ध्यान योग

Directions

ध्यान योग नीर शून्यसे आयो बाबा, शून्य हमारा धाम,अलख हमारी मुद्रा,निरंजन हमारा ध्यान.
शोध स्वतःच्याच हृदयातल्या ईश्वरी अस्तित्वाचा....

ज्योतिष चिंतनकाल एका मित्राचा फोन आला होता,त्याचे म्हणणे होते की सध्याचे ज्योतिषी आणि त्यांनी पसरवलेले भ्रम किंवा मायाजा...
22/03/2026

ज्योतिष चिंतन

काल एका मित्राचा फोन आला होता,त्याचे म्हणणे होते की सध्याचे ज्योतिषी आणि त्यांनी पसरवलेले भ्रम किंवा मायाजाळ आणि लोकांची होणारी फसवणूक यावर काही तरी लिहावे.
खरं तर सध्या जे कॅप्टन अशोक खरात या भामट्याचे प्रकरण बाहेर आलं आहे ते अगदी मन सुन्न करणारे आहे...मिडिया वर याला भोंदू बाबा संबोधले आहे पण मी जाणून बुजून भामट्यांनी हा शब्द वापरला...लक्षात घ्या मोठ्या मोठ्या राजकारणी,उद्योजक आणि आपल्या माताभगिनींना फसवून गैरफायदा घेणारा भोंदू कसा ? खरं तर हा एक विकृत मनोवृत्तीचा आणि अतिशय थंड डोक्याने कोणत्या थराला जाणारा भामटा किंवा गुन्हेगार म्हणनेच योग्य किंवा पिसाळलेल जनावर म्हणणे योग्य.... असो खरं पाहता ज्योतिष हे अतिशय पवित्र आणि गूढ विज्ञान आहे...पण सध्या माणसांच्या काम करण्याच्या प्रत्येक क्षेत्रात पैसा, धन, लालसा, वासना किंवा दुर्भाव.... योग्यतेपेक्षा अधिक अहंकार जागृत झाला की माणूस जनावर बनू लागतो.
ज्योतिष्यांकडे जाणारे लोकस हे दोन प्रकारचे असतात...एक ते जे अतिशय देव भोळे आणि अंधश्रद्धाळू लोक जे पटकन विश्वास ठेवतात आणि फसतात...आणि त्याचे परिणाम भोगतात.. दुसरे ते लोक्स जे अतिमहत्त्वकांशी आणि अधिक हव्यास असणारे ज्यांना कशाही प्रकारे ज्योतिष्यांकडून कोणतीही नकारात्मक गोष्ट ऐकून घ्यायची नसते..किंवा त्यांना जे हवे ते ज्योतिषांनी बोलावे अशी त्यांची इच्छा असते.....हेच ते दोन प्रकारचे लोक्स जे आधी ज्योतिषांच्या बाजूने आणि नंतर झालेल्या फसवणुकीने त्यांच्या विरोधात जातात.
महान योगी देवराहा बाबांनी समाधी घेण्याआधी त्यांच्या ज्योतिषी मित्राला सांगितले होते..की ही एक पवित्र विद्या आहे आणि ती कधी सोडू नकोस अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच.
तरी पण अशा घटना आणि ज्योतिषी पाहिले की मन विषण्ण होते...तरी सर्व माता,भगिनी आणि मित्रांना मनापासून नम्र विनंती आहे की याकडे फक्त एक मार्गदर्शन म्हणून बघा,(जसे आपण गाडी चालवताना गुगल मॅप पाहतो ना अगदी तसेच)कोणत्याही ऐकीव माहितीवर विसंबून अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका...कोणालाही आपला प्रश्न किंवा समस्या सांगण्याआधी किंवा विचारण्याआधी समोरच्याला पारखून घ्या...आणि मगच विश्वास ठेवा...
लक्षात घ्या ज्योतिष ही विद्या आहे आणि त्याचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांपासून कायम सावध रहा....

ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषी हा पराविद्या म्हणजेच दैवी ज्ञान आणि अपराविद्या म्हणजेच सांसारिक ज्ञान या दोघांच्या मधला सेतू आहे ज्याचे काम आहे जातकाला समजदार किंवा सजग बनवणे.

