महाराष्ट्र पुरोहित संघटन

  • Home
  • India
  • Pune
  • महाराष्ट्र पुरोहित संघटन

महाराष्ट्र पुरोहित संघटन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र पुरोहित संघटन, Religious organisation, रत्नागिरी, Pune.

27/09/2024

नमस्कार
आपले परदेशी अथवा राहणारे कोणी नातेवाईक / मित्रमंडळी असतील व त्यांना पितृपक्षा निमित्त प्रत्यक्ष पितृ सेवा / श्राद्ध / तर्पण करता येत नसेल तर त्यांना माझा नंबर देऊन संपर्क साधण्यास सांगावे 🙏🏻

मुख्य पितृपक्ष काल सर्वापित्री अमावस्येस संपत असला तरी महालय निमित्त पितृसेवा करण्याची संधी शास्त्राने सूर्य तुला राशीत असेपर्यंत दिलेली असते. यंदा तो कालावधी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत दिलेला आहे. तरी कोणास इच्छा असल्यास संपर्क साधावा.

तर्पण
तर्पण + पितृ शान्ति होम
पिंडदान (आमान्न श्राद्ध)

याप्रमाणे सांगितले आहेत. आपल्याला जे विधी करावयाचे आहेत त्याप्रमाणे 8208722673 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधणे .

10/10/2023

ज्यांना घरी महालय श्राद्ध पक्ष करणे शक्य होत नाही त्यांचेसाठी थोडी तरी पितृ -सेवा -स्मरण म्हणून तर्पण विधी करण्यात येतो.
प्रति नृसिंह वाडी अवधूतवन दत्तमंदिर, (अंजणारी पुलानजीक, मुंबई गोवा हायवे, लांजा, रत्नागिरी )येथे काजळी नदीकिनारी पितृपक्षात सर्वपित्री अमावस्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने पितृतर्पण केले जाईल.
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप मेसेज : 8766991051

लोकमान्य....एक झंझावात_- कीर्तनकार : श्री. चारुदत्त आफळे बुवा_"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" ...
19/12/2020

लोकमान्य....एक झंझावात
_- कीर्तनकार : श्री. चारुदत्त आफळे बुवा_

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" अशा सिंहगर्जनेने ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडणारे भारतीय लढ्यातील एक प्रखर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचे हे प्रेरणादायी चरित्र सुराज्य प्रतिष्ठान YouTube वर Live कीर्तनाच्या माध्यमातून घेऊन येत आहे.

कीर्तनाविषयी ठळक माहिती पुढीलप्रमाणे:

• विषय/शीर्षक
लोकमान्य....एक झंझावात

• कीर्तनकार
राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री. चारुदत्त आफळे बुवा

• तारीख व वेळ
शनि-रवि, दि. 19 आणि 20 डिसेंबर 2020
रोज संध्याकाळी 6:30 PM IST

• स्थळ
Surajya Pratishthan YouTube Channel

• कीर्तन कसे पाहाल?

१) खाली दिलेल्या Link वर Click करा.
२) लाल अक्षरातील Subscribe वर Click करा.
३) त्याच्या उजवीकडील Bell Icon🔔 वर Click करून All हा पर्याय निवडा.
Link: https://youtube.com/channel/UCa1gVq87kq9M9n-dRmJkx4g
४) कीर्तनाच्या दिवशी कीर्तन सुरू होण्याच्या वेळी YouTube वर Surajya Pratishthan असा Search करून Live कीर्तन पाहता येईल.
(नोंद: पहिल्या ३ सूचनांचे पालन केल्यास कीर्तनाची Notification आपोआप येईल.)

• संपर्क:
_कोणतीही शंका असल्यास खालील क्रमांकांवर शक्यतो WhatsApp द्वारे किंवा Call करून संपर्क करा._
१) नीलया ताम्हनकर - 9969832084
२) सुयश जोशी - 9769313224

This is the official YouTube Channel of Surajya Pratishthan. Surajya Pratishthan aims to unveil the advanced and sophisticated treasure of knowledge in India...

12/12/2020
13/10/2020
कोकणातील संस्कृती आणि गावातील सण परंपरा यासंबंधी माहिती साठी सबस्क्राईब करा माझे युट्युब चॅनेल ...
02/05/2020

कोकणातील संस्कृती आणि गावातील सण परंपरा यासंबंधी माहिती साठी सबस्क्राईब करा माझे युट्युब चॅनेल ...

चोरवणे पाली रत्नागिरीकोकण सांस्कृतिक नृत्यप्रचोरवणे गावाला सुमारे तीनशे वर्षाहून मोठी सांस्कृतिक परंपरा आहे . ...

कृपया केवळ ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणारांनी जॉईन व्हावे ...
02/03/2020

कृपया केवळ ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणारांनी जॉईन व्हावे ...

WhatsApp Group Invite

15/03/2017

वेदाध्ययन किती कठीण आहे याची तथाकथित सुशिक्षित समाजाला पण फारशी कल्पना नसते. त्याची जराशी तोंड ओळख करून देणारा हा सुंदर लेख .
==========================================
copied from Mani Shidhore लेखक :- पराग दिवेकर गुरुजी. पुणे

संथा म्हणजे काय?
================================
संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी- समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण) पाडून ,आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते.

एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा
२) अर्धनीची संथा
३) ऋचेची संथा
४) गुंडिकेची संथा

१) चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी (पोथित बघून) तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात
शुद्धअक्षर,
जोडाक्षर,
त्याचे गुरुत्व,
अनुस्वारांचे उच्चार,
स्वराघात,र्हस्व
आणि दीर्घ/प्रदीर्घ-असे विसर्ग (आणि त्यांचे तसेच उच्चार) ,
हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले
पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं...ही झाली "चरणाची" पहिली संथा .

अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते.
(कारण तेच-मंत्रात अशुद्धी राहू नये.)

२) अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. आधी चरण-डोक्यात-
बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर-नसले,तरी चालते. तर..ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला...की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३) ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण (धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण-घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) यातल्या या (पहिल्या) संथेवर, शिकविणार्या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः-अशुद्धी आली कींवा तयार झालेली आहे
काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा..हा शेवटचा परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम- केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा..

अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्या किंवा तिसर्या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी- नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-
पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर
१६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आवृत्ती:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय्/ध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत -ठेवावा लागतो. नाहितर
आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. आणि असंही हे सोप काम नसतच.

नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन
वर्षानी बॅलन्स होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष (फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/ निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत जिवंत
ठेवत अध्ययन करावे लागते.. एका वेदाच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास इथून सुरवात
होऊन..शेवटच्या वर्षाला हा कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी १२ वर्षे आहे. पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार
जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय?
तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते?

तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून
वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात
सुमारे आडिचशे संचार आहेत.
बरं हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय?
आणि नुसते तेव्हढेच आहेत काय?
तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत (विशिष्ट शब्दावर) मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच (विशिष्ट शब्दावर) (आता)
मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा एके ठिकाणी "शुंभमान ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे ,"शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्या प्रकाराला म्हणतात:- संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू ..
सुदुघाहि-पयस्वती: आणि
सुदुघाहि-घृतःश्चुतः हा शब्दाचा संचार
झाला...हा ही सहज लक्षात रहातो. पण
अनुस्वारांचे संचार
म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं
बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं
लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा -
पवतामांतरिक्षा आणि
पवंतामांतरिक्षा -
या शब्दातल्या दुसर्या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे.
मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना... रोज २ अथवा ३ संचार- जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज
ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि
काही नाही!

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातलाहा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..,ते पहा...!
नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु रघोरा पापकाशिनी।

आणि पुढची (वेगळी)ओळः-
तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ
नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु: शिवाविश्वा हभेषजी।

आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ
ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार!

आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र
बुद्धिमत्तेचा माणूस असला ,तरी संपूर्ण एका वेदातले हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम..मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडव आलं
तरी त्याला नीट उभं करता येतं.(याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! )

अर्थात,
ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता,त्या अतीप्राचीन
(लेखनकलेची सुरवातही न झालेल्या)कालखंडात अश्या तर्हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं,
हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगत म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि (या)पुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो. आज या निमित्तानी हा (पाठांतराचा)
छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान दोन कारणानी आहे.

१) वेदज्ञान..हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/निरुपयोगी .. उपकारक्/
अनुपकारक..असं,कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे
वेदाध्यायी आहेत.

त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. smile emoticon )

याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना..किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल.

२)कुणितरी मनापासूनशंका विचारल्या शिवाय, हे असल्या पद्धतीचं लेखन माझ्या हातून
(कधिही) होत नाही..ते आज झाल

लेखक :- पराग दिवेकर गुरुजी. PUNE पुणे MH 12

आपल्यापैकी पौरोहित्य करणार्या बांधवांसाठी आनंदाची बातमी...*eBhatji.com वर मोफत रजिस्टर होण्याची सुवर्णसंधी... !*माझी विन...
30/01/2017

आपल्यापैकी पौरोहित्य करणार्या बांधवांसाठी आनंदाची बातमी...

*eBhatji.com वर मोफत रजिस्टर होण्याची सुवर्णसंधी... !*

माझी विनंती आहे की लवकरात लवकर रजिस्टर व्हावे, तसेच आपल्या संपर्कातील गुरूजींना हा मेसेज पाठवावा.
जेणेकरुन आपल्याला जास्तीत जास्त व छान काम करता येईल.

तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाउन स्वतःची माहिती भरुन रजिस्टर होउ शकता.
http://www.ebhatji.com/index.php/Home/bhatajireg

किंवा मला खालील माहिती पर्सनल मेसेज अथवा ईमेलद्द्वारे पाठवावी. म्हणजे मला तुमचे मोफत रजिस्ट्रेशन करता येईल.
Personal Details
1) Full Name:
2) Email ID:
3) Date of Birth:
4) Mobile Number:
5) Address:
6) Pin code:

Bank Details
1) Bank Account Number:
2) IFSC Code:
3) Bank Name:
4) Branch Name:
5) City:

धन्यवाद...! 🙏🏻

- श्रीकांत कुलकर्णी
मोबाईल :- 7506011929
ईमेल:- [email protected]

10/01/2017
22/06/2015

मराठी पुरोहित WhatsApp Group साठी नावे नोंदविण्यासाठी नंबर द्यावेत .

Address

रत्नागिरी
Pune
411030

Telephone

9158386375

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र पुरोहित संघटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share