Christ For All Ministries- Pune

20/12/2025
*ह्याप्रमाणे नामी आपली सून मवाबी रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली; त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास ...
01/12/2025

*ह्याप्रमाणे नामी आपली सून मवाबी रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली; त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.*
रूथ 1:22

देवाची वेळ ही परिपूर्ण असते.

गरजवंत विधवा नामी आणि तिची सुन रुथ या दोघी जणी अन्नाची उपलब्धता होईल अशा समयी त्या मवाब देशाहून बेथलेहेम येथे परतल्या. तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.

कापणीच्या वेळी शेतातील सर्व पीके काढून न घेता काही उत्पन्न गोरगरीबांसाठी ठेवावे हा देवाचा नियम होता आणि त्या मुळेच त्यांना ते अन्न गोळा करण्याची संधी मिळाली अशासाठी की त्यांना अन्नाचा पुरवठा व्हावा.

आणि खरोखरच हि देवाची परिपूर्ण वेळ होती कारण हंगामाच्या काळात बवाज नियमितपणे आपल्या शेतीकडे जात असे. आणि यामुळेच रूथ आणि बवाज यांची भेट झाली, त्यांच्या नात्यात वाढ झाली आणि शेवटी त्यांचा विवाह झाला.

परमेश्वर देव वेळेचा मालक, गुरू, प्रधान आहे.

त्याच्या योजना नेहमीच घडून येतात—ना एक क्षण आधी, ना एक सेकंद उशीरा. योग्य त्या वेळी तो त्याची परिपूर्ण इच्छा पूर्ण करतो. त्याच्या योजनेत कोणीही अडथळा आणू शकत नाही, अगदी तारणाच्या योजनेतही नाही.

*परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.*
गलतीकरांस पत्र 4:4

आमेन!
🙏🏻🙏🏻🙏🏻

*“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”**आपली वस्त्रे नव्हे, तर हृद...
03/04/2025

*“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”*
*आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.*

योएल 2:12-13

पश्चात्ताप तो नाही जेव्हा आम्ही रडतो, पश्चात्ताप तो आहे जेव्हा आमचे जीवन पूर्णपणे बदलून जाते.

आमेन!

आपला दिवस आशिर्वादीत होवो!
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

*परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे.**परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःक...
21/03/2025

*परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे.*
*परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन.*

स्तोत्र संहिता 28:6-7

*PRAISE THE LORD!*
*GOOD MORNING!*
🌹🌹🌹

*खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्...
14/02/2025

*खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.*
यशया 53:5

*PRAISE THE LORD!*
*GOOD MORNING!*

Address

Pune
411030

Opening Hours

Wednesday 10am - 10pm
Sunday 10:30am - 12pm
6pm - 7:30pm

Telephone

+919665841044

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Christ For All Ministries- Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Christ For All Ministries- Pune:

Share