Trimbakeshwar Kaal Sarp Pandit Shekhar Kulkarni

Trimbakeshwar Kaal Sarp Pandit Shekhar Kulkarni Kaal Sarp puja we do all tipe pooja in trimbakeshwar town

22/10/2022
माता शैलपुत्री के स्वरूप से प्रारंभ होने वाले नवरात्रि की बहुत-बहुत शुभकामनाएं
26/09/2022

माता शैलपुत्री के स्वरूप से प्रारंभ होने वाले नवरात्रि की बहुत-बहुत शुभकामनाएं

श्री कृष्ण भगवान जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं
19/08/2022

श्री कृष्ण भगवान जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं

त्र्यंबकेश्वर में सभी प्रकार के विधि विशेष रूप से कालसर्प दोष, पितृदोष, महामृत्युंजय जाप अनुष्ठान, अभिषेक पूजा आदि अनुष्...
06/08/2022

त्र्यंबकेश्वर में सभी प्रकार के विधि विशेष रूप से कालसर्प दोष, पितृदोष, महामृत्युंजय जाप अनुष्ठान, अभिषेक पूजा आदि अनुष्ठान करने के लिए संपर्क करें +919850996037 शेखर कुलकर्णी गुरुजी

इस वर्ष दिपावली का पर्व 30 अक्टूबर रविवार के दिन मनाया जाएगा.........        ""दीपैर्नीराजनादत्र सैषा दीपावली स्मृता..""...
30/10/2016

इस वर्ष दिपावली का पर्व 30 अक्टूबर रविवार के दिन मनाया जाएगा.........
""दीपैर्नीराजनादत्र सैषा दीपावली स्मृता..""
(मत्स्य पुराण)
अर्थात-कार्तिक अमावस्या तिथि को दीपको के नीराजन आरती करने से उसीको दीपावली के नाम से जाना जाता है...।।इसके अतिरिक्त दीपावली से अभिप्राय दीप-पुंज प्रकाशित कर तिमिर (अंधेरे)को दूर करने से है.।।
नोट---इस दिन मनुष्यों को प्रातः अभ्यंग स्नान आदि से निवृत्त होकर स्थिर लग्न मे नूतन श्री लक्ष्मी गणेश जी की मूर्ति स्थापित करके विधिविधान के साथ चल प्रतिष्ठादि करके पंचामृत से स्नान आदि कराके षोडशोपचार से पूजन करके लक्ष्मी सूक्त या स्तोत्र का पाठ करके आरती आदि को करके प्रसाद का वितरण करेंं..... जिससे माँ लक्ष्मी की कृपा प्राप्त होती है इसमे सन्देह नही है..।।🌷🌷🌷
दीपावली पूजन मुहुर्त---
१.)सर्वोत्तम समय---【स्थिर लग्न】
1★प्रातः--07:29 से09:46(वृश्चिक लग्न)
2★दोपहर--01:36 से 03: 08(कुम्भ लग्न)
3★शायं--06:15 से 08: 11(वृष लग्न)
4★विशेष महानिशा पूजन--रात्रि 12:40से02:57 तक।।

२.)मध्यम समय---【द्विस्वभाव लग्न】
1◆प्रातः--09:47 से 11:52(धनु लग्न)
2◆दोपहर--03:09 से 04:36(मीन लग्न)
3◆रात्रि--08:11 से 10:25(मिथुन लग्न)

विशेष----लक्ष्मी पूजन पश्चात शायंकाल मिट्टी के 108 नये दीपको को धुलने के पश्चात 11 दीपक घी से एवं शेष तेल आदि से भरकर अपने घर के मन्दिर में ही पहले घी के दीपक जलाकर माता की आरती कृरें फिर उन्ही दीपको से तेल के सभी दीपक जलाकर ट्रे मे रखकर घर के सभी स्थानों मे श्रद्धापूर्वक स्थापित करें...
घी वाले दीपक अपने घर के मन्दिर मे,तुलसी जी के पास,रसोई मे,तिजोरी के पास,लाईब्रेरी मे,घर के ईशान कोण मे,अपने गुरू जी के निमित्त एवं अपने मूल ग्राम देवता को स्मरण करते हुये स्थापित करें..........।।
🌻🌻🌹🌹🌷🌻🌻

