21/04/2024
हनुमान जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे सोमवारी वसंत महाकुंभाभिषेकम्.
सोलापूरातील भावनाऋषी पेठ, जुन्या वालचंद कॉलेजसमोर असलेल्या
श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम्
येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त रामनवमी बुधवार दि.१७/०४/२०२४ ते मंगळवार दि.२३/०४/२०२४ हनुमान जन्मोत्सवापर्यंत श्री पंचमुखी हनुमानाचे दररोज एका अवताराने विशेष पूजन करण्यात येते.
उत्सव काळात दररोज पहाटे सुप्रभातम,सुंदरकांड पठण,अभिषेकम्, अलंकार सेवा, महाआरती व दररोज सायंकाळी भक्ती गीत,भजन, विष्णु सहस्त्रनाम स्तोत्रम्,जलकलशाभिषेकम्, हनुमान चालीसा,सामूहिक मृदुंग वादन,वसंत कुंभाभिषेकम्,गीत रामायण आदि कार्यक्रम होणार आहे.
गीता परिवार आयोजित श्रीराम मंदिर अयोध्याजी प्राणप्रतिष्ठा प्रित्यर्थ पूज्य स्वामी गोविंददेव गिरि जी अमृत महोत्सव निमित्त साडे सात लक्ष हनुमान चालिसा पठण संकल्पपूर्ति दिव्य विवेचन द्वारा गौव्रती हनुमान भक्त पंडित अशोकजी पारीक (भैय्याजी) पुणे, विषय-हनुमानजी का गुणवैभव, सामुहिक हनुमान चालिसा पठण महायज्ञ
सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सायं. ७.३० ते ९ व मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वा.
होणार आहे.
तसेच हनुमान जन्मोत्सव पूर्व संध्येस सोमवार विविध नद्यांना आवाहन करून जलाभिषेक व ६४ आयुवेर्दिक वनौषधीं विविध फळांचा रसाने,पंचामृताने वसंत कुंभाभिषेकम् होणार आहे.
श्री पंचमुखी हनुमान देवस्थानच्या वतीने मंगळवार दि. २३/०४/२०२४ हनुमान जन्मोत्सव रोजी सकाळी ९ वा. सामुहिक सहस्र हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. सायंकाळी निघणाऱ्या शोभायात्रा मिरवणुकीतील उंट, घोडे, देवतांच्या अवतारांतील चिमुकल्यांच्या सहभागाने निघणारी शोभायात्रा भक्तांसाठी विलोभनीय व मनाला स्फूर्ती देणारी असते.
संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव कृष्णवर्ण, पश्चिमाभिमुखी, अश्वतवृक्ष सहवासातील लाखो हनुमान चालिसा पठण व कोट्यवधी रामनाम जपाने जागृत अवस्था प्राप्त झालेल्या श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम्चे वैशिष्ट्य असे की भक्तांची श्रध्दा असलेली सर्व विघ्ने नाहिशी करणारी गरुड देवता, सकल संपत्ती प्रदान करणारी हयग्रीव देवता, भयमुक्त करणारी नरसिंह देवता, संकटात असलेल्या भक्तांवरील आरिष्ट दूर करुन ऐश्वर्य प्रदान करणारी वराह देवता या अवतारांचा समावेश आहे.
४१ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या दाक्षिणात्य पध्दतीच्या, सुबक नक्षीकाम असलेल्या विविध देवतांच्या सुंदर मुर्तीनी अलंकृत शिखर, सुंदर नयनमनोहर परिवार देवतांची मंदिरे,भव्य महाद्वार, आकर्षक सभामंडप, सभामंडपात चोहीकडे हनुमान चालिसा चित्ररुप प्रतिमा, विविध आभूषणांनी सजविल्यानंतरचे 'श्री'चे विश्वरुप, नक्षत्र आरतीवेळी भाविकांना दिव्य दर्शनाचा आनंद लाभतो.
शिवतत्व व विष्णूतत्व असलेल्या विराट स्वरुपाच्या या पंचमुखी हनुमान दर्शनाने सकल देवतांचे पूजन केल्याचे फळ मिळते अशी भाविकांची श्रध्दा आहे.
तरी उत्सवकाळातील धार्मिक विधीत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा व जन्मोत्सवदिनी सायंकाळी अयोध्या येथील रामलल्ला प्रतिकृती असलेल्या मुर्ती सह हनुमान प्रिय वाहन असलेल्या उंट ,घोडे,राम,लक्ष्मण, वेशभूषेत निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी व्हावे.