काय आहे ना ज्योतिषी काही मोठ्या लोकांचे भविष्य अचूक सांगतात आणि तसे घडतेही...परिणामस्वरूप समाजात प्रशंसा होते...त्यातून इर्षा उत्पन्न होते...मग अहंकार वाढतो... अती पैशाचा हव्यास निर्माण होतो...सात्विकता लोप पावली की व्यक्ती तामसिक होतो..मग वासना वाढते...नैतिक किंवा अनैतिक हा विसर पडतो...त्यातूनच हे प्रसंग निर्माण होतात...
असो प्रत्येक ज्योतिषांनी स्वतः ला फक्त आणि फक्त माध्यम समजावे.. कर्ता करविता फक्त परमेश्वर.

कौस्तुभ कुलकर्णी ©
सज्ञान फाऊंडेशन

ज्योतिष रहस्य - अष्टम भाव आपल्या पत्रिकेतला अष्टम भाव म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न अनेकदा पडतो,आणि आपल्या माहितीनुसार ब...
15/03/2026

ज्योतिष रहस्य - अष्टम भाव
आपल्या पत्रिकेतला अष्टम भाव म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न अनेकदा पडतो,आणि आपल्या माहितीनुसार बऱ्याच वेळा आपण अष्टम शब्द जरी ऐकला तरी घाबरतो..कारण आपण आजपर्यंत हेच ऐकले आहे की हा मृत्यूचा भाव, क्रॉनिक आजारांचा भाव, अचानक होणारा लॉस...अनेक प्रकारचे निगेटिव्ह आणि त्रासदायक significations याच भावाशी जोडलेले आहेत.
Actually अष्टम भाव खरं तर अतिशय गूढ आणि रहस्यमय आहे जर याला समजलं नाही तर आपण बरंच काही गमावून बसतो...हा भीतीचा भाव..मृत्यूचा भाव...मृत्यू कसा येणार ..घरात...दवाखान्यात.. का ओशो रजनीश यांच्याप्रमाणे गूढ आणि रहस्यमय मृत्यू येणार ते समजून घेण्याचा भाव..किंवा मृत्यूनंतर काय ते समजून घेण्याचा भाव...अचानक घडणाऱ्या घटनांचा भाव.
पण जर सखोल विचार केला तर लक्षात येईल की अष्टम भाव म्हणजे अंत किंवा मृत्यू एवढेच नक्की नाही...तर अष्टम भाव म्हणजे आत्म्याचे transformation किंवा परिवर्तन करणाराही भाव आहे.
कालपुरुष किंवा निसर्ग कुंडलीत १२ भाव आहेत जे आपल्या जीवनातल्या १२ विभागाचे किंवा domain चे प्रतिनिधित्व करतात, पण अष्टम भाव हा एकमेव भाव असा आहे की जो असे अनुभव देतो की जे सांगता येत नाहीत..फक्त अनुभवता येतात..Hidden experiances which may transform or change your life suddenly and completly.... जणू काही हा आपल्या आविष्यातला Bermuda triangle... इथे जीवन अचानक आपली दिशा बदलते...जातक स्वतः च्याच अहंकाराची होळी साजरी करतात...किंबहुना असे अनुभव, अश्या घटना.. किंवा नात्यातले एखादे सत्य अचानक अशा पद्धतीने समोर येतात की नाती गोती.. रिलेशन्स...यावरचा विश्वास अचानक मातीत मिळतो..आणि मनुष्य आपल्या आत्म्याच्या खोल आणि गूढ विश्वाच्या गहराई मध्ये उतरायला सुरुवात होते. त्यामुळेच जुन्या संत महात्म्यांनी किंवा पराशर ऋषींनी या अष्टम भावाला रहस्य,परिवर्तन आणि पुनर्जन्माचा भाव असे म्हणले आहे.
जीवनात ज्या घटना आपल्याला अंतर्बाह्य बदलून टाकतात त्या याचा भावाच्या activation मुळे, एखादा अचानक होणारा मानसिक आघात याच भावाने मिळतो...नात्यातले एखादे रहस्य तुमचे जीवन अक्षरशाः अगदी ३६० अंशाने बदलून टाकतात ते याच अष्टम भावाने किंवा related महादशा आणि अंतरदशेने.....