🌷🌷🌷आप सभी को दिपावली की हार्दिक शुभकामनाएं🌷🌷

05/03/2016

●|| रुद्राक्ष ||●

* रुद्रक्षामध्ये आध्यात्मिक ऊर्जा व अनेक औषधी गुण आहेत. रुद्राक्ष माळा धारण
करणा-याला जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत होते. पुराणात तसेच आयुर्वेदामध्ये रुद्राक्षाचे फायदे व महत्त्व वर्णन करण्यात आले आहे.

* एकमुखी रुद्राक्ष – एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे. हा धारण केल्याने मनुष्य चिंतामुक्त व निर्भय बनतो. त्याला कोणतीही शत्रूपीडा वा भय उरत नाही.नेत्रविकार, डोकेदुखी, हृदयविकार, अस्थिविकार, त्वचाविकार, उदरविकार, उदर या सर्व रोगांवरील उपचारात हा रुद्राक्ष बहुमोल मदत करतो. यासाठी एकमुखी रुद्राक्षांची माळ फार प्रभावी ठरते.

* द्विमुखी रुद्राक्ष–यारुद्राक्षाचा संचालक ग्रह चंद्र आहे. तो इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवण्यात वा कुंडलिनी जागृत करण्यात मदत करतो. हा धारण केल्याने स्त्री रोग, रक्तविकार, अनिद्रा, मेंदूविकार, डाव्या डोळ्याचे दोष, रक्ताल्पता , जलविकार, मूत्रपिंड विकार, स्मृतिभ्रंश इत्यादी विकार दूर होतात. गुणांच्या तुलनेत हा रुद्राक्ष मोत्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त गुणकारी असतो.

* तीनमुखी रुद्राक्ष– यात ब्रह्मा,विष्णू व महेश या तिन्ही शक्तींचा संगम असतो. याचा प्रधान ग्रह मंगल आहे. हा धारण केल्याने आत्मविश्वास, निर्भयता, द्वेष, उच्चज्ञान, वायुदोष यात लाभ होतो.
पटकी, प्लेग , देवी, रक्तदाब, रक्ताल्पता, स्त्रीविकार , अस्थिभ्रंश, मुळव्याध, अल्सर, अतिसार, जखमा यावरील उपचारात लाभ होतो. वृश्चिक व मेष राशीच्या लोकांसाठी त्रिमुखी रुद्राक्ष अत्यंत भाग्योदयकारी ठरतो.

* चतुर्मुखी रुद्राक्ष – चार मुखे असणारा रुद्राक्ष हा साक्षात ब्रम्हदेवाचे स्वरूप मानला जातो. हा मनाची एकाग्रता वाढवितो. लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व व्यापारी वर्गासाठी हा लाभदायी आहे. याच्या प्रभावाने चपळपणा, चातुर्य व ग्रहणशक्तीमध्ये लाभ होतो. या रुद्राक्षावर बुध ग्रहाचे नियंत्रण असते. हा धारण केल्याने अपस्मार, नाक, कान तसेच गळ्याचे विकार, नपुसंकता, तोतरेपणा, पांढरे डाग,मनोविकार, त्वचा विकार, कोड, अर्धांगवायू, पितज्वर, नासिका विकार, दमा इत्यादी आजार दूर होतात. व्यापारी तसेच मिथुन व कन्या राशीच्या जातका साठी हा रुद्राक्ष धारण करणे लाभप्रद ठरते.पाचू ऐवजी चुतुर्मुखी रुद्राक्ष धारण केल्याने पाच पेक्षा अनेक पटींनी लाभ होतात .

