23/05/2021
नमस्कार...
कोविड १९ च्या महाकठीण काळामध्ये शासनाने जमावबंदी केलेली असताना बऱ्याच गोष्टींवर बंधने आली आहेत. अनेक यजमानांना धार्मिक विधी करण्याची इच्छा असूनही ते करता येत नाहीत. अशातच महामारीने सर्वांनाच ग्रासले आहे. जवळचा कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला की मानसिक धैर्य खचून जाते. आपल्याकडे औषधोपचारांसोबतच आध्यात्मिक साधनेला मोठे प्राधान्य आहे. याकरिता शास्त्रामध्ये संकटातून मुक्ती होण्यासाठी जी विविध अनुष्ठाने सांगितलेली आहेत. उदा. महामृत्युंजय जप, नवग्रह बीजमंत्र जप, योगिनी संकटा माता जप, दत्तमाला मंत्र जप, सर्वाबाधा विनिर्मुक्तो मंत्रजप इत्यादी अनुष्ठाने विधिवत करुन घेतल्यास निश्चितच उत्तम फळ प्राप्त होते. मानसिक बळ तर मिळतेच आणि संबंधित जातकाला त्रासातून मुक्ती मिळते.
अशा प्रकारे अनुष्ठाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही करत आहोत. यजमानांसहित सर्व आमंत्रित गुरुजी कॅमेरा व माईक दोन्ही समोर बसून संपूर्ण अनुष्ठान शास्त्रशुद्ध रीतीने पूर्णत्वास नेत आहेत. यजमानही अत्यंत प्रसन्न होऊन आजारातून बरे होत असल्याचे अनेक अनुभव येत आहेत.
या महासाथीच्या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार, सकस आहार व आध्यात्मिक पाठबळ या तीन साधनांचा अत्यंत उपयोग होताना दिसून येत आहे.
कोणास याप्रमाणे अनुष्ठान करणे असल्यास निश्चित संपर्क साधावा.