Shree Vitthal Rakhumai Mandir , Owe

Shree Vitthal Rakhumai Mandir , Owe RAM KRISHN HARI

श्री विठ्ठल रखमाई मंदिर, सेक्टर ३०, ओवेगाव. खारघर.

इतिहास -
श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे गाव , ता.पनवेल , जि.रायगड

श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे गाव - खारघर सेक्टर ३० , नवी मुंबई

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर , ओवे ,ता.पनवेल , जि.रायगड ( नवी मुंबई ) या मंदिराचा यंदा १०५ वे वर्ष सोहळा मोठ्या उत्साहने शुक्रवार दि.२८ जुलै २०१७ ते शुक्रवार ०४ ऑगस्ट २०१७ या कालावधीत संपन्न होत आहे
सन १९१२ साली श्

रावण शुद्ध एकादशीस या मंदिराची स्थापना झाली आणि या मंदिराने वारकरी संप्रदायात एक इतिहास घडविला . नुकतच चार वर्षांपूर्वी जुने मंदिर जीर्ण झाल्याने शतक महोत्सवा दरम्यान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला . या मंदिराचा इतिहास फारच उद्बोधक असल्यामुळे त्याचा परिचय सर्वाना होणे आवश्यक म्हणून हा पंक्ती प्रपंच !
ओवे गावातील संत विभूती श्री शंकर मास्तर हि आगरी समाजाला लाभलेली एक विभूती होती .शंकर मास्तर उर्फ मास्तर काका हे व्यक्तीमत्त्व पाहिलं कि , त्यांचे जीवन या विशिष्ट कार्यासाठीच होते असे म्हणावे वाटते .मास्तर काकांनी प्रपंच यथासांग केला , उच्च कोटीचा परमार्थ व सामाजिक बांधिलकी ठेऊन अनेक रंजलेल्यांची अखंड सेवा केली . विठ्ठल मंदिराची स्थापना करून काकांनी समाजाला परमार्थाचा आदर्श घालून दिला आहे .
१०५ वर्षापूर्वी ओवे हे लहानसे खेडे होते आणि अशा गावात काका हे सधन शेतकरी म्हणून राहत होते .भातशेती बरोबर काका कशी मळ्याची लागवड करत असे . आंब्याच्या मोठ्या बागा होत्या . काका रोज सकाळी शेतावरून जाऊन येत व दुपारी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्या सामाजिक कार्यात मग्न असत .के.इ.एम. हॉस्पिटल मध्ये काकांची चांगलीच ओळख होती . त्या ओळखीमुळे अनेकांना हॉस्पिटलमधून विनामुल्य उपचार काका करून देत असत . प्रपंचाबरोबर विठ्ठल मंदिराच्या सेवेत काका सदैव दंग असायचे . काकांचा परमार्थिक अभ्यास , वाचन ,चिंतन मोठे होते . अनेक साधूंच्या सानिध्यात ते राहिले . सदैव सेवा परायण , विनम्र , हात जोडून पायाला हात जोडून वाकून नमस्कार करून पायाला हात लावून अभिवादन करणे हा काकांचा स्वभाव होता . मुखात सतत हरी हरी या भगवंत नामाचा जप तर विहिरीचे गार पाणी न गुळाचा खडा त्याच्या हातावर ठेवणार . आलेला पाहुणा जेवल्याशिवाय कधीच गेला नाही , हे काकांच्या गृहस्थाश्रमाचे वैशिष्ट्य होते . काकांच्या घरी अखंड अन्नदान हे यज्ञाप्रमाणे चालू असयाचे . अशा विभूतीचे कार्य पाहू .

|| श्री विठ्ठल मंदिराची स्थापना ||

तळोजे गाव त्याकाळी सर्व खेड्यांची बाजारपेठ होती . तळोज्याला अप्पा , आबा अमृते हे सधन सुवर्णकार कुटुंब सुवर्ण व्यवसायाबरोबर परमार्थाची आवड असल्यामुळे त्यांच्या माडीच्या ओटीवर भजन , पूजन होत असे . संत साधू नेहमीच येत जात असे . अमृते कुटुंबीय व्यवसाया बरोबर शेतीही करत असत . त्यांची शेते ओवे , पापडीचा पाडा , इनामपुरी या भागात असल्यामुळे त्यांचा आणि मास्तर काकांचा परिचय होऊन ते एका परिवारासारखे राहिले . काका सात्विक आणि देवभक्त , साधू संतांची आवड त्यामुळे काका नेहमी आबा अप्पांच्या सानिध्यात असत . आळंदी पंढरपुरच्या वारीला जात . काकांचे दुसरे घर म्हणजे तळोज्याचे अमृते यांचे घर होते .

