PunyNidhi

PunyNidhi Abhinandan Chhajed (अभिनंदन छाजेड पिंपरी चिंचवड पुणे)

*पिंपळे गुरव येथे जैन चातुर्मास पर्व २०२२ निमित्त श्री महर्षि आनंद युवा मंचातर्फे घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीर आणि म...
16/11/2022

*पिंपळे गुरव येथे जैन चातुर्मास पर्व २०२२ निमित्त श्री महर्षि आनंद युवा मंचातर्फे घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीर आणि मोफत महाआरोग्य तपासणी शिबीरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद*

जैन चातुर्मास पर्व २०२२, पिंपळे गुरव निमित्त श्री महर्षि आनंद युवा मंचातर्फे जैन साध्वीजी सौम्य साधिका प. पु. पुण्यस्मिताजी म.सा. व ओजस्वी वक्ता प. पु. प्रणिधीजी म.सा. आदि ठाणा २, पिंपळे गुरव यांच्या सान्निध्यात व त्यांच्या कृपार्शिवादाने रसिकलाल माणिकचंद धारीवाल जैन स्थानक भवन, भिमाशंकर काॅलनी, पिंपळे गुरव येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका (वाय. सी. एम.), ह्युमन सक्सेस सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य), श्री. लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप (आमदार,भा.ज.पा‌‌. चिंचवड विधानसभा), श्री. शंकरशेठ पांडुरंग जगताप (निवडणुक प्रमुख,भा.ज.पा‌‌. चिंचवड विधानसभा,मा. नगरसेवक पिं.चिं. म.न.पा), श्री. महेशदादा दत्तात्रय जगताप (स्वीकृत नगरसेवक, भा.ज.पा. पिं.चिं. म.न.पा.) यांच्या संयुक्त विद्यमानाने "महारक्तदान आणि मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे" आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान व आरोग्य शिबीरात ज्युपिटर हाॅस्पिटल (बाणेर),आदित्य बिर्ला हॉस्पिटल (चिंचवड) ,वाय.सी.एम. हाॅस्पिटल (पिंपरी) व श्रद्धा क्रिटीकेअर हॉस्पिटल (पिंपळे गुरव) या नामांकित हाॅस्पिटल अंतर्गत विविध आरोग्य विषयी सेवा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सदर शिबीरामध्ये नेत्र चिकित्सा,दंत चिकित्सा,कान-नाक-घसा,थायरॉईड तपासणी, किडणी विकार, गुडघे प्रत्यारोपण,संधीवात, हाडांचे व मणक्यांचे आजार,पोटाचे आजार,स्त्री रोग,मेंदूचे विकार,हार्निया,मुळव्याध,त्वचारोग, लहान मुलांचे आजार, रक्तदाब, रक्तगट ,शुगर तपासणी (जनरल तपासणी) इत्यादी तपासण्यांचा समावेश होता. सदर शिबीराचे उद्घाटन
श्री. शंकरशेठ पांडुरंग जगताप (निवडणुक प्रमुख,भा.ज.पा‌‌. चिंचवड विधानसभा), श्री. महेशदादा दत्तात्रय जगताप (स्वीकृत नगरसेवक,भा.ज.पा. पिं.चिं. म.न.पा.) यांच्या हस्ते पिंपळे गुरव जैन स्थानकाचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रा. सुरेश धाडीवाल (सर), चातुर्मास अध्यक्ष श्री. सुर्यकांत बाफना,श्री. सुभाषजी मुथ्था,श्री. प्रदीपजी बाफना यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर शिबीरामध्ये श्री. अनिकेत काटे (स्विकृत नगरसेवक, पिं.चिं. म.न.पा.), श्री. राम बांगड (संस्थापक अध्यक्ष,रक्ताचे नाते ट्रस्ट,महाराष्ट्र राज्य, रक्तमित्र, जीवनगौरव, पुणे हिरो, सामाजिक समरसता मंच, महेश गौरव, महाराष्ट्र जन सन्मान या सर्व पुरस्काराचे मानकरी), श्री. भाग्यदेव घुले (विशेष कार्यकारी अधिकारी, भोसरी पोलीस शांतता कमिटी सदस्य), श्री. रविन्द्रजी बलाई (राष्ट्रीय कोषाध्यक्ष,जीवन प्रकाश योजना,ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स,दिल्ली,अध्यक्ष पोलीस मित्र संघटना,औंध, रिपोर्टर सत्य पोलीस मित्र टाईम्स,एक्स रिपोर्टर ऑल इंडिया टीव्ही न्यूज), श्री. सतिश बांदल (वास्तुतज्ञ,संचालक, क्रीडावेध महाराष्ट्राचा न्यूज पेपर), श्री. विजय गायकवाड (सकाळ न्यूज पेपर), श्री. धर्मचंदजी फुलपगर (उपाध्यक्ष, पंचम झोन ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स, दिल्ली), जनसेवक श्री. देवदत्त लांडे, श्री. सुरेशजी गादिया (कासारवाडी) आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबीराचे विशेष सहकार्य आणि आयोजन श्री. सुखानंद कांबळे (संस्थापक अध्यक्ष,ह्युमन सक्सेस सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) ),श्री. गणेश मुथ्था,श्री. अभिनंदन छाजेड,श्री. रवींद्र गांधी, श्री. आशिष काटे,श्री. प्रशांत कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात पिंपळे गुरव,पिंपळे सौदागर,सांगवी,दापोडी, कासारवाडी,औंध विभागातील ज्येष्ठ नागरिक,पुरुष वर्ग, महिला वर्ग यांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शविली होती. सदर शिबीरामध्ये श्री महर्षि आनंद युवा मंच, पिंपळे गुरव जैन श्रावक संघ आणि जय आनंद महिला मंडळ उपस्थित होते.
सदर शिबीराला श्री. शंकरशेठ जगताप,श्री. महेशदादा जगताप,श्री. प्रा. सुरेश धाडीवाल (सर),श्री. सुखानंद कांबळे यांनी उत्कृष्ट सहकार्य आणि मार्गदर्शन केले‌.
आपणा सर्व हाॅस्पिटल, मान्यवरांचे,नागरिकांचे आणि ज्येष्ठ पत्रकारांचे श्री. अभिनंदन छाजेड यांच्याकडून मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏

