Shree Ganadheesh

Shree Ganadheesh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Ganadheesh, Religious organisation, Pune.

आश्विन शुद्ध विजयादशमी सीमोल्लंघन राजोपचार पोशाख, श्री चिंतामणी थेऊर 🙏🚩
24/10/2023

आश्विन शुद्ध विजयादशमी सीमोल्लंघन राजोपचार पोशाख, श्री चिंतामणी थेऊर 🙏🚩

अद्य दिने विशेष पोशाख, श्री चिंतामणी थेऊर 🙏🚩
08/05/2023

अद्य दिने विशेष पोशाख, श्री चिंतामणी थेऊर 🙏🚩

नमन श्री एकदंता। एकपणे तूचि आता।एकी दाविसी अनेकता। परि एकात्मता न मोडे।श्री ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि ज्ञाने...
08/05/2023

नमन श्री एकदंता। एकपणे तूचि आता।

एकी दाविसी अनेकता। परि एकात्मता न मोडे।

श्री ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि ज्ञानेश्वरीचा सखोल संस्कार या ओव्यांवर आहे. स्वसंवेद्य आत्मरूपाला वंदन करून ज्ञानेश्वरांनी ‘देवा तूचि गणेशु’ असे म्हणून निर्गुणाच्या पातळीवरून सगुणाच्या पातळीवर गणेशास मानले आहे. एकनाथांनीही ‘एकी दाविसी अनेकता।’ असे म्हटले आहे. संत एकनाथांनी गणेशाच्या चार भुजा म्हणजे धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत असे म्हटले आहे. गणेशाचे दोन कान म्हणजे पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही कल्पना ज्ञानदेवांच्या गणेशरूपकातील आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी नि:शब्द होऊन गणेशला शरण जातात. एकनाथांचा गणेश सत्रुप, चित्रुप आणि आनंदरूप असा सच्चिदानंद रूप आहे. गणेशाचे चरण म्हणजे प्रकृती आणि पुरुष आहेत. प्रकृतिपुरुष ही सांख्यतत्त्वज्ञानातील संकल्पना संत एकनाथ येथे चरणयुगुलांसाठी योजितात. गणेशाच्या हाती परशु असून त्याने ‘संसारफांसोटी’ म्हणजे संसारपाश तोडून टाकतो. भक्तांच्या श्रद्धा भावनेने त्यांना अभय देतो. निजबोधरूपी अंकुशाने भवव्यथा नष्ट करून जन्ममरणाचे संकट नाहीसे करतो.

गजाननं भूतगणादि सेवितंकपित्थजम्बूफलसार भक्षितम् ।उमासुतं शोकविनाशकारणंनमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ॥                     ...
26/03/2023

गजाननं भूतगणादि सेवितं
कपित्थजम्बूफलसार भक्षितम् ।
उमासुतं शोकविनाशकारणं
नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ॥

माघ वद्य संकष्ट चतुर्थी, बालस्वरूप श्री चिंतामणीचे जन्मोत्सवाचे मनमोहक स्वरूपातले दर्शन. श्री चिंतामणी थेऊर 🙏🚩
10/02/2023

माघ वद्य संकष्ट चतुर्थी, बालस्वरूप श्री चिंतामणीचे जन्मोत्सवाचे मनमोहक स्वरूपातले दर्शन. श्री चिंतामणी थेऊर 🙏🚩

भेट जिवाभावाची...🌺🙏श्री चिंतामणी व श्री मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती यांच्या भेटीचा सोहोळा आज पार पडला...
29/01/2023

भेट जिवाभावाची...🌺🙏
श्री चिंतामणी व श्री मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती यांच्या भेटीचा सोहोळा आज पार पडला...

श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणेश,सोमवार पेठ, पुणेहे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराची घडण एखाद्या शिवमंदिराप्रमाणे आ...
27/01/2023

श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणेश,सोमवार पेठ, पुणे
हे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराची घडण एखाद्या शिवमंदिराप्रमाणे आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना इथे पाहावयास मिळतो. वास्तुस्थापत्त्य, मूर्तिवैचित्र्य व समाधीवर असलेली 'श्री' मूर्ती ही येथील विशेषता आहे..

