श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • Home
  • India
  • Neral
  • श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, Hindu temple, Neral.

🙏🏻💐श्री स्वामी समर्थ ॐ महादेवाय नमः 💐🙏🏻
(स्वामी सेवा करा,सेवेकरी व्हा, सेवेकरी घडवा)
🚩💐स्वामीभक्त करण💐🚩
(छायाचित्रकार)
100k followers
११

*एक गोष्ट लक्षात घ्या...*  *माणूस चुकून पाप करत नाही; तो आधी आपल्या विचारांमध्ये चुकतो, आणि नंतर ती चूक कर्मातून प्रकट ह...
03/08/2026

*एक गोष्ट लक्षात घ्या...*

*माणूस चुकून पाप करत नाही; तो आधी आपल्या विचारांमध्ये चुकतो, आणि नंतर ती चूक कर्मातून प्रकट होते.*

*श्रीगुरुचरित्राच्या अध्याय २८ मध्ये त्रिविक्रम भारती श्रीगुरूंना एक अत्यंत गंभीर प्रश्न विचारतात...*

*"स्वामी, कोणत्या कर्मामुळे मनुष्याला नीच जन्म मिळतो?"*

*हा प्रश्न फक्त त्रिविक्रम भारतींचा नाही... हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे.*

*श्रीगुरू उत्तर देताना सांगतात की...*

*व्यभिचार करणे, कुलदेवता, माता-पिता किंवा गुरु यांचा द्वेष करणे, प्राणिहत्या करणे, असत्य बोलणे आणि अशा अनेक दुष्कर्मांमुळे मनुष्याला हीन योनी प्राप्त होते.*

*पण यामागचा गूढ अर्थ समजून घेतला पाहिजे.*

*वाईट कर्म अचानक घडत नाही.*

*जेव्हा माणूस आपल्या संस्कारांचा त्याग करतो... कर्तव्य विसरतो... अहंकाराला सत्यापेक्षा मोठं मानतो... तेव्हाच त्याच्या अधोगतीची सुरुवात होते.*

*एक साधं उदाहरण घ्या...*

*जर एखाद्या घराचा पाया रोज थोडा-थोडा कमकुवत होत गेला, तर ते घर एका दिवसात कोसळत नाही... पण एक दिवस असा येतो, जेव्हा संपूर्ण इमारत कोसळते.*

*अगदी तसंच...*

*प्रत्येक वाईट कर्म हे आपल्या चारित्र्याच्या पायातून एक वीट काढून टाकत असतं.*

*आणि प्रत्येक सत्कर्म... त्या पायात एक नवी मजबूत वीट बसवत असतं.*

*म्हणूनच श्रीगुरू आपल्याला घाबरवत नाहीत... ते आपल्याला सावध करतात.*

*ते सांगतात...*

*"तुमच्या कर्मांवर लक्ष ठेवा... कारण कर्मच तुमचं भविष्य घडवतं."*

*आज आपण इतरांना दोष देण्यात वेळ घालवतो...*

*पण कधी स्वतःला विचारतो का...*

*मी माझ्या आई-वडिलांचा आदर करतो का? मी माझ्या गुरुंचा सन्मान करतो का? मी सत्याच्या मार्गावर चालतो का? माझ्या कृतींमुळे इतरांचं कल्याण होतं की नुकसान?*

*हे प्रश्न जर आपण स्वतःला विचारायला सुरुवात केली... तर समजा श्रीगुरुचरित्राचा हा अध्याय आपण खऱ्या अर्थाने समजायला सुरुवात केली आहे.*

*कारण...*

*माणसाचा जन्म त्याला ओळख देत नाही... त्याची कर्मं त्याचं खरं व्यक्तिमत्त्व घडवतात.*

*आणि म्हणूनच...*

*वाईट कर्म अधोगतीकडे नेतं... तर सत्कर्म आणि गुरुकृपा माणसाला उन्नतीच्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जातात.*

*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*

*गुरुच्या चरणी बसणारा प्रत्येक शिष्य ज्ञानासाठी आसुसलेला असतो.*  *अध्याय २८ मध्ये त्रिविक्रम भारतीही अत्यंत नम्रतेने श्र...
03/08/2026

*गुरुच्या चरणी बसणारा प्रत्येक शिष्य ज्ञानासाठी आसुसलेला असतो.*

*अध्याय २८ मध्ये त्रिविक्रम भारतीही अत्यंत नम्रतेने श्रीगुरूंना एक प्रश्न विचारतात...*

*"स्वामी, कोणत्या कर्मामुळे मनुष्याला नीच जन्म मिळतो?"*

*हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नव्हता... तो प्रत्येक माणसाच्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे.*

*आज आपण आपल्या आयुष्यात जे काही भोगतो, त्यामागे फक्त नशीब नसतं... आपली कर्मं ही तितकीच कारणीभूत असतात.*

*एक साधं उदाहरण घ्या...*

*जर एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यासच करत नाही, तर परीक्षेच्या दिवशी यशाची अपेक्षा करू शकत नाही.*

*आणि जो रोज थोडं-थोडं मन लावून अभ्यास करतो, त्याचं यश एका दिवसात नाही, तर त्याच्या सातत्यपूर्ण कर्मातून घडतं.*

