Samartha Seva Mandal, Sajjangad

Samartha Seva Mandal, Sajjangad Samartha Seva Mandal, Sajjangad At its core, the institution strives to uphold Dharma and fortify the nation.

Samarth Seva Mandal, established on 9th January 1950 by Shri Shreedhar Swami and Ramdas Mandali, is a renowned organization dedicated to promoting the teachings of Shri Ramdas Swami. The organization is committed to circulating Swami's teachings, advocating for a peaceful and guided way of life. A key aspect of their mission involves making Swami's unpublished works and scriptures accessible to th

e public. The Mandal, along with its school, actively conducts pravachans, teachings, and competitions based on these sacred texts. Through these initiatives, they aim to instill values of self-respect, respect towards Dharma, and patriotism among individuals. Furthermore, Samarth Seva Mandal organizes annual gatherings, creating a platform to raise awareness about Samarth Seva. This multifaceted approach reflects their dedication to promoting spiritual, moral, and patriotic values within society. With a rich history rooted in the teachings of Ramdas Swami, the organization remains a light of inspiration, guiding individuals towards a virtuous and enlightened way of life.

(३२)*किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा |**येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानिच ||३२||*श्लोक बात्तिसवा..!...
27/08/2026

(३२)
*किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा |*
*येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानिच ||३२||*

श्लोक बात्तिसवा..!🌺

हे गोविंदा, ज्यांच्यासाठी हे युद्ध जिंकायचे,राज्य स्थापन करायचे तेच सारे या रणांगणात समोर उभे आहेत.मग मला,आम्हाला त्या राज्याचा,सुखाचा,उपभोगाचा काय उपयोग आहे..?

कथार्थ -- अर्जुन इथे श्रीकृष्णाला गोविंद ह्या नावाने आवाहन करतो आहे.सर्व प्राणिमात्रांच्या इंद्रियांना तसेच गोमातेला सुख देणारा,पालन करणारा म्हणजे गोविंद होय.
सुखाची निर्मिती,सुखाचे संस्करण,अनुकरण घडवून आणणारा हा कृष्ण म्हणजेच गोविंद.
या सुखाचा अधिपती असलेल्या कृष्णा,हे युद्ध जिंकून,सर्वतोपरी याच लोकांचा नाश माझ्याकडून करवून मला तू सुख मिळवून देणार असशील तर त्या सुखाची अभिलाषा मी कशी करावी..?या साऱ्या नाशाला कारणीभूत मी होऊन ते सुख मला आनंद कसे देईल..?
वास्तविक सुख ही वैयक्तिक अनुभव अवस्था आहे.पण ती इतरांना दाखवणे किंव्हा त्याचे प्रदर्शन करणे,साजरे करणे यात मनुष्याला स्वारस्य जास्त असते.खऱ्या सुखाचा एकांतात अनुभव घेणे हे मनुष्याला शक्यतो आवडत नाही.प्रदर्शन करणे या मनुष्य सवयी प्रमाणे अर्जुनालाही हाच प्रश्न पडला आहे.युद्ध करून राज्य मिळवणे हा केवळ जय पराजयाचा विषय नसून हा संघर्ष न्याय अन्याय,पाप पुण्य या मधला आहे हे या मोहामुळे अर्जुन विसरू लागला आहे.

श्रीकृष्णार्पणमस्तु..!!

©प्रवीण मुकुंद कुलकर्णी
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
९८२२६३५९०२

*समर्थांचे साहित्यविश्व**स्फुट ओव्या -- ३३-५*🌺*प्राणीयासी लुलू सुटेना लोभाची |**तुटेना पाईची इच्छाबेडी ||९||**इच्छाबेडी ...
27/08/2026

*समर्थांचे साहित्यविश्व*

*स्फुट ओव्या -- ३३-५*

🌺
*प्राणीयासी लुलू सुटेना लोभाची |*
*तुटेना पाईची इच्छाबेडी ||९||*
*इच्छाबेडी तोडी श्रीरामसमर्थ |*
*पूर्ण मनोरथ रामदासी ||१०||*
🌺

समर्थ रामदास सांगतात...