साप्ताहिक क्रीडावेध महाराष्ट्राचा

https://kridavedhnews.in/archives/1331
👆👆👆👆👆👆

https://maharashtrajainwarta.com/organizing-shri-maharishi-anand-yuva-manchatarfe-maharakta-donation-and-mofat-maha-arogya-tapasani-shibirache/
👆👆👆👆👆👆

*दीक्षा घेण्यासाठी वैराग्यवती कु, अंजली जैन यांचा आज्ञापत्र कार्यक्रम पिंपळे गुरव येथे मोठ्या थाटामाटात संपन्न* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸...
01/11/2022

*दीक्षा घेण्यासाठी वैराग्यवती कु, अंजली जैन यांचा आज्ञापत्र कार्यक्रम पिंपळे गुरव येथे मोठ्या थाटामाटात संपन्न*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
पुणे परिसरातील पिंपळे गुरव येथे यावर्षी महासाध्वी पू, श्री, पुण्यस्मिताजी म, सा, व पू,. श्री, प्रणिधिजी म, सा, आदी ठाणा 2 यांचा चातुर्मास मोठ्या जप -तपाने आनंद मंगलमय वातावरणात चालला असून त्यांच्या प्रेरणेने चातुर्मासाच्या अंतिम टप्प्यात चिकलठाण औरंगाबाद येथील गेली पाच वर्षांपासून वैराग्य काळ प्राप्त झालेली वैराग्यवती कु, अंजली दीपकजी जैन यांना त्यांच्या परिवाराकडून अखेर आज्ञापत्र मिळाले, हा कार्यक्रम पिंपळे गुरव येथे चातुर्मासार्थ विराजित असलेल्या महासतीजी पू, श्री,पुण्यस्मिताजी म, सा, आदी ठाणा 2 यांच्या सानिध्यात रविवार दिनांक ३० आॅक्टोंबर २०२२रोजी रामकृष्ण मंगल कार्यालय मध्ये मोठ्या आनंद मंगलमय वातावरणात संपन्न झाला, पिंपळे गुरव जैन श्रावक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी विजयकांतजी कोठारी, बाळासाहेबजी धोका, मोहनलालजी संचेती, राजेंद्रजी मुनोत, सागरजी सांखला , रूचिराताई सुराणा, सुरेखाताई कटारिया, कुसुमबाई भंडारी, चेन्नई येथील दिनेशजी भळगट, सुरेशजी गादीया, सुभाषजी ललवाणी, जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाषबाबू लुंकड, चाकण येथील सुवालालजी बोरा व अनिलजी कुचेरिया, प्रकाशजी कटारिया, विलासजी पगारिया, नितीनजी बेदमुथा, नितीनजी चोपडा, राजेंद्रजी लुंकड, दिलीपजी नहार, अशोकजी बागमार, विलासजी मुथा, जवाहरलालजी भंडारी, प्रकाशजी भंडारी, सचिनजी नहार, नितीनजी बाठीया, रविन्द्र जी बलाई ,किशोरजी भंडारी, अशोकजी मंडलेचा, प्रकाशजी बंब, रसिकलालजी नहार, श्रेयशजी पगारिया, सुर्यकांतजी छाजेड, नगरसेवक राजेंद्रजी जगताप,माजी नगरसेवक शामभाऊ जगताप, सुभाषजी मुथा, राजेंद्रजी बाठीया, राजेंद्रजी चोरडिया असे अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते, श्री, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री, सुरेशजी धाडीवाल यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले,