*अगदी तसंच...*

*आपली प्रत्येक कृती, प्रत्येक विचार आणि प्रत्येक शब्द हेच आपल्या भविष्याचं बीज असतं.*

*म्हणूनच त्रिविक्रम भारतींचा प्रश्न आपल्याला ही स्वतःला विचारायला हवा—*

*"मी आज अशी कोणती कर्मं करतोय, जी उद्या माझं भविष्य घडवतील?"*

*याच प्रश्नाचं सखोल उत्तर श्रीगुरू या अध्यायात देतात.*

*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*

*॥ सारांश व जीवनाचा गूढ संदेश ॥ श्री गुरु चरित्र ॥ अध्याय २७*  *आज आपण श्री गुरु चरित्राच्या अध्याय २७ मधून एक अत्यंत गह...
01/08/2026

*॥ सारांश व जीवनाचा गूढ संदेश ॥ श्री गुरु चरित्र ॥ अध्याय २७*

*आज आपण श्री गुरु चरित्राच्या अध्याय २७ मधून एक अत्यंत गहन संदेश समजून घेतला.*

*या अध्यायात श्रीगुरूंनी दोन गर्विष्ठ ब्राह्मणांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विद्वत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी न करता, इतरांचा अपमान करण्यासाठी, विद्वानांची निंदा करण्यासाठी आणि स्वतःच्या अहंकाराला वाढवण्यासाठी केला. इतकेच नव्हे, तर श्रीगुरूंचे शिष्य असलेल्या त्रिविक्रम भारतींना ही त्यांनी त्रास दिला.*

*श्रीगुरूंनी त्यांना अनेक संधी दिल्या... पण त्यांनी सत्य स्वीकारले नाही. उलट, ते पाप करतच राहिले.*

*मग श्रीगुरूंनी एका मातंगाकडून वेद बोलवून घेतले. त्या क्षणी त्या ब्राह्मणांना स्वतःची चूक जाणवली नाही... त्यांना फक्त भीती वाटली. कारण त्यांचा अहंकार तुटला होता, पण अंतःकरण अजून ही बदलले नव्हते.*

*श्रीगुरूंनी स्पष्ट सांगितले की, ज्ञानाचा गर्व हा अज्ञानापेक्षाही अधिक धोकादायक असतो. आणि शेवटी त्यांनी त्यांना बारा वर्षे ब्रह्मराक्षस होण्याचा शाप दिला.*

*गावाबाहेर पडताच त्यांना हृदयशूळ झाला. त्यांनी देह सोडला आणि त्यांच्या कर्मांनुसार ब्रह्मराक्षस योनी प्राप्त झाली. हा केवळ शाप नव्हता... तो त्यांच्या कर्मांचा अपरिहार्य परिणाम होता.*

*आता या संपूर्ण अध्यायाचा सूक्ष्म भाव समजून घेऊया...*

*जसा एक कावळा घड्यातील पाणी वर आणण्यासाठी दगड टाकतो, तसाच मनुष्यालाही आपले ज्ञान योग्य दिशेने वापरावे लागते. फक्त ज्ञान असणे पुरेसे नसते; त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करतो, यावरच जीवनाचे फळ ठरते.*

*त्या ब्राह्मणांना शास्त्र माहिती होते, वेद माहिती होते, धर्म माहिती होता... पण त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी आत्मोन्नती किंवा जनकल्याणासाठी केला नाही. उलट त्याच ज्ञानाचा उपयोग त्यांनी इतरांना कमी लेखण्यासाठी केला.*

*आपल्यालाही जीवनात अनेकदा ईश्वर, गुरु, आई-वडील, अनुभव किंवा परिस्थिती बदलण्याची संधी देतात. पण जर आपण प्रत्येक वेळी त्या संकेतांकडे दुर्लक्ष केले, तर शेवटी कर्मच आपल्याला धडा शिकवते.*

*म्हणूनच या अध्यायाचा सार एकाच वाक्यात सांगायचा तर,*

*"ज्ञान मिळवणं ही मोठी गोष्ट नाही; त्या ज्ञानाला योग्य दिशा देणं हीच खरी साधना आहे."*

*आणि आता कथा एका नवीन वळणावर येते...*

*ज्ञानी झालेला मातंग श्रीगुरूंना नमस्कार करून अत्यंत नम्रतेने विचारतो—*

*"स्वामी, मी पूर्वजन्मी श्रेष्ठ ब्राह्मण असताना या जन्मी असा पतित कसा झालो? मला याचे कारण सविस्तर सांगा."*

*हा प्रश्न फक्त त्या मातंगाचा नाही... तो प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे.*

*कर्म जन्म कसे ठरवते? पाप आणि पुण्याचा पुढच्या जन्माशी नेमका काय संबंध असतो? मनुष्य अधःपतनाकडे कसा जातो? आणि त्यातून मुक्तीचा मार्ग कोणता?*

*याच सर्व प्रश्नांची अतिशय गूढ आणि तत्त्वज्ञानपूर्ण उत्तरे श्री गुरु चरित्राच्या अध्याय २८ मध्ये श्रीगुरूंनी स्वतः त्या मातंगाला सांगितली आहेत. भेटूयात पुढील श्री गुरुचरित्र अध्यायामध्ये*

