श्री संत तुकाराम गाथा

  • Home
  • India
  • Pune
  • श्री संत तुकाराम गाथा

श्री संत तुकाराम गाथा “संत तुकाराम महाराजांचे अभंग, तुकाराम गाथा आणि पांडुरंग विठ्ठल भक्ति यांचा संदेश सर्व भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न.”

25/06/2026

#मराठी #अभंग #संततुकाराम #विठ्ठल
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥

अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥

कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥

अर्थ:-

हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे .हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या .आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे .तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे .

17/06/2026

राम कृष्ण हरी #विठ्ठल #अभंग #संततुकाराम #मराठी

29/05/2026

संत तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग
जय जय राम कृष्ण हरी 🚩
#संततुकाराम #विठ्ठल
#मराठी #अभंग #जयहरीविठ्ठल

23/05/2026

जय हरी विठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी 🙏

20/05/2026

जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏 श्री संत तुकाराम गाथा

जय जय रामकृष्ण हरी 🙏जया नाहीं नेम एकादशीव्रत ।जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥त्याचें वय नित्य काळ लेखीताहे ।रागें दात ख...
13/05/2026

जय जय रामकृष्ण हरी 🙏

जया नाहीं नेम एकादशीव्रत ।
जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे ।
रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन ।
नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥
जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव ।
त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड ।
प्रत्यक्ष तें कुंड चर्मकांचें ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय ।
कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥

अर्थ

जे नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेतासमान समजला जावा .काळही त्याच्यावर रागाउन करकरा दांत खात असतो .ज्याच्या दारामधे तुळशीवृंदावन नाही, ते घर स्मशाणा प्रमाणे आहे .ज्याच्या कुळा मध्ये एकही वैष्णव नाही त्याचे संपूर्ण कुळच भवनदि च्या त्रिविध तापात बुडते . ज्या मुखामधे विठ्ठलाचे नावच येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजावे .
तुकाराम महाराज म्हणतात जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लकडा प्रमाणे असतात, असे मानावे.

13/05/2026

जय हरी विठ्ठल 🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
# #

12/05/2026
12/05/2026


रामकृष्ण हरी 🙏
जय हरी विठ्ठल

Address

Pune
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री संत तुकाराम गाथा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share