21/12/2023
🌞🌞🌞 🌞 🌞🌞🌞
🌞 गुरुचरित्र पारायण 🌞
🛶🛶🛶🛶🛶🛶🛶
मित्रांनो ! गुरूचरित्रात काय लिहिले आहे याची माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला केंव्हाही ,कुठेही आणि कुणालाही वाचता येते.! सामूहिक वाचन करणे हे सध्या बरेच ठिकाणी चालू असते.! मनाला स्थीर करण्यासाठी ! दुःखापासून काही काळ दूर रहाण्यासाठी ठीक आहे.!!
पण गुरूचरित्र पारायण करताना मात्र तुम्हाला काही पथ्ये पाळावीच लागतात.! सर्वात प्रथम देहशुद्धी,मनशुद्धी,घरात शुचिता असणे ही प्रमुख अट आहे.!!
दररोज नित्य संध्या,सूर्योपासना व घरातील देवांची नित्य पूजा करणारा
साधक हा या पारायणाचे फल निश्चित
आपल्या पदरी पाडून घेऊ शकतो.!!
गुरूचरित्र सप्ताह वाचन करत असताना
एका आसनावर स्थीर बसावे.आसन सोडून उठू नये.!कुठेही लक्ष देणे,बोलणे
वर्ज्य.! ब्रह्यचर्य पाळावे.! हविषान्न एकवेळ घ्यावे. संध्याकाळी फक्त दूध
प्यावे.!पलंग, बेड व खाटेवर झोपू नये.
भूमीशय्या तीही चटयीवर,पांढरे घोंगडे
अंथरावे.सप्ताहाच्या ७ व्या दिवशी महानैवेद्य समाराधना करण्यास हरकत नाही.!! किंवा सात दिवसाच्या व्रताचे
फल पदरात पाडून घेण्यासाठी भागवत
सप्ताहाप्रमाणे आडव्या दिवशी समाराधना करणे चांगले.!
पहिल्या दिवशी -पूर्वाभिमुख पूजा मांडणी करून शुचिर्भूत होऊन आचमन प्राणायाम करावा.! मंगलपाठ करून संकल्प करावा.! पोथी व प्रतिमेची पंचोपचार पूजा करावी पोथी वाचन सुरू करावे.!!---
गुरूचरित्रात एकूण ५२ आध्याय आहेत !!!! !!!!!
पहिल्या दिवशी १ ते ७ आध्याय.!
दुसरे दिवशी ८ ते १८ आध्याय !
तिसरे दिवशी १९ ते २८ आध्याय.!
चौथे दिवशी २९ ते ३४ आध्याय.!
पाचवे दिवशी ३५ ते ३७ आध्याय.!
सहावे दिवशी ३८ ते ४३ आध्याय.!
सातवे दिवशी ४४ ते ५२ आध्याय !
अशाप्रकारे नीट एकाग्रतेने मन लावून समजून वाचले तर याची अनूभूती येत
राहील व मी गुरूचरित्र पारायण केले!
असे खऱ्या अर्थाने जाणवेल.!!
●●●गुरूचरित्र ग्रंथ परिचय ●●●
मंगलाचरण गणपती सरस्वती,ब्रह्मा, विष्णु ,महेश , गंधर्वयक्षकिन्नर,पाराशरादी ऋषी कवि वाल्मिकी ऋषी यांना वंदन
व प्रार्थना करून" सरस्वती गंगाधर" रचित सिद्धनामधारक संवादातून हे गुरूचे चरित्र सर्वांना समजेल अशा पद्धतीने ओवीबद्ध केलेले आहे.!! श्रीनृसिंहसरस्वती उपाख्यान पहिल्या आध्यायात दिलेले आहे.!चारी वेद पुराणे याचे वर्णन-कलियुगाला ब्रह्मदेव गुरूमहिमा सांगतात.!प्रलय झाल्यावर वटपत्रावर शयन केलेल्या अव्यक्त रूपी नारायणाने (बाळकृष्ण) सृष्टीची रचना केल्याचे वर्णन.चारी युगाचे वर्णन, कलीयुगाचे लक्षण वर्णन केलेले आहे.!
