15/09/2018
*नर्मदा परिक्रमा*
*नर्मदे हर !!!*
*१८ दिवसीय नर्मदा परिक्रमा २०१९*
भारत देश हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. नद्या, पर्वत, जंगल, वाळवंट, समुद्र, हिमच्छादित प्रदेश असे भिन्न भिन्न प्रकार आपल्या एकाच देशात बघावयास मिळतात. हे सर्व भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते. नद्यांची दैवी प्रभावाची कल्पना, जाणीव आपल्या पूर्वसूरींना असल्यामुळे नद्यांबद्दल आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती, रीतीभाती आहेत; अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पॄथ्वीतलावरची एकमेवद्वितिय परंपरा आहे *नर्मदा परिक्रमा!*
भारतामध्ये नर्मदा नदीपेक्षाही अनेक मोठ्या नद्या आहेत परंतु परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते. नर्मदा परिक्रमा ही सर्वप्रथम श्री मार्कंडेय मुनी यानी केली,त्यांना शास्त्रोक्त महापरिक्रमेला जवळजवळ २७ वर्ष लागली.
नर्मदा परिक्रमा कुणी, का, कोणत्या वयात, कशी नी कश्यासाठी करावी ?...
नर्मदा परिक्रमा कुणीही करावी, इथे जन्मजात वंश, जाती, धर्म, लिंगभेद, वय यांची अजिबात आडकाठी नाही. नर्मदा परिक्रमा हे मानवी मनाच्या सबलीकरणाच, निर्मलीकरणाच साधण आहे. आपल्या स्वत:शिवाय दुसऱ्या कुणाच्याच हातात हे नाही. दुसऱ्याचे अनुभव वाचून किंवा ऎकून ते उमगलं, कळलं तरी त्याची अनुभूती स्वत:ची स्वत:च घेणं केव्हाही उत्तम, त्यामुळे नर्मदा परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहिच हरकत नाही.
पायी नर्मदा परिक्रमा ही चार्तुमास पाळून साधारण ३ वर्ष ३ महिने १३ दिवसात पूर्ण होते. ज्यांना शारिरीकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अश्यांनी २ ते ३ आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे परिक्रमा पूर्ण केली तरीसुद्धा चालते. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नी श्रद्धेने करणे अगत्याचे आहे. ही परिक्रमा म्हणजेच शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक तप आहे.
नर्मदा परिक्रमा ही जवळ जवळ ३५०० किलोमीटर आहे. सर्व नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ठ असली तरी परिक्रमा फक्त नर्मदेचीच केली जाते.
श्री स्वामी समर्थ सेवा संघ आयोजित नर्मदा परिक्रमा २०१९
परिक्रमा दिनांक :१६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१९
८ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०१९
परिक्रमा स्वरुप : ओंकारेश्वर येथे संकल्प करुन AC वाहनाद्वारे परिक्रमा सुरु होईल.
परिक्रमा सहभाग शुल्क : २७,२००/- प्रती व्यक्ती
परिक्रमा शुल्कात समाविष्ट घटक :
• सर्व प्रवास खर्च : पुणे ते पुणे रेल्वे तिकीट ( स्लिपर क्लास),
इंदोर ते इंदोर एसी बसने प्रवास.
• दररोज एक पाण्याची बाटली
• २ वेळचा चहा
• सकाळी नाष्टा
• दोन वेळचे जेवण
• राहण्याची उत्तम होटल मध्ये सुविधा
( टीप : रेल्वेमधील चहा, नाष्टा, जेवण, पाण्याचा खर्च वैयक्तिक असेल )
नोंदणीची अंतिम तारीख: ११ ऑक्टोबर २०१८
यात्रेविषयी अधिक महितीसाठी 9404033214 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर NP असा मेसेज करावा.
*यात्रेचा लाभ सर्वाना घेता यावा यासाठी अधिकाधिक ग्रुप्स वर शेअर करावी.*
*अधिक माहितीसाठी संपर्क :
*स्वामी समर्थ सेवा संघ*
कोथरूड,पुणे
फोन नं.
विश्वनाथ काळे: ९४२२३१४३५७
शिवाजीराव गायकवाड : ८०८७६९८२०९
*त्वदीयपाद पंकजं नमामी देवी नर्मदे !*