*🙏🏻 ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏🏻*

*जसं पेराल तसं उगवेल..| श्री गुरुचरित्र | अध्याय २७ |*  *गुरुचरित्राच्या अध्याय २७ मध्ये एक अतिशय गूढ संदेश दडलेला आहे.*...
31/07/2026

*जसं पेराल तसं उगवेल..| श्री गुरुचरित्र | अध्याय २७ |*

*गुरुचरित्राच्या अध्याय २७ मध्ये एक अतिशय गूढ संदेश दडलेला आहे.*

*"श्रीगुरूंचा शाप मिळाल्यानंतर ते दोघे गर्विष्ठ ब्राह्मण गावाबाहेर पडले. पण कर्माची गती किती अचूक असते, याचा प्रत्यय त्यांना लगेच आला. अचानक दोघांनाही प्रचंड हृदयशूळ झाला आणि नदीतीरावरच त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या शरीराचा अंत झाला, पण त्यांच्या अहंकाराने त्यांना ब्रह्मराक्षस योनीत ढकललं.*

*त्या गर्विष्ठ ब्राह्मणांकडे वेदांचे ज्ञान होते, शास्त्रांचे ज्ञान होते, योग्य-अयोग्य याची पूर्ण जाणीव होती. पण ज्ञान असूनही त्यांनी त्याचा उपयोग स्वतःच्या आत्मोन्नती आणि जन कल्याणासाठी केला नाही. उलट त्या ज्ञानाचाच आधार घेऊन त्यांनी इतरांचा अपमान केला, त्यांना त्रास दिला आणि पापकर्म करण्यातच आनंद मानला.*

*जसं एक कावळा घड्यातील पाणी पिण्यासाठी दगड टाकतो. त्याला विज्ञान कळत नाही, पण योग्य विचार करून तो ज्ञानाचा योग्य उपयोग करतो आणि त्याला पाणी मिळतं.*

*पण इथे या ब्राह्मणांकडे शास्त्रांचं ज्ञान असूनही त्यांनी त्याचा योग्य दिशेने विचारच केला नाही. ज्ञान त्यांच्या जवळ होतं; पण विवेक त्यांच्या कृतीत नव्हता.*

*यातून आणखी एक सूक्ष्म सत्य समोर येतं. जसं हे जग आपल्याला स्थूल स्वरूपात दिसतं, तसंच त्यामागे एक सूक्ष्म कर्म नियम ही सतत कार्यरत असतो.*

*आपल्या प्रत्येक विचाराची, प्रत्येक शब्दाची आणि प्रत्येक कृतीची नोंद त्या सूक्ष्म स्तरावर होत असते. या ब्राह्मणांनी स्थूल शरीराने सतत पापकर्म केलं.*

*श्रीगुरूंनी त्यांना वारंवार समजावलं, ईश्वराने बदलण्याच्या अनेक संधी दिल्या; पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. आणि जेव्हा माणूस स्वतः बदलण्यास नकार देतो, तेव्हा ईश्वर त्याच्या नियतीनुसार कर्माचं फळ देतो. म्हणूनच त्यांचा शेवट ब्रह्मराक्षस योनीत झाला.*

*म्हणून लक्षात ठेवा...*
*ज्ञान मिळवणं ही मोठी गोष्ट नाही; त्या ज्ञानाला योग्य दिशा देणं हीच खरी साधना आहे. कारण ईश्वर संधी नक्की देतो, पण त्या संधीचं रूपांतर नियतीत कसं होतं, हे आपल्या कर्मांवरच अवलंबून असतं. 🙏🏻*

*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏🏻*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🚩*

*! कर्माचा सिद्धांत ! श्री गुरुचरित्र | अध्याय २७*   *"श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना लगेच शाप दिला नाही. आधी त्यांनी अने...
31/07/2026

*! कर्माचा सिद्धांत ! श्री गुरुचरित्र | अध्याय २७*

*"श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना लगेच शाप दिला नाही. आधी त्यांनी अनेक वेळा समजावलं, संयम ठेवला, त्यांच्या चुका दाखवल्या. पण अहंकाराने अंध झालेला माणूस सत्य स्वीकारत नाही. उलट तो इतरांना त्रास देत राहतो.*

*या गर्विष्ठ ब्राह्मणांनी फक्त त्रिविक्रम भारतींचाच नाही, तर अनेक विद्वानांचा आणि निरपराध लोकांचाही अपमान केला. इतकंच नाही, श्रीगुरूंच्या शिष्यांनाही त्यांनी त्रास दिला. तरीही त्यांना स्वतःची चूक कधीच जाणवली नाही.*

*पण जेव्हा एका मातंगाच्या मुखातून वेद प्रकट झाले, तेव्हा त्यांना आपल्या पापाची जाणीव झाली म्हणून नाही…*

*तर स्वतःच्या विनाशाची भीती वाटली. लक्षात ठेवा, भीतीमुळे झालेला पश्चात्ताप आणि अंतःकरणातून झालेला पश्चात्ताप यात खूप मोठा फरक असतो.*

*आजही आयुष्यात असंच घडतं. काही लोक आई-वडील, गुरु, मित्र किंवा हितचिंतक वारंवार समजावतात; पण आपण ऐकत नाही. मग काळच असा प्रसंग आणतो की आपण थांबतो. प्रश्न एवढाच असतो—आपण प्रेमाने बदलणार की संकट आल्यावर?*

