• शाडूच्या मातीपासून तयार केलेली शास्त्र शुद्ध पद्धतीची मूर्ती.
• समाजाने निवडलेली प्लास्टिक ऑफ पॅरिस ही मूर्ती पद्धत जलप्रदूषण व जलीय प्राण्याचा मृत्युस प्रथम कारणीभूत ठरते.
• P.o.p. पासून होणारे त्रास .
• P.o.p. प्रामुख्याने रासयनिक प्रक्रियेतून तयार केली जाते .
• अशा या P.O.P चा निसर्गातील प्राणीमात्रांना त्रास होतो त्यात प्रामुख्याने जलहानी होते .
• गणेशोत्सासाठी समाज P.O.P ची गणेश मूर्ती बस
वतात . शास्त्रानुसार दीड दिवस,सात दिवस आणि दहा दिवस अशा दिवसापर्यंत गणेशमूर्ती पूजतात त्यानंतर विसर्जनासाठी मूर्ती नदी,समुद्र,तलाव अशा जागी नेली जाते. मूर्ती विसर्जन केल्यानंतर लोकांकडून त्याकडे पुम्हा लक्ष दिले जात नाही.
• जल प्रदूषणाची सुरवात इथून होते,गणेश मूर्ती पाण्यात बुडली जाते. हळू हळू त्या मूर्ती वरील रासायनिक रंग पाण्यात पसरत जातात. सर्व रसायनाचा प्रभाव पाण्यातील जलसामग्री वर म्हणजे मासे, पाण्यातील शेवाळे, झाडे यावर होतो .
• प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात लवकर विसर्जित होत नाही ,पण त्यातील रासायनिक पदार्थ(त्या वरील केमिकल रंग ,OIL PAINT ,तसेच मुर्ती बनावण्यासाठी वापरलेले विषारी रसायन ) हळू हळू पाण्यात मिसळले जातात त्यामूळे तेथील पाण्यातील घटकांवर प्रभाव पडतो.
• P.o.p. वर वापरले जाणारे रंग हे तैलरंग आणि रासायनिक रंग असतात. ते पाण्यात विरघळत नाही त्यातील रसायन पाण्यावर तरंगत राहतात आणि ते पाण्यातील मासे खातात. त्या माश्यांच्या आहारात रसायन पचवण्याचे गुणधर्म नसतात. त्यामूळे जलचर खूप मोठ्या प्रमाणावर दगावतात , तसेच मच्छीमार अशा मशाना विकण्यासाठी बाजारात आणतात व त्यांच माशांना लोक आपल्या आहारासाठी वापरतात या सर्व प्रक्रियेत नंतर शेवटी तेच मासे लोक खातात व आजारी पडतात.
• या सर्व गोष्टी टाळण्यासाठी लोकांची विचार श्रेणी बदलणे गरजेचे आहे.
• शास्त्रा नुसार शाडूची माती वापरणे योग्य ठरते.
• शाडूची माती निसर्गाचा एक घटक म्हणून तयार केलेली असते.
• शाडू पासून तयार बनवलेले मुर्ती सहज विसर्जित होते.
• शाडू माती ही पाण्यात सहज विरघळणारा नैसर्गिक घटक असून त्यावर वापरलेले रंग हे जल रंग असतात.
• शाडूची माती व जलरंग यांचा वापर जलसामग्रीला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवत नाही.
• त्त्यामूळे समाजाने आपल्या प्रथा सांभाळत, शाडूचा वापर करणे काळाची गरज आहे . जर आपण या पद्धतीचा वापर करण्यास माघार घेतली तर आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना दाखवण्यास काही शिल्लक नसेल.
• या सर्व हानीला दोषी आपण व आपल्या पिढ्या असणार .
• RESPECT NATURE, SAVE OUR FUTURE
• निसर्गाचा आदर करा, आपल भविष्य वाचवा.........