Junner Vidhan Sabha Matadar Sangh

Junner Vidhan Sabha Matadar Sangh Junner Vidhan Sabha Matadar Sangh

youtube  चॅनेल व न्युज पोर्टल सध्या असंख्य होत आहेत. रोज एक चॅनेल आणि वेबपोर्टलच्या लिंक पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी पत...
29/08/2018

youtube चॅनेल व न्युज पोर्टल सध्या असंख्य होत आहेत. रोज एक चॅनेल आणि वेबपोर्टलच्या लिंक पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी पत्रकारांची कमतरता भासत आहे. जाहिरातीद्वारे काम करण्याची संधी दिली जात आहे. मात्र मानधन अथवा पगार देण्यास ते सक्षम नाहीत. जाहिराती गोळा करून कमिशन मिळावा किंवा काम पाहून पगार दिला जाईल असे सांगितले जात आहे. मात्र आमच्या वेबपोर्टल साठी पत्रकार नको आहेत . म्हणजे पगार अथवा मानधनावर काम करणारे नकोत . आपला स्वतःचा व्यवसाय करणारे हवे आहेत. मालक हवे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या वेबपोर्टलच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक विधानसभेसाठी वेबपोर्टल चालवण्यासाठी मालक संपादक हवे आहेत.
www.vsabha.com
अधिक माहिती साठी.
7709906623
[email protected]

