Hindu Dhangar - हिंदु धनगर

Hindu Dhangar -  हिंदु धनगर धनगर जमातीच्या न्याय हक्कासाठी! The Dhangar is caste of people primarily located in the Indian state of Maharashtra.

The Page is for only DHANGAR cultures, programs, activities.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🌸🌸🌸🌸स्त्रीशक्ती, न्यायप्रियता, लोककल्याण आणि आदर...
31/05/2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🌸🌸🌸🌸

स्त्रीशक्ती, न्यायप्रियता, लोककल्याण आणि आदर्श प्रशासन यांचा अमूल्य वारसा जपणाऱ्या लोकमातेच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.

बांधवांनो,दिनांक १ मे रोजी “मिसिंग लिंक” हा महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असून त्याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे...
29/04/2026

बांधवांनो,

दिनांक १ मे रोजी “मिसिंग लिंक” हा महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असून त्याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे.

या पार्श्वभूमीवर, या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, ही आपल्या सर्वांची मागणी आहे.

CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Ram Shinde Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर या संदर्भात राज्य सरकारला लवकरच निवेदन सादर करण्यात येणार आहे. राज्यभरातील सर्व बांधवांनी आपल्या-आपल्या स्तरावर निवेदन देऊन या मागणीला बळ द्यावे.

नामकरण होईपर्यंत हा विषय सातत्याने लावून धरूया.

🙏 जय मल्हार

२८ जानेवारी : यशवंत सेनेचे संस्थापक, धनगर आरक्षण चळवळीचे निर्माते क्रांतीसुर्य स्व.बापुसाहेब खंडेराव कोकरे उर्फ बी के को...
28/01/2026

२८ जानेवारी : यशवंत सेनेचे संस्थापक, धनगर आरक्षण चळवळीचे निर्माते क्रांतीसुर्य स्व.बापुसाहेब खंडेराव कोकरे उर्फ बी के कोकरे, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

20/01/2026
16/12/2025

सांगली : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण!

24/09/2025

महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमाती (ST) आरक्षण अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत !
धनगर आरक्षण Scheduled Tribe

धनगर समाजाच्या Scheduled Tribe (ST) आरक्षणाची अंमलबजावणी कधी होणार?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला घटनेत अनुसूच...
15/09/2025

धनगर समाजाच्या Scheduled Tribe (ST) आरक्षणाची अंमलबजावणी कधी होणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला घटनेत अनुसूचित जमातीचे (Scheduled Tribe) आरक्षण दिले होते. मात्र, आजवर ७०+ वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही! या कालावधीत समाजाचे मोठे नुकसान झाले, परंतु त्याकडे कोणाच्याही लक्ष गेले नाही. आजही धनगर समाजाला हक्काचे ST आरक्षण मिळाले नाही, यामागे राजकीय अनास्था व जाणूनबुजून केलेला विलंब दिसून येतो.

सध्या Scheduled Tribe मधील जमातींसाठी लोकसंख्येनुसार ३५ मतदारसंघ राखीव आहेत. जर धनगर समाजाची ST आरक्षण अंमलबजावणी झाली, तर आणखी ३० ते ३५ मतदारसंघ राखीव होऊ शकतात. हाच राजकीय आरक्षणाचा भीतीदायक मुद्दा पुढे करून धनगर समाजाच्या हक्काची अंमलबजावणी थांबवली जाते, अशी चर्चा आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की – जर सर्वच राजकीय पक्ष धनगर समाजाच्या ST आरक्षणाला पाठिंबा देत असतील, तर आजवर हा प्रश्न सुटला का नाही?

या विलंबामुळे धनगर समाजाला प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. IIT, IIM, इंजिनिअरिंग, मेडिकल यांसारख्या उच्च शिक्षण क्षेत्रात आणि इतर सर्वच क्षेत्रात समाज मागे पडला आहे. काहीजण स्वतःच्या कष्टाने प्रगती करत असले तरी बहुसंख्य धनगर समाज आजही मागासलेलाच आहे. वस्तुतः, हा समाज इतरांपेक्षा तब्बल ७० वर्षे मागे राहिला आहे.

म्हणूनच, खरा प्रश्न असा आहे की, जर खरोखरच सर्व पक्ष व त्यांच्या नेत्यांनी धनगर समाजाच्या ST आरक्षणाला पाठिंबा दिला असेल, तर आजवर याची अंमलबजावणी का झाली नाही?

#धनगरसमाज ्षण #आरक्षणहक्क #धनगरआरक्षण #70वर्षांचाअन्याय #धनगरआंदोलन #आरक्षणअंमलबजावणी #धनगरएकता #धनगरविकास #धनगरमागासलेपण #आरक्षणलढा

कागल तालुक्यातील यमगे गावाचा मेंढपाळाचा मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने यशाचा इतिहास घडवला आहे! केंद्रीय लोकसेवा आयोगा...
26/04/2025

कागल तालुक्यातील यमगे गावाचा मेंढपाळाचा मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने यशाचा इतिहास घडवला आहे! केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC IPS) देशात ५५१ वी रँक मिळवून बिरदेवने संघर्ष, चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.
मेंढरामागं फिरण्यापासून सुरू झालेला हा प्रवास दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचलेला आहे.
बिरदेव डोणे यांचं मन:पूर्वक अभिनंदन! तुझं यश प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे!

Address

Navi Mumbai
400706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindu Dhangar - हिंदु धनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share