🌺माघ शु.तृतीया ब्रम्हांडनाथ श्री मयुरेश्वर प्रभुंचा पारंपारिक..सुवर्ण रत्न वस्ञ अलंकार महापोशाख दर्शन🌺
24/01/2023

🌺माघ शु.तृतीया ब्रम्हांडनाथ श्री मयुरेश्वर प्रभुंचा पारंपारिक..सुवर्ण रत्न वस्ञ अलंकार महापोशाख दर्शन🌺

॥ अथ श्रीगणेशावतारस्तोत्रम् ॥।।श्रीगणेशाय नमः।। ।।श्रीमद्सद्गुरुवे नमः।।।।श्रीमत्स्वानंदेशाय ब्रह्मणस्पतये नमः।।आङ्गिरस ...
11/01/2023

॥ अथ श्रीगणेशावतारस्तोत्रम् ॥

।।श्रीगणेशाय नमः।। ।।श्रीमद्सद्गुरुवे नमः।।
।।श्रीमत्स्वानंदेशाय ब्रह्मणस्पतये नमः।।

आङ्गिरस उवाच
अनन्ता अवताराश्च गणेशस्य महात्मनः ।
न शक्यते कथां वक्तुं मया वर्षशतैरपि ॥ १॥

संक्षेपेण प्रवक्ष्यामि मुख्यानां मुख्यतां गतान् ।
अवतारांश्च तस्याष्टौ विख्यातान् ब्रह्मधारकान् ॥ २॥

वक्रतुण्डावतारश्च देहिनां ब्रह्मधारकः ।
मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ॥ ३॥

एकदन्तावतारो वै देहिनां ब्रह्मधारकः ।
मदासुरस्य हन्ता स आखुवाहनगः स्मृतः ॥ ४॥

महोदर इति ख्यातो ज्ञानब्रह्मप्रकाशकः ।
मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः स्मृतः ॥ ५॥

गजाननः स विज्ञेयः सांख्येभ्यः सिद्धिदायकः ।
लोभासुरप्रहर्ता च मूषकगः प्रकीर्तितः ॥ ६॥

लम्बोदरावतारो वै क्रोधसुरनिबर्हणः ।
आखुगः शक्तिब्रह्मा सन् तस्य धारक उच्यते ॥ ७॥

विकटो नाम विख्यातः कामासुरप्रदाहकः ।
मयूरवाहनश्चायं सौरमात्मधरः स्मृतः ॥ ८॥

विघ्नराजावतारश्च शेषवाहन उच्यते ।
ममासुरप्रहन्ता स विष्णुब्रह्मेति वाचकः ॥ ९॥

धूम्रवर्णावतारश्चाभिमानासुरनाशकः ।
आखुवाहनतां प्राप्तः शिवात्मकः स उच्यते ॥ १०॥

एतेऽष्टौ ते मया प्रोक्ता गणेशांशा विनायकाः ।
एषां भजनमात्रेण स्वस्वब्रह्मप्रधारकाः ॥ ११॥

स्वानन्दवासकारी स गणेशानः प्रकथ्यते ।
स्वानन्दे योगिभिर्दृष्टो ब्रह्मणि नात्र संशयः ॥ १२॥

तस्यावताररूपाश्चाष्टौ विघ्नहरणाः स्मृताः ।
स्वानन्दभजनेनैव लीलास्तत्र भवन्ति हि ॥ १३॥

माया तत्र स्वयं लीना भविष्यति सुपुत्रक ।
संयोगे मौनभावश्च समाधिः प्राप्यते जनैः ॥ १४॥

अयोगे गणराजस्य भजने नैव सिद्ध्यति ।
मायाभेदमयं ब्रह्म निवृत्तिः प्राप्यते परा ॥ १५॥

योगात्मकगणेशानो ब्रह्मणस्पतिवाचकः ।
तत्र शान्तिः समाख्याता योगरूपा जनैः कृता ॥ १६॥

नानाशान्तिप्रभेदश्च स्थाने स्थाने प्रकथ्यते ।
शान्तीनां शान्तिरूपा सा योगशान्तिः प्रकीर्तिता ॥ १७॥

योगस्य योगता दृष्टा सर्वब्रह्म सुपुत्रक ।
न योगात्परमं ब्रह्म ब्रह्मभूतेन लभ्यते ॥ १८॥

