अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे.

  • Home
  • India
  • Pune
  • अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे. केल्याने होत आहे रे..!
आधी केलेची पाहिजे...

 #श्री_मंडई_म्हसोबा_उत्सव (सन २०२६)**"दीप अमावस्या निमित्त दीपोत्सव"**धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्...
25/08/2026

#श्री_मंडई_म्हसोबा_उत्सव (सन २०२६)
**"दीप अमावस्या निमित्त दीपोत्सव"**

धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आपल्या **अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे** च्या वतीने सालाबादप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या मंडई म्हसोबा उत्सवा दरम्यान आषाढी दीप अमावस्येनिमित्त बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी हिंदू धर्मगुरू **कालीपुत्र प.पू. कालीचरण महाराज** यांच्या शुभहस्ते श्रींची सांजआरती पार पडली. त्यानंतर महाराजांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सुमारे **११०० दिव्यांच्या दीपोत्सवाने** श्री मंडई म्हसोबा मंदिर परिसर उजळून निघाला होता.

या वेळी प.पू. कालीचरण महाराजांचे **पाद्यपूजन** करण्यात आले तसेच त्यांच्या सुश्राव्य वाणीतून संपन्न झालेल्या **भजनसंध्येने** उपस्थित सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले.

या भक्तिमय सोहळ्याला **योगतपस्वी परमपूज्य दत्तदासजी महाराज** (श्री क्षेत्र दत्तधाम पीठ गंगापूर, गोवर्धन नाशिक) यांची विशेष अतिथी म्हणून तसेच गुरूवर्य मयुरेश दादा कालदंते वंदनीय उपस्थिती लाभली होती.

सर्व भाविकांच्या उत्साही उपस्थितीत हा दीपोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

*आपले विनीत:*

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे

 #श्री_मंडई_म्हसोबा_उत्सव (सन २०२६)“दीप अमावस्या निमित्त दीपोत्सव”धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आ...
25/08/2026

#श्री_मंडई_म्हसोबा_उत्सव (सन २०२६)
“दीप अमावस्या निमित्त दीपोत्सव”

धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आपल्या “अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” च्या वतीने सालाबाद प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या मंडई म्हसोबा उत्सवा दरम्यान आषाढी दीप अमावस्या योगी बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता हिंदू धर्मगुरू “कालीपुत्र प.पू. कालीचरण महाराज” यांच्या हस्ते श्रींची सांजआरती संपन्न झाली.

या प्रसंगी “योगतपस्वी परमपूज्य दत्तदासजी महाराज” (श्री क्षेत्र दत्तधाम पिठ गंगापूर, गोवर्धन नाशिक) हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते

आपले विनीत:
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६{ ढोल ताशा पथक स्थिरवादन सेवा }“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव ...
25/08/2026

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६
{ ढोल ताशा पथक स्थिरवादन सेवा }

“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव (सन २०२६)" निमित्त उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या श्रींचरणी अर्पण स्थिरवादन सेवेचे क्षणचित्रे

ढोल ताशा पथक:
कालेश्वरनाथ ढोल ताशा पथक
स्वरब्रह्म ढोल ताशा पथक, पुणे
सरदार ध्वज व वाद्य पथक

आपले विनीत : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे

"अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे" च्या वतीने "म्हसोबा उत्सव (सन २०२६)" शुभारंभी श्रींना विविध मिष्टान्न भोग नैवेद्य...
21/08/2026

"अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे" च्या वतीने "म्हसोबा उत्सव (सन २०२६)" शुभारंभी श्रींना विविध मिष्टान्न भोग नैवेद्य स्वरुपात अर्पण करण्यात आला. या प्रसंगी टिपलेली श्रींची प्रसन्न छबी आपणा समोर सादर.

