21/08/2012
श्री. बल्लाळेश्वर मंदिर व सभामंडप प्रशस्त असून सभामंडपात भाविकांच्या देणगी स्विकारणेसाठी कार्यालय आहे.
श्री. बल्लाळेश्वर मंदिराच्या नजीकच प्रशस्त धर्मशाळा असून भाविकांना जेवण बनविण्याची सोय व्हावी म्हणून पाकशाळा आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता भाविकांच्या निवासासाठी प्रशस्त खोल्या (संडास, व बाथरूम सहित), एक हजार माणसे राहतील असे प्रशस्त सभागृह, स्वयंपाकघर, दहा हजार माणसांचा स्वयंपाक होईल इतकी भांडी, खुर्च्या टेबले इ. साहित्य उपलब्ध आहेत.
भक्तनिवास क्र १ समोरही एक प्रशस्त सभागृह बांधण्यात आले आहे.
भक्तनिवास क्र. १ दिवसेंदिवस अपुरा पडत असल्यामुळे भक्तनिवास क्र.२ मंदिराजवळील जागेत बांधण्यात आला आहे.
भक्तजनान्नसाठी सुविधा:-
भाविकांचे वाहनासाठी सुरक्षित असे मोफत वाहन तळ स्वच्छतागृहासह भक्तनिवास क्र.१ जवळ उपलब्ध आहे.
श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली, ता. सुधागड, जि. रायगड येथे येण्यासाठी मुंबई, पुणे, अलिबाग, पेण, कर्जत, खोपोली, महाड, रोहा येथून थेट गाडय़ा पालीपर्यंत आहेत.
संस्थेमार्फत भाविकांनी देणगीरूपाने अर्पण केलेली वस्त्रे, चांदीची उपकरणे ही भाविकांना प्रसादरूपाने खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच सौलतीच्या दरात माहीती पुस्तके उपलब्ध आहेत.
भाविकांसाठी देवस्थानच्या आवारात व भक्तनिवासांमध्ये एस.टी.डी. व लोकल फोनची सुविधा आहे.
श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे विविध विषयांवरची पुस्तके असणारे वाचनालय नाममात्र शुल्क घेऊन चालविण्यात येते.
भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानाच्या आवारात एक पिण्याच्या पाण्याची टाकी व थंड पाण्यासाठी दोन कुलर बसविण्यात आले आहेत.
विद्युत पुरवठय़ाची नियमित गैरसोय लक्षात घेता देवस्थानतर्फे दोन जनरेटर बसविण्यात आले आहेत.
भक्त निवास फोन : (०२१४२) २४११२९