Parelcha Icchapurti - Lal Maidan

Parelcha Icchapurti - Lal Maidan Lal Maidan Sarvajanik Ganeshutsav Mandal
Parelcha Icchapurti, Lal Maidan | (Estd 1947)
Celebrating 80th year of Ganeshotsav
Use

वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वद:

वक्र सोंड आणि तुंदिलतनु देवा, कोटी सूर्यांसमान तेजस्वी गणराया, आमच्या कार्यांतील सर्व विघ्नं, सर्व अडथळे सदा दूर करा!

ही अजरामर प्रार्थना, सन १९४७ पासून परळचा इच्छापूर्तीचीचे प्रेरणास्थान ठरली आहे.

मुंबापुरीच्या मूळ सात बेटांपैकी एक, परळ. येथे वाढलेल्या गिरणीकामगार आणि चाळकर्‍यांनी गणेशोत्सवाला आज हे रंगरूप दिलं. बद

लाचे वारे वाहिले आणि बंद पडत्या गिरण्यांतले कामगार त्याच वार्‍यावर गेले. आज त्यांचा वसा पुढे नेतांना गणेशोत्सवाची पताका वाहण्याचं कर्तव्य आम्ही पेलत आहोत. दशकांचे परिश्रम आणि जोपासना आज गणेशोत्सवाच्या ह्या रूपाचं कारण ठरले आहेत.

परळच्या या लालमैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ७५ वर्षांची समृद्ध परंपरा आणि हजारो कार्यकर्त्यांची साथ आहे. सार्वजनिक उपक्रमांत आघाडीवर राहून गणेशोत्सव आम्ही नेहमीच गाजवत आलो आहोत. रक्तदान शिविरं, रक्तदात्यांची यादी, 'स्वच्छ परळ मोहीम', अशा समाजोपयोगी कार्यांतून बाप्पांचा आशीर्वाद आम्ही लोकांसमोर साकार केला आहे.

ही यशस्वी परंपरा घडवणार्‍या, ह्या कार्यात हातभार लावणार्‍या आमच्या शुभेच्छुकांचे आणि कार्यकर्त्यांचे आम्ही शतश: ऋणी आहोत. येत्या काळात अशाच उपक्रमांतून जनाधार आणि जनसेवा पुढे नेण्यास आम्ही बांधील आहोत.


म्हणूनच, सर्व गणेशभक्तांना बापांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आन्मच्या मंडळात सहर्ष आमंत्रित करत आहोत.

गणपती बाप्पा मोरया|| मंगलमूर्ती मोरया||

वारसा इतिहासाचा, प्रारंभ नव्या पर्वाचा! 🔱लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ॥ परळचा इच्छापूर्ती ॥भव्य आगमन सोहळा २०२६दिना...
18/08/2026

वारसा इतिहासाचा, प्रारंभ नव्या पर्वाचा! 🔱

लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
॥ परळचा इच्छापूर्ती ॥

भव्य आगमन सोहळा २०२६

दिनांक : ६ सप्टेंबर २०२६
दुपारी ठिक १:०० वाजता
स्थळ : तिरमल स्टुडिओ, गणसंकुल, परळ (भारतमाता सिनेमा)

मूर्तिकार : श्री. आकाश तिरमल
यंदाचा देखावा: श्री क्षेत्र केदारनाथ मंदिर

[ Parelchaicchapurti, lalmaidan, aagman, gansankul, lalbaugparel, aagmansohla, firstlook, Ganpati, Bappa ]

aagmansohala

18/08/2026

उत्सवाचा मंगलारंभ…🔱
परंपरा, भक्ती आणि भव्यतेचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा!
परळचा इच्छापूर्ती-लाल मैदान मंडप पूजन २०२६

हिमालय दूर नाही.. यंदा परळ नगरीत अवतरणार महादेवाचं श्री क्षेत्र केदारनाथ! 🔱परळच्या इच्छापूर्तीचा विजय असो! हर हर महादेव!...
17/08/2026

हिमालय दूर नाही.. यंदा परळ नगरीत अवतरणार महादेवाचं श्री क्षेत्र केदारनाथ! 🔱

परळच्या इच्छापूर्तीचा विजय असो! हर हर महादेव!

लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
॥ परळचा इच्छापूर्ती ॥

यंदाचं खास आकर्षण: श्री क्षेत्र केदारनाथ मंदिर
[ Kedarnath Temple, Shankar, Parelchaicchapurti, lalmaidan, decoration, theme, lalbaugparel ]

वारसा इतिहासाचा, प्रारंभ नव्या पर्वाचा! 🔱लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ॥ परळचा इच्छापूर्ती ॥भव्य आगमन सोहळा २०२६दिना...
13/08/2026

वारसा इतिहासाचा, प्रारंभ नव्या पर्वाचा! 🔱

लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
॥ परळचा इच्छापूर्ती ॥

भव्य आगमन सोहळा २०२६

दिनांक : ६ सप्टेंबर २०२६
स्थळ : तिरमल स्टुडिओ, गणसंकुल, परळ.

मूर्तिकार : आकाश तिरमल

[ Parelchaicchapurti, icchapurti, Lalmaidan, lalbaugparel,
Mumbaiganpati, Bappa, aagman, Akashtirmal, gansankul, ganeshustav ]
#80

या रे या! सारे या! श्रींच्या मंगल पाटपूजनाने भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या पर्वाचा आज शुभारंभ! परळचा इच्छापूर्तीच्या कृ...
03/08/2026

या रे या! सारे या!
श्रींच्या मंगल पाटपूजनाने भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या पर्वाचा आज शुभारंभ! परळचा इच्छापूर्तीच्या कृपेने प्रत्येक क्षण मंगलमय होवो. 🙏✨
#80

30/07/2026

✨ श्री परळचा इच्छापूर्ती नम: ✨
लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

🙏 पाटपूजन सोहळा 🙏

शुभारंभाची मंगल वेळ,
भक्तीचा दरवळ, आनंदाचा मेळ!

या साक्षीदार व्हा या पवित्र क्षणाचे,
आशीर्वाद घ्या श्री इच्छापूर्ती च्या चरणांचे. ❤️🙏

📅 १ ऑगस्ट २०२६ (शनिवार)
🕖 सायंकाळी ७:०० वा.
📍 लाल मैदान, परळ

https://www.instagram.com/reel/DbZ8vDtClhx/?igsh=ZnNpczhpcnB6ejg1

📲

#80

✨ श्री परळचा इच्छापूर्ती ✨🙏 पाटपूजन सोहळा 🙏📅 १ ऑगस्ट २०२६ (शनिवार)🕖 सायंकाळी ७:०० वा.📍 लाल मैदान, परळभक्ती, श्रद्धा आणि ...
29/07/2026

✨ श्री परळचा इच्छापूर्ती ✨

🙏 पाटपूजन सोहळा 🙏

📅 १ ऑगस्ट २०२६ (शनिवार)
🕖 सायंकाळी ७:०० वा.
📍 लाल मैदान, परळ

भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने नटलेल्या या शुभ सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.

[ parelchaicchapurti, icchapurti, lal maidan, Parel ]

ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रत्येक गुरुचरणी कृतज्ञतेचा नम्र प्रणाम.*गुरुपौर्णिमेच्य...
28/07/2026

ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या, अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रत्येक गुरुचरणी कृतज्ञतेचा नम्र प्रणाम.
*गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!*🙏🏻❤️
#80

https://www.instagram.com/p/DbWXuiKiRKe/?igsh=ZDFoZG5jOW5tYnA1

28/07/2026

Address

Lal Maidan
Parel
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parelcha Icchapurti - Lal Maidan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share