आबा , अप्पा अमृते यांचे गुरु सद्गुरू श्री.विश्वनाथमहाराज उर्फ वामनमूर्ती नेहमी तळोज्यास यायचे . तळोज्याला आल्यानंतर ज्ञानेश्वरी , भागवत , भजन , पुजन चाले . त्यावेळी शंकर मास्तरही येत असत .काकांची यातून संगत व सत्संगाची आवड वाढत गेली व त्यांनीही सद्गुरू श्री.विश्वनाथमहाराज यांच्याकडून वारकरी पंथाची दीक्षा व अनुग्रह घेतला . पुढे काकांना असे वाटले कि , आपल्या हातून श्री विठ्ठलाची अखंड सेवा व्हावी म्हणून ओवे गाव येथे विठ्ठल मंदिर बांधण्याचा विचार केला . ओवे गावात त्या काळी कोणतेही मंदिर नव्हते . आबा , अप्पा , सद्गुरू विश्वनाथमहाराज आणि काकांचे इष्ट मित्र परिवार या सर्वांच्या सहमताने विठ्ठल मंदिर बांधण्याचे ठरले आणि श्राव्न्न शुद्ध एकादशी सन १९१२ मध्ये श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना झाली आणि ओवे परिसरात पंढरीचे वैभव प्राप्त झाले . दिवसेंदिवस मंदिराची महती वाढत गेली व ओवे गावचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला .

|| विठ्ठल मंदिराचे वैभव आणि कार्य ||

प्रती पंढरपूर म्हणून हा ओवे गावचा उत्सव त्या काळात खूप गाजला होता . पावसाला असूनही ओवे येथे एकादशीला भाविकांची खूप गर्दी असायची .बेलापूर पट्टी , उरण , खोपटे , तळोजे पंचक्रोशी , डोंबिवली , ठाणे , नाशिक , आळंदी , पंढरपूर , देहू येथून संत महात्मे , कीर्तनकार , प्रवचनकार येत . त्यांचे कीर्तन , प्रवचन ऐकण्यासाठी भाविकांची रीघ लागायची .सद्गुरू श्री राजाराम महाराज उर्फ देव प्रवचन सेवेसाठी बेलापूरहून मुद्दाम या उत्सवासाठी अखंड ५० वर्षे येते होते .रात्री सद्गुरू विश्वनाथमहाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होई . त्या काळात एवढे चांगले श्रवण फक्त या मंदिरातून मिळत असे .

|| संगीत भजन महोत्सव ||

या ओवे गावातील उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील संगीत भन कलावंत भजनासाठी आवर्जून यायचे . त्या काळात अत्यंत लोकप्रिय असलेले श्री.तुळशीरामबुवा , साटमबुवा , शिवरामबाबा , भाटकरबुवा , स्वमिबुवा , जनार्दनबुवा , नामदेवबुवा असे दिग्गज कलावंत एकादशीच्या सेवेत हजेरी लावत असत . त्यांची भजने ऐकायला तुडूंब गर्दी होत असे . विठ्ठल मंदिर नाम गजराने दुमदुमत असे . एका वेळेला तीन तीन ठिकाणी भजने होत असे . असा भजनाचा आनंद कुठे हि पहावयास मिळणार नाही .

|| श्री विठ्ठल मंदिराच्या सेवेतील परिवार ||

वै.शिवराम बगल्या म्हात्रे : शिवराम दादा म्हणजे काकांचा पुतण्या , पण काकांचा पुत्र शोभत होता . काकांच्या तालमीत शिवराम दादा परिपूर्ण तयार झाले . रोज सकाळी देवळात काकडा , संध्याकाळी हरिपाठ - भजन हि सेवा शिवराम दादांनी केली होती . व्यवहार , पाहुणा , साधू संतांचे आदरातिथ्य अशी सर्व सेवा दादाने अत्यंत निष्ठेने व आदराने केली . काकांच्या आज्ञेत राहून शिवराम दादा यांनी प्रपंच व परमार्थ दोन्ही साधले . काकांची परंपरा अतिशय उज्ज्वल अशी पुढे चालवली .