* पंचमुखी रुद्राक्ष – पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याने यश व धनाची प्राप्ती होते. याचा संचालक ग्रह गुरु आहे. मानसिक शांती, वाईट सवयींपासून सुटका, मंत्रसिद्धी, पवित्र विचार व जास्त कामेच्छावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा सहाय्यकारी ठरतो. हा धारण केल्याने लठ्ठपणा, मूत्रपिंड, ,मधुमेह व कर्णविकार बरे होतात. स्थूलता, उदरविकार, गाठ, जास्त मद्यपान करणे, अनिमिया, कावीळ, चक्कर येणे, स्नायुदुखी यावरील उपचारात हा रुद्राक्ष गुणकारी ठरतो. धनु व मीन राशींच्या व्यक्तींनी व व्यापा-यांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे लाभदायी ठरते. हा पुष्कराज रत्नापेक्षा जास्त गुणकारी आहे.

* षष्टमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष साक्षात शिवपुत्र कार्तिकेय व गणेशाचे स्वरूप आहे. या रुद्राक्षाचा नियंत्रक व संचालक ग्रह शुक्र आहे. हा ग्रह भोग, विलास व सुखसुविधांचा प्रतिनिधी आहे. हा धारण केल्याने प्रेम, कामसुख, संगीत, कविता, सृजनात्मक व कलात्मक कौशल्य , समजूतदारपणा, ज्ञान व वाकचातुर्य यात लाभ होतो.महारोग नपुंसकता , मंद कामेच्छा, मुतखडा व किडनी विकार, मूत्रविकार , शुक्राणू अल्पता व गरोदर पणातील विकार यावरील उपचारात सहामुखी रुद्राक्ष धारणा इष्ट ठरते. वृषभ व तूळ राशीच्या जातकांसाठी हा विशेष लाभकारी आहे.

* सप्तमुखी रुद्राक्ष - सप्त मातृका व हनुमान या रुद्राक्षाच्या देवता आहेत. हा संपत्ती कीर्ती व विजयश्री प्रदान करणारा आहे. हा धारण केल्याने शरीरावर कोणत्याही विषाचा प्रभाव पडत नाही. कालसर्पयोगातही अनुकुलता प्राप्त होते. मनुष्य स्त्रियांना प्रिय बनतो. यांच्या वापराने आरोग्य, सौभाग्य, संपत्ती प्राप्त होऊन रेंगाळलेली कामे मार्गी लागतात निराशा दूर होते. खासकरून शनि पीडा व शनीच्या साडेसातीच्या अनिष्ट प्रभाव दूर करण्यासाठी हा रुद्राक्ष लाभदायी आहे.

* अष्टमुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षामध्ये कार्तिकेय, गणेश अष्ट मातृकागण, अष्टवसुक गण व गंगा यांचा वास मानला जातो. याच्या वापराने शत्रूवर व संकटावर विजय प्राप्त होतो. याचा संचालक ग्रह राहू आहे. राहू हा आकस्मिक घटना घडविणारा ग्रह आहे. अष्टमुखी रुद्राक्ष धारण केल्याने त्वचाविकार फुप्फुसांचे विकार, पाण्यातील बिघाड, गुप्तरोग, मानसीक अशांती, सर्पदंश व तांत्रिक विद्यांमुळे होणारे अनिष्ट प्रभाव तसेच मोतीबिंदू यात लाभ होतो.

* नऊमुखी रुद्राक्ष – हा साक्षात भैरव स्वरूप आहे. हा धारण केल्याने यश, सन्मान, संपत्ती, सुरक्षा, चतुराई, निर्भयता, शक्ती, कार्य नैपुण्य प्राप्त होते. वास्तुदोष याबाबतीत लाभ होतो. नऊमुखी रुद्राक्षाचा संचालक ग्रह केतू आहे. केतू अनिष्ट असेल तर फुप्फुसाची बाधा, ज्वर, नेत्रविकार, बहिरेपणा, अनिद्रा , संतानप्राप्ती दोष, उदर विकार, शरीरदुखी अपघात तसेच अज्ञात कारणांमुळे उत्पन्न होणारे रोग उदभवतात.केतू ग्रहाच्या शांतीसाठी लसण्या रत्न वापरले जाते. परंतु नऊमुखी रुद्राक्ष हा लसण्या रत्नापेक्षाही कितीतरी जास्त पटींनी प्रभावी आहे.

* दशमुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षामध्ये यम देवता, विष्णू महासेन, दशादिक्पाल व दश महाविद्यांचा वास असतो. याची इष्ट देवता विष्णू आहे. यामुळे कफ, फुप्फुसाचे विकार, चिंता, अशक्तपणा, हृदयविकार यात लाभ होतो.

* एकादश मुखी रुद्राक्ष – या रुद्राक्षावर इंद्र देवतेचे स्वामित्त्व आहे. हा धारण करण्याने सर्व इंद्रिये व मन नियंत्रित होते. कुंडलिनी जागृती, योगसंबधीची एकाग्रता, रोगोपचार, निर्भयता, निर्णय क्षमता या बाबीत लाभ होतो.हा शारीरिक आरोग्य, यम-नियम, योगासने, षटकर्म वा इतर यौगिक क्रियांमध्ये येणा-या बाधा नष्ट करतो. याच्या वापराणे स्त्री विकार, जुने चिवट रोग, शुक्राणु अल्पता व संतान प्राप्तीतील बाधा यात लाभ होतो.

* द्वादशमुखी रुद्राक्ष – हा साक्षात सुर्यस्वरुप आहे. हा धारण करणारी व्यक्ती निरोगी व अर्थप्राप्ती करून सुखी जीवन व्यतीत करते. त्याच्यात नेतृत्व गुण, आत्मसन्मान , आत्मविश्वास , प्रेरणा, श्रद्धा, आरोग्य व शक्ती हे गुण येतात.गुणामध्ये हा रुद्राक्ष माणिक रत्नाहून जास्त प्रभावी तसेच किमतीने कमी आहे. याचा वापर केल्याने डोकेदुखी, टक्कल पडणे, ज्वर, डोळ्यांचे विकार,हृदय विकार, वेदना तसेच मूत्राशय व पित्ताशयाचि जळजळ या विकारात लाभ होतो.

* त्रयोदशीमुखी रुद्राक्ष – हा रुद्राक्ष साक्षात कामदेवस्वरूप आहे. हा धारण केल्याने सर्व ऐशोराम, सौंदर्य, प्रसिद्धी, वशीकरण व लक्ष्मीप्राप्ती होते. दाम्पत्य जीवनात सर्व सुखे देण्यास सक्षम आहे.
याच्या वापरामुळे किडनी, नपुसंकता, मूत्राशय विकार, कुष्टरोग, गरोदरपणातील रोग, शुक्राणु अल्पता या विकारात लाभ होतो.

* चतुर्दशमुखी रुद्राक्ष – हा साक्षात कंठ स्वरूप आहे. हा सर्व रोगांचे हरण करणारा तसेच आरोग्य प्रदान करणारा आहे. हा धारण केल्याने वंशवृद्धी होते. यात हनुमानाचाही वास आहे असे मानले जाते.हा भूतपिशाच्च , डाकिनी, शकिनी यापासून रक्षण करतो. याचा वापर केल्याने निराशा मानसिक विकार, बहिरेपणा, कॅन्सर, चित्तभ्रम, थकवा व पायांचे विकार बरे होतात.

* गौरीशंकर रुद्राक्ष – मुख असणार्‍या रुद्राक्षामध्ये गौरीशंकर रुद्राक्ष सर्वश्रेष्ट आहे. याचा वापर केल्याने पारिवारिक ऐक्य, आत्मिक ज्ञान, मन व इंद्रियावर नियंत्रण, कुंडलिनी जागृती तसेच पतीपत्नीमधील समरसता वाढते.मानसिक व शारीरिक विकारांनी पिडीत लोकांसाठी हा रुद्राक्ष दिव्य औषधी सिद्ध होतो.