इथे मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा किंवा तुमच्या physical existance हाच एकमेव अर्थ अभिप्रेत नाही आहे...हा मृत्यू आहे तुमच्यात वसलेल्या शडरिपूंचा ...हा मृत्यू आहे तुमच्या इगो चा....हा मृत्यू आहे त्याचा ज्याला आपण आविष्यभर...मी... माझा...म्हणून जोपासले त्या अहंकाराचा...एकदा का हे परिवर्तन पूर्ण झाले की मग पुनर्जन्म होतो ऐका नवीन आत्म्याचा...किंबहुना यातून तावून सुलाखून बाहेर पडलात की तुमची सुरुवात होते आत्मसाक्षात्कार किंवा enlightenment कडे....थोडक्यात काय तर अष्टम भाव म्हणजे अंत आणि नवीन सुरुवात या दोन्हींचा संगम म्हणूयात आपण....
इथे अष्टम भावात एखादा ग्रह बसला तर तो ग्रह स्वतः चा स्वभाव किंवा कारकत्व नॉर्मली म्हणजे सर्वसाधारण पणे नाही व्यक्त करत..तेही अगदी सखोल आणि रहस्यमय प्रभाव देतात...
समजा अष्टम भावात मंगळ आहे, तर जातकाच्या जीवनात तीव्र संघर्ष आणि परिवर्तन येतात.
समजा इथे सूर्य आहे,जातकाला अनेक वेळा स्वतः ची ओळख बदलावी लागू शकते.
समजा इथे चंद्र आहे, जातक अतिशय भावनिक आणि रहस्यमय बनतो.
अष्टम भावात शनी कर्मात म्हणजेच profession मध्ये संघर्ष आणि बदल दाखवतो.
अष्टम भाव फक्त वर्तमान जीवनातील ते कर्मच दाखवतो जे आत्मा मागच्या जन्मातून घेऊन आली आहे.
मागच्या एखाद्या जन्मात तुम्ही कधीतरी शक्तीचा दुरुपयोग केला असेल, एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात केला असेल.. एखादे guilt मागच्या जन्मापासून आत्म्यावर असेल...किंवा एखादा occult, तंत्र..मंत्र किंवा एखादी आध्यात्मिक इच्छा किंवा अनुभव अर्धवट राहिलेला असेल...आणि ते अर्धवट राहिलेलं काम,इच्छा किंवा अनुभव या जन्मात अष्टम भाव किंवा त्यात बसलेल्या ग्रहांच्या माध्यमातून समोर येते.
आता हे ग्रह किंवा अष्टम भाव कश्याप्रकारे फलित होतात ?
बऱ्याच वेळा sudden events...sadan losses.. किंवा काही वेळा sudden gains देतात, अनपेक्षित आणि अचानक घडणाऱ्या घटना हे अष्टम भाव दर्शवतात त्याचा उद्देश तुम्हाला किंवा तुमच्या आत्म्याला पूर्णपणे transform करणे हाच असतो, त्यामुळेच ज्यांचा अष्टम भाव शक्तिशाली किंवा इथे अनेक ग्रहांची युती असते त्याचं अविष्य सर्वसाधारण नसून विशेष असते, नियतीने त्यांची निवड केलेली असते जीवनाचे अंतिम रहस्य शोधून काढण्यासाठी आणि त्याद्वारे enlightened being होण्यासाठी....आजच्या भाषेत सशक्त अष्टम भाव म्हणाले की मला ब्रूस ली यांचे एक वाक्य कायम आठवते..."Do not pray for an easy life,pray for strength to endure a difficult one" मित्रांनो ही संघर्षातून परिवर्तन घडवणारी strength म्हणजेच अष्टम भाव.
हा भाव आपल्यापासून काही नाती,काही गोष्टी जबरदस्तीने काढून घेतो...परिस्थितीच अशी काही निर्माण होते की त्या ठराविक गोष्टी द्याव्याच लागतात...अश्याच पद्धतीने तुमचा अहंकार...तुमचं इमोशनल कम्फर्ट झोन,सुरक्षितता किंवा stability हा भाव आपल्यापासून काढून टाकतो किंवा या सर्वांपासून दूर नेतो...पण एक अतिशय चांगली आणि life changing गोष्ट आपल्याला देतो ती म्हणजे एक उत्कृष्ट आध्यात्मिक समज जी तुम्हाला जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत सोबत करते, हीच समज तुम्हाला हे दाखवते की जीवन फक्त ते नाही जे आपण डोळ्याने पाहतो...त्यापलिकडेही एक खोल,गूढ...रहस्यमयी आणि लपलेलं जीवन आहे ....सत्य आहे की जे फक्त आणि फक्त अनुभवता येते...त्याचा आनंद घेता येतो पण शब्दात व्यक्त करता येत नाही....म्हणूनच मी म्हणतो.. अष्टम भाव म्हणजे आत्म्याचे परिवर्तन आणि पुनर्जन्म !!!
चला तर मग let's start our journey of transformation....