*जसं लाल सिग्नलवर थांबलो तर अपघात टळतो; पण तोच सिग्नल वारंवार तोडला, तर एक दिवस अपघात अटळ होतो. जीवनातही गुरुंचा उपदेश हा त्या लाल सिग्नलसारखाच असतो.*

*म्हणून लक्षात ठेवा—*
*'जो माणूस योग्य वेळी सत्य स्वीकारतो, त्याला शिक्षा लागत नाही; पण जो अहंकाराने सत्य नाकारत राहतो, त्याला शेवटी कर्मच शिकवतं.' 🙏🏻*

*🙏🏻 ॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥ 🙏🏻*
*🙏🏻 ॥ श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये ॥ 🙏🏻*

*"गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो... तुम्हाला माहिती आहे का? सृष्टीचा कालचक्र हा गुरुपौर्णिमेला सुरू होतो ते? आणि कध...
28/07/2026

*"गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो... तुम्हाला माहिती आहे का? सृष्टीचा कालचक्र हा गुरुपौर्णिमेला सुरू होतो ते? आणि कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? गुरु नेमके कोण आहेत? त्यांची सुरुवात कुठून झाली?*

*देव उठनी एकादशी आणि देवशयनी एकादशी ( योगनिद्रेत ) हे का महत्त्वाचे आहे. आणि ह्या अवस्था घडण्या पाठीमागे काय कारण आहे? ते*

*माझ्या साधना, चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेला एक सूक्ष्म आध्यात्मिक दृष्टिकोन आहे."*

*भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसून, संपूर्ण सृष्टी, मन आणि जीवनाच्या निर्मितीचा एक टप्पा आहे. माझ्या चिंतनानुसार या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निर्गुणातून होते. निर्गुण म्हणजे परब्रह्म. जिथे कोणताही आकार नाही, कोणतंही नाव नाही, पण सर्व काही अस्तित्वात येण्याची अनंत शक्यता आहे.*

*या निर्गुणातून सर्वप्रथम जे प्रकट होतं, ते म्हणजे गुप्त रूप. आणि माझ्या अनुभूतीनुसार हेच गुप्त रूप म्हणजे गुरुतत्त्व. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण सृष्टीला दिशा देणारं पहिलं तत्त्व (परब्रह्म) . म्हणूनच गुरुपौर्णिमा ही केवळ गुरुंच्या पूजनाची तिथी नाही, तर निर्गुणातून प्रकट झालेल्या गुरुतत्त्वाच्या स्मरणाची आणि कृतज्ञतेची पर्वणी आहे.*

*आता हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा, आपल्या हातात एक फुगा आहे. फुगा स्वतःहून फुगत नाही. कोणीतरी त्यामध्ये श्वास भरतो. पण फुग्याकडे पाहणाऱ्याला तो श्वास दिसत नाही. त्याला फक्त फुगा दिसतो. प्रत्यक्षात मात्र फुग्याला आकार देणारं कार्य अदृश्यपणे आतून चालू असतं.*

*माझ्या अनुभूतीनुसार गुरुतत्त्वाचं कार्यही असंच असतं. ते गुप्त रूपाने प्रत्येक जीवामध्ये प्रेरणा निर्माण करत राहतं. आपण अनेकदा स्वतः विचार करतोय असं वाटतं; पण प्रत्यक्षात आपण इतरांना पाहूनच प्रेरित होत असतो. एखाद्याने नवीन गाडी घेतली, तर आपल्या मनात ही तशीच इच्छा निर्माण होते. एखाद्याने घर बांधलं, तर आपण ही तसंच स्वप्न पाहू लागतो. एखादा साधक साधनेत पुढे गेला, तर आपल्या ही मनात साधना करण्याची प्रेरणा निर्माण होते. हा प्रेरणेचा अदृश्य प्रवाह म्हणजेच माझ्या चिंतनानुसार गुरुतत्त्वाचं गुप्त कार्य आहे.*

*या गुप्त प्रेरणेनंतर गणेशतत्त्व प्रकट होतं, ते साक्षीभाव स्वरूपात. कारण कोणत्याही निर्मितीपूर्वी बुद्धी आणि विवेक आवश्यक असतो. त्यानंतर विष्णुतत्त्व जीवधारणेचा प्रवाह सांभाळतं. ब्रह्मतत्त्व निर्मिती घडवतं. महेशतत्त्व आवश्यक परिवर्तन आणि विसर्जन घडवतं. शक्ती तत्त्व (आधी माया नवरात्र उत्सव ) या संपूर्ण प्रवाहाला कार्यरूप देते. पुढे सप्तऋषी, विशेषतः महर्षी अत्री आणि माता अनसूया, या ज्ञान आणि पावित्र्याच्या संगमातून या प्रवासाला पूर्णत्वाकडे नेतात.*

*त्यानंतर पुन्हा काळ पुढे सरकतो. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागृत होतात ( राम जन्म दिवाळी ) . माझ्या चिंतनानुसार, जे सूक्ष्म स्वरूपात घडत होतं, ते आता नव्या प्रकट कार्यासाठी सज्ज होतं. जसा गर्भातील जीव योग्य काळानंतर प्रकट होतो, तसाच हा विश्वप्रवाह ही सतत सूक्ष्म आणि प्रकट अशा दोन अवस्थांमध्ये फिरत राहतो.*