प्राणिमात्रांचा एक दुर्गुण आहे तो लोभ,लालसा.तो अवगुण इतका चिकटून असतो की तो मृत्यूपर्यंत पाठ सोडत नाही.|
ही बेडी सोडवण्यासाठी कठीण आहे आणि त्यात तिला इच्छा नावाचा सम गुण सामील होतो.||९||

मात्र रामनाम,भगवंताची भक्ती ,उपासना हा एक सोपा उपाय आहे की जो ही बेडी सोडवू शकतो.|
आणि मन,अस्तित्व पूर्ण रामाच्या चरणी लीन म्हणजे रामदासी होऊन जाते.||१०||

श्रीराम..!

© प्रवीण मुकुंद कुलकर्णी
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
९८२२६३५९०२

(३१)*न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे |**न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ||३१||*श्लोक एकतीस ..🌺आपल्याच साऱ...
26/08/2026

(३१)
*न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे |*
*न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ||३१||*

श्लोक एकतीस ..🌺

आपल्याच साऱ्या स्वजनांची हत्या करून चांगले असे काय होणार आहे.?हे कृष्णा..या युद्धानंतर मिळणाऱ्या विजय,राज्य आणि त्यापासूनचे सुख याचा मी विचारही करू शकत नाही.

कथार्थ -- मनुष्याचे अंतिम ध्येय परमेश्वराचे चरण आहे.हे अंतिम सत्य असून सुद्धा मनुष्याला आपले नातेसंबंध,सगेसोयरे,मित्रपरिवार याचे आकर्षण वाटते.ही केवळ मायेने बद्ध अशी कारणे आहेत.ही माया भौतिकतेला जखडून ठेवून मन,बुद्धी यावर भ्रामक सुखाची झालर देते.समोरच्या नातेसंबंधात शत्रू म्हणून झालेला बदल या मायेत अडकल्यामुळे अर्जुनाला दिसत नाही. क्षत्रियाला युद्ध लढून मिळणारा इहलोक आणि पारलौकिक गौरव अर्जुनाला या नातेसंबंधापुढे फिका वाटू लागला आहे.तो कृष्णाला विचारतो आहे की अन्याय झाला म्हणून राज्याच्या रक्षणासाठी चालू झालेलं हे युद्ध आहे पण त्या युद्धात ज्या आप्तांना घेऊन राज्य उपभोगायचे ते नसतील तर त्या विजयाचा उपयोग काय..?

श्रीकृष्णार्पणमस्तु..!

©प्रवीण मुकुंद कुलकर्णी
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
९८२२६३५९०२

*समर्थांचे साहित्यविश्व**स्फुट ओव्या -- ३३-४*🌺*आहे हे आटले ते शून्य जाहले |**सुन्याही राहिले सस्वरूप ||७||**स्वरूप पाहिल...
26/08/2026

*समर्थांचे साहित्यविश्व*

*स्फुट ओव्या -- ३३-४*

🌺
*आहे हे आटले ते शून्य जाहले |*
*सुन्याही राहिले सस्वरूप ||७||*
*स्वरूप पाहिल्या काळवेळ गेली |*
*निजठेवि लाधली प्राणीयासी ||८||*
🌺

समर्थ रामदास सांगतात...

जे होते,जे साठवून ठेवले होते ते ही हळूहळू संपत जाते.ते नाहीसे होऊन शून्य होते.|
आणि ते शून्यच कायम मूळ रूप होऊन जाते.कारण तोच प्रत्येक वास्तूचा अंतिम स्थायिभाव आहे.||७||

हे शून्याचे रूप जेव्हा कळते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.हाती काही रहात नाही समजून घ्यायला अवघा जन्म जातो.|
अर्थात प्रत्येक प्राणिमात्राची मनाची स्थिती हीच असते.शून्य होणारे खात्री असून जमवाजमवी चालू असते.||८||

श्रीराम..!

©प्रवीण मुकुंद कुलकर्णी
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
९८२२६३५९०२

(३०)*न च शोकम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: |**निमित्तानी च पश्यामि विपरीतानी केशव ||३०||*श्लोक तिसावा..!🌺अर्जुन स्वतःची स्...
25/08/2026

(३०)
*न च शोकम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: |*
*निमित्तानी च पश्यामि विपरीतानी केशव ||३०||*

श्लोक तिसावा..!🌺

अर्जुन स्वतःची स्थिती वर्णन करताना सांगतोय की माझी उभ रहाण्याची ताकद संपत चाललीये अस वाटू लागलं आहे.स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडून माझं मन भ्रमित होईल अस वाटू लागलं आहे.हे केशवा(ज्याने केशी दैत्याचा वध केला आहे.अशा श्रीकृष्णा..) मला फक्त वाईटच दिसू लागले आहे.