30/11/2015

पुष्करिणी घालतेय पर्यटकांना साद

बेल्हे गावातील मंदिरामध्ये असलेल्या व पर्यटकांना आकर्षित करणार्‍या याच त्या आकर्षक पुष्करिणी. ■ मंदिराच्या बाहेर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पुष्करणी. पश्‍चिमेकडील मंदिरांमध्ये हा प्रकार खूप ठिकाणी आहे. पवित्र होऊन मंदिरात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली पाण्याची सुविधा किंवा पायर्‍यांची विहीर, पाषाणावर कोरीव कलाकुसर असलेली पाण्याची टाकी म्हणजेच पुष्करणी होय. मंदिराची भव्यता, मंदिराचे महत्त्व यावरूनही पुष्करणीच्या कोरीव कामात कमी अधिकता दिसून येते. राजुरी : जुन्नरला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यापेक्षाही जुना इतिहास मंदिर वास्तुकलेचादेखील आहे. जुन्नरमध्ये असणार्‍या प्राचीन मंदिरांजवळ काही विशिष्ट बांधकामे आढळतात. ते आपले लक्ष नेहमीच आकर्षित करत असतात. पुष्करिणी त्यापैकीच एक आहे. काही ठिकाणी किल्ल्यावर पुष्करिणी आहेत, तर काही ठिकाणी फक्त पुष्करिणी आहेत. मग नुसत्या पुष्करिणी अस्तिवात असणार्‍या जागा काही वेगळाच इतिहास सांगू पाहत आहेत.
बेल्हेजवळील प्राचीन पुष्करिणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत, अशी माहिती जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना हाडवळे म्हणाले, की प्राचीन काळापासून पुष्करिणी हा मंदिरांचा एक अविभाज्य घटक म्हणून निर्मिला गेला आहे. तत्कालीन बांधकामशैलीच्या वैशिष्ट्यानुसार पुष्करिणीचे विविध आकार आणि प्रकार आहेत. त्यांना भारतातील विविध भाषांमध्ये विविध नावे आहेत,
जसे की पुष्करिणी, कल्याणी, कुंड, सरोवर तीर्थ, तालाब, पुखुरी आणि अजुन खूप काही. मुळात जगाच्या पाठीवर सर्वात पहिले मंदिर जरी सूर्याचे बनविले गेले असले तरी काळानुरूप होत गेलेल्या बदलात आर्थिक सुबत्ता आणि त्यातून झालेला कलेचा विकास हा मंदिर वास्तुकलेत प्रतिबिंबित झाला.
हाडवळे म्हणाले, जुन्नर शहराजवळील पंचलिंग मंदिरातील पुष्करिणी आणि बेल्हे गावातील शेवटच्या घटका मोजत असलेली पुष्करिणी अशा मुख्यत्वे तीन पुष्करण्या आढळतात. जुन्नरच्या पुढे टाकळी ढोकेश्‍वरजवळ असणार्‍या पळशीगावीसुद्धा १८व्या शतकातील विठ्ठल मंदिराजवळ एक सुस्थितीतील पुष्करिणी आढळते.
चावंड किल्ल्यावरील पुष्करिणी आणि तिचे कोरीवकाम पाहता, त्याठिकाणी तत्कालीन भव्य असे मंदिर असावे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो, असे सांगून हाडवळे यांनी या ऐतिहासिक स्थळाविषयी सांगितले की, चावंड किल्ल्याची जुन्नरमधील जागा, किल्ल्यावरील इतर बांधकामांचे अवशेष बघता इथे नक्कीच कोणीतरी तत्कालीन इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती वास्तव्याला होत्या यास दुजोरा मिळतो. पंचलिंग मंदिरातील पुष्करिणी आजही वापरात आहे. (वार्ताहर) हेमाडपंती बांधकामशैली
■ हेमाडपंत यांनी निर्मिलेल्या मंदिरांच्या शिल्पकलेला त्यांच्याच नावाने अर्थात हेमाडपंती बांधकामशैली म्हणून संबोधले जाऊ लागले आणि पुढे त्याचे नाव हेमाडपंती झाले. हेमाडपंत हा कुठला पंथ नसून ते हेमाडपंत या नावाचा अपभ्रंश आहे. मध्य भारतात मंदिरांच्या शिल्पकलेचा विकास होत असताना उत्तर आणि दक्षिण भारतीय शैली एकत्रित करून वेगळीच दख्खनची बांधकामशैली विकसित झाल्याचे दिसते.
■ या दख्खन बांधकामशैलीत हेमाडपंत यांचा खूप महत्त्वाचा वाटा नंतरच्या काळात राहिला आहे. मंदिर बनविण्याची जागा निवडताना शक्यतो पाण्याच्या काठची निवडली जाते. साधारणपणे मंदिरे बनवत असताना मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप, त्यावरचे गोपुरम (द्रविडीयन पद्धती), गर्भगृह व त्यावरचे शिखर म्हणजे कळस असे विविध भाग पाडले जातात व त्यावर विशेष काम केले जाते. ■ पुष्करिणीच्या बांधकामाच्या वेळी पुष्करिणीत येणारे पाणी आणि आणि त्यातून होणारा विसर्ग याचे व्यवस्थित नियोजन केलेले असते.
■ आयताकृती किंवा चौरसाकृती आकाराच्या पुष्करिणीची जागा ही शक्यतो मंदिराच्या दर्शनी भागात असते, की जेणेकरून येणार्‍या भाविकांना शुचिर्भूत होऊन असेच पुढे मंदिरात जाता यावे.
■ पुष्करिणीच्या पूर्व पश्‍चिम बाजूला उतरण्यासाठी व बाहेर येण्यासाठी पायर्‍यांची रचना असते.
■ पुष्करणीच्या दगडी बांधकामासाठी दगडांना इंटरलॉकिंग सिस्टिम केलेली असते, ज्यामुळे आज हजारो वर्षांनीही आहे तशाच अवस्थेत पुष्करण्या आजही पाहायला मिळतात.

14/08/2015
या परिसरातील आपल्या व्यवसायाची माहित द्या आणि आपला व्यवसाय वाढवा.http://junner.vsabha.com/search_cpt/
31/07/2015

या परिसरातील आपल्या व्यवसायाची माहित द्या आणि आपला व्यवसाय वाढवा.
http://junner.vsabha.com/search_cpt/

29/06/2015

मावळ पट्ट्याची मजुरीकडे वाटचाल
जुन्नर (जि. पुणे) - एकेकाळी मॉन्सूनचा शाश्वत पाऊस, त्यावर भात, नाचणी, वरई, सावा आदी धान्यांचे मुबलक उत्पादन आणि जोडीला वन उत्पादने, यामुळे संपन्न आणि स्वयंपूर्ण असलेला जुन्नर तालुक्याचा पश्चिम भाग मॉन्सूनच्या लहरीपणामुळे शेतीकडून शेतमजुरीकडे लोटला गेला आहे. संपन्नतेचा वारसा असणारी अनेक पिके, वाण बाजूला पडली आहेत. शेती परवडत नाही म्हणून मजुरी सुरू झाली आहे.

