श्रीसिध्दराज मंदिर, कवठे एकंद

  • Home
  • India
  • Sangli
  • श्रीसिध्दराज मंदिर, कवठे एकंद

श्रीसिध्दराज मंदिर, कवठे एकंद भगवान कपिलमहामुनींचे संजीवन समाधीस्थान 🙏🏼

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यात कवठे एकंद नावाच्या गावी श्रीसिध्दराजांच े हे एक जागृत स्थान असून महाराष्ट्राच्या च नव्हे तर संपुर्ण देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या असंख्य भाविकांचे कुलदैवत म्हणून त्यांची आराधना आजही होत आहे. हे स्थान आदिसिध्द श्रीकपिल महामुनींची समाधी आहे, असे या गावातील असंख्य भाविक हजारो वर्षांपासून सांगत आले आहेत.
कवठे एकंद हे गाव सांगली-तासगांव रस्त्याला लागूनच वसले आहे. गावाजवळच एस.टी. गाड्यांचा थांबा आहे. सांगलीहून येणार्‍या प्रवाशाला सुमारे अठरा किमी व तासगांवहून येणार्‍याला सुमारे सहा किमी दूर असे हे गाव आहे. कवठे एकंदच्या या थांब्यावर उतरल्यानंतर पुर्वेकडे जाणारा एक प्रशस्त रस्ता आपणांस गावात घेऊन जातो. सांगलीजिल्ह्यात कवठे नावाची एकाहून अधिक गावे असल्यामुळे सांगली-तासगांव रस्त्यावरील या गा वाला तासगांव कवठेअथवा बिर्‍हाडसिध्दाच े कवठे अशा नावांनी सर्वजण ओळखतात.
दसर्‍या दिवशी येथील श्रीसिध्दराजांच ्या (श्रीबिर्‍हाडसि ध्द) पालखीपुढे अखंड आतषबाजी केली जाते. म्हणून या गावांस 'दारुचे कवठे' असेही म्हणतात. श्रीसिध्दराजांन ा वास्तव्यासाठी कवठे येथील अरण्यात एकांत लाभला म्हणून कवठ्यास 'कवठे एकंद' हे नाव पडले असावे असेही येथील जाणाकारांचे मत आ हे.
कवठ्याच्या एस.टी. थांब्यावर उतरुन पुर्वेकडे जाणार्‍या रस्त्याने पुढे पाच मिनिटांचे अंतर चालून गेल्यावर उजव्या हातास रस्त्याच्या कडेलाच एक शोभिवंत, दगडी कमान आपल्या दृष्टिपथात येते. कमानीतून आत प्रवेश केल्यावर समोरच मजबूत तटबंदी असलेली एक इमारत दिसते. चारही बाजूंना भक्कम तटबंदी व प्रत्येक कोपर्‍यात एक बुरुज असे तटबंदीचे स्वरुप पाहिल्यावर येथे एखादा किल्ला किंवा गढी असावी, अशी शंका येते. पण आपण तटबंदीच्या जसजसे जवळ जाऊ, तसतसे समोरील दगडी प्रवेशद्वार व प्रवेशद्वारातून आत पाहिल्यावर शिवमंदिरासमोरील नंदी, विठ्ठल-रखुमाईच् या मुर्ती व दिपमाळ दृष्टीस पडते. या तटबंदीस पुर्वेकडे व उत्तरेकडे अशी दोन भव्य व भक्कम प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी श्रीयंत्राकार पद्धतीचे चिरेबंदी मंदिर, त्यापुढील प्रशस्त मंडप आणि मंदिर व मंडपाच्या भोवतीची तटबंदीपर्यंतची फरसबंद जागा या गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात. हेच ते श्रीसिध्दराज (श्रीबिर्‍हाडसि ध्द) मंदिर होय.
कृतयुगात आदिमाधव, त्रेतायुगात बाळकृष्ण, द्वापारयुगात आदिबस्व आणि कलियुगात श्रीबिर्‍हाडसिध ्द या नावांनी भाविकांना पुरातन काळापासून परिचित असणार्‍या व भगवान श्रीविष्णूचा पाचवा अवतार असलेल्या श्रीकपिल महामुनींच्या समाधीचेही हेच ते प्रसिध्द स्थान. ही परंपरा पाहिल्यावर या स्थानाचे प्राचीनत्व आपणासमोर हळूहळू साकार होऊ लागते.
मित्रांनो श्रीसिध्दराजांचा महिमा हा अनंत व अगाध आहे, तो आंतरजालाच्या एवढ्या छोट्याशा पानावर उतरविणे केवळ अशक्यप्राय आहे, एवढेचं सांगेन की भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भग्वदगीतेत सांगितल्या प्रमाणे " योगक्षेम वहाम्यहम... " ह्या वचनानुसार महाराज हजारो वर्षांपासून आपल्या चरणांशी येणार्‍या भक्तांचा योगक्षेम वहात आहेत.
सिध्दस्थान महापवित्र रमले जे भक्तीने या स्थळी मोक्षद्वार तया निरंतर खुले बाधे कधी ना कलि l
आधिमाधव बालकृष्ण भजनीज्यांची गिरा रंगली त्यांचे जन्मूनी सार्थजिवित खरे झाले हिरे सत्कुली ll

ll शुभं भवतु ll

Address

Kavathe Ekand
Sangli
416307

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीसिध्दराज मंदिर, कवठे एकंद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्रीसिध्दराज मंदिर, कवठे एकंद:

Shortcuts

Share

Category