धन्यवाद ...
कौस्तुभ कुलकर्णी ©
ध्यान योग

मित्रांनो हा लेख नावासहीत शेअर करायला हरकत नाही...स्वतः चे नावावर कॉपी पेस्ट करून तुमचं कर्म बिघडवू नका ही विनंती..

22/10/2025
 #गुरू  आजवर आपण या विषयावर अनेक लेख वाचले असतील पण तरीही संपूर्ण माहिती कधीच मिळत नाही.कित्येक जण अनेक वर्षं किंबहुना द...
09/10/2025

#गुरू आजवर आपण या विषयावर अनेक लेख वाचले असतील पण तरीही संपूर्ण माहिती कधीच मिळत नाही.कित्येक जण अनेक वर्षं किंबहुना दशक म्हटलं तरी कमीच पडेल इतका काळ गुरूंच्या शोधात फिरत आहेत पण यश काही मिळत नाही,बरोबर ना मित्रांनो? अनेकांनी तर कित्येक स्वयंघोषित #मार्गदर्शकांचे दरबारात हजेरी लावलेली आहे..अनेकांनी #पेड ध्यान सेशन अटेंड केलेली आहेत,वेळ, पैसा आणि बरेच काही गमावलेले पण आहे..पण इतके करून ना खरे गुरू मिळाले ना समाधान ? का बरं हा प्रश्न इतका जटिल आहे ? का मिळत नाहीत खरे आध्यात्मिक गुरू ? का होते फसवणूक स्वयंघोषित बाजारी व्यक्तींकडून ? कधी केलाय याबद्दल विचार ? मित्रांनो गुरू - शिष्य हे नातेच मुळी अद्भुत आहे आणि त्याला जन्मो- जन्माची सेवा,साधना आणि उपासना याची जोड असावी लागते. पूर्वजन्मातील केलेलं कुकर्म आणि राहिलेले #भोग आधी संपवावे लागतात,पूर्वजन्मातील राहिलेल्या वासना शमवाव्या लागतात,यासाठी कधी कधी अगदी ३ ते ४ जन्म किंवा त्यापेक्षाही जास्तीचा काळ जावा लागतो. अर्थात गुरुकृपेची त्रीव इच्छा आणि जाणीव असावी लागते मगच आपल्याला मार्ग मिळत जातो.पण लक्षात घ्या हे जे काही दोन, तीन अथवा अनेक जन्म तुम्ही घेणार आहात तेव्हाही गुरू सोबतच असतात..त्यांची करडी नजर तुमच्यावर असते..तुमचे भोग सरण्याची वाट ते पाहत असतात..प्रत्येक जन्मात अनेक प्रलोभनही देतात..मोहाचे प्रसंग समोर आणतात...काही जन्मात अगदी वेदनादायक #मृत्यू सुद्धा देतात..पण अर्थात हे सर्व काही तुमचे भोग संपवण्यासाठीच गुरूंची योजना असते ज्याची तुम्हाला किंवा मला तिळमात्र कल्पना नसते. एकदा का आपण या परीक्षेत उत्तम कामगिरी केली आणि पास झालो की #गुरू आपोआप प्रकट होतात..आता ते या जन्मात की पुढच्या ते फक्त आणि फक्त तुमचं कर्म आणि भोग यावर अवलंबून आहे. यामुळेच कित्येक ज्योतिषी पत्रिका हातात आली की #पंचम आणि #नवम भाव बघतात कारण त्यावरून आपण केलेली पूर्वजन्मातील कर्म मग पुण्य असो वा पाप - पंचम भाव दाखवतो,आणि आपल्या पूर्वज आणि त्यांच्या बद्दल चे भविष्य - नवम भाव दाखवतो. #पितृदोष सुद्धा याच दोन भावांनी पहिला जातो..असो विषयांतर नको.. तर finally the moral of the story is आपण जे काही वागत आहोत ते योग्य आणि आहे का हे तपासून बघा....कोणालाही जाणीवपूर्वक दुःख देऊ नका किंवा नकळत ही कोणाच्या दुःखाला कारणीभूत ठरू नका.आपल्याला एखाद्याचे चांगले करता येत नसेल तर वाईट तरी करू नका... #सात्विकता जपा... #आध्यात्मिकता जोपासा...कोण जाणे कोणत्या रूपात खरे गुरू समोर येतील ? अंतर्मुख व्हा ..मी कोण आहे ? माझे ह्या देह रूपात जन्म घेण्याचे प्रयोजन काय आहे हे स्वतः लाच विचारा...याचे उत्तर तुम्हालाच शोधायचे आहे..बाहेरून कोणताही गुगल बाबा नाही देणार..किंवा बाजारू मार्गदर्शक नाही देऊ शकणार...हाच आहे खरा #शोधअध्यात्माचा ...