"छेद करीन धर्मासी । आपण असे निरंकुशी । निरानंद परियेसीं ।। निद्रा-कलह माझे प्राण ।।परद्रव्यहारक परस्त्रीरत ।। हे दोघे माझे भ्रात । प्रपंच मत्सर दंभक ।। प्राणसखे माझे असती।।
अशारितीने दुष्ट, दांभिक,भ्रष्ट नाटकी, खोटारडे,पापकर्मी जन हे माझे स्थान आहे हे प्रत्यक्ष कली ब्रह्मदेवाला सांगतो.!
त्याचबरोबर धार्मिक, सदाचारी,धार्मिक,
पुण्यकर्मी,सत्यवचनी,एकपत्नी,
परोपकारी जन हे माझे वैरी आहेत, असेही सांगतो.!!ब्रह्मा कलीला सांगतात की, गुरूसेवक,हरिहरांचे भक्त,मातापिता सेवक,विवेकी सत्वगुणी पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना तू छळू नकोस.गुरूचे महत्त्व वर्णन करताना "पैलपुत्र"नावाचा वैदिक ब्राह्मण व त्याचा शिष्य "दीपक" याचे आख्यान वर्णन केलेले आहे..!! गुरूचे आवतार महात्म्य वर्णन करताना राजा"अंबरीश" याचे एकादशीचे व्रताची कथा, दुर्वास ऋषीनी घेतलेली परिक्षा याचे वर्णन आहे. ! अत्री ऋषीची कथा पुण्यतेज पतिव्रता "अनसूया" यापासून ब्रह्मा विष्णु महेश यांचा बालरूपी दत्तात्रय आवतार झाला.!याचे सविस्तर वर्णन केले आहे.! पीठापूर येथील विप्र"आपळराज" व त्याची भार्या "सुमती" यांना दत्तत्रयाच्या कृपेने पुत्र प्राप्ती झाली. त्यानिमित्ताने दत्तगुरूचा "श्रीपाद श्रीवल्लभ" आवतार झाला.! याचे वर्णन आहे.!! गोकर्ण महाबळेश्वर याचा महिमा वर्णन केलेला आहे. ज्यात रावणाची गणपतीची कथा उद्बोधक आहे. "गोकर्ण" स्थानाचे महात्म्य वर्णन करणारी कथा आहे.!!"स्कंदपुराणातील" ही कथा आहे.! शापभ्रष्ट महापापी चांडाळी ही शापमुक्तीसाठी गोकर्ण महाबळेश्वर येथे यात्री लोकांबरोबर गेली असता.तिच्या कडून माघ मासातील शिवरात्रीचे दिवशी अन्न पाणी मिळाले नाही म्हणून आपोआप उपवास घडला व निषिथ काली बेलपत्र पिंडीवर पडल्याने अगणित पुण्य झाले व ती शापमुक्त होऊन शिवदूताच्या आज्ञेने शिवलोकाला प्राप्त झाली.अशी कथा आहे.!प्रदोष व्रताचे महात्म्य. पुत्रप्राप्ती. तस्करवध.!
श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा. कुरवपूर क्षेत्र महात्म्य. श्री नृसिंहसरस्वती
यांचे बाललीला वर्णन. करंजन नगरी गमन.विप्राची जठरव्याधी हरण कथा.
क्रूर यवनाला शासन तसेच सायंदेव शिष्याला वरप्रदान.तीर्थयात्रेचे निरूपण.
गुरूसेवेचे महात्म्य वर्णन. अमरापूर महिमा व भिल्लवडी स्थानाचे वर्णन.
ब्राह्मण दैन्य हरण.! औदुंबर वृक्ष महात्म्य. योगिनी सद्गुरु दर्शन घेण्यासाठी प्रतिदिन येतात याचे वर्णन.
ब्रह्मसमंध परिहार. पुत्रप्रेत घेऊन शोक करणाऱ्या जननीच्या पुत्राला जीवदान. वंध्यत्व असलेल्या म्हशीला दुग्ध दोहन.
ब्रह्मराक्षस मुक्ती.!त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन घडविले.वेदांचे सविस्तर वर्णन.मदोन्मत्त विप्राला शाप !! भस्ममहिमा वर्णन." पतिव्रताधर्म' निरूपण.मृत ब्राह्मण जिवंत केला.!
