Jeevan Kala Mandir Dehu

Jeevan Kala Mandir Dehu Socio-Philosophical organization for propagation of Poornawad Philosophy which advocates living life as an art and with high moral values.

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज श्री सद्गुरुनाथ प.पू. विष्णू महाराजांना त्यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच...
28/06/2025

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज श्री सद्गुरुनाथ प.पू. विष्णू महाराजांना त्यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा... !!! 💐💐💐
त्यांच्या चरणीं शिरसाष्टांग नमस्कार ...🙏🙏🙏

🙏|| जय पूर्णवाद ||🙏

🙏।।दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन।। 🙏🙏🌺श्रीदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏
07/12/2022

🙏।।दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन।। 🙏

🙏🌺श्रीदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏

🙏🏻🙏🏻जेव्हा एकटे असाल, तेव्हा सदगुरुंशी बोला. जेव्हा सगळ्यां सोबत असाल, तेव्हा सदगुरुं बद्दल बोला🙏🏻🙏🏻                    ...
02/12/2022

🙏🏻🙏🏻जेव्हा एकटे असाल, तेव्हा सदगुरुंशी बोला. जेव्हा सगळ्यां सोबत असाल, तेव्हा सदगुरुं बद्दल बोला🙏🏻🙏🏻

🌹जय पूर्णवाद*🌹

🌷🙏🙏🙏🙏गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणिअखंड वाहणारा झरा..गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती...
23/07/2021

🌷🙏🙏🙏🙏

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे
मूर्तिमंत प्रतिक..

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

🙏🙏🙏

प.पूज्य दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹🙏

🙏प.पू. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
22/07/2021

🙏प.पू. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

29/12/2020

🙏श्री दत्ताची आरती - एक चैतन्य आविष्कार🙏

श्री दत्ताची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन'च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे.

आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल.

।। श्री दत्ताची आरती।।

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।

दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।
- संत एकनाथ

आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ:

आता आपण या आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते.

१. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।’ याचा अर्थ दत्त हा (कार्यानुरूप) त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे तीन देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत, म्हणजे अनुक्रमे रज, सत्त्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात.

२. ‘नेति नेति शब्द न ये अनुमाना ।’ याचा भावार्थ वेदांनी श्री दत्ताचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने ‘नेति, नेति’ म्हणजे ‘असे नाही, असे (ही) नाही’, एवढेच ते सांगू शकले.

३. ‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।’ म्हणजे आत-बाहेर पूर्णपणे तू एक दत्त केवळ गुरुतत्त्वरूप, ईश्वरतत्त्व असलेला आहेस.

४. ‘अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।’ म्हणजे आम्हा अभागी, दुर्दैवी लोकांना तुझे माहात्म्य कसे कळणार?

५. ‘पराही परतली तेथे कैंचा हेत ।’ म्हणजे श्री दत्ताचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली त्यात कोणता हेतू असावा बरे? दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्याने परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली.

६. ‘जन्ममरणाचा पुरलासे अंत ।’ याचा भावार्थ आहे, श्री दत्ताचे स्वरूप नित्य आणि अनादी-अनंत असे आहे. तिथे जन्ममरण हे शब्दच संपतात.

७. ‘जन्ममरणाचा फेरा चुकविला ।’ याचा भावार्थ जन्ममरणाच्या फेर्‍यातून माझी सुटका केली. मला मोक्ष (टीप) दिला, असा आहे.

८. ‘मीतूपणाची झाली बोळवण ।’ याचा भावार्थ आहे, अद्वैतावस्था प्राप्त झाल्याने मी-तू हा आपपरभाव संपला आहे.

‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो आणि भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना आहे🙏

।।जय पूर्णवाद।।🙏

🙏🌸श्री गुरुदेव दत्त🌸🙏🙏दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏जय पूर्णवाद🙏
29/12/2020

🙏🌸श्री गुरुदेव दत्त🌸🙏

🙏दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

🙏जय पूर्णवाद🙏

19/05/2020
18/05/2020
🙏पूर्णवाद उत्सव 2020🙏
14/05/2020

🙏पूर्णवाद उत्सव 2020🙏

Address

At Abhangnagari, Dehu
Pune
412109

Telephone

+917304340621

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Kala Mandir Dehu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category