आपले विनीत:
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६{ सुश्राव्य भजनसेवा }“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव (सन २०२६)"...
21/08/2026

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६
{ सुश्राव्य भजनसेवा }

“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव (सन २०२६)" निमित्त श्रींचरणी अर्पण करण्यात येत असलेल्या सुश्राव्य भजनसेवेचे क्षणचित्रे

भजन सेवेकरी मंडळ:
कलातीर्थ भजनी मंडळ, सदाशिव पेठ
उत्कर्ष महिला भजनी मंडळ, नारायण पेठ
गीता महिला भजनी मंडळ, शुक्रवार पेठ

आपले विनीत:
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६{ रुद्राभिषेक | होमहवन }“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव (सन २०२...
21/08/2026

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६
{ रुद्राभिषेक | होमहवन }

“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव (सन २०२६)" निमित्त श्री मंडई म्हसोबा मंदिर येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या पवित्र रुद्राभिषेक तथा होमहवन तसेच महाआरती संपन्न झाली त्यांची क्षणचित्रे

रुद्राभिषेक तथा होमहवन शुभहस्ते:
सौ. व श्री. साक्षी तुषार रायकर

सौ. व. श्री. स्नेहा नामदेव माळवदे
(नगरसेविका, पुणे महानगरपालिका)

आपले विनीत :
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे

 #वाढदिवस_अभिष्टचिंतनआपल्या "अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे" चे सहाय्यक "मा. रमणशेठ लुंकड" (संचालक, आर.के. लुंकड ह...
21/08/2026

#वाढदिवस_अभिष्टचिंतन

आपल्या "अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे" चे सहाय्यक "मा. रमणशेठ लुंकड" (संचालक, आर.के. लुंकड हौसिंग कॉर्पोरेशन लि.) यांचा आज (२१ ऑगस्ट) वाढदिवस.

त्यानिमित्त ट्रस्ट परिवाराच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. श्री मंडई म्हसोबा च्या आशीर्वादाने त्यांस उज्ज्वल अन् यशस्वी दीर्घायुष्य लाभो, हीच निर्मळ प्रार्थना...!!

शुभेच्छुक:
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे.

 #श्री मंडई म्हसोबा उत्सव (सन २०२६)भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा"वेनकाॅब पुणे श्री २०२६"धार्मिकतेतून विधायकतेकडे ...
20/08/2026

#श्री मंडई म्हसोबा उत्सव (सन २०२६)
भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा
"वेनकाॅब पुणे श्री २०२६"
धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या "अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे" च्या वतीने "श्री म्हसोबा उत्सव २०२६" दरम्यान मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता "वेनकाॅब पुणे श्री २०२६" ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वाधिक रोख पारितोषिकांसह पहिली भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा (बॉडी शो) आयोजित करण्यात आली होती
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड शरीरसौष्ठव संघटना व फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे यांच्या सहकार्याने तसेच वेनकाॅब आणि एन.इ.सी.सी. यांच्या प्रायोजकत्वाने एकूण ७ वजनी गटातील ही जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा तब्बल ३,१३,००० रूपयांच्या भरघोस रोख पारितोषिकांसह पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शुभहस्ते:
मा.श्री. आनंद पिंपळकर (संचालक: आनंदी वास्तू)
मा.श्री. नारायण मोहन गलांडे
(नगरसेवक तथा क्रीडा समिती अध्यक्ष, पुणे मनपा)

#स्थळ : मंडई म्हसोबा मंदिर प्रांगण, ६१ शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडई, मंडई म्हसोबा चौक, बुरुड आळी, पुणे २.
आपले विनीत:
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६{ श्रींची सांजआरती }“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव (सन २०२६)" ...
20/08/2026

श्री मंडई म्हसोबा उत्सव २०२६
{ श्रींची सांजआरती }

“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” आयोजित "म्हसोबा उत्सव (सन २०२६)" निमित्त श्रींची सांजआरती संपन्न झाली त्यांची क्षणचित्रे

श्रींची सांजआरती शुभहस्ते:
श्री. आनंदजी पिंपळकर (संचालक, आनंदीवास्तू)
सौ.व श्री भाग्यश्री साळुंखे

आपले विनीत:
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे

Address

६१. शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडई, मंडई म्हसोबा चौक, पुणे-२
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट,पुणे.:

Shortcuts

Share

Category