वैराग्यवती कु, अंजली जैन ही नवकार आराधिका पू, श्री, प्रतिभाजी म, सा, यांच्या पावन सान्निध्यात लवकरच दीक्षा घेणार असून दीक्षाचा प्रथम कार्यक्रम म्हणजे परिवाराकडून आज्ञापत्र हा असतो, तो कार्यक्रम पिंपळे गुरव येथे संपन्न झाला, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या साक्षीने हा संयम आज्ञापत्र कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेशजी धाडीवाल, सुर्यकांतजी बाफना, दिलीपजी भन्साळी, राजेंद्रजी बाठीया व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले, यावेळी विजयजी चोरडिया यांनी आठ उपवासाचे महासतीजीकडून पचक्खाण घेतले, संगीतकार अनुपजी जैन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आपल्या स्वमधूर गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रमानंतर सुर्यकांतजी सुयोगकुमारजी छाजेड परिवारातर्फे गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती, शेवटी दिलीपजी भन्साळी यांनी सर्वांचे आभार मानले,

*🙏श्री महावीराय नम:🙏**🙏जय जिनेंद्र🙏**🙏आज्ञापत्र की कार्यक्रम पत्रिका 🙏*आपको सूचित करते हुये हर्ष हो रहा है की *वै. मुमुक...
29/10/2022

*🙏श्री महावीराय नम:🙏*
*🙏जय जिनेंद्र🙏*
*🙏आज्ञापत्र की कार्यक्रम पत्रिका 🙏*
आपको सूचित करते हुये हर्ष हो रहा है की *वै. मुमुक्षु कु. अंजली दीपक जैन* अपने जीवन के नये मोड संयम मार्ग पर अग्रेसर हो रही है। उसका पहला कदम आज्ञापत्र है।
प. पू. महासाध्वी *पुण्यस्मिताजी* म. सा. तथा प. पू. महासाध्वी *प्रणिधिजी* म. सा. के सानिध्य में *रविवार दि. ३०-१०-२०२२* को *सुबह १०.०० बजे *कु. अंजली के आज्ञापत्र* का आयोजन *पिंपळे गुरव जैन श्रावक संघ* के तत्वाध्यान में आयोजित किया है। आप और आपके सहपरिवार की उपस्थिती प्रार्थनीय है।🙏🙏
कार्यक्रम :-
*सुबह ७.३० से ८.३० - नाश्ता / नवकारशी*
*सुबह ८.३० बजे वरघोड़ा - जैन स्थानक / बॅंक ऑफ महाराष्ट्र चौक से रामकृष्ण मंगल कार्यालय*
*सुबह १०.०० से १.०० बजे तक अंजलि का आज्ञापत्र, सन्मान तथा गुण गौरव।*
*दोपहर १.०० बजेसे गौतम प्रसादी*

*स्थल: रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव, पुणे - ४११०६१*

*विनीत*
*भामाशाह रसिकलाल माणिकचंद धारीवाल जैन स्थानक भवन*
*🙏🏻श्री वर्धमान जैन श्रावक संघ, महर्षि आनंद युवा मंच, जय आनंद महिला मंडळ, पुणे 🙏*

*गौतम प्रसादी के लाभार्थी*
*श्रीमती पद्माबाई दगडुलालजी छाजेड*
*श्री सूर्यकांतजी, सौ सुशीला, श्री सुयोग, सौ स्विटी एवं छाजेड परिवार औंध, पुणे*

Address

Pimple Gurav
Pune
411061

Telephone

+918308668075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PunyNidhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share