* गणेश रुद्राक्ष – संतती प्राप्ती बाधा तसेच वैवाहिक समस्या व विवाहासाठी विलंब यावर उपाय म्हणून हा रुद्राक्ष धारण करणे लाभदायी ठरते. याचा वापर केल्याने विद्या, ज्ञानप्राप्ती, मानसिक असंतोष तसेच सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. त्वचाविकार, उचकी, गुप्तरोग, मानसिक अशांती , सर्पदंश, कॅन्सर व तांत्रिक विद्येमुळे होणारे दुष्परिणाम यावर हा उत्तम लभदायक आहे.

* पथरी रुद्राक्ष – यात व्हिटमिन्स व विद्युत तरंग लहरींचे प्रमाण जास्त असते. नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत कठीण असल्याने याचे आयुष्य अनेक शतकांचे असते. उच्च परिणामासाठी हा रुद्राक्ष धारण करणे इष्ट ठरते.

05/03/2016

🌔 खंडग्रास सूर्यग्रहण 🌖

माझ्या माता भगिनीनो,बंधूनो,
९मार्च२०१६चे खंडग्रास सर्यग्रहण माहिती देत आहे.कारण बरेच गरोदर भगिनी विचारात आहे.
हे सर्यग्रहण पाचग्रहाच्या युतीत आहे.हे ३२०वर्षानंतर येत आहे.याला पंचग्रही योग म्हणतात. हे सुर्य ग्रहण फाल्गुण मासाचे कृष्ण पक्षाचे आहे.या ग्रहणाचे सुती ८मार्चला संध्याकाळी ४/४९ला सुरु होईल ते ग्रहणाच्या मोक्ष वेळी संपेल.
सर्यग्रहणाचा स्पर्श ९मार्चला पहाटे ४:४९आहे.व
मध्य ५:४७
मोक्ष-६:४४ ला होईल.
उपाय व पुजा काय करावेत?
ज्या जातकास राशी ग्रहणाच्या कारणाने त्रास होत आहे त्यांनी तीर्थजलाने स्नान करून जप,दान,शिवार्चन करावे,पितरासाठी श्राध्द करा.
२०१६ मध्ये ९ मार्च रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मात्र सुमात्रा, इंडोनेशिया, उत्तर पॅसिफिक महासागर येथून हे ग्रहण खग्रास दिसेल. भारतात ग्रहणस्पर्श सूर्योदयाच्यापूर्वीच होईल व थोड्याच वेळात ग्रहण मोक्ष होईल. विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर येथे हे ग्रहण दिसणार आहे. भंडारा येथे सर्वाधिक म्हणजे २२ मिनिटे, तर अकोला येथे सर्वात कमी म्हणजे १० मिनिटे ग्रहण पाहता येईल. भंडारा येथे सकाळी ६.२६ वाजता सूर्योदय होईल आणि ६.४८ वाजता ग्रहण मोक्ष होईल. अकोला येथे सूर्याेदय ६.३७, तर मोक्ष ६.४७ वाजता आहे. गर्भवती स्त्रियानी ८ मार्च ला रात्री ९ वाजल्या पासून सकाळी ६:४७ पर्यन्त पाळावे.
ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.ग्रहण लागताच सुती लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.२)ग्रहण काळात झोपू नये
३)घराची साफ सफाई करावी.
४) गर्भवती स्त्रियांनी सूर्य देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
५) ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.
६)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा
७) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
८) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहा.
९) ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
१०) ग्रहणकाळात संभोग करु नये.नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.
११) ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.
१२) ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.
१३) ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
१४) ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.
१५) ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.
१६)सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.
१७) नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुने धुवू नये.पाणी भरु नये,
१८) भगवान सूर्याचे ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे.मुले बुद्धिमान होतात.
ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे.ही लक्षात ठेवा.हे सर्व शास्त्र परिहार आहे.यातून कोणतीही सूट नाही.

Address

"Shrikrupa" 11. KailasRaja Nagar. Ring Road, Near Swami Samarth Mandir, Trimbakeshwar, Nashik
Trimbak
422212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimbakeshwar Kaal Sarp Pandit Shekhar Kulkarni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Trimbakeshwar Kaal Sarp Pandit Shekhar Kulkarni:

Share