22/03/2026
🙏🏻 *!! जय गणेश !!* 🙏🏻
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त
गुढी पाडव्याच्या मंगलमय पर्वावर आयोजित भव्य शोभायात्रा २०२६ उत्साहात आणि जल्लोषात पार पडली!
पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, आकर्षक देखावे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आलेल्या प्रत्येक पुणेकराने संस्कृतीची सुंदर परंपरा जपली आणि नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने केली.
यंदाच्या शोभायात्रेची सुरुवात पारंपरिक नगारा वादनाने झाली, ज्याने वातावरण भारावून गेले.
श्री तुळशीबाग मंडळाने साकारलेला संत तुकाराम महाराजांच्या भव्य मूर्तीने सजलेला रथ विशेष लक्षवेधी ठरला, भक्ती, परंपरा आणि कलात्मकतेचा सुंदर संगम त्यातून अनुभवायला मिळाला.
त्याचबरोबर महिलांनी सादर केलेले मर्दानी खेळ, हे सामर्थ्य, आत्मविश्वास आणि परंपरेचा अभिमान व्यक्त करणारे होते, तर वारकरी दिंडींच्या सहभागामुळे वातावरण भक्तिमय, शांत आणि प्रसन्न झाले.
या संपूर्ण शोभायात्रेत गजलक्ष्मी पथकाने आपल्या दमदार ढोल वादनातून मान वंदना अर्पण केली, ज्यामुळे वातावरणात वेगळाच उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली.
या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे लाडके आमदार मा. श्री हेमंत भाऊ रासने, तसेच आपल्या प्रभागातील नगरसेवक मा. श्री. राघवेंद्र बापू मानकर, मा. सौ. स्वरदा ताई बापट, मा. सौ. स्वप्नाली ताई पंडित आणि मा. श्री कुणाल दादा टिळक यांचीही विशेष उपस्थिती लाभली. त्यानंतर श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
*📸 शोभायात्रेतील काही क्षणचित्रे 📸*
!! मानाचा चौथा महागणपती !!
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , ट्रस्ट . पुणे .