|| श्री जयती गजानन प्रसन्न ||
"अग्रपूजनाधिकारी"
"पुण्यनगरीचे आराध्य"
"ग्रामदैवत श्री कसबा गणपती ,पुणे." "ग्रामदैवत श्री कसबा गणपती" याचे मूळ नाव हे “श्री मोरया” असे आहे.
त्यानंतर "श्री छत्रपती शिवाजी महाराज" ह्यांचा काळात ह्या "श्री मोरयाचे नाव" महाराज ह्यांनी “श्री जयति गजानन” असे ठेवले. त्याचा उल्लेख आजही आहे. "श्री जयति गजानन" म्हणजेच,
"जय मिळवून देणारा गजानन !"
"छत्रपती शिवाजी महाराज" ह्यांच
्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींत,मोहिमेमध्ये यश आणि विजय मिळवून देणारा हा गणपती,
आजही त्याच्या भक्तगणांना याची प्रचिती देतो आहे. "इतिहास तज्ज्ञांच्या मते ७०० वर्षांपासून पुण्यनगरीत म्हणजेच पुणे येथे श्री गणेशाचे पुजन होत आहे. म्हणजेच यादवकाळापासुन, पुणे हे महाराष्ट्रतील पहिले गाव असेल की जेथे श्री गणेशाचे वास्तव्य निरंतर आहे.ह्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत, यादव राजवटीच्या कालखंडानंतर, निजामाच्या कारकिर्दीतही श्री मोरयाचे पुजन होत आले आहे."
आजचा "श्री कसबा गणपती", "श्री जयति गजानन", याचे अस्तित्व इसवी सन १६१३ पासुन म्हणजे अगदी निजामशाहीपासून असल्याचे सिद्ध झाले आहे.
तसेच,
ह्या "श्री मोरया","गजाननाची पूजाअर्चा व इतर सर्व व्यवस्था ही शिवकालापासुन श्री.ठकार ह्यांच्या घराण्याकडे परंपरेने आहे."
या परंपरेचे पालन करीत,
आजही मंदिरात सर्व उत्सव (माघ, ज्येष्ठ आणि भाद्रपद) मोठ्या थाटात साजरे होतात. ह्याचा उल्लेख श्री गणेश कोशातही केलेला आढळतो.(पहा पृष्ठ क्र.१६०).
श्री मोरया,गजाननाचे हे प्राचीन देवस्थान सर्व भाविकांच्या व गणेशभक्तांच्या भक्तिभावाने अत्यंत जागृत असे असुन,
श्रद्धाळुंना त्याची नित्य प्रचिती येत असते.
मंदिरात आजही श्रींची सकाळ आणि दुपारी महापुजा, रात्री शेजआरती व धुपार्ती तसेच विशेष प्रसंगी श्री मोरयाला वस्त्रालंकारचा पोषाख असा नित्यक्रम असतो.
या मोरयाचा कृपाप्रसाद समस्त भाविकां आणि गणेशभक्तांना प्राप्त व्हावा यासाठीच ह्या संकेतस्थळाच प्रपंच आहे. instagram handle-
॥ "माझ्या मोरयाचा धर्म जागो" ॥
��