छत्रपती सेवा प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Pune
  • छत्रपती सेवा प्रतिष्ठान

छत्रपती सेवा प्रतिष्ठान राजकारणापासून अलिप्त राहून निस्पृहपणे शिवकार्य करणारी संघटना

शककर्ते शिवराय या विजयराव देशमुख लिखित प्रासादिक शिवचरित्राचा प्रसार प्रचार.
धर्म संस्कृति इतिहास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महानुभवांचे राजमाता जिजाबाईंच्या नावे विद्वत पूजन. (गत 40 वर्षांपासून हे विद्वत पूजन दर वर्षी सुरू आहे) जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार.
अन्य विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्ये

19/02/2026

शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा!🚩

*स्मृती शिवाची सदा जागती। पुन्हा घडावे युगप्रवर्तन ।*
*नवे घडाया राष्ट्र आपुले सदा असावे शिवमय जीवन ।।धृ।।*

अमंगलाचा विनाश व्हावा, भोगवृत्तीचा स्पर्श नसावा ।
मातृभाव हो पुन्हा जागता, अबलांना आधार असावा।
जिजामाऊली पुन्हा घडावी, पुन्हा घडावे श्री शिवदर्शन।।१।।

युद्ध जिथे ना कधी नांदते, अयोध्या अशी पुन्हा दिसावी।
दीनदरिद्री जिथे ना कोणी, बंधुभावना सदा जगावी।
रामराज्य साकार कराया शिवापरी हो विजयी जीवन ।।२।।

रायगिरीच्या शिवरायाचा कर्मयोग तो पुन्हा दिसावा।
मुरारबाजी तानाजींच्या समर्पणाचा भाव फुलावा ।
अणूरेणुने व्रतस्थ व्हावे, संस्थापाया शिवसिंहासन।।३।।
*रचना - प.पू. सद्गुरुदास महाराज, श्रीगुरुमंदिर नागपूर*

11/02/2026

अत्यंत दुःखद अंत:करणाने सूचित करण्यात येते की, छत्रपती सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक, विख्यात शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख, सद्गुरुदास महाराज 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.00 वाजता श्रीदत्तचरणी लीन झालेत!
छत्रपती सेवा प्रतिष्ठान, श्रीगुरुमंदिर व पत्रभेट चा आधारवड कोसळला.

23/11/2025

आज नागपूर येथे नॅशनल बुक ट्रस्ट द्वारा आयोजित पुस्तक महोत्सवात लिट फेस्टिवल चे उद्धाटन परम पूजनीय विजयराव देशमुख, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती सेवा प्रतिष्ठान यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान स्टॉल नंबर 23, इथे अवश्य भेट द्या!

29/09/2025

छत्रपती सेवा प्रतिष्ठान चा 44 वा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, श्री. संदीप बाबाराव शिंदे, यांना दिनांक 4 ऑक्टोबर 2025, शनिवारी, संध्याकाळी 6.00 वाजता, सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, राणीलक्ष्मी नगर, नागपूर येथे प्रदान करण्यात येणार आहे. सोहळ्याचे अध्यक्ष, श्रीमंत मुधोजीराजे भोसले तर प्रमुख अतिथी कृषितज्ज्ञ श्री. शरदराव निंबाळकर सर असणार आहेत. सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे व आमचा आनंद शतगुणीत करावा ही विनंती.
श्री. भालचंद्र देशकर,
सचिव, छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूर

18/09/2025

जेष्ठ इतिहास संशोधक आदरणीय श्री. गजानन भास्कर मेहेंदळे सर, यांचे काल दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक परम पूजनीय सद्गुरुदास महाराज यांचे मेहेंदळे सरांशी असलेल्या स्नेहबंधाचे स्मरण होत आहे. रायगड स्मारक समिती व भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. पुरावे व प्रमाणित संदर्भ असल्याशिवाय इतिहास लेखन करायचे नाही, असे व्रत घेतलेल्या पिढीतील एक थोर संशोधक आपण गमावला.
छत्रपती सेवा प्रतिष्ठान च्या वतीने श्री. मेहेंदळे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मोहन श्रीराम बरबडे.

01/05/2025

"शककर्ते शिवराय"
सुधारित नववी आवृत्ती, लवकरच वाचकांच्या भेटीला..

मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा||
जय शिवराय

🚩 आनंदाची बातमी! 🚩|| श्री गुरुदेव दत्त ||🏆 ABP Majha ने शिवजयंती निमित्त आयोजित "माझा कट्टा" या विशेष कार्यक्रमासाठी प. ...
23/02/2025

🚩 आनंदाची बातमी! 🚩
|| श्री गुरुदेव दत्त ||

🏆 ABP Majha ने शिवजयंती निमित्त आयोजित "माझा कट्टा" या विशेष कार्यक्रमासाठी प. पू. सद्गुरुदास महाराज यांना सस्नेह आमंत्रित केले!

🎤 मुख्य संपादक श्री. राजीव खांडेकर यांनी स्वतः पू. महाराजांची मुलाखत घेतली, ज्यात त्यांच्या शिवकार्य व दत्तकार्याची प्रेरणादायी गोष्टींवर चर्चा झाली. ही मुलाखत म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे!

📺 चित्रीकरणाच्या वेळी संपूर्ण स्टुडिओ भारावून गेला, पत्रकारांनी पू. महाराजांचा यथोचित सन्मान आणि गौरव केला, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे! 🙌

🔥 ABP माझा सारख्या प्रतिष्ठित मीडिया हाउसने पू. महाराजांच्या अतुलनीय कार्याची घेतलेली दखल निश्चितच ऐतिहासिक आहे!

💥 आपण ही प्रेरणादायी मुलाखत खालील लिंकवर पाहू शकता!
📌 👉 https://youtu.be/1mffucyg2kk?si=qazDP12_5pFlpiba

🚩 जय शिवराय! 🚩
#शिवजयंती #माझा_कट्टा #शिवचरित्र ाझा #श्रीगुरुदेवदत्त #कट्टा #छत्रपतीसेवा

ाझा ...

खास दिल्लीतील मराठी हिंदी शिवभक्तांसाठी सुवर्णसंधी !!!घेउन येत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदीतील एकमेव प्रमाण चरित...
17/02/2025

खास दिल्लीतील मराठी हिंदी शिवभक्तांसाठी सुवर्णसंधी !!!
घेउन येत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदीतील एकमेव प्रमाण चरित्र - शिवकथाकार श्री विजयराव देशमुख लिखित शकनिर्माता शिवराय (हिंदी) व शककर्ते शिवराय (मराठी)
अ भा म साहित्य संमेलनातील छत्रपती सेवा प्रतिष्ठान च्या १९ नंबरच्या दालनास अवश्य भेट द्या...
२१, २२, २३ फेब्रुवारी तालकटोरा स्टेडियम दिल्ली.

शिवयोगी श्री विजयराव देशमुख लिखित 'शककर्ते शिवराय' ची शिवआवृत्ती फक्त ५०० रुपयांत! ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षा...

11/01/2025
17/12/2024

राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा २२ डिसेंबर पर्यंत पुण्यात फर्ग्युसन कॉलेज मधे पुस्तक महोत्सव सुरू आहे. पुणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जहागिरी, महाराजांचा मुलुख. मग छत्रपती सेवा प्रतिष्ठान प्रकाशित आणि शिवकथाकार श्री विजयराव देशमुख लिखित "महाराजांच्या मुलुखात" हे पुस्तक तर संग्रही पाहिजेच.

मातृतीर्थ सिंदखेड राजापासून तर कैलास रायगडापर्यंत महत्वाच्या सर्व किल्ल्यांची भौगोलिक तसेच तिथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती. हे पुस्तक घेऊन त्या त्या गडावर गेल्यास इतिहासाशी पटकन कनेक्ट व्हाल आणि गडच तुमच्याशी बोलेल.

चला तर, पुणे पुस्तक महोत्सवातील प्रतिष्ठानच्या ई-१६ क्रमांकाच्या स्टाॅलवर, महाराजांच्या मुलुखात मुशाफिरी करायला...


#पुणेपुस्तकमहोत्सव
#पुणेपुस्तकमहोत्सव२०२४
#९दिवस९पुस्तक

Address

दुसरा मजला, १०८८, मनोरमा, , बाजीराव रोड जनता बँकेसमोर, , सदाशिव पेठ, शनिपार
Pune

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+919921237999

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती सेवा प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share