श्री हालसिद्ध नाथांची पावन भूमी आप्पाचीवाडी

  • Home
  • India
  • Nipani
  • श्री हालसिद्ध नाथांची पावन भूमी आप्पाचीवाडी

श्री हालसिद्ध नाथांची पावन भूमी आप्पाचीवाडी APPACHIWADI NEAR BY KOLHAPUR AROUND @25 KM & BELGAUM
NEAREST RAILWAY STATION CSMT ALSO AIRPORT BELGAUM & KOLHAPUR

शेकडो वर्षापासून स्वत:ची गौरवशाली आत्मतेजाची परंपरा लाभलेले, कर्नाटक-महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक एकतेचे सर्व धर्मियांचे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व जागृत अध्यात्मिक पीठ म्हणून चिकोडी तालुक्यातील आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथांचे देवस्थान प्रसिद्ध आहे.

नवनाथ भक्तीसागर ग्रंथामध्ये 34, 35, 36 या अध्यायामध्ये श्री रेवणनाथाच्या अवतार कार्याची माहिती आली आहे. रेवा नदीकाठी अयोनी संभव असा हा नाथ बालक. त्याच्यावर दत्त महाराजांचा अनुग्रह झाल्याने त्याला सिद्धी प्राप्त झाली. मच्छिंद्रनाथांनी या बालकाचे चमत्कार पाहून नाथ संप्रदायातील हा एक श्रेष्ठ अवतार असल्याचे ओळखले. तसेच दत्त महाराजांकडून पूर्ण कृपा करविली.

करवीर क्षेत्र हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. मरूळसिद्ध करवीर क्षेत्री आले. त्यावेळी करवीर प्रांतात माई या नावाची एक योगिनी रहात होती. तिचा नाथपंथाला विरोध होता. तिने सव्वाखंडीचे विष तयार करून ठेवले होते. नाथपंथी सिद्ध येताच त्यांची ती परीक्षा घेत. तयार झालेले विष प्राशन करावे, अन्यथा नाकात कवडय़ा घालून दळण-कांडण करीत कारागृहात रहावे, अशी तिची अट होती. अशातऱहेने अनेकांचा पराभव करून तिने बऱयाच सिद्धांना बंदीवासात टाकले होते.

मरूळसिद्धांवरही तोच प्रयोग केल्यावर त्यांनी आपले भिक्षापात्र पुढे केले. बंदिवासातील सिद्धांनी हे जहाल विष असून न पिण्याचा सल्ला दिला. क्षणभर मरूळसिद्धांनी आपले तोंड मागे फिरवले. त्यावेळी त्या स्त्राrने नाथांची अवहेलना करणारे उद्गार काढले. प्रक्षुब्ध झालेल्या मरूळसिद्धांनी ‘लिंगापर्णमस्तू’ असे म्हणत माईने दिलेले विष गुरुचे स्मरण करून प्राशन केले.

रेवणनाथांनी योगिनीकडून प्रत्यक्ष पार्वतीनेच आपली परीक्षा पाहिली, हे अंतर्ज्ञानाने ओळखले. अंगाचा दाह शांत करण्यासाठी पार्वतीचाच धावा केला. पार्वती हाकेस धावून आली, तीच भागुबाई होय. रेवणनाथांच्या म्हणजे श्री हालसिद्धनाथांच्या स्थानाजवळ भागुबाईचे स्थान आढळून येते.

रेवणनाथांना गाईचे दूध अतिशय प्रिय आहे. कानडीत ‘हाल’ या शब्दाचा अर्थ दूध असा आहे. दुग्ध प्राशनाने जे प्रसन्न झाले ते हालसिद्ध, म्हणून हालसिद्धनाथ या नावाने कर्नाटकात श्री रेवणनाथांना ओळखले जाते. कारण त्यांचे बरेचसे कार्य कर्नाटकातच आहे.

आप्पाचीवाडी येथे हालसिद्धनाथांची तीन मंदिरे असून गावच्या माध्यभागी वाडा आहे. त्या ठिकाणी मुख्य गादी, घोडय़ाचा पागा आहे. घुमटात देवाची समाधी आहे. निपाणीतील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाडय़ात असलेल्या गुराख्याबाबत गाईचे दूध पित असल्याची चुगली केली. त्यावेळी गुराख्यास रूईचा चिक पिण्यास दिला. त्याला काहीही इजा झाली नाही. हाच सिद्धपुरुष हालसिद्धनाथ असल्याचे स्पष्ट झाले. पुढे नाथांनी विविध ठिकाणी जावून भक्तांचे कल्याण केले.

सर्व स्तरातील व जातीतील हजारो भाविक आजही करवीर व कर्नाटकात आढळतात. अशा या हालसिद्धनाथांची ऐरणी मोंगलाई, कंकणवाडी रायबाग महाल, नणदी (ता. चिकोडी), घोसरवाड (ता. शिरोळ), कारीकोळ उर्फ सिद्धापूरहट्टी (ता. तिकोटा) व आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) या सहा मुख्य जागी ठिकाणे आहेत.

घोसरवाड व आप्पाचीवाडी ही दोन्ही ठिकाणे हालसिद्धनाथांच्या आगमनाने, वास्तव्याने व साक्षात्काराने सुमारे गेली तीन शतके प्रसिद्ध आहेत.

आजही आप्पाचीवाडी येथे दर अमावास्येला येणाऱया भक्तांची संख्या शेकडोंनी आहे. हालसिद्धनाथांच्या नामस्मरणाने व पूजेने ऐहिक पारलौकिक यश असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. निष्ठापूर्वक, श्रद्धापूर्वक विनयतेने नाथांना शरण गेल्यास भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतात, असा अनेक भाविकांचा अनुभव आहे.

Address

Appawchi Wadi
Nipani
591241

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री हालसिद्ध नाथांची पावन भूमी आप्पाचीवाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री हालसिद्ध नाथांची पावन भूमी आप्पाचीवाडी:

Shortcuts

Share