कौस्तुभ कुलकर्णी
ध्यान योग ©

लेख आवडला तर नक्की शेअर करा...

04/10/2025

जन्माला आलास तेव्हा कोण होतं सोबत ? जेव्हा शेवटच्या घटका मोजशील...अखेरचे काही श्वास घेत असशील तेव्हा कोण असेल सोबत ? बाबारे...विचार तुझे लाडके मित्र येतात का सोबत ? तुझा भाऊ,बहीण... आणि अजून कोणी आहे का इच्छुक ?? अरे एकटाच आलास जन्माला...अंगावर कपडे तरी होते का ?? नाही ना ...शेवटी जेव्हा सरणावर ठेवतील..किंवा आजच्या modern day context मध्ये electric शवदाहीनी मध्ये टाकतील...तुझी बॉडी जाळायला, तेव्हा कोण असेल सोबत ? काय असेल सोबत ? आविष्यभर कमावलेला पैसे ? नाव ? सर्टिफिकेट? ...नाही ना...मग कशाचा रे इगो? कसला अहंकार ? अरे मित्रा...तो great पोरस सिकंदर...आठवतो का ?
याद रख सिकंदर की हौसले तो आली थे...जब गया था दुनिया से दोनो हाथ खाली थे....बरोबर ना? तेव्हा लक्षात घे...एकटाच जन्माला आलास आणि एकटाच जाणार...तेव्हा प्रत्येक वेळी विचार कर...आणि मग react हो...शेवटी काय तर,"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हेच खरे...तुझ्या प्रत्येक चांगल्या कृत्याला ही तूच जबाबदार आणि वाईटालाही...
त्यामुळे स्वतः ला शोध मित्रा...

