांनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी काही क्षणचित्रे.
नमस्कार

Address

Umred
441203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when परमात्मा एक सेवक उमरेड परिसर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share