सदगुरु भाऊ महाराज

सदगुरु भाऊ महाराज Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सदगुरु भाऊ महाराज, Shahapur.

17/07/2025

🙏 सहवास भाऊंचा🙏
https://bhaumaharaj.com/bhau-maharaj/

|| श्री गुरुदेव दत्त || सदगुरू श्री भाऊ महाराज की जय
भालचंद्र महाराज की जय 🙏🙏🙏🙏👍👍👍

14/07/2025

🙏 गुरुपौर्णिमा २०२५🙏
https://bhaumaharaj.com/karyakram/gurupournima/

“न भूतो ..” असा अजब,अभूतपूर्व आणि भक्तिमय गुरुपौर्णिमा २०२५ उत्सव दहागाव वाशिंद _ प्रति गाणगापूर क्षेत्रात यशस्वीपणे पार पडला.

सकाळपासून समाधी पूजन, सामूहिक गुरूगीता पठण, गुरूपूजन आणि गुरुपादुका रुद्राभिषेक, अभंगवाणी वाद्यवृंद कार्यक्रम, महाप्रसाद सेवा आणि संध्याकाळी पार पडलेली दिव्य दत्त पादुका परिक्रमा – या सर्व कार्यक्रमांमधून लाभलेला अध्यात्मिक अनुभव शब्दात मांडणे कठीण आहे.

सदगुरू श्री भाऊ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अशीच सेवा घडत राहो हीच प्रार्थना!

|| श्री गुरुदेव दत्त || सदगुरू श्री भाऊ महाराज की जय
भालचंद्र महाराज की जय 🙏🙏🙏🙏👍👍👍

20/02/2025

श्रीदत्त पादुका पालखी परिक्रमा 2025 - व्हिडिओ 🍁🌹💐http://bhaumaharaj.com/bhaukarya/palakhiparikrama/

"जो वाहतो विश्वाची पालखी, त्याची पालखी आम्ही वाहतो" – सदगुरु श्री भाऊ महाराज.

दर माघी पौर्णिेमेनिमित ही पालखी गाणगापूर या ठिकाणी मूळ पादुकांना स्पर्शभेटी साठी नेली जाते. तिथे सात दिवस माघी अन्नदान सोहळा असतो. . या वेळची काही क्षणचित्रे इथे देत आहोत..

🙏🙏 || श्री गुरुदेव दत्त || 🙏🙏





श्रीदत्त पादुका पालखी परिक्रमा 2025..🌺🌻🍁🌹💐http://bhaumaharaj.com/bhaukarya/palakhiparikrama/"जो वाहतो विश्वाची पालखी, त्...
20/02/2025

श्रीदत्त पादुका पालखी परिक्रमा 2025..🌺🌻🍁🌹💐http://bhaumaharaj.com/bhaukarya/palakhiparikrama/

"जो वाहतो विश्वाची पालखी, त्याची पालखी आम्ही वाहतो" – सदगुरु श्री भाऊ महाराज.

दर माघी पौर्णिेमेनिमित ही पालखी गाणगापूर या ठिकाणी मूळ पादुकांना स्पर्शभेटी साठी नेली जाते. तिथे सात दिवस माघी अन्नदान सोहळा असतो. . या वेळची काही क्षणचित्रे इथे देत आहोत..

श्रीदत्त पादुका पालखी परिक्रमेचा मार्गक्रम
- बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 - 6.00 वाजता वाशिंदहून गाणगापूर साठी प्रस्थान. दुपारी पालखी पुण्यामधे सांगवे गावी प्रसादासाठी थांबून पुढे सुुरली-शिराळ गावी रात्री मुक्कामी.

- गुुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 अक्कलकोट कडे रवाना , तेथे प्रसादासाठी थांबून दुपारी 2.30 वाजता गाणगापूर मठात 5.30 च्या सुमारास पोचली.

- तद्नंतर पालखी पुढील 3 दिवस गाणगापूर मठात मुक्कामी व दिनांक 16 फेब्रुवारी, रविवार दुपारी 3 वाजता वाशिंद साठी रवाना. या दिवशी रात्री पंढरपूर येथे मुक्कामी राहीली.

- दिनांक 17 फेब्रुवारी, सोमवार सकाळीच पंढरपूर येथे दत्तयाग व दुपारी प्रसाद घेऊन पालखी आळंदीला मुक्कामी.

- दिनांक 18 फेब्रुवारी, मंगळवार पालखी आळंदीहूून वाशिंदसाठी रवाना व येताना दुपारी विश्रांतीसाठी श्री लाहोटे यांच्या गावी दत्त मंदिरात थांबली. तेथून थेट वाशिंद मठात 4 या वाजता पोहोचली.

🙏🙏 || श्री गुरुदेव दत्त || 🙏🙏





30/01/2025
19/02/2023

महाशिवरात्री..🌺🌻🍁🌹💐
http://bhaumaharaj.com/karyakram/utsavsohala/mahashivratri/

माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी... म्हणजेच महाशिवरात्र. या पवित्र दिवशी सद्गुरू शिवस्वरूपात असतात. त्यांच्यातील शिवतत्वाची पूजा यादिवशी करण्याची प्रथा आहे. नास्ती तत्वो गुरो परम.. म्हणजे गुरू तत्वासारखे दुसरे तत्व नाही, असे स्वतः महादेवांनी गुरुगीतेत सांगितले आहे. गुरुपूजन आणि हरिहर पूजन हे दोन्ही समांतर आहेत. यामुळेच गुरुचरित्रतील प्रत्येक अध्यायात शिव आणि विष्णु पूजना संबंधी विविध उपचार सुचविले आहेत. त्यातील अध्याय क्र. ३४ वा, यामधे भद्रसेन राजाच्या राजपुत्राला मृत्यूयोगाच्या गंडांतरापासून वाचवण्यासाठी रुद्राध्याय पठण आणि अभिषेक याचा उपाय पराशर ऋषी सुचवतात. सतत सात दिवस रुद्रपठणाने राजपुत्राचे गंडांतर टळते आणि राजपुत्र चिरंजिवी होतो. असे हे रुद्रपठण महादेवास अतिप्रिय आहे. म्हणूनच या रुद्राध्याय पठणाने शिवाला अभिषेक करण्याची सर्वत्र प्रथा आहे. यावेळेस महाशिवरात्रीनिमित्त, श्री क्षेत्र वाशिंद येथे, ब्रम्हवृदांच्या उपस्थितीत, रुद्रपठणाचा भव्य सोहळा संपन्न झाला. त्याचीच काही क्षणचित्रे येथे देत आहोत.

🙏🙏 ||ॐ नमः शिवाय || 🙏🙏
🙏🙏 || श्री गुरुदेव दत्त || 🙏🙏

Address

Shahapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when सदगुरु भाऊ महाराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to सदगुरु भाऊ महाराज:

Share