*या सूक्ष्म प्रवासात सर्वप्रथम गुरुतत्त्व दिशा देतं. त्यानंतर क्रमाने विविध दैवी तत्त्वं कार्यरत होतात. हा प्रवास महिना न महिना पुढे सरकत राहतो. माझ्या चिंतनानुसार, हा प्रवास मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्तात्रेयांच्या जन्माने पूर्णत्वाला पोहोचतो. कारण ते संपूर्ण दैवी कार्य प्रवाहाचं प्रकट स्वरूप आहेत.*

*पण याच मार्गशीर्ष महिन्यात श्री मल्हारी मार्तंडांचं कार्यही मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. माझ्या अनुभूतीनुसार, श्रीदत्तात्रेय हे चैतन्याला दिशा देतात म्हणजे शरीर, तर मल्हारी मार्तंड मनाला धारण ( मन धारण ) करण्याची, संयमित करण्याची आणि धर्मासाठी उभं करण्याची शिवशक्ती जागृत करतात. म्हणून माझ्या चिंतनात दत्ततत्त्व आणि मल्हारी तत्त्व हे या कालचक्राचे परिपूर्ण टप्पे आहेत.*

*याच कारणामुळे भारतीय सणांचं कालचक्र मला अत्यंत अर्थपूर्ण वाटतं. माझ्या चिंतनानुसार, देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची योगनिद्रा ही निष्क्रियतेची नसून, पुन्हा नव्याने विश्वात एक सूक्ष्म प्रक्रिया सुरू होते. जीवधारणेच्या अदृश्य प्रक्रियेचं प्रतीक आहे. जे कार्य डोळ्यांना दिसत नाही, ते सूक्ष्म पातळीवर घडत असतं. म्हणूनच या काळात बाह्य विस्तारापेक्षा अंतर्मुख होण्याला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे.*

*आणि हे संपूर्ण कालचक्र घडण्यामागे निसर्गही तितकाच महत्त्वाचा आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, ऋतू बदलतात, वातावरण बदलतं, आणि त्यानुसार साधनेचे, उत्सवांचे आणि अंतर्मुखतेचे काळही बदलतात. म्हणून भारतीय सण हे केवळ दिनदर्शिकेतील दिवस नाहीत; ते निसर्ग, सृष्टी आणि चेतनेच्या अखंड प्रवाहाशी जोडलेले आहेत.*

*म्हणून माझ्या अनुभूतीनुसार भारतीय सण वेगवेगळे नसून, ते मननिर्मिती, सृष्टीनिर्मिती आणि दत्तनिर्मिती या अखंड प्रवासाचे टप्पे आहेत.*

*या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निर्गुणातून प्रकट झालेल्या गुरुतत्त्वापासून होते, आणि त्याचं प्रकट पूर्णत्व श्रीदत्तात्रेयांमध्ये अनुभवायला मिळतं. हेच माझ्या साधना, चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेलं सनातन कालचक्र आहे. 🙏🏻🚩*

*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*

*अध्याय २७ च्या या प्रसंगात श्रीगुरूंनी केवळ एका मातंगाला वेद बोलण्याची शक्ती दिली नाही, तर संपूर्ण मानवजातीला एक महान स...
28/07/2026

*अध्याय २७ च्या या प्रसंगात श्रीगुरूंनी केवळ एका मातंगाला वेद बोलण्याची शक्ती दिली नाही, तर संपूर्ण मानवजातीला एक महान सत्य शिकवलं.*

*श्रीगुरु म्हणती तयासी। वेदशास्त्रीं अभ्यास म्हणसी। आले विप्र चर्चेसी। वाद करीं त्यांसवें॥" (ओवी २४)*
*"अभिमंत्रोनि विभूति। त्याचे सर्वांगीं प्रोक्षिती। प्रकाशली ज्ञानज्योती। तया नरा परियेसा॥" (ओवी २५)*
*"पतित झाला ज्ञानराशी॥" (ओवी २६)*
*"जे आले चर्चेस विप्र। भयचकित झाले फार। जिव्हा तुटोनि झाले बधिर। हृदयशूळ तात्काळीं॥" (ओवी २८)*

*अर्थात...*
*श्रीगुरूंनी मंत्रसिद्ध विभूती मातंगाच्या अंगावर लावली आणि एका क्षणात त्याच्या मुखातून वेदांचा अखंड प्रवाह सुरू झाला. हे पाहून स्वतःच्या विद्वत्तेचा आणि जन्माचा गर्व बाळगणारे ब्राह्मण थरथर कापू लागले. कारण त्यांना जाणवलं की, ज्ञानावर कोणाचं मालकी हक्क नसतो; गुरुकृपा जिथे होते, तिथे अशक्यही शक्य होतं.*

*पहिली गोष्ट श्रीगुरूंनी दाखवून दिली ती म्हणजे प्रत्येक जीवामध्ये असलेली चैतन्यशक्ती ही मुळात शुद्ध, दिव्य आणि परमेश्वराचा अंश आहे. शरीर, जात, जन्म, पद किंवा परिस्थिती ही बाह्य आवरणं आहेत. त्या शुद्ध चैतन्याचं खरं स्वरूप अनुभवण्यासाठी मात्र गुरुकृपा अत्यावश्यक असते.*

*जेव्हा गुरुकृपा प्राप्त होते, तेव्हा माणसाच्या मनातील अहंकार, श्रेष्ठत्वाची भावना आणि "मी"पणाचा अभिमान आपोआप नष्ट होऊ लागतो. म्हणूनच आपल्या शास्त्रात म्हटलं आहे—*

*"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।*
*गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥"*

*गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि जिथे परब्रह्माचा स्पर्श होतो, तिथे अहंकार टिकूच शकत नाही.*

*या प्रसंगातील चमत्कार हा केवळ मातंग वेद बोलू लागला म्हणून महत्त्वाचा नाही. खरा चमत्कार म्हणजे अहंकाराचा नाश होणे. कारण बाह्य चमत्कार काही क्षणांसाठी आश्चर्य निर्माण करतात; पण अंतर्मनातील परिवर्तन आयुष्यभरासाठी दिशा बदलून टाकतं.*

*आजच्या जीवनातही आपण अनेकदा आपल्या पदाचा, पैशाचा, शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा अभिमान बाळगतो. पण विचार करा... जर एका क्षणात हे सर्व निघून गेलं, तर आपल्याकडे खरंच काय उरेल? उरेल ते फक्त आपलं कर्म, नम्रता आणि आपल्या अंतःकरणातील चैतन्य.*

*जसा आरशावर धूळ साचली की आपलंच प्रतिबिंब दिसेनासं होतं, तशीच अहंकाराची धूळ आपल्या आत्म्यावर साचली की परमेश्वराचं स्वरूप आपल्याला जाणवत नाही. पण गुरु त्या धुळीला दूर करतात आणि आपल्या आत आधीपासून असलेलं दिव्य चैतन्य प्रकट करून दाखवतात.*

*म्हणून या प्रसंगाचा संदेश केवळ मातंगापुरता मर्यादित नाही; तो प्रत्येकासाठी आहे.*

*जोपर्यंत जिवात जीव आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षणी स्वतःला बदलण्याची, अहंकार सोडण्याची आणि गुरुकृपेच्या मार्गावर चालण्याची संधी आपल्याकडे आहे. कारण जेव्हा अहंकार दूर होतो, तेव्हाच आपल्या अंतःकरणातील शुद्ध चैतन्य जागृत होतं आणि तेच आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जातं.*

*लक्षात ठेवा... गुरुकृपेचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाच्या जीवनात घडणारा अंतर्मनाचा परिवर्तनाचा क्षण. त्या क्षणानंतर बदलतं ते फक्त ज्ञान नाही, तर संपूर्ण जीवन.*

*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*

*श्री गुरुचरित्र | अध्याय २७ | सात रेषांचे रहस्य*  *आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन तिच्या जन्मावरून, परिस्थितीवर...
27/07/2026

*श्री गुरुचरित्र | अध्याय २७ | सात रेषांचे रहस्य*

*आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन तिच्या जन्मावरून, परिस्थितीवरून किंवा समाजाने दिलेल्या ओळखीवरून करतो. पण श्रीगुरुचरित्रातील हा प्रसंग सांगतो की, परमेश्वराच्या दृष्टीने माणसाची खरी ओळख त्याच्या कर्माने ठरते.*

*"एक रेखा लंघीं रे ऐसी। आला नर वाक्यासरसीं। झालं ज्ञान आणिक तया॥" (ओवी १६)*
*"पहिली रेखा लंघितां। पतित म्हणे किरातवंशी। नाम आपुलें वनराखा॥" (ओवी १७-१८)*
*"दुसरी रेखा लंघितां। ज्ञान झालें मागुता। बोलूं लागला अनेक वार्ता।..." (ओवी १८)*
*"तिसरी रेखा लंघी। म्हणे गंगापुत्र निश्चितीं। वास तीं गंगेच्या॥" (ओवी १९)*
*"लंघितां रेखा चौथी। म्हणे आपण शूद्रजाती।..." (ओवी २०)*
*"लंघितां रेखा पांचवेसी। झालं ज्ञान आणिक तयासी। जन्म झाला वैश्यवंशीं। नाम आपुलें सोमदत्त॥" (ओवी २१)*
*"सहावी रेखा लंघितां। म्हणे आपण क्षत्रिय ख्याता। नाम आपुलें विख्याता। गोदावरी म्हणोनि॥" (ओवी २२)*
*"सातवी रेखा लंघितांक्षण। अग्रजाती विप्र आपण। वेदशास्त्रादि व्याकरण। अध्यापक नाम आपुलें॥" (ओवी २३-२४)*

*श्रीगुरूंनी त्या नम्र मातंगाला आपल्या समोर उभं केलं आणि शिष्याला जमिनीवर सात रेषा आखण्यास सांगितलं. त्या रेषा फक्त मातीवरच्या नव्हत्या, तर त्या जीवाच्या सात जन्मांच्या प्रवासाच्या साक्षीदार होत्या.*

*पहिली रेषा ओलांडताच त्याला आठवलं—तो पूर्वी किरात म्हणजे वनरक्षक होता.*

*दुसरी रेषा ओलांडली आणि आणखी एक जन्म स्मरणात आला.*

*तिसरी रेषा ओलांडल्यावर तो गंगेच्या तीरावर राहणारा गंगापुत्र असल्याचं त्याला जाणवलं.*

