Vashicha Vighnaharta -वाशीचा विघ्नहर्ता

Vashicha Vighnaharta -वाशीचा विघ्नहर्ता नवी मुंबईचा लोकप्रिय राजा वाशीचा विघ्नहर्ता माझा..!! "

आपलेच,
श्री दत्तगुरू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,वाशीचा विघ्नहर्ता

वर्षानुवर्षे ऋतुचक्र निर्मित ऊन, थंडी,वारा,पाऊस यानां समर्थपणे तोंड देत असतानाच आपल्या शीतल छायॆखाली पांथस्थांना सावली देणार्‍या महान वटवृक्षाप्रमाणे श्री दत्तगुरू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली भरपूर र्वर्षे अव्याहतपणे आपल्या धार्मिक सामाजिक , शैक्षणिक , आणि सांस्कृतिक कार्याद्वारे वाशी सारख्या विभागात कार्यरत आहे.सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना उत्सवातून अभिप्रेत असलेले समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य हेच या उत्सव मंडळाच्या कार्याचे मूळसूत्र आहे.
सेवाभावी संस्थेचे काम पक्षातीत असले पाहिजे हा या मंडळाचा प्रारंभापासूनच कटाक्ष होता,गेल्या कित्येक वर्षात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपली राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून उत्सव मंडळाच्या कार्याचा हा रथ पुढे नेत आहेत हे आवर्जून नमूद करावयास हवे.हे मंडळ म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याची कार्यशाळा आहे असे म्हटले जाते. मंडळाच्या माध्यमातून कामास सुरवात करुन आज विविध स्तरांवर हे कार्यकर्ते नावारुपास आलेले आहेत याचा ,मंडळास रास्त अभिमान आहे.वैचारीक अधिष्ठान व सेवा हाच स्थायीभाव असलेल्या या उत्सव मंडळासारख्या संस्था सामाजिक जीवन संपन्न व सुसंस्कृत करतात. समाजाची सर्व दु:खे जरी दूर करता आली नाहीत तरी ती सुसह्य करण्यासाठी झटतात व समाजात जागल्याचे काम करतात.म्हणूनच समाज ,सरकार,राजकीय पक्ष,प्रसिध्दी माध्यमे ,दानशूर संस्था यांनी आपले सक्रीय पाठबळ अशा संस्थेच्या मागे उभे केले पाहिजे.सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे आव्हानांना मंडळाने कधीच पाठ दाखविलेली नाही किबंहूना प्रश्नांना हात घालीतच मंडळाची वाटचाल झालेली आहे.आजची विभागातील तरुण पिढी सुशिक्षित ,सुसंस्कृत आहे. मंडळ गेली कित्येक वर्षे जमविलेल्या निधीचा फार मोठा हिस्सा शैक्षणिक कार्यावर खर्च अशा वेळी सामाजिक बांधिलकी म्हणून किमान २ वर्षे या तरुण पिढीने मंडळाच्या कार्यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा मंडळाने केली तर वावगे ठरणार नाही.मंडळाच्या कार्याची राज्य पातळीवर विविध संस्था, प्रसिध्दी माध्यमे यांनी योग्य ती दखल घेतलेली आहे
आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये उत्सव मंडळाने फार मोठे काम केलेले आहे असं आमच कधीच म्हणणं नव्हत आणि असणार ही नाही.’अपूर्णावस्थेतच पूर्णत्वाचे बीज असते ’ जेव्हा पूर्ण विकास झाल्यावर भास होतो तेथे विकास खुंटतो या विचार सरणीवर आज आम्हा सर्व कार्यरत कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.या कामामध्ये आमच्याही काही चुका झाल्या असतील परंतु TO ERR IS A HUMAN NATURE या वाक्याने या चुका आपण सर्वांनी समजून घेतल्या .सर्व जनता जनार्दन वर्गणीदार ,देणगीदार ,जाहिरातदार ,हितचिंतक तनमनधनाने या मंडळाची एकरुप झालेत.गेल्या कित्येक वर्षाच्या कालावधीत असंख्य व्यक्ती ,संस्थानी या उत्सव मंडळाच्या जडणघडणीत जे योगदान दिले त्याबद्दल मंडळ त्यांना सदैव मानाचा मुजरा करीत आहे. फुटीरता व जातियता यांनी ग्रासलेली आपली भारत मातृभूमी पुन्हा एकदा अखंड बलशाली व सुवर्णभूमी व्हावी.आपणा सर्वांना वैभव व सौख्य लाभावे हीच श्री गणराय व आईभवानीकडे प्रार्थना.
धन्यवाद !
जयहिंद,जय महाराष्ट्र

"मान टिळकांचा
ठसा सामाजिक बांधिलकीचा !

पहिलें तुझें अर्चन सदा गणनायका ।।अनवत धरा पायावरी, सुखदायका ।।🌺🙏🏻मूर्तिकार :- सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्ट्स)वाशीचा विघ्न...
17/08/2026

पहिलें तुझें अर्चन सदा गणनायका ।।
अनवत धरा पायावरी, सुखदायका ।।🌺🙏🏻

मूर्तिकार :- सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्ट्स)

वाशीचा विघ्नहर्ता 2025

फोटो सौजन्य :- अमेय राव

#बाप्पामाझा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर स्वातंत्र्यसै...
14/08/2026

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन! 💐🙏

१५ ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्यदिन 🇮🇳

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपत आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान देऊया.
देशाची एकता आणि अखंडता मजबूत करण्याचा संकल्प करूया. 🇮🇳❤️

जय हिंद! 🇮🇳
जय भारत! 🇮🇳

फोटो सौजन्य :- सुयश ग्राफिक्स

#भारत #भारतमाताकीजय

🚩🔱 सर्वांना श्रावण मासारंभाच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा! 🔱🚩​फोटो सौजन्य :- प्रतीक गाडगे  #श्रावण  #श्रावणमासारंभ  ...
13/08/2026

🚩🔱 सर्वांना श्रावण मासारंभाच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा! 🔱🚩



फोटो सौजन्य :- प्रतीक गाडगे

#श्रावण #श्रावणमासारंभ #महादेव #भोलेनाथ #विघ्नहर्ता

卐 ॥ आग्रहाचे आमंत्रण ॥ 卐🙏"मान टिळकांचा ठसा सामाजिक बांधिलकीचा ! "🙏सरले आता वर्ष... राहिले आता काही क्षण..तुझ्या येण्याच्...
10/08/2026

卐 ॥ आग्रहाचे आमंत्रण ॥ 卐

🙏"मान टिळकांचा ठसा सामाजिक बांधिलकीचा ! "🙏

सरले आता वर्ष... राहिले आता काही क्षण..
तुझ्या येण्याच्या खुशीत... लागे ना माझे कुठे मन..
🎺🥁🎷आगमन सोहळ्याच्या तयारीची सर्व #नवीमुंबईत चर्चा झाली..🎺🥁🎷
#विघ्नहर्ता तुझ्या यजमानासाठी #वाशी सज्ज झाली ❤

दिनांक :- ०८ सप्टेंबर २०२६ { मंगळवार }

ठीक दुपारी ०१.०० वाजता

स्थळ :- " मूर्तिकार श्री .सिद्धेश दिघोळे " ( कलागंध आर्ट्स ) ,

परेल रेल्वे वर्कशॉप मैदान.

फोटो सौजन्य :- हर्ष ग्राