Guruji Barbhai jejuri

Guruji Barbhai jejuri कुलदैवत खंडीबा मंदिर जेजुरी

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी**मो ९८५०६४०३७४                     ९४२१९००५०५* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्रावण हा व्रत-व...
12/08/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४ ९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रावण हा व्रत-वैकल्यांचा महिना असून, श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजनानंतर श्रावणी शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जिवतीची पूजा, शुक्रवारची कहाणी आणि जिवतीची आरती यांबाबत जाणून घेऊया...
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
*जिवतीची पुजा शुक्रवार श्रावण पहिला शुक्रवार दि. 14/8/२6 रोजी करावी
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेरवाशिणीला. व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात. धार्मिक पथ्ये पाळतात. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात. श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जीवतीचा अथवा जिवंतिकेचा कागद चिकटवला जातो

✨जिवतीची पूजा✨

जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।।, असा श्लोक जिवतीची पूजा करताना म्हटला जातो. श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. यासह २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी.
देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.
जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते

✨श्रावण महिन्यातील कहाणी जिवतीची✨
एक आटपाट नगर होते. तिथल्या राजाला मूल नव्हते. सर्व सुखे हात जोडून उभी असली तरी त्याचा जीव रमत नव्हता. राणी कष्टी होती. ती सारखी आसवे ढाळी. माझी कूस उजव म्हणून देवाला विनवी. पण तिची व्यथा संपली नाही. मग तिने एका सुइणीला बोलावले. म्हणाली , ' मला कोणाचे तरी नाळ-वारीचे मूल आणून दे. तुला सोने-नाणे देईन. ' सुइण कबूल झाली. राणीने गरोदरपणाचे सोंग केेले. नऊ मास पूर्ण होत आले असता गावातील एक ब्राह्माणी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुइणीने तो नाळ-वारेसहीत राणीच्या कुशीत नेऊन ठेवला आणि ब्राह्माणीला म्हणाली की बये , तुला वरवंटा निपजला. इथे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजाला जगण्यात अर्थ गवसला. राणीच्या कुशीत बाळाचा ट्यॅहा फुटला.
ब्राह्माणी मुलाच्या आशेने झुरू लागली. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करू लागली. ' जिथे माझा बाळ असेल तिथे तो खुशाल असो ' म्हणत सर्व दिशांना तांदूळ उडवू लागली. ते तांदूळ राजवाड्यात राजपुत्राच्या अंगावर पडू लागले. ब्राह्माणीने हिरवे लुगडे , हिरव्या बांगड्या र्वज्य केेल्या. ती कारलीच्या मांडवाखालून जाईना. तांदुळाचे धुवण ओलांडीना. मुलगा मोठा झाला. राज्याचा राजा झाला. एक दिवस ब्राह्माणी त्याच्या नजरेस पडली. तिचे देखणे रूप पाहून त्याच्या मनात पाप उत्पन्न झाले. तिच्या दारातील वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला. गाय वासराला म्हणाली , ' जो आपल्या आईची अभिलाषा धरायला कचरत नाही , तो तुझ्या शेपटीवर सहज पाय देईल. ' राजाला पश्चाताप झाला.
पुढे तीर्थयात्रा करून त्याने सर्व प्रजेला जेवायला बोलावले. ब्राह्माणीही तेथे आली. राजा पंक्तीत तूप वाढू लागला. तिच्या पानापाशी तो येताच तिला पान्हा फुटला आणि त्याची धार राजाच्या तोंडात उडाली. राजाला राग आला. पण त्याची राणीआई त्याला म्हणाली , ' बाळ , हीच तुझी खरी आई. ' राजा आईच्या पाया पडला. आई-वडिलांना वाडा बांधून दिला. जिवती त्या सर्वांवर प्रसन्न झाली.
अशी ही जिवतीची कहाणी.
आजही श्रावण आला की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जिवतीचे चित्र काढतात. घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जिवतीचा कागद लावतात. पूजा करतात. तेरड्याआघाड्याची पानेफुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालतात. कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात. ' माझे बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकतेय , हे जिवतीआई , तू त्याचे रक्षण कर. ' अशी मनोमन प्रार्थना करतात. पुरणावरणाच्या जेवणाने पुजेची सांगता करतात.
काळ बदललाय. जगणे बदलले. रोजचे संदर्भ बदलले. तरी आईची माया तशीच राहिली. ही माया आटत नाही तोवर जिवती प्रसन्नच राहणार. ती तशीच राहो ही तुम्हाआम्हा सर्वांची प्रार्थना. ती सुफळ संपूर्ण होवो.
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातात व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?
✨✨✨✨✨✨✨✨
जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...

✨प्रथम भगवान नरसिंहचं का?✨✨✨✨✨✨✨✨
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. म्हणजेच कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

✨नंतर येतात त्या जरा व जिवंतिका ✨✨✨✨✨

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ✨बुध व बृहस्पती ✨✨✨

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता.नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.
आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पुजन
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

✨जिवतीची आरती✨

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।
आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।
चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।
माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
✨जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।✨✨✨✨✨
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४ ९४२१९००५०५*
🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩

10/08/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गिरीश बारभाई गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी
मो. 9850640374
9421900505

दिनांक 12 ऑगस्ट 2026 बुधवार या रोजी दिसणारे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणारे नाही त्यामुळे ग्रहणामध्ये पाळण्यात येणारे तसेच वेधाधी कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही हे ग्रहण भारतामध्ये दिसणारे नाही
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩गिरीश बारभाई गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी
मो. 9850640374
9421900505

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी**मो ९८५०६४०३७४*     *९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*दीप अमावस्या                  ...
10/08/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*दीप अमावस्या (दिवे पूजनाची)*
*आषाढ अमावस्या बुधवार दि12/8/26 रोजी आहे
*याअमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहेत *मुळात गटारी असा कोणताही सण आपल्या धर्मात नाहीये*

*या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते.* *दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात,* *त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण*
*त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुण्याची) *दिप अमावस्याच* *म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका*. *कोणताही धर्म ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही,* *उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात ... *या दिवशी* *घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे*...
*वेळीच सावध व्हावे, *उद्या महाराष्ट्रातील नवीन पिढीला वाटेल की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो,* *सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावी*. ...
*तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते* *थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती* ...
*तसेच आपल्या हिंदू धर्माचा अभिमान राखून दीप अमावास्येला गटारी ना म्हणता *दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या सणांचा व संस्कृतीचा मान राखावा* *शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा* ।
*शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते* ॥
*शक्यतो सकाळी घरातील देवांच्या रोजच्या पूजेबरोबर दीप पूजन करणे उत्तम.*

*दीप पूजन कसे करावे ?*🎂

*घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी.*

*या दिवसापासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते. आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा*.

*आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे.*
*दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी.*

*या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.*
*ती प्रार्थना अशी :*

*दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌ |*
*गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ||*

*अर्थ:*
*‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस.*
*तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस.माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.*

*त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरीश गुरुजी खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*गणपुजा उत्सव २०२६*
15/07/2026

*गणपुजा उत्सव २०२६*

*बारभाई गिरिष गुरूजी*          *जेजुरी*       *मो.९८५०६४०३७४*             *९४२१९००५०५*           *गणपूजा*               ...
08/07/2026

*बारभाई गिरिष गुरूजी*
*जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*

*गणपूजा*
दि.१४/७/२०२६ आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार रोजी श्री क्षेत्र कडेपठार येथे सालाबादप्रमाणे कडेपठार गडावर गणपूजा उत्सव होणार आहे
या आषाढ शुद्ध प्रतिपदेला भगवान शंकर कडेपठारावर अवतरले तेव्हा सर्व देव गणांनी त्यांची भंडाऱ्याने पूजा केली तोच हा उत्सव गणपूजा सर्व देव गणांनी केलेली पूजा म्हणजेच गणपूजा तेव्हा ंपासून ही गणपूजा म्हणून ओळखली जाते तसेच प्रतिवार्षिक ती केली जाते मंदिरातील लिंगावर रात्री मानाच्या पूजा झाल्या नंतर लिंगावर भंडार वाहिला जातो गावकरी मानकरी भाविक आपापल्या इच्छेनुसार मोठ्या प्रमाणात भंडारा वाहतात लिंगावर पुर्न भंडाराच्या राशी उभ्या राहतात रात्रभर देवाचा जागर छबिना दिवट्यांच्या प्रकाशात निघतो पहाटे देवांच्या पिंडीवरील भंडारा वाटप होतो हा उत्सव पुर्न रात्रभर कडेपठार डोंगरावर साजरा होतो रात्रभर मंदिरा मध्ये भाविकांची गर्दी असते पिंडी वरील वाटप झालेला भंडारा भाविक आपल्या घरी वर्षभर अंगारा रूपात लावण्यासाठी घेऊन जातात
*आपल्या इच्छेने भाविक आपल्या कुटुंबाच्या नाव गोत्राने उत्सवासाठी भंडारा अर्पण करू शकतात*
🙏🏻येळकोट येळकोट जयमल्हार
सदानंदाचा येळकोट
कडेपठार महाराज की जय🙏🏻

*बारभाई गिरिष गुरूजी*
*जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*बारभाई गिरीष गुरुजी**खंडोबा मंदिर जेजुरी**मो*९८५०६४०३७४*     *९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*वटपौर्णिमा खुलासा*🚩यावर्षी ज्य...
28/06/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरीष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो*९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩*वटपौर्णिमा खुलासा*🚩

यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा दि. २९/६/२०२६ सोमवार या दिवशी आहे पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसह वटपूजन करावे असे वचन आहे .
हिंदू धर्मात म्हणजेच हिंदू पौराणिक कथानुसार असे मानले जाते कि वटवृक्ष म्हणजेच “त्रिमूर्ती” होय, तर त्रिमूर्ती म्हणजे काय? तर भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांचे प्रतिक आहे. असे म्हटले जाते कि ब्रह्मा या झाडाच्या मुळाशी वास करतात, मध्य भागी भगवान विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करत असतात. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा केल्यास भाविकांचे भले होते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*पुजा मुहूर्त*
अमृत सकाळी ६.०२ ते ७.४१ मी.
शुभ सकाळी ९.२० ते १०.५९ मी.
अभिजित दुपारी ११.५७ ते १२.५२मी.
*राहू काळ ७.४१ ते ९.२०*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*वटपौर्णिमा*
वड हा अनेक वर्ष आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया ३ दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात
यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.

वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात मात्र यामागे काही शास्त्रीय कारणेही सांगितली जातात. वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते. याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते असेही म्हणतात. वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षांसाठी जगते त्याचप्रमाणे आपला पतीही दिर्घायुषी व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असाही समज आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*पौराणिक कथा*
अनेक वर्षापूर्वी अश्वपती नावाचा राजाच्या आपल्या सावित्री या मुलीला तिचा पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्र अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. त्यावेळी सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा एका अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून व्रत केले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने सावित्रीला परत जाण्याची विनंती केली. पण तिने पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तु म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात असे म्हटले जाते
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*वटपौर्णिमा पुजा करण्याची पद्धत* :-
भारतातील स्रिया या वटपौर्णिमा या सणाला खूप महत्व देतात, या दिवशी त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात. त्यामुळे हा सन महाराष्ट्रात खूप जोरात साजरा केला जात असतो. या दिवशी स्रिया आपल्या हातावर मेहंदी काढतात, आणि तसेच नवीन साडी आणि शृंगार करतात. मग पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ सर्व स्रिया या बारावाजे पर्यंत पोहचतात.

ताटामध्ये तांदूळ किंवा गहू, पाच प्रकारची फळे, गोड पदार्थ, तुपाचा दिवा, अगरबत्ती, पाणी आणि दुर्वा हे सर्व घेऊन जातात. या दिवशी वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करतात. आणि असेही म्हंटले जाते कि या दिवशी वडाची फांदी तोडू नये किंवा फांदी तोडून तिची पूजा करू नये.

सर्वात आधी स्रिया या वडाच्या झाडाजवळ जातात आणि मग आपण आणलेले दुध आणि पाणी हे वडाच्या झाडाच्या पायथ्याशी घालतात. मग दुध आणि पाणी घातल्या नंतर स्रिया अगरबत्ती किंवा धूप हे तेथे लावतात आणि मग दिवा पेटवतात. त्यानंतर आपण आणलेले पाणी हे तेथे ठेवतात आणि दोरा घेतात आणि मग वडाच्या झाडा बोवती सात फेऱ्या मारतात व तो दोरा झाडाला बांधतात.

या वेळे स्रीया पूजा करत असतना देवा कडे फक्त आपल्या पतीचे आयुष्य हे दीर्ध व्हावे आणि आरोग्य हे चांगले राहावे अशी प्रार्थना देवाकडे करत असतात
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरीष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो*९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

15/05/2026

*गिरिष बारभाई गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*अधिक मास*
रवीवार दि.१७/५/२०२६ पासून सोमवार दि.१५/६/२०२६ पर्यंत अधिक मास आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*अधिक मासात आपल्या घरामध्ये कुलदैवताचा आपणास अभिषेक होम हवन करावयाचे असल्यास आपणाकडून आपल्या घरामध्ये कुलदैवताचा होम हवन आपणाकडून करून घेण्यात येईल*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरिष बारभाई गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*

*अधिक मास*        *बारभाई गिरीष गुरुजी*          *खंडोबा मंदिर जेजुरी*   *मो.९८५०६४०३७४*    *मो.९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩अधिकमा...
15/05/2026

*अधिक मास*

*बारभाई गिरीष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*मो.९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अधिकमास,यालाच पुरषोत्तममास, तसेच ग्रामीण भागात धोंड्याचा महिना असे सुद्धा म्हणतात
हिंदू पंचांगानुसार तीन वर्षांनी बारा महिन्यामध्ये एक महिना अधिक होतो त्यास अधिक मास अथवा पुरुषोत्तम मास बोलतात
या वर्षांमध्ये हा अधिकमास श्रावण महिन्यास जोडून आला आहे यालाच अधिक श्रावण मास बोलतात अधिक मासाची सुरुवात रवीवार दि.१७/५/२०२६ पासून होत आहे आणि समाप्ती सोमवार दि.१५/६/२०२६ रोजी होत आहे

अधिक मासात श्री पुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित, नक्तभोजन अथवा एकभुक्त रहावे. अशक्तताने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा.
अधिकमासात दानाचे खूप महत्व आहे
*महिनाभर तांबुलदान दिल्यास सोभाग्यप्राप्ती होते*

*देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते*

*निदान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापनिवृत्ती होते*

*मौन भोजन केल्यास पापांचे निरसन होते*

*शक्य असेल त्याने संपूर्ण अधिक मासात नित्य अपुप दान करावे शक्य नसेल त्याने शुक्ल व कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथीस आणि व्यतिपात, वैदृती असेल त्या दिवशी अपुप दान कारावे (अपुप म्हणजे अनारसे)*

*अपुप दानाचा संकल्प*

ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरूपी सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्वकं पुत्रपौत्रयुतधनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फल प्राप्त्यापूपच्छिद समसंख्य वर्ष सहस्त्रावधी स्वर्लोकनिवासादिकल्पोकक्त फलसिद्ध्यर्थं मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये ।
याप्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे
इदं सोपस्करं त्रयस्त्रिशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबुलं पुरुषोत्तम प्रीतिकामस्तुभ्यमहं संप्रददे असे म्हणून दान द्यावे
दान घेणाऱ्याने त्वयादत्तमिदंपात्रंपरमानेंनपुरीतं संघृतं प्रतिगृह्यमी प्रियतां ते दिवाकर: हा श्लोक म्हणून दान घ्यावे
या प्रमाणे जो तेहतीस अपुपदान देईल पुत्रप्राप्ती व विपुल संपत्ती प्राप्त होईल

अधिक मासात जावयास आणि ब्रह्मणांस विष्णू मानून त्यांस तेहतीस अपुप तांब्याच्या पात्रात घेऊन त्यावर चांदीची अथवा तांब्याची निरांजन ठेऊन दान स्वरूपात देण्यात येते
याच महिन्यात पुरणाचे धोंडे जावयास तसेच आप्तेष्टांना खायला देण्याची सुद्धा काही भागात पद्धत आहे

*अधिक मास संबंधी कथा*

अधिक महिना किंवा मलमासास पुरुषोत्तम महिना त्याच्याशी संबंधित एका प्रचलित कथेचा उल्लेख सुद्धा त्यात सापडतो. हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवतेस प्रिय आहे, परंतु अधिक महिन्यात कोणत्याही देवतेची किंवा ईश्वराची आपली पूजा होण्याची इच्छा नव्हती. ह्या मागे सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे अधिक महिना हा दर तीन वर्षांनी येतो. म्हणजेच त्या देवतेस आपल्या पूजेसाठी तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार होती. ह्यामुळे दुःखी होऊन अधिक महिना हा भगवान श्रीविष्णू ह्यांच्याकडे आपली समस्या घेऊन गेला. भगवान श्रीविष्णूने त्याचे म्हणणे ऐकून घेतले व त्या महिन्यास स्वतः धारण करून त्यास आपले नांव दिले. ह्या कारणास्तव अधिक महिन्यास पुरुषोत्तम महिना असे सुद्धा संबोधण्यात येते. ह्या महिन्यात भगवान श्रीविष्णूंची आराधना करून वैकुंठ प्राप्ती होऊ शकते

*अधिक मासात कोणती कामे करावी व कोणती करू नयेत*

नित्य व नैमित्तिक कर्मे करावी
काम्यकर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. जे केल्या वाचून गती नाही अशी कर्मे करावी ज्वरशांती, पर्जन्यष्ठी इत्यादी नेहमीची काम्यकर्मे करावी देवांची पुन:प्राणप्रतिष्ठा करता येते ग्रहणश्राद्ध, जातकर्मे,नामकर्मे, अन्नप्राशन हे संस्कार करावे मन्वादि व युगादि संबंधित श्राद्धादि कृत्ये करावी तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध ही करावी नारायण नागबली, त्रिपिंडी या सारखी कर्मे गंगा,गोदावरी,गयातीर्थ क्षेत्री करता येतील महादाने, गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रतग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, नवीन देव प्रतिष्ठापना करू नयेत
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरीष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*मो.९४२१९००५०५*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*बारभाई गिरिष गुरुजी* *खंडोबा मंदिर जेजुरी**मो ९८५०६४०३७४*     *९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*अक्षयतृतीया १९/४/२६ रविवार*अक्...
17/04/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*अक्षयतृतीया १९/४/२६ रविवार*

अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.

हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक दान करतात. या दिवशी सोने-चांदि खरेदी केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते

धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूचे नर-नारायण, हयाग्रीव आणि परशुरामां हे आवतार झाले होते. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी नारायण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी त्रेतायुगला सुरुवात झाली. असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य शुभ परिणाम देते, म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया आणि आखा तीज या नावांनी ओळखला जातो. त्याचे महत्त्व, सोने आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
💠 तृतीया प्रारंभ : १९ एप्रिल २०२६ रविवार सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून

अक्षय तृतीयेचं महत्त्व –अक्षय म्हणजेच कधीही नष्ट न होणारे पुण्य प्राप्त होते. तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे, एखाद्या व्यक्तीचे दु:ख दूर होतात. म्हणून या दिवशी दान देण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. याशिवाय, अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा स्नानालाही विशेष महत्त्व आहे.

या गोष्टी दान केल्या जातात
अक्षय तृतीयेला वसंत ऋतूचा शेवट आणि ग्रीष्म ऋतूची सुरुवात मानली जाते, म्हणून या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, पंखे, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, काकडी, साखर, हिरव्या भाज्या, सरबत आणि सत्तू इत्यादी उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. असेही म्हटले जाते की, या दिवशी जे काही दान केले जाईल, त्या सर्व गोष्टी पुढील आयुष्यात प्राप्त होतील. म्हणून बरेच लोक या दिवशी सोने-चांदी देखील दान करतात.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता?
शुभ मुहूर्त –

❇️लाभ अमृत मुहूर्त
सकाळी १०.४९ ते १२.२० वाजेपर्यंत

❇️ दुपारी १.५८ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

लक्षात ठेवा – राहुकाल संध्याकाळी ५.१७ पासून ते संध्याकाळी ६.५१ वाजेपर्यंत असेल, यादरम्यान कोणतेही शुभ कार्य आणि खरेदी करणे टाळा.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे.

कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान
या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.
तिलतर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ अन् जल अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देवाजवळ सर्वकाही आहे. त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार ? तसेच ‘मी देवाला काहीतरी अर्पण करतो’, हा अहंही नको. यासाठी तीळ अर्पण करतांना ‘देवच माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहे’, असा भाव ठेवावा. यामुळे तिलतर्पण करतांना साधकाचा अहं न वाढता त्याचा भाव वाढण्यास मदत (साहाय्य) होते. तिलतर्पण करणे म्हणजे देवतेला तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे होय.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर ‘देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर ‘त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत’, असा भाव ठेवावा.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रथम (सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणांवर) तीळ अर्पण केल्यामुळे तिळांत देवतांकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता अधिक प्रमाणावर ग्रहण होते आणि जल अर्पण केल्यावर अर्पण करणार्‍याचा भाव जागृत होतो. भाव जागृत झाल्यामुळे देवतांकडून तिळांत ग्रहण झालेली सात्त्विकता तिलतर्पण करणार्‍याला अधिक प्रमाणावर ग्रहण करता येते.

अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय (अक्षय्य) तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तिलतर्पण करायचे असते.
ठीक दुपारी १२ नंतर पितरांना नैवेद्य करावा सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून बसावे पितरांचे स्मरण करावे या दिवशी पितरांना उदककुंभ दान करतात पत्रावळी वरती तांदूळ ठेऊन त्यावरती पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा त्या मध्ये गंध, फुले,तीळ,सुपारी,दक्षणा घालावी घटास सूत्राचे वेष्टन करावे त्याचे पंचोपचार पूजन करून तो ब्राम्हणास दान द्यावा या दिवशी केलेले हवन ,पूजन, तर्पण,दान, पूजा, जप हे पुण्यकर्म अक्षय टिकते म्हणून अक्षय तृतीय ही शुभतिथी प्रमाणे पितृतिथी आहे पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*पुजन पद्धत*
पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवावा. त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्या वेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तिळांमध्ये सात्त्विकता ग्रहण करून रज-तम नष्ट करण्याची क्षमता अधिक आहे. साधकाच्या भावानुसार तिलतर्पण करतांना सूक्ष्मातून ताटामध्ये आलेल्या पूर्वजांच्या प्रतिकात्मक सूक्ष्म-देहावरील काळे आवरण दूर होऊन त्यांच्या सूक्ष्म-देहांतील सात्त्विकता वाढते आणि त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक अशी ऊर्जा मिळते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व
अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरिष गुरुजी* *खंडोबा मंदिर जेजुरी *मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*चैत्र पौर्णिमा*   🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *बारभाई गिरिष गुरुजी**खंडोबा मंदिर जेजुरी**मो* *९८५०६४०३७४*         *९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *चैत्...
31/03/2026

*चैत्र पौर्णिमा*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो* *९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*चैत्र पौर्णिमा दि. १/४/२६ बुधवार रोजी आहे*

*चैत्र पौर्णिमा म्हणजेच मल्हार मार्तंडभैरव अर्थात खंडेरायांचा प्रगट दिन*

*कल्पारंभी ब्रम्हदेव तपात आणि नारायण योग निद्रेत निमग्न असताना ब्रम्हदेवाच्या कर्णमलातून मधू आणि कैटभ जन्माला आले. त्यांचा वध नारायनाणी केला त्यावेळी त्यांच्या रक्ताचे थेंब शेषाच्या मस्तकावर पडले त्यातून दोन जीव जन्माला आले त्या जीवांनी ब्रम्ह देवांची उपासना केली त्यानी वर मागितला की आम्हाला शिवांच्या हातून मरण याव पण शिवाच रूप एरव्ही पेक्षा भिन्न असाव. शक्ती संपन्न होऊन ते जीव दैत्य झाले . आता त्यांना मणी आणि मल्ल या नावाने ओळखले जाऊ लागले त्यांनी सह्याद्री पर्वतावर मणीचूल पर्वतावर आपली राजधानी वसवली. त्यानी उन्मत्त होऊन इंद्रादी देवांचे अधिकार काढून घेतले एक दिवस त्यानी मणीचूल पर्वताजवळ तप करणाऱ्या धर्मांगवीत,धर्मपालक, धार्मिक, धर्ममील,धर्मज्ञ,धर्मबाहू, धर्मकौतुक अशा सात धर्मपुत्रांच्या आश्रमावर हल्ला केला त्यांनी मांडलेला यज्ञ विध्वंसला .त्रस्त ऋषी स्वर्गात इंद्राकडे गेले पण त्यानी असमर्थता दाखवताच ते वैकुंठात नारायनांकडे कडे गेले.नारायनांनी वरदान लक्षात घेऊन ऋषींसह कैलासाला गमन केले प्रारंभी ऋषींना वाईट वाटले की साक्षात नारायण देखील आपल्याला सहाय्य करेनात पण विष्णूंनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की घाबरू नका तुम्हाला झालेला हा त्रास समस्त विश्र्वाचे कल्याण करणारी गोष्ट घडवणार आहे. नारायणांसह ऋषींना बघून भगवान शंकराना प्रथम आनंद झाला पण त्यांच्या येण्याच कारण ऐकून पंचमुख भगवान सदाशिव प्रचंड रागावले रागाच्या भरात त्यांनी स्वत:ची जटा तोडून आपटली त्या क्षणी एक उग्र अशी मारी शक्ती प्रगटली तीला शांत करण्यासाठी ऋषींनी तुप म्हणजे घृत शिंपडले म्हणून तिला घृतमारी असे नाव मिळाले.अनेक शस्त्रास्त्रे धारण करून प्रचंड निनाद करणारी ही विनाशककारी शक्ती आणि शंकराचा हा विक्राळ क्रोध बघून क्षणभर सर्व देव आणि ऋषी अवाक् झाले. हर हर शब्दाचा घोष झाला आणि क्षणात जणू सोन्याचा तेजःपुंज डोंगर डोळ्यासमोर उभा राहिला आणि दुसऱ्याच क्षणी शंकरांच्या आसनाकडे पाहील तर हातात सुंदर खडग्, डमरू, त्रिशूल आणि पानपात्र ही चार शस्त्र व्याघ्राजीना बरोबरच पितांबर डोक्याला किरीट गळ्यात, कवडी हार रूद्राक्ष माळा, कानात अही म्हणजे नागाची कुंडल सहस्त्रसूर्याची प्रभा फिकी पडावी अशा त्या मार्तंड भैरवाच्या किरीटावर चंद्रकोर शोभत होती.तो दिवस होता स्वारोचिष मन्वंतरातील ३१ व्या द्वापार युगात कलीयुगाला २४४ वर्षे पाच महीने १० दिवस बाकी असताना चैत्र पौर्णिमेला भर दुपारी हा अवतार झाला रजनीचूर्ण म्हणजे भंडार्याच्या उधळणीत चंद्राचा अवतार असणाऱ्या शुभ्र अश्वावर देव स्वार झाले. यळकोट म्हणजे सात कोटी मंत्राचा उद्गाता सात कोटी गणाचा अधिपती युध्दाला निघाला. असा हा भक्तवत्सल जगत्पालक भोळा खंडेराया जसा सप्तर्षींसाठी धाऊन आला*
*जसा खंडोबा सप्तर्षींसाठी धावून आला तसा आपल्या साठी धावून येतो चैत्र पौर्णिमेला खंडोबा देवांचा तळी भंडारा आपल्या घरी करावा या दिवशी देवांना कोणताही गोड नैवेद्य दाखवावा आपल्या कुळा प्रमाणे चैत्र पौर्णिमेचा मान हा त्या दिवशी दिला जातो*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो* *९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*चैत्र पौर्णिमेला आपल्या घरात करावयाचा तलीभंडारा विधी**

*तलिभंडारा*

*खंडोबा देवांच्या कुळाचाराचा एक भाग म्हणजे तळीभंडारा जेजुरी मध्ये आल्यावर तसेच घरामध्ये दर अमावास्या पौर्णिमेला अथवा चंपाषष्टी दसरा या दिवशी घरामध्ये तळीभंडारा हा करावाच तळी भंडारासाठी देवासमोर बसून ताम्हणात विड्याची (खायची)पाने,सुपारीचे तुकडे,खोबऱ्याचे* *तुकडे,भंडारा,एक खोबऱ्याची वाटी एक नारळ एवढे साहित्य घ्यावे आपल्या घरात दिवटी बुधली असल्यास ती तळी* *भरताना पेटवून ठेवावी पाच सात नऊ पुरुषांनी अथवा उपलब्ध असतील तेवढ्या सर्वांनी*अथवा एकट्याने *देवासमोर बसून ताम्हण हात मध्ये घेऊन ते वर खाली करत खालील प्रमाणे बोलावे*

*हर हर महादेव*
*चिंतामणी मोरया*
*आनंदीचा उदो उदो*
*भैरव नाथांचा चांगभल*े
*बोल अहंकरा*
*सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार*

*हे बोलून झाल्यावर एक पान* *जमिनीवर ठेऊन त्यावर ताम्हण ठेवणे देवासमोर पानांचा विडा* *एक सुपारी एक खोबऱ्याचा तुकडा ठेवणे देवावर भंडारा* *वाहने देवाला दिवटी ओवाळणे* *थोडे भंडारा खोबरे हातात घेऊन ते आपल्या दरवाजाच्या बाहेर जाऊन आपण प्रत्येक्ष जेजुरीत मंदिरातच आहोत असे समोर आणून तो भंडारा खोबरे* *सदानंदाचा येळकोट बोलत* *उधळणे दिवटी ओवाळणे घरात* *येऊन थोडा भंडारा घरात फुंकावा पुन्हा देवासमोर बसून ताम्हण* *हातात घेऊन ते खाली वर करत खालील सर्व बोलावे*

*आगड धूम नगारा सोन्याची जेजुरी*
*देव गेले जेजुरीला निळा घोडा*
*पावमे तोडा कमरी करगोठा*
*बोंबी हिरा मस्तकी तुरा*
*अंगावर शाल सदाही लाल*
*तळी आरती करी म्हाळसा सुंदरी*
*देव ओवाळी नाना परी*
*खोबऱ्याचा कुटका भांडाऱ्याचा भडका*
*बोल अहं करा सदानंदाचा येळकोट*
*येळकोट येळकोट जयमल्हार*
*अडकलं के भडकल भडकल के*
*भंडारा बोल बोल हजारी वाघ्या* *मुरुळी खंडोबा भगत सलाम सलाम सदानंदाचा येळकोट* *येळकोट येळकोट जयमल्हार*
*ताम्हण खाली ठेवावे ताम्हणातील भंडारा सर्वांनी लावावा* *पानसुपारी खोबऱ्याचा प्रसाद सर्वाना द्यावा नैवेद्य देवाला दाखवावा ताम्हणातील नारळ देवा समोर फोडावा सर्वाना प्रसाद वाटावा*

*आपल्या सर्वांवर खंडेरायांचा कृपाआशीर्वाद सतत राहावा*
*सदानंदाचा येळकोट*
*येळकोट येळकोट जयमल्हार*
( *चैत्र पौर्णिमेला कुलदैवत खंडोबास तसेच सर्व देवांना दवणा वाहतात आपणाकडे भेटल्यास वहावा*)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीश बारभाई गुरुजी*
*महालक्ष्मी चोंक जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Address

Jejuri Mahalaxhmi Chawk
Pune
412303

Telephone

+919850640374

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guruji Barbhai jejuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category