Balbhim Mandir Pune

Balbhim Mandir Pune Balbhim Mandir, Deccan Gymkhana, Pune.

सद्गुरू श्री भागीरथीनाथ महाराज यांनी त्यांचे सद्गुरू प.पू.बलभीम महाराज यांचे आदेशानुसार ज्ञानभक्तीपर संप्रदायाची मुहुर्तमेढ पुणे येथे सन १९१६ मध्ये सदाशिव पेठेतील निंबाळकर तालमीशेजारी श्रीमती ताई साठे यांचे वाड्यात प्रथम रोवली. पुढे भक्तवर्ग जसा वाढू लागला,तसे हे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी त्यांनी सन १९३७ मध्ये हे बलभीम मंदिर आपल्या सद्गुरूंच्या स्मरणार्थ बांधले. श्री सद्गुरूंचे प्रतीक व त्यांचे

उपास्यदैवत म्हणून श्री बलभीम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांनी स्वहस्ते केलेली आहे. अडीचशे वर्षे ज्या खाडिलकर घराण्यात सातत्याने श्री वणीच्या सप्तशृंगी देवीची उपासना चालू होती, त्या घराण्यात अवतरलेल्या शक्तीस्वरूप भागीरथीनाथांनी या शक्तिमान व बुद्धिमतावरिष्टम अशा बलभीमाची प्रतिष्ठापना 'दासमारूती' म्हणून हे मंदिर उभारले. सर्वार्थाने शक्तिपीठ व ज्ञानपीठ आहे. सद्गुरू श्री भागीरथीनाथ महाराज यांनी घालून दिलेली उपासना आज गेली ६३ वर्षे या मंदिरात अव्याहतपणे श्रद्धेने व असीम निष्ठेने चालू आहे. ती अशीच चालू रहावी ही गुरुदेवांना प्रार्थना.

Address

769/8, Balbhim Mandir, Lane No. 7, Bhandarkar Road, Near PYC Ground, Deccan Gymkhana
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balbhim Mandir Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category