कथार्थ -- मनुष्य जेव्हा सहृदयी असतो त्यावेळी त्याला संघर्षाच्या वेळी असे विचार सुचू लागतात.युद्धाची परिणीती ही फक्त जीवहानी,वित्तहानी एवढीच नाहीतर त्यामुळे निर्माण झालेले मनावरचे घाव दीर्घकाळ टिकतात ही जरी वस्तुस्थिती असली तरी योद्ध्याला पर्याय नसतो.नसावा. क्षत्रियाला युद्ध ही अपरिहार्यता आहे.तिथे मानसिक द्वंद्वाला स्थान नाही.भौतिक गोष्टींचा आश्रय घेऊन अर्जुन गलीतगात्र होत चालला आहे.ज्यातून दुःखच निर्माण होणार आहे ते करून मी काय करू अशी भावना त्याची होत चालली आहे.या साऱ्या दुःखाला मी कारणीभूत होईन अशा प्रकारची भीती त्याच्या मनात उत्पन्न झाली आहे.ह्या अवस्थेला थोड्या सोप्या भाषेत सद्गुणविकृती म्हणतात.

श्रीकृष्णार्पणमस्तु..!!

©प्रवीण मुकुंद कुलकर्णी
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
९८२२६३५९०२

*समर्थांचे साहित्यविश्व**स्फुट ओव्या -- ३३-३*🌺*जे जयासी व्याले ते त्याने भक्षिले |**अंती उरले ते शून्य एक ||५||**शून्याच...
25/08/2026

*समर्थांचे साहित्यविश्व*

*स्फुट ओव्या -- ३३-३*

🌺
*जे जयासी व्याले ते त्याने भक्षिले |*
*अंती उरले ते शून्य एक ||५||*
*शून्याचे स्वरूप पाहता काही नाही |*
*ते शून्य जेथे सर्व आटे ||६||*
🌺

समर्थ रामदास सांगतात...

परब्रम्हापासून पंचमहाभूते आणि त्यातून माया आणि नंतर सृष्टी हे निर्माण झाले.ज्याने हे निर्माण केले तोच तिचा भक्षणाचा अधिकारी आहे.ज्याला प्रलय म्हणतात.|
तो प्रलय पूर्ण होऊन शेवटी रहाणार ते शून्यच आहे.||५||

शून्याचे मूर्त स्वरूप पाहायला गेलो तर ते काहीच नसते.सर्व गोष्टींचा आभाव म्हणजे शून्य.|
ते शून्य जे आहे तिथे सगळ्याचे अस्तित्व संपून जाते.मूर्तहिन स्वरूप म्हणजे शून्य होय.||६||

श्रीराम..!

©प्रवीण मुकुंद कुलकर्णी
श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड
९८२२६३५९०२

24/08/2026
24/08/2026

••|| लघुरुद्र वेदसेवा - सर्व महानुभाव वैदिक मंडळी ||••

पवित्र अशा श्रावण महिन्यात श्रीसमर्थ सेवा मंडळ, विले पार्ले पूर्व केंद्रातर्फे सद्गुरू चरणी वेदसेवा अर्पण केली.
लघुरुद्र सेवा अर्पण - ब्रह्मवृंद नावे:

वेदमूर्ती विष्णु कुडके
वेदमूर्ती प्रसन्न आचार्य
वेदमूर्ती मंदार शिकेरकर
वेदमूर्ती ओंकार पाध्ये
वेदमूर्ती सर्वज्ञ माईणकर
वेदमूर्ती वल्लभ आठल्ये
वेदमूर्ती निलेश परांजपे
वेदमूर्ती सुयश पाध्ये
वेदमूर्ती दीपक जोशी
वेदमूर्ती केतन शहाणे
वेदमूर्ती विश्वास परांजपे
वेदमूर्ती विनोद खरे
वेदमूर्ती अर्पित जोशी
वेदमूर्ती सतीश जोशी

#हिंदू #समर्थ #महाराष्ट्र ゚ #भारत

Address

Shri Samarth Seva Mandal, Sajjangad
Satara
415013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samartha Seva Mandal, Sajjangad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Samartha Seva Mandal, Sajjangad:

Shortcuts

Share

Category