श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर, श्रीगोंदा

  • Home
  • India
  • Shrigonda
  • श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर, श्रीगोंदा

श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर, श्रीगोंदा श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर (ट्रस्ट) श्रीगोंदा
पब्लिक ट्रस्ट नं. ए-८६८ - अहिल्यानगर - 22/02/1983
रविवार पेठ, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर महाराष्ट्र

श्रीगोंदा शहराचे आद्य दैवत श्री लक्ष्मी पांडुरंग

श्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक व पौराणिक संपन्न वारसा असलेले शहर. मध्ययुगीन काळात या शहराला ' श्रीपूर ' असे नाव होते. या श्रीपुरचे ' चाम्भारगोंदे' हेच आजचे श्रीगोंदे होय. श्रीगोंदा शहराला दक्षिण काशी म्हणावे लागेल एवढी मंदिरे आहेत. पुरातन तसेच ऐतिहासिक पेशवेकालीन मंदिरे पहिली कि श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष पटते. मंदिर

ांबरोबरच शिंद्यांच्या राजवटीतील ऐतिहासिक व भव्य वाडे हेही श्रीगोंद्याचे एक वैषीष्ट्यच. अनेक मंदिरे वाडे व त्यासोबतच विविध साधू संतांच्या वास्तव्याने हि नगरी पुनीत झाली आहे.
श्रीपूर हे नाव श्रीलक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे . पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी श्री विष्णुंनीही या ठिकाणी बालरूपात अवतार घेतला म्हणून त्यांची श्री लक्ष्मी व श्री पांडुरंगाची स्वतंत्र मंदिरे येथे पहावयास मिळतात. पंढरपुरचे श्री विठ्ठल व श्रीगोंद्याचे श्री पांडुरंग हि दोन स्वतंत्र दैवते असल्याचेही या ग्रंथात दिले असून. सदर श्रीपूर नगरीचे वर्णन ' स्कंद पुराणात ' सापडते.
श्री लक्ष्मी पांडुरंगाशिवायही अनेक देवतांची मंदिरेही शहरात जागोजागी आहेत. १२ महादेव( ३ अन्य ), अष्टविनायक ( अन्य ३) , अष्टभैरव,नवदुर्गा, ११ मारुती याशिवाय श्री बालाजी, लक्ष्मी नारायण, एकमुखी दत्त, विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम, श्रीकृष्ण, शनी महाराज, श्री भगवान कार्तिकेय, खंडोबा अशी अन्य मंदिरेही आहेत. याशिवाय भारतात अत्यंत थोड्या ठिकाणी असणारे सूर्य मंदिरही होते पण सध्या ते अस्तित्वात नाही. त्याच बरोबर श्रीगोंदा नगरीत होऊन गेलेल्या विविध संताची मंदिरेही आहेत त्यात श्री संत शेख महम्मद महाराज, संत प्रल्हाद महाराज, संत गोधडे महाराज, संत राउळ महाराज, संत गोविंद महाराज चांभार, संत वामनराव पै यांचे गुरु संत नानामहाराज श्रीगोंदेकर, संत मोदोबा महाराज तेली अलीकडील काळातील संत तात्या महाराज महापुरुष असे विविध जाती- धर्मातील संत या भूमीत होऊन गेले त्या सर्वांची मंदिरेही शहरात आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्शही येथे झाला असून दांडेकर मळा येथे त्यांचे मंदिर आहे.

19/04/2026
श्री लक्ष्मी पांडुरंग अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम किर्तन सेवा  (माघ शु।। ५ अर्थात वसंत पंचमी शुक्रवार दि.२३ जानेवारी २०...
14/04/2026

श्री लक्ष्मी पांडुरंग अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम किर्तन सेवा (माघ शु।। ५ अर्थात वसंत पंचमी शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६)
ह.भ.प.अशोक महाराज आळेकर, श्रीगोंदा

श्री लक्ष्मी पांडुरंग अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम किर्तन सेवा (माघ शु।। ५ अर्थात वसंत पंचमी शुक्रवार दि.२३ जाने.....

10/04/2026
https://youtu.be/xO-bo72SmP0?si=1Gd-uIMi1XvGSHLp
20/03/2026

https://youtu.be/xO-bo72SmP0?si=1Gd-uIMi1XvGSHLp

shrigonda - नववर्षाच्या मुहूर्तावर लक्ष्मी पांडुरंग मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ. ...

Address

Shrigonda
413701

Telephone

+919960612304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर, श्रीगोंदा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर, श्रीगोंदा:

Share

Category