शक्तिपीठ नायिका - Shaktipeeth Nayika

  • Home
  • India
  • Pune
  • शक्तिपीठ नायिका - Shaktipeeth Nayika

शक्तिपीठ नायिका - Shaktipeeth Nayika अखंड भारत भूमिची अंबिका श्री "शक्तिपीठ नायिका"
(2)

आज अश्विन शुक्ल पक्ष ८/९ विश्वावसु नाम संवत्सरेशके १९४७ शुक्रवार दि. ३०/०९ /२०२५ श्री तुळजाभवानी मातेस महिषासुरमर्दिनी अ...
30/09/2025

आज अश्विन शुक्ल पक्ष ८/९ विश्वावसु नाम संवत्सरे
शके १९४७ शुक्रवार दि. ३०/०९ /२०२५ श्री तुळजाभवानी मातेस महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा दुर्गाष्टमी उपवास.

महत्व :
साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानी मातेने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला.त्यामुळे महिषासूरमर्दिनी ह्या स्वरुपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते.आज तुळजाभवानी मंदिरात असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये दुपारी ०२ वाजता होमहवनास सुरुवात होवून संध्याकाळी ०६:१५ वाजता होमामध्ये कोहळा व नारळ याची पूर्णाहुती दिली जाते.

आज सोमवार दिनांक : २९ / ०९ /२०२५ विश्वावसू नाम संवत्सरे शके १९४७ आज अश्विन शुक्ल ७ तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी मात...
29/09/2025

आज सोमवार दिनांक : २९ / ०९ /२०२५ विश्वावसू नाम संवत्सरे शके १९४७ आज अश्विन शुक्ल ७ तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी मातेस 'भवानी तलवार अलंकार' महापूजा

महत्व :- स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते

अश्विन शु. ६ शके १९४७ रविवार २८ /०९ /२०२५ श्री तुळजाभवानी मातेस  शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना .महत्व : भगवान वि...
28/09/2025

अश्विन शु. ६ शके १९४७ रविवार २८ /०९ /२०२५ श्री तुळजाभवानी मातेस शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना .

महत्व : भगवान विष्णू शेषशैय्येवरती विश्राम करत असताना मातेने यांचे नेत्रकमळात विश्राम घेतला यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांचा वध
ब्रह्मदेवाने देवीची स्तुती करून देवीस जागे केल्यावर अंबामातेने त्यांचा वध केला. त्यानंतर विष्णूने आपली शैय्या
श्रीदेवीस अर्पण केली. त्यामुळे शेषशाही अलंकार पूजा या रुपात देवीस सजवले जाते.

या देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।अश्विन शु.५ शके १९४४ शनिवार दि. २७/०९/२...
27/09/2025

या देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।

अश्विन शु.५ शके १९४४ शनिवार दि. २७/०९/२०२५ श्री तुळजाभवानी मातेस मुरली अलंकार महापूजा भोपे पुजारी यांच्याकडून मांडली जाते.

महत्व:
तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव,देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्री देवीस अर्पण केली. त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते. श्रीदेवीने मुरली वाजविल्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले...!!

आईराजा उदो उदो...!!

*||श्री भवानीदेव्यै नम:||**|| नवरात्र उत्सव, वार- शुक्रवार दिनांक-२६-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा व...
26/09/2025

*||श्री भवानीदेव्यै नम:||*
*|| नवरात्र उत्सव, वार- शुक्रवार दिनांक-२६-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा व वाघ वाहनावर छबीना काढण्यात आला. 🚩🙏🏻*🌸

आज अश्विन शु चतुर्थी /पंचमी  (४/५) शके १९४७ दि:- २६/०९/२०२५. शारदीय नवरात्रौत्सव श्रीतुळजाभवानी देवीची विशेष रथ अलंकार म...
26/09/2025

आज अश्विन शु चतुर्थी /पंचमी (४/५) शके १९४७ दि:- २६/०९/२०२५. शारदीय नवरात्रौत्सव श्रीतुळजाभवानी देवीची विशेष रथ अलंकार महापूजा

आज अश्विन शु.४ नवरात्र उत्सवाची चौथी माळ वार-गुरुवार दिनांक-२५-०९-२०२५ रोजी,श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य ...
25/09/2025

आज अश्विन शु.४ नवरात्र उत्सवाची चौथी माळ वार-गुरुवार दिनांक-२५-०९-२०२५ रोजी,श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन.

आज अश्विन शु.३ नवरात्र उत्सवाची तीसरी माळ वार-बुधवार दिनांक-२४-०९-२०२५ रोजी,श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य ...
24/09/2025

आज अश्विन शु.३ नवरात्र उत्सवाची तीसरी माळ वार-बुधवार दिनांक-२४-०९-२०२५ रोजी,श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन.

नवरात्र उत्सव, वार- मंगळवार दिनांक-२३-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा व सिंह वाहनावर  छबीना काढण्यात आ...
24/09/2025

नवरात्र उत्सव, वार- मंगळवार दिनांक-२३-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा व सिंह वाहनावर छबीना काढण्यात आला.

आज अश्विन शु.२, नवरात्र उत्सवाची दुसरी माळ वार-मंगळवार दिनांक-२३-०९-२०२५ रोजी,श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्...
23/09/2025

आज अश्विन शु.२, नवरात्र उत्सवाची दुसरी माळ वार-मंगळवार दिनांक-२३-०९-२०२५ रोजी,श्री तुळजाभवानी देविची अलंकार महापूजा नित्य दर्शन.

सोमवार दिनांक-२२-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेचा नंदी वाहन वरती छबिना व धुप आरती.
22/09/2025

सोमवार दिनांक-२२-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी मातेचा नंदी वाहन वरती छबिना व धुप आरती.

Address

Pune
412411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शक्तिपीठ नायिका - Shaktipeeth Nayika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share