वै.सीताबाई शंकर म्हात्रे : काकांच्या सेवेत अखंड राहून - आप्त इष्ट , पाहुण्यांना सामोरे जावून सीता काकीनी प्रपंचात उणीव भासू न देता परमार्थिक भक्तांचीही फार सेवा केली . शेतीची कामे करताना त्यांनी विठ्ठलाच्या भक्तांची अपार सेवा केली .


वै.सीताबाई शिवराम म्हात्रे : शिवराम दादांची अर्धांगिनी म्हणून जन्मभर कुटुंबाची व मंदिराच्या सेवेत रमल्या . सासूबाई सीता काकींच्या बरोबर अखंड सेवेत त्यांनी जीवन धन्य केले . रामकृष्णाला सांभाळून त्याला प्रपंचात सुखी ठेवले . रामकृष्ण यांचा परिवार आज हि मंदिराच्या सेवेत आहे .

श्रीमती इंदुबाई शिवराम म्हात्रे : या श्री.मोहनजी यांच्या मातोश्री सीताकाकींच्या दुसऱ्या सुनबाई यांनी त्यांच्यानंतर सर प्रपंचाचा भार आपल्यावर घेतला . सर्व मुला बाळांना मोठे करून मंदिराची सेवा त्या मनोभावे करत आहेत .हि भावी पिढी सुना , नातवंड , अखंड विठ्ठल मंदिराच्या सेवेत रमलेली आहेत .

अमृते परिवार : काकांची सर्वस्वी आधारस्तंभ व अंतकरण पूर्वक संबंध होते , ते अमृते परिवाराशी अप्पा , आबा व मथुरा अक्का ( कारेकर ) यांच्याशी रोजच काहीना काही कारणानी गाठ भेट होत . सिताकाकी आणि त्या महिला यांना मथुरा अक्कांचा फार मोठा आधार वाटे . काकांच्या प्रापंचिक तथा परमार्थिक उत्कर्षामध्ये अमृते मंडळी फार मोलाची आहेत . हीच परंपरा पुढे त्यांच्या पिढीने म्हणजे अरुण कारेकर , जगदीश अमृते , आबा अप्पांची मुल मुली सर्वानीच प्रेमाने जपली व विठ्ठल मंदिराची सेवा केली , करीत आहेत .

|| ओवे परिसरातील समाज श्रेष्ठींचे मंदिराशी योगदान ||

त्या काळात मुरबीचे काशिनाथ शेठ , खारघरचे तुकाराम पाटील रांजणपाड्याचे चौधरी , रोहिंजनचे हाल्या पाटील , जोमा पाटील , खुटूक बंधन , इनामपुरी , पापडीचा पाडा या बरोबर तळोजे मजकूरचे दादू पाटील , रामदासबुवा , पेठालीचे नामदेव शेठ किरवलीचे नारायणशेठ आदी समाजातील श्रीमंत व मान्यवर मंडळीं काकांशी घनिष्ठ संबंध होते .

याजसाठी केला होता अट्टाहास
काका ( ओवे ) गावाच्या स्मशानात २ दिवस जात होते व स्मशानातील काटे - कुटे काढत . गवत साफ केले . काकांना विचारले हे काय करता ? " अरे बाबा कुणी गेला तर लोकांना यायला रस्ता तरी पाहिजे ना !" बांधावर गवत वाढल आहे . स्मशानात केवढे गवत - चिखल . म्हणून हे सगळ करतोय ." काकांनी वाढलेल्या तुळशीच्या कुडांच्या जुड्या बांधून ठेवल्या . पताकांना ध्वजा लावल्या . ताल - पखवाज व्यवस्थित केले . आणी ३ दिवसांनी काकांनी निर्वाण केले . स्वताचे निर्वाण त्यांना कळले होते . त्यांनी स्वताच सर्वाना त्रास नको म्हणून सर्व जय्यत तयारी करून ठेवली होती .ताल दिंड्यांच्या गजरात एका गुरुभक्ताची , समाज श्रेष्ठीची , गोर गरीबांचा कैवारी , विठ्ठल भगवंताचा परमभक्त निजधामाला गेला . तो दिवस भाद्रपद शु. चतुर्थी गणपतीचा पहिला दिवस . प्रत्येक वर्षी गणपतीच्या दिवशी काकांचे सहज सहज स्मरण होते .

' गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ' काकांनी समाजाला खूप काही दिले . त्यांचे हे कार्य परत यांच्या माध्यमातून मोहनशेठ म्हात्रे व त्यांचे बंधूयांच्या मार्फत नवीन मंदिराच्या रूपाने उभे राहिले आहे . त्या पुण्यपुरुषाच्या चरणी साष्टांग दंडवत ! यंदा महारष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकार प्रभूती या उत्सवात ज्ञानदान करणार आहेत त्यात प्रामुख्याने ह.भ.प.श्रीपुरुषोत्तममहाराज पाटील बुलढाणा , ह.भ.प.श्रीदादामहाराज शिरवळकर, गुरुवर्य ह.भ.प.श्रीसंदिपानमहाराज शिंदे ,ह.भ.प.श्रीकेशवमहाराज नामदास , ह.भ.प.श्रीरविंद्रमहाराज हरणे ,ह.भ.प.श्री.डॉ.विकासानंदमहाराज मिसाळ , ह.भ.प.प.पू.श्रीगुरू प्रमोदमहाराज जगताप, ह.भ.प.श्रीमुकुंदकाका जाटदेवळेकर यांचा समावेश आहे .

यंदा उत्सवात आपल्या परिसरातील वारकरी संप्रदयातील अध्वर्यू असे असणाऱ्या पूज्य व्यक्तिमत्त्वांचा सद्गुरू श्रीविश्वनाथमहाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे .

श्रीरामदासबाबा , त.मजकूर - सद्गुरू श्रीवामनबाबा यांच्या केलेल्या अवरीत सेवे बद्दल व संप्रदाय प्रचार प्रसार अतुलनीय कार्य
श्रीगोविंदबाबा वाहळकर - श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जीवनभर केलेल्या सेवा प्रित्यर्थ
श्रीराजाराममहाराज उसाटने - कीर्तनाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात वारकरी संप्रदाय प्रचार प्रसार अतुलनीय कार्य
श्रीदगडूबुवा सकपाळ - निष्ठावंत वारकरी ( विणेकरी बाबा )

तालमणी श्रीप्रतापराजजी पाटील यांचे शिष्य श्रीजयेंद्र म्हात्रे व गुरुबंधू मंडळ कीर्तनास पखवाज साथीकरीता उपस्थित राहणार आहेत . तरी सर्व भाविकांनी या १०५ व्या वर्षातील कीर्तन महोत्सवात सहभागी व्हावे व परमार्थिक आनंद लुटावा . ओवे गावच्या श्री विठ्ठल मंदिराला पूर्वीचे भक्तीचे वैभव पुन: मिळवून द्यावे या करिता आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय !



माहीती संकलन - श्रीअक्षयमहाराज भोसले , बिजवडीकर


स्वागताभिलाषी - श्री.मोहन शिवराम म्हात्रे
अध्यक्ष - श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर ओवे गाव , ता.पनवेल , जि.रायगड व समस्त ग्रामस्थ

03/08/2022
11/08/2020

🌺जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🌺

।। श्रीपांडुरंग ।। सद्गुरु श्रीविश्वनाथबाबा , गुरुवर्य शंकरमास्तर व पू. श्रीशिवरामबाबा यांच्या कृपाशीर्वादाने सुरु असलेल...
23/07/2020

।। श्रीपांडुरंग ।।

सद्गुरु श्रीविश्वनाथबाबा , गुरुवर्य शंकरमास्तर व पू. श्रीशिवरामबाबा यांच्या कृपाशीर्वादाने सुरु असलेला ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सव , ओवे गाव यांचे यंदाचे १०८ वे वर्षं आहे . जगभरातील कोरोना नामक विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दि .२४ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२० यादरम्यान होणार आपला उत्सव यंदा अल्प स्वरूपात संपन्न होईल . कृपया याची नोंद घ्यावी . कीर्तनमहोत्सवास आपण स्थगिती दिली आहे . मंदीरात सोशल डिस्टन्स पाळत केवळ ग्रंथपुजन व प्रतिनिधीक स्वरुपात कार्यक्रम केले जातील . ( संख्या केवळ ५ वारकरी ) .कृपया आपण सर्वांनी घरी राहून नामचिंतन व श्रीज्ञानेश्वरी पारायण करावे ही विंनती . पुढील वर्षी आपण मोठ्या उत्साहात आपला उत्सव संपन्न करुयात. कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावे .

ONLINE श्रीज्ञानेश्वरी पारायण Zoom द्वारे संपन्न होईल .

- ह.भ.प.मोहन शिवराम म्हात्रे व परिवार , समस्त ग्रामस्थ ओवे गाव .

संत श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या समाधी सोहळ्यास भगवान  श्रीपांडुरंगांचा पालखी सोहळा आपल्या हजारो वारकऱ्यांच्या समवेत ..! भ...
11/10/2019

संत श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या समाधी सोहळ्यास भगवान श्रीपांडुरंगांचा पालखी सोहळा आपल्या हजारो वारकऱ्यांच्या समवेत ..!

भगवान श्रीपांडुरंग पालखी सोहळा -
श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र आळंदी

आपण ही आपल्या दिंडी समवेत यात सामील होऊ शकतात . प्रवेश सर्वांना खुला .

वारीच्या प्रत्येक क्षणाची माहिती आता आपल्या अक्षयवारीच्या माध्यमातून व्हाट्सएप द्वारे मिळू शकेल .
#कार्तिक #वारी #समाधी #सोहळा #संत #ज्ञानेश्वर #महाराज #फड #पायी #कीर्तन #भजन #दिंडी
#अक्षयवारी - ८४५१८२२७७२

प्रथमच '' वारकरी स्वाध्याय संस्कार वर्ग '' -सर्वांसाठी प्रवेश खुला स्थळ - नाशिक
11/04/2019

प्रथमच '' वारकरी स्वाध्याय संस्कार वर्ग ''

-सर्वांसाठी प्रवेश खुला
स्थळ - नाशिक

।। श्रीविठ्ठल ।।

'' वारकरी स्वाध्याय संस्कार वर्ग ''
प्रारंभ - २९ मे २०१९ , बुधवार - दुपारी ०४.००
समारोप - ०३ जुन २०१९ सोमवार - सायंकाळी ०६.००

सौ.किरणदेवी सारडा सत्कार्य निधी तर्फे

' वारकरी स्वाध्याय संस्कार वर्ग ' निवासी शिबिर प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांचे पूर्णवेळ उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आयोजित केले असुन यात विविध संत- वाड्मय अभ्यासकांचे प्रबोधनकार कीर्तन - प्रवचनकारांसाठी मार्गदर्शन लाभणार आहे .एका वेगळ्या दृष्टीकोनाने स्वतः महाराजांचे संकल्पनेतून होणाऱ्या या युवा स्वाध्याय शिबिरासाठी आपली नावे नोंदवावीत . केवळ १०० प्रवेशिका उपलब्ध आहेत . निःशुल्क शिबीर असुन निवास भोजन व्यवस्था आहे . दि.३० एप्रिल पर्यंत नोंदणी आवश्यक .

प्रवेशानंतर आपणास सविस्तर माहिती देण्यात येईल .
*शिबीर स्थान - नाशिक*

नोंदणी संपर्क - श्रीमाधवदासमहाराज राठी : ९४२२२५८०८७
व्हाट्सअप्प संपर्क - ८४५१८२२७७२

श्रीज्ञानेश्वरी चिंतन , पंचिकरण , भावार्थ रामायण , श्रीएकनाथ भागवत , महाभारत , श्रीतुकाराम गाथा इ. विषयी चिंतन कार्यशाळा .

प्रवेश - सर्व कीर्तनकार , प्रबोधनकार , प्रवचनकार , व्यख्याते ( वारकरी / हरिदासी / नारदीय ) सर्वांसाठी .
वय - १२ ते ५५

नोंदणी आवश्यक - मर्यादित नोंदणी उपलब्ध
#अक्षयवारी - ८४५१८२२७७२
#वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

28/03/2019

संतवीर श्रीबंडातात्या कराडकर यांचे जाहीर आवाहन..!

गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा करावा .

#वारकरी #सण #उत्सव #गुढी #पाडवा #हिंदू #धर्म #वारी #पांडुरंग #तात्या #संप्रदाय #महाराष्ट्र

Address

Shree Vitthal Rakhumai Mandir/Shiv Mandir
Panvel

Opening Hours

Monday 4am - 12am
Tuesday 4am - 12am
Wednesday 4am - 12am
Thursday 4am - 12am
Friday 4am - 12am
Saturday 4am - 12am
Sunday 4am - 12am

Telephone

9221065277

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vitthal Rakhumai Mandir , Owe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share