Sarvajanik Krida Ganeshotsav Mandal Sawli

Sarvajanik Krida Ganeshotsav Mandal Sawli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sarvajanik Krida Ganeshotsav Mandal Sawli, Religious organisation, Sangrampur.

श्री लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने सावली गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १९८४ साली झाली. १९९४ साली "सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ सावली" ची नोंदणी करण्यात आली. ह्या उपरोक्त मंडळाची सध्या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे. सार्वजनिक उत्सव मंडळात सर्वात जास्त प्रसिद्धी लाभलेले हे साताऱ्यातील एकमेव मंडळ असून गेली 33 वर्ष वर्गणी विरहित गणेशोत्सव साजरा करत सर्व कार्यकर्त्यांच्

या एकजूट परिश्रमातून हे मंडळ आज नावारूपास आलेले आहे. सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ हे सामाजिक क्षेत्रात उत्सवाच्या माध्यमातून उपक्रम राबवून समाज जीवन व शैक्षणिक क्षेत्रात व आरोग्य विषयक कामात हातभार लावत आलेले आहेत.आजपर्यंत या मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीरे, शाळेतील मुलांना वह्या वाटप, गावातील शाळांना संगणक वाटप तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.आजपर्यंत मंडळ लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करत आले आहे. गणेशोत्सवादरम्यान सजावटीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक च्या वस्तू अथवा पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा वस्तूंचा वापर केला जात नाही. गणपतीची मिरवणूक गुलाल विरहित व डॉल्बीमुक्त काढली जाते. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा समावेश असतो. "सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ सावली" हे गेली 33 वर्षे सामाजिक बांधिलकी जपून आपल्या कार्याचा ठसा सर्वत्र उमटवत राहिले व या पुढे देखील असेच कार्य करून सर्वांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहील. ह्या मंडळाच्या नावरुपास येण्यास सर्व गणेशभक्तांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला असून त्यांच्या सहकार्यानेच आम्ही हे कार्य करत आलो, त्यामुळे सर्वांचे शतशः जाहीर आभार.
धन्यवाद!!
गणपती बाप्पा मोरया!!!

Address

Sangrampur
444201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarvajanik Krida Ganeshotsav Mandal Sawli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share