जुन्नर हे पूर्वापार महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी केंद्र राहिल आहे. मॉन्सूनच्या मार्गाने जगभरातील व्यापारी पूर्वी कल्याण बंदरावर दाखल होत. तेथून नानेघाट - जुन्नर - नगर मार्गे पैठणपर्यंत व्यापार होई. या सर्व मार्गावर मॉन्सून आणि जंगलाची मोठी छाया होती. आजही आहे. आजही या भागातील शेती, हवामान, राजकारण, अर्थकारण याच मार्गाभोवती फिरते. त्या सर्वांवर गेल्या काही वर्षांत मॉन्सूनने मोठी स्थित्यंतरे घडवून आणली आहेत.

21/06/2015

एक विशिष्ठ भूमिकेतून आम्ही हे संकेत-स्थळ निर्माण केले आहे. मागील काळात घडलेल्या काही घटना,आंदोलनांनी समाजाची राजकारणाकडे पाहण्याची भावना बदली आहे.ती बदल्यांच्या दृष्टीनेआपल्या लोकप्रतिनिधींची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचावी राजकारणाचे विविध पैलू,राजकारण्यासाठी एक व्यासपीठ आणि मतदारांनी मतदान करण्याच्या उद्देशाने ह्यासंकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली असून राजकारणाचे पाया असणारया सामान्य जनता,विविध पक्ष,प्रतिनिधी आणि सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करून या संकेतस्थळाची बांधणी करण्यात आली आहे.या संकेतस्थळावर सर्व पक्ष संघटना, नेते आणि लोकप्रतिनिधींची माहिती उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून….यातून सामान्य जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्यास मदत होईल.मतदान वाढण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.तसेच माहितीचा अधिकार, जनलोकपाल विधेयक,दैनदिन राजकीय घडामोडींची माहिती देखील आपणास या संकेत-स्थळावर मिळेल.लोकप्रतिनिधी यावर आपली सर्व माहिती,कार्यक्रम,जाहीरनामा देऊ शकतील तसेच निवडणुकीच्या दृष्टीने आवशक सर्व माहिती, विविध प्रकारचे फॉर्म्स,आचारसंहिता विषयक माहिती, मागील निवडणुकींचा आढावा देखील लोक-प्रतिनिधीना उपयुक्त ठरेल.
श्रीनाथ प्रकाशन,
शॉप न.२, सहारा प्रेस्टीज ; भेकराई नगर; फुरसुंगी- ४१२३०८ यावर पाठवू शकता.
mo-7709906623

19/06/2015

माननीय मोहदय;
प्रत्येक पिढीला एका नव्या मध्यमाची ओळख झाली. या माध्यमातून त्या पिढीचे जीवन प्रगतिपथावर आले. अशाच एका माध्यमाच्या सहायाने नव्या पिढीच्या समोर या विधान सभा मतदार संघाच्या इतिहासासह येथील सामाजिक ; शैक्षणिक; भौगोलिक; राजकीय; सांस्कृतिक;महिला व तरुण विश्व आणि व्यावसायिक क्षेत्राची माहिती संग्रही ठेवण्याचा प्रयत्न या संकेत्स्थालाव्दारे केला जात आहे.
या संकेत्स्थालावर सर्व प्रकारची माहिती जी सर्वांच्या मदतीसाठी उपयोगी ठरेल.अशी माहिती कोणत्याही मध्यमाव्दारे पठविल्यास त्यास विनामूल्य प्रसिधी दिली जाईल. एक नवा माहिती-संग्रह लोकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे .त्यासाठी सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग आवशक आहे. आपण विविध प्रकारची माहिती; साहित्य संबधी माहिती ; छायाचित्रे ; मते [email protected] च्या अथवा श्रीनाथ प्रकाशन, फ्लेट नं. १०; संकल्प मार्केट ; भेकराई नगर;फुरसुंगी- ४१२३०८ यावर पाठवू शकता.मो .7709906623

Address

Junnar
Pune
410502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Junner Vidhan Sabha Matadar Sangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category