रुद्राक्ष महिमा वर्णन. रुद्राध्याय महात्म्य वर्णन.!सिमंतिनी आख्यान. नित्य धार्मिक आचार विचार व कर्ममार्गाचे
निरुपण.!एकाच वेळी एकाच पाकातून
असंख्य जनाना नगरभोजन.वृद्ध व वंध्यत्व असणाऱ्या स्त्रीला कन्या पुत्र
प्राप्ती.!शुष्क काडीला पाने फुले आणली.! काशीयात्रेचे वर्णन. त्वष्ट
पुत्राचे आख्यान.!सायंदेवाला इच्छित वरप्राप्ती.!अनंतव्रत महामा !श्री शैल्य
शिवरात्री वर्णन.!द्विज कुष्टरोग निवारण.
नरहरी कविश्वराला वरप्रदान.!एकाच वेळी आठही शिष्यांच्या घरी आठ रूपाने
जाणे.!शूद्राला वरप्रदान !अमरजा संगमी
गंधर्वपुर तीर्थमहिमा वर्णन.!!गुरूगीता !!
व शेवटी सद्गुरूचे निजानंद गमन.!!
■■■■■■■■■■■■■■
गुरूचरित्र पारायण करायचे असेल तर
आत्मशुद्धी करताना. आदले दिवशी कमीतकमी १०८ दीर्घ प्राणायाम व ५००० गायत्रीमंत्र जप करावा.!!
(१)-शक्यतो शनिवारी सुरू करून शुक्रवारी समाप्ती करावी.!शुक्रवार हा
श्रीनृसिंहसरस्वती यांचा निजानंदकालाचा
दिवस आहे.!हे सातही दिवस प्रातःकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोषारती, व रात्री शेजारती करावी.!
(२)- अखंड तेलाचा दिवा लावावा. तसेच रोजचे वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा लावावा.!वाचन संपल्यानंतर पोथीची पूजा करताना शक्यतो शमीपत्रे
वहावी.महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची
भाजी असावी.!उर्वरित दिवस भजन
कीर्तन अभंग गायन करावे.!
(३)-"दत्तजयंती" दिवशी सातवा दिवस येत असेल तर त्या दिवशी उपवास करून आठवे दिवशी समाप्ती करावी.
दांपत्य भोजन द्यावे. व धार्मिक सत्शील
ब्राह्मण शोधून त्याला योग्य ती दक्षिणा
द्यावी. आँनलाइन दिली तरी चालेल.!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
संकल्प विषयक माहिती ग्रंथात दिलेली
असते.!!!!
श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत तीन संस्कृत श्लोकाचे मंत्र नेहमी पठण करावे.!!
●● सौभाग्यवर्धक श्लोक ●●
(१)--जीवयामास भर्तारं, मृतं सत्या हि मृत्युहा । मृत्युंजयः स योगिन्द्रः,सौभाग्यं मे प्रयच्छतु ।।१।।
[ सतीचा पति मृत झाला असता त्याला ज्याने जिवंत केले तो मृत्युनाशक मृत्युंजय दत्तयोगिन्द्र मला सौभाग्य देवो.]
●● संततिवर्धक श्लोक ●●
(२)--दूरीकृत्य पिशाचार्ति जीवयित्वा मृतं सुतम् । यो$भूदभीष्टदः सिद्धः स नः संततिवृद्धिकृत ।।२।।
[साध्वीची पिशाच्च पीडा दूर करून व तिच्या मेलेल्या पुत्रास जिवंत करून जो
अभिष्ट फल देता झाला तो दत्त आमची
संतति वृद्धी करणारा होवो.]
●● संपत्तीवर्धक श्लोक ●●
(३)--दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियम् । ददौ श्रीद्त्तदेवः स
दारिद्र्याच्छिप्रदो$वतु.।।३।।
[दरिद्री विप्राच्या घरामध्ये घेवड्याची शाक खाऊन त्याला ज्याने उत्तम संपत्ती
दिली असा तो भाग्यदाता श्रीदत्तदेव आमचे दारिद्र्यापासून रक्षण करो.]
मित्रांनो हे सर्व नीट वाचून घ्या !
गुरुचरित्र पारायण करणे सोपे नाही
योग्य पथ्यपाणी होत असेल व मनाची एकाग्रता असेल तरच गुरूची भक्ती
साध्य होते व गुरूची कृपा होते.!!!!
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्तात्रय गुरू देवताभ्यो नमः।।
♂ श्रीदत्तार्पणाय मस्तु ♂