*चौथी रेषा ओलांडताच शूद्र जन्माची स्मृती झाली.*

*पाचवी रेषा ओलांडल्यावर तो वैश्य वंशातील सोमदत्त म्हणून स्वतःला ओळखू लागला.*

*सहावी रेषा पार करताच तो गोदावरी काठचा पराक्रमी क्षत्रिय असल्याचं सांगू लागला.*

*आणि सातवी रेषा ओलांडताच आश्चर्यकारक घटना घडली. तो श्रेष्ठ वेदवेत्ता, व्याकरणाचा विद्वान ब्राह्मण असल्याप्रमाणे वेदपठण आणि शास्त्रचर्चा करू लागला.*

*पण श्रीगुरूंचा संदेश इथेच संपत नाही.*

*प्रत्येक जीव हा अत्यंत सूक्ष्म गतीने कार्य करणाऱ्या कर्माच्या नियमांनुसार जन्म घेत असतो. आपण बाहेरून फक्त वर्तमान जन्म पाहतो; पण कर्माची गती, संस्कारांची साखळी आणि जन्मोजन्मीचा प्रवास हा अत्यंत सूक्ष्म स्तरावर घडत असतो. म्हणूनच ऋषी-मुनी ध्यान, तप आणि साधनेला इतके महत्त्व देतात.*

*जेव्हा मनुष्य सातत्याने ध्यान किंवा साधना करतो, तेव्हा त्याला या सूक्ष्म अस्तित्वाची काही प्रमाणात अनुभूती येऊ शकते. मात्र त्या अवस्थेतही साधकाने साक्षीभावाने राहणे आवश्यक असते. जे काही अनुभव येतात, ते फक्त पाहायचे असतात; त्यात अहंकार, आकर्षण किंवा भीती निर्माण होऊ द्यायची नसते. कारण आध्यात्मिक प्रवासाचा उद्देश चमत्कार पाहणे नसून, स्वतःला जाणणे हा असतो.*

*म्हणूनच या मानवजन्माचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या शरीरात असतानाच आत्म्याच्या उन्नतीसाठी, सदाचारासाठी, ईश्वरभक्तीसाठी आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवन सार्थ करण्याचा प्रयत्न करणे, हेच सर्वश्रेष्ठ कार्य आहे. जोपर्यंत जिवात जीव आहे, तोपर्यंत परिवर्तनाची, प्रायश्चित्ताची आणि ईश्वरप्राप्तीची दारे सदैव उघडी असतात.*

*या सात रेषा म्हणजे फक्त सात जन्म नाहीत; त्या आपल्या जीवनातील अज्ञान, अहंकार, मोह, भीती, चुकीचे संस्कार, वाईट कर्म आणि भ्रम यांच्या मर्यादा आहेत. जो या मर्यादा ओलांडतो, त्याच्यातील खरा प्रकाश प्रकट होतो.*

*आजही अनेक लोक एका अपयशानंतर स्वतःला संपलेलं समजतात. पण विचार करा—विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात नापास झाला म्हणून तो आयुष्यभर अपयशी ठरत नाही. शेतकरी एका हंगामात नुकसान झालं म्हणून शेती सोडत नाही. लहान मूल शंभर वेळा पडतं, म्हणून चालणं शिकणं सोडत नाही.*

*तसंच, आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक रेषा आहे. ती पार केली की पुढचा टप्पा सुरू होतो.*

*म्हणून लक्षात ठेवा—परिस्थिती तुमची ओळख ठरवत नाही, जन्म तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमची श्रद्धा, कर्म, प्रयत्न आणि सद्गुरूंची कृपा यांच्यामुळेच जीवनाचा खरा परिवर्तनाचा प्रवास सुरू होतो. कारण जोपर्यंत जिवात जीव आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षण नव्याने उभं राहण्याची आणि आत्म्याला परमेश्वराकडे नेण्याची संधी आपल्याकडे असते. 🙏🏻🚩*

*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*

*अध्याय २७ – प्रत्येक जीवाकडे करुणेने पाहा; कारण सद्गुरूंच्या दृष्टीने कोणीही तुच्छ नसतो.*  *कधी कधी परमेश्वर आपल्याला अ...
26/07/2026

*अध्याय २७ – प्रत्येक जीवाकडे करुणेने पाहा; कारण सद्गुरूंच्या दृष्टीने कोणीही तुच्छ नसतो.*

*कधी कधी परमेश्वर आपल्याला अशी व्यक्ती भेटवतो, जिच्याकडे पाहून समाज तुच्छतेने पाहतो; पण त्या व्यक्तीत दडलेला आत्मा किती महान आहे, हे फक्त सद्गुरूंनाच दिसतं.*

*"इतुकें वर्ततां ते अवसरीं। श्रीगुरु देखती नरासी दूरी। शिष्यांसी म्हणती पाचारीं। कवण जातो मार्गस्थ॥" (ओवी ९)*
*"गुरू पुसती त्यासी। जन्म कवण जातीसी। तो वृत्तान्त सांग मजसी। म्हणती पुसती तये वेळीं॥" (ओवी ११)*
*"मातंग नाम म्हणोनि। स्थान आपुलें बहिग्रामीं॥" (ओवी १२)*
*"तैसें तया पतितावरी। कृपा केली नरहरीं। दंड देवोनि शिष्या करीं। रेखा सम काढविल्या॥" (ओवी १५)*