माझी मूर्ती किंवा पुतळा बनवू नकामाणूस जितका साधा दिसतो, तितकाच चलाख असतो. इतिहास साक्षी आहे — ज्याचं ज्याचं पुतळा बनवला,...
04/10/2025

माझी मूर्ती किंवा पुतळा बनवू नका
माणूस जितका साधा दिसतो, तितकाच चलाख असतो. इतिहास साक्षी आहे — ज्याचं ज्याचं पुतळा बनवला, त्या माणसाचं दैवत केलं गेलं. मूर्ती बनण्यापूर्वी तो माणूस असतो — हाडां-मांसाचा, घाम-रक्ताचा झगडा करणारा, प्रश्न विचारणारा, चुका करणारा, पुढे जाणारा, अडचणी येणारा आणि मग उठणारा. पण जेव्हा आपण त्याचा पुतळा बनवला दगडाचा, त्याचे विचारही दगडबंद झाले. लोक त्याची सजीवता विसरले, त्याचे संघर्ष विसरले, त्याची क्रांती विसरले.

मग काय उरतं? उरतो पूजा-अर्चेचा खेळ. उरतो प्रसाद, उरते माळ, उरती अगरबत्ती. आणि माणूस म्हणतो — "बघा, आम्ही त्याचा आदर केला." खरं तर आदर केला नाही, तर आपल्या खांद्यावरचा ओझा टाकून दिलं. कारण जोपर्यंत तो माणूस जिवंत होता किंवा त्याचे विचार जिवंत होते, तोपर्यंत आपल्याला बदलावं लागत होतं, आपल्याला आपल्या घरांत, मंदिरांत, संसदेत, समाजात आणि स्वतःच्या अंतरंगात क्रांती करावी लागत होती. पण पुतळा बनवून आपण त्याला सुरक्षित केलं — दगडात, आणि विचारांना कुलूप लावून विसरलो.

विचार करा, कबीरांची मूर्ती बनली, त्यांचे दोहे मंदिरांच्या भिंतींवर लिहिले गेले, पण कबीरांनी ज्या पाखंडावर प्रहार केला होता, तेच पाखंड आजही मंदिरांत जिवंत आहे. बुद्धांची मूर्ती प्रत्येक गल्ली-कोपऱ्यात सापडतात, पण बुद्धांनी जी करुणा, ध्यान आणि मौन शिकवलं होतं, ते आजही वाळवंटातल्या पाण्यासारखं दुर्मिळ आहे. गांधींचा पुतळा संसदेसमोर दिमाखात उभा आहे, आणि संसदेच्या आत रोज तेच होतं जे पाहून गांधी कदाचित जमिनीवर पडले असते किंवा आपण का जन्म घेतला याचा पश्चाताप झाला असता.

हीच माणसाची सर्वात मोठी चलाखी आहे — महापुरुषांचं दैवत करा, म्हणजे विचार मरतील. जोपर्यंत तो माणूस आहे, तोपर्यंत आव्हान आहे, प्रश्न आहे, क्रांती आहे. पण जसं त्याचं दैवत केलं, तो देव झाला पण त्याचा विचार राहत नाही — तो पूजेची वस्तू झाला. पूजा करणं सोपं आहे, बदलणं कठीण.

म्हणून मी म्हणतोय — माझं पुतळा करू नका. माझ्या विचारांशी झगडा करा, माझ्यावर टीका करा, मला चुकीचं सिद्ध करा, मला पुढे न्या,माझ्या विचारांना जिवंत ठेवा.... माझ्याशी सहमत असाल, तर ते जगा; असहमत असाल, तर त्यांना आव्हान द्या. पण त्यांना दगडी पुतंळ्याबरोबर पुरू नका.

मूर्ती किंवा पुतळा बनताच माणसाची जबाबदारी संपते. पूजा सुरू होते आणि विचार संपतात. आणि हाच माणसाचा सर्वात धोकादायक खेळ आहे — तो आपल्या महापुरुषांचं दैवत बनवून त्यांच्यापासून सुटका करतो.

तर, खरंच आदर करायचा असेल — तर माझा पुतळा बनवू नका, माझे विचार जिवंत ठेवा. हीच खरी श्रद्धांजली असेल.

आपल्या हृदयातल्या परमात्म्यास माझा नमस्कार.....

