Amol Davalbhakta Guruji

Amol Davalbhakta Guruji He has taken priesthood education form Shree Vedmurti,Vedashri Gajanan Digambar kale Guruji who has 50+ year of experience in this filed and is a graduate

20/05/2021
29/10/2020
नवचंडी
28/10/2020

नवचंडी

वास्तुशांती पूजन
14/08/2020

वास्तुशांती पूजन

08/10/2018

या वर्षी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:26 वाजता प्रतिपदा समाप्ति होत असली तरी 10 ऑक्टोबर रोजी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून मध्याह्न समाप्ति पर्यंत दुपारी 1 वाजून 36 मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येते. सकाळी 7:26 पूर्वी घटस्थापना करण्याची आवश्यकता नाही. तसेच 9 ऑक्टोबर रोजी अमावास्या समाप्ति घटस्थापना करू नये. 18 ऑक्टोबर रोजी दसरा, नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) व पारणा आहे. सर्वसाधारणपणे घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो या वर्षी घटस्थापनेपासून 9 व्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो.
अशौचामुळे ज्यांना 10 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) 11 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 18 रोजी नवरात्रोत्थापन करावे.
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. दुर्गाष्टमी 17 ऑक्टोबर रोजी आहे.
विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 18 ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी 2/20 ते 3/07 या दरम्यान आहे.

श्री अमोल दावलभक्त गुरुजी
9822004491
9689904491

100+ वर्षांची परंपरा

05/08/2018

तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत

तुळशीचे पान विष्णूला प्रिय आहे. हे रोप सर्वांच्या घरात असत आणि प्रत्येक शुभ कामासाठी याला सामील करण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुळशीचे पान तुमची बर्‍याच प्रकारे मदत करतो. मग तो पैसांची समस्या असो किंवा घरात नकारात्मक शक्ती असो, प्रत्येक अडचणीतून तुम्हाला तुळशीचे पान बाहेर काढू शकतात. जाणून घ्या कसे...
जर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा भास होत असेल तर झोपण्याअगोदर आपल्या उशीखाली तुळशीचे पाच पान ठेवा. त्या जागेवरून नकारात्मक शक्ती पळून जातील.
ज्या जोडप्यांची आपसात बिलकुल पटत नसेल, प्रत्येक दिवसाआड भांडण होत असतील तर तुळशीचे पाच पान आपल्या जवळ ठेवा. असे केल्याने नवरा बायकोतील भांडण संपुष्टात येतील.
तुम्ही ज्या जागेवर पान ठेवत आहे, त्याला प्रत्येक 24 तासात बदलायला पाहिेजे आणि किमान 21 दिवसापर्यंत असे करावे. वाळलेले पान पाण्यात प्रवाहित करून द्यावे.
तुळशीचे 5 पानांना एका लाल कागदात लपेटून देवघरात ठेवावे आणि त्याची पूजा करावी. या पानांना आपल्या मनातील इच्छा सांगावी. काहीच दिवसांमध्ये फरक दिसून येईल. असे केल्याने तुमचे भाग्य नक्कीच पालटेल.

▬▬▬ஜ۩ ​सर्वे भवन्तू सुखिन:​ ​۩ஜ▬▬▬ ▬▬▬▬ஜ

18/06/2018

नवग्रह स्तोत्र मराठी अर्थः

१) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.

२) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.

३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.

४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.

५) देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.

६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.

७) निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.

८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.

९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.

१०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.

११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.

१२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.

अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.

Address

300/301, Vakratunda Apartment, 3rd Floor, Flat No:-8, Ghorpade Peth
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Davalbhakta Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Amol Davalbhakta Guruji:

Share