18/05/2026
बुधभूषण ग्रंथ रचनाकार धर्मरक्षक धर्मपालक श्रीमंत छत्रपती श्रीशंभू महाराजांना कोटी कोटी वंदना..!!
स्वराज्यरक्षक, धर्मवीर, बुधभूषण ग्रंथाचे रचनाकार छत्रपती श्रीशंभू महाराज यांच्या पुतळ्याचे आणि कोनशिलेचे अनावरण !
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाबरोबरच इतिहासात आपल्या असामान्य कर्तृत्वाने नाव कोरणारे धर्मरक्षक छत्रपती श्रीशंभू महाराजांनी आपला राजकीय वारसा जपलाच त्यांच्यात साहित्यिक गुणही होते. त्यांना एकूण अंदाजे १४ भाषा अवगत होत्या. महान कवी कलश, महाकवी भूषण, काशीचे वेदमूर्ती श्रीगागाभट्ट तसेच आपले वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानीतिशास्त्रावर ग्रंथ रचला. त्यांचा राजनीती, राज्यव्यवस्था, कर्तव्ये, मंत्रिमंडळ यांच्याविषयी सखोल अभ्यास होता. जसे राजनीतीमधील 'कौटिल्य अर्थशास्त्र' हा प्रमाण ग्रंथ मानला जातो, तसेच 'बुधभूषण' ग्रंथाविषयी म्हटले जाते. अशाप्रकारे धर्मरक्षक, धर्मपालक छत्रपती श्रीशंभूमहाराज ह्यांनी वयाच्या केवळ १४ व्या वर्षी 'बुधभूषण' (संस्कृत भाषेत)
शंभूराज', 'नृपशंभू', 'शंभूवर्मन' या नावांनी साहित्यनिर्मिती केली."
छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत लहान वयात संस्कृत भाषेत लिहिलेला 'बुधभूषण' हा राजकारण आणि प्रशासनावरील एक अमूल्य ग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करत आदर्श राज्यकारभार, सैन्याचे व्यवस्थापन आणि राजपुत्रांच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले आहे.
https://www.facebook.com/share/p/1J2tK7ccY6/
महाराष्ट्र राज्य सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि असा ग्रंथ आज संपूर्ण भारतवासीय ह्यांचे साठी उपलब्ध आहे ही अत्यंत सार्थ अभिमानाची गोष्ट आहे, युवकांसमोर आदर्श सनातन परंपरेचे, सर्व संतांचे आणि त्यांच्या ग्रंथांचे , अत्यंत शुद्ध विचारांचे, श्रीमंत छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि श्रीमंत छत्रपती श्रीशंभू महाराज ह्यांचे कार्य आणि न्यायप्रणाली ह्याचाच असावा..देव, देश आणि स्वधर्म ह्याशिवाय कोणीही मोठे नाही. देशद्रोही, राष्ट्रद्रोही ह्यांच्यावर अत्यंत कडक शासन झालेच पाहिजे..कुठलीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वराज्याशी प्रामाणिक राहून केवळ स्वराज्य वर्धिष्णू व्हावे असेच विचार जर सातत्याने वृद्धिंगत होतील तर भारत वर्ष हे सर्वोच्च शिखरावर आरुढ असेल ह्यात तिळमात्र शंका नाही..
श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड
#हिंदू #महाराष्ट्र ゚ #वारकरी #समर्थ #भारतीय