*याच अध्यायात श्रीगुरु सभेत बसलेले असताना, त्यांना दूर रस्त्याने एक सामान्य मातंग जाताना दिसतो. इतरांच्या नजरेत तो फक्त एक पतित मनुष्य होता; पण श्रीगुरूंच्या दृष्टीने तोही परमात्म्याचाच अंश होता. म्हणून ते शिष्यांना सांगतात, "त्याला आदराने बोलावून आणा."*

*तो नम्रतेने येतो. श्रीगुरु त्याला विचारतात, "तू कोण? तुझा जन्म कुठे झाला?" तो अत्यंत विनयाने उत्तर देतो, "माझे नाव मातंग आहे. मी गावाबाहेर राहतो."*

*पण इथेच श्रीगुरू आपल्याला एक मोठा धडा देतात. ते त्या मनुष्याचा अपमान करत नाहीत, त्याला दूर लोटत नाहीत; उलट त्याच्यावर कृपा करतात. दंडाने भूमीवर रेषा काढून त्याच्या पूर्वजन्मांचे रहस्य उलगडू लागतात.*

*याचा अर्थ स्पष्ट आहे—सद्गुरू कधीच माणसाचा न्याय त्याच्या जन्मावरून करत नाहीत; ते त्याच्या कर्मांचा आणि अंतःकरणाचा विचार करतात.*

*आजही आपल्या आयुष्यात असंच होतं. आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीचं मूल्य तिच्या कपड्यांवरून, व्यवसायावरून, जातीवरून किंवा परिस्थितीवरून ठरवतो. पण कदाचित ती व्यक्ती संघर्षातून तयार झालेली असते, अनुभवाने समृद्ध असते आणि आपल्यापेक्षा अधिक उंच विचारांची असते.*

*म्हणून लक्षात ठेवा— "ज्याला जग कमी लेखतं, त्याच्यामध्येही परमेश्वराची ज्योत तेवढ्याच तेजाने प्रज्वलित असते. माणसाची ओळख त्याच्या जन्माने नाही, तर त्याच्या कर्माने, नम्रतेने आणि सदाचाराने होते."*

*हीच श्रीगुरूंची शिकवण आहे—*

*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*

*"काही लोकांना सत्य समजावून सांगण्यासाठी शब्द अपुरे पडत नाहीत... पण त्यांचा अहंकारच त्यांना सत्य स्वीकारू देत नाही."*  *...
26/07/2026

*"काही लोकांना सत्य समजावून सांगण्यासाठी शब्द अपुरे पडत नाहीत... पण त्यांचा अहंकारच त्यांना सत्य स्वीकारू देत नाही."*

*श्रीगुरूंनी गर्विष्ठ ब्राह्मणांना वेदांचं अनंत स्वरूप समजावून सांगितलं. भरद्वाज ऋषींची कथा सांगितली, महर्षी वेदव्यासांचं कार्य सांगितलं, वेदांचं महत्त्व सांगितलं. पण इतकं सगळं सांगूनही त्यांच्या मनातील अहंकार कमी झाला नाही.*

*तेव्हा श्रीगुरूंनी वाद वाढवला नाही. त्यांनी फक्त बोटाने इशारा करत सांगितलं—"उगाच वाद घालू नका... निघून जा."*

*यातून एक मोठा जीवनधडा मिळतो.*

*आजच्या आयुष्यातही काही लोक असे भेटतात की, त्यांना कितीही शांतपणे समजावलं, पुरावे दिले किंवा प्रेमाने मार्गदर्शन केलं, तरी ते ऐकायलाच तयार नसतात. कारण त्यांना सत्य जाणून घ्यायचं नसतं; त्यांना फक्त स्वतःच बरोबर असल्याचं सिद्ध करायचं असतं.*

*अशा वेळी सतत वाद घालत बसण्यात काहीच अर्थ नसतो.*

*जसा एखादा शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून शिकवतो; पण जर एखादा विद्यार्थी शिकण्याची तयारीच ठेवत नसेल, तर शिक्षक त्याच्यावर रागावत नाही. तो आपला वेळ त्या विद्यार्थ्यांवर खर्च करतो जे शिकण्याची इच्छा ठेवतात.*

*तसंच, आपल्या आयुष्यातही प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करत बसू नका. ज्याला शिकायचंच नाही, त्याला ज्ञान देता येत नाही. आणि ज्याला सत्य स्वीकारायचंच नाही, त्याला सत्य पटवून देता येत नाही.*

*म्हणून कधी कधी शांतपणे मागे होणं, हा पराभव नसतो; तीच खरी शहाणपणाची सुरुवात असते.*

*पुढील भागात...*
*श्रीगुरूंनी गर्विष्ठ ब्राह्मणांना जाण्यास सांगितलं, पण कथा इथे संपत नाही. त्यांच्या अहंकाराचा शेवट कसा झाला? श्रीगुरू त्यांना त्यांच्या विद्वत्तेची खरी परीक्षा कशी दाखवतात? हा अत्यंत रोमहर्षक प्रसंग आपण पुढील भागात पाहूया. 🙏🏻🚩*

*|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||*
*॥ श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏🏻*

Address

Neral

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category