ओशो रजनीश 🙏

· "मी मंदिरांमध्ये, चर्चांमध्ये आणि मशिदींमध्ये शोधले. पण मला ईश्वर माझ्या स्वतःच्या हृदयात सापडला."  I looked in temple...
01/10/2025

· "मी मंदिरांमध्ये, चर्चांमध्ये आणि मशिदींमध्ये शोधले. पण मला ईश्वर माझ्या स्वतःच्या हृदयात सापडला."
I looked in temples, churches, and mosques. But I found the Divine in my own heart.

Rumi

🎯 गुरु!!! गुरू तोची देव जाणावातो धिटाईने वृद्ध गुरुसमोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते....
30/09/2025

🎯 गुरु!!!

गुरू तोची देव जाणावा
तो धिटाईने वृद्ध गुरुसमोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.

कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.

" तुला माझ्या कडून काय हवे आहे ???" गुरूने त्या मुलाला विचारले.

"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे !!!"

शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे ??? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला ???"
"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात. मोठी माणसं नको तितकी कीव करतात. मला त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो !! मला माझ्या हिमतीवर जगायचंय !! कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे !!"

"ठीक आहे !! पण मी आता तो 'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्या कडे कोणी पाठवलं ???"

"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांचा 'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. 'तुला फक्त तेच शिकवू शकतील. कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही !!' असे ते म्हणाले होते."

'तो उन्मत्त 'शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ओळखले. अशा अहंकारी माणसांमुळेच ही विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली. याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.

"ठीक आहे, आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे. या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो. लक्षात ठेव, *आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा*. मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे. ज्युडो-कराटे ही खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो !! म्हणून ही विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले ???"

"हो सर. समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन." मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले. आणि आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास त्यांनी आरंभ केला.

एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच ते त्याच्याकडून करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.

"सर, सहा महिने झालेत. एकच मूव्ह तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना ???"

"आहेत! अनंत डाव आहेत !! ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल !! पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे. आणि इतकेच तुझ्या साठी पुरेसे पण आहे !!"

गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

बरेच दिवसानंतर ज्युडोचे टुर्नामेंटस जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला. पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले !!

पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा ??? कोण गुरु असावा ??

तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाच्या सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो सामना सुद्धा त्यानेच जिंकला !!

आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणही जिंकू शकतो !! ही भावना त्याला बळ देत होती. बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहोचला.

ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता !!

प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणार हे स्पष्ट दिसत होते. पंचानी एकत्र येऊन विचार केला.

"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही, कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान तर एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो. प्रथम जेते पद विभागून देण्यात येईल! अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच." मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.

"मी या चिरगुट पोरा पेक्षा श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे !!" तो प्रतिस्पर्धी उर्मटपणे म्हणाला.

"मी लहान असेन, तरी मला हे टाकलेले उपविजेतेपद नको आहे !! माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे. मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेते पद आहे ते स्वीकारीन !!" त्या लढवय्याचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी जास्त झाले तर ??? आधीच एक हात नाही अजून एखादा अवयव गमावला जायचा !! मूर्ख मुलगा !!

सामना सुरु झाला. आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला. परफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स !! अप्रतिम! केवळ अप्रतिम !!!

गुरुगृही पोहचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांना पायावर डोके ठेवून आपली पूज्य भावना व्यक्त केली.

"सर, एक शंका आहे. विचारू ???"
"विचार."
"मला फक्त एकच डाव/ मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो ???"

"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास !!"

"कोणत्या,सर ???"

"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव !! त्या मुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे !! त्यात चूक होणे अशक्य आहे !!"

"आणि दुसरे कारण ???"

"दुसरे कारण हे, त्याहून महत्वाचे आहे. प्रत्यक डावाचा एक प्रतिडाव असतो !! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे !!"

"मग तो, माझ्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास माहित नव्हता कां ???"

"तो त्याला माहित होता !! पण तो हतबल झाला, कारण ??? कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो !!"

आता तुम्हाला समजले असेल की, एक सामान्य, एक हात नसलेला मुलगा कसा जिंकला ???

ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु !!!

आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो, कमजोर असतो. फक्त त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा !!!*(forwarded)



🧘‍♂️

Address

Pimpri Chinchwad
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ध्यान योग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share