एतदेव परं गुह्यं कथितं वत्स तेऽलिखम् ।
भज त्वं सर्वभावेन गणेशं ब्रह्मनायकम् ॥ १९॥

पुत्रपौत्रादिप्रदं स्तोत्रमिदं शोकविनाशनम् ।
धनधान्यसमृद्ध्यादिप्रदं भावि न संशयः ॥ २०॥

धर्मार्थकाममोक्षाणां साधनं ब्रह्मदायकम् ।
भक्तिदृढकरं चैव भविष्यति न संशयः ॥ २१॥

।।इति श्रीमुद्गलपुराणान्तर्गतं गणेशावतारस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
।।श्रीमत्स्वानंदेशार्पणमस्तु।।
।।श्रीमद्सद्गुरुपादार्पणमस्तु।।
मंगलमुर्ती मोरया...!
मोरया...!🌺🙏🌺

जय गणेश🙏🌺माझ्या विभूती जाणणारा माझा भक्त नाश पावत नाही. देव अथवा ऋषि माझी उत्पत्ति व विभूति जाणत नाहीत. नानाप्रकारच्या व...
15/12/2022

जय गणेश🙏🌺
माझ्या विभूती जाणणारा माझा भक्त नाश पावत नाही. देव अथवा ऋषि माझी उत्पत्ति व विभूति जाणत नाहीत. नानाप्रकारच्या विभूतींनीं विश्व व्यापून मी स्थित आहे. जगामध्ये जे जे अत्यंत श्रेष्ठ ते ते माझी विभूति आहे. विभूती म्हणजे अशी स्थानं जिथं ईश्वराचं ऐश्वर्य , शोभा , प्रभाव , महात्म्य , तेज ठळकपणे जाणवतं. अशी स्थानं बघितली की , आपली नजर ईश्वराकडे जाऊन आपण नतमस्तक होतो. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दहाव्या अध्यायात त्यांच्या विभूती कुठं कुठं आहेत ते सविस्तर सांगितलंय आणि शेवटी ते म्हणतात , जगात जे जे काही श्रेष्ठ आहे ते ते माझी विभूती आहे असे समज. अरे या विभूतीतही माझ्यासारखं प्रचंड सामर्थ्य जरी असलं तरी त्याही माझ्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाहीत. माझ्या सामर्थ्याची चुणूक म्हणून तुला सांगतो की , हे सर्व ब्रह्मांड मीच व्यापलंय आणि माझ्याशिवाय इथं दुसऱ्या कशाला अस्तित्वच नाहीये रे ! यासाठी माझ्या सामर्थ्याचा एक छोटासा अंशही पुष्कळ होतो.

- श्री गणेशगीता

जय गजानन.आज कार्तिक शुद्ध षष्ठी.भगवान श्री कार्तिकेय जयंती. श्री स्कंद स्थापित व पूजित वेरूळ येथील भगवान लक्षविनायक
30/10/2022

जय गजानन.
आज कार्तिक शुद्ध षष्ठी.
भगवान श्री कार्तिकेय जयंती.
श्री स्कंद स्थापित व पूजित वेरूळ येथील भगवान लक्षविनायक

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷॥ॐवन्दे कल्पक कुञ्जरेन्द्रवदनं वेदोक्तिभिस्तिल्वभू-      देवैः पूजितपादपद्मयुगलं पाशच्छिदं प्राणिनाम् ।दन्ता...
26/10/2022

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
॥ॐवन्दे कल्पक कुञ्जरेन्द्रवदनं वेदोक्तिभिस्तिल्वभू-
देवैः पूजितपादपद्मयुगलं पाशच्छिदं प्राणिनाम् ।
दन्तादीनपि षड्भुजेषु दधतं वाञ्छाप्रदत्वाप्तये
स्वाभ्यर्णाश्रयिकामधेनुमनिशं श्रीमुख्यसर्वार्थदम् ॥
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
मंगलमूर्ती मोरया 🙏😇
कार्तिक शु.१ बलिप्रतिपदा श्रीं चे सायंकालीन वस्त्रालंकार महापुजा दर्शन जय गजानन 🙏😇
दि.२६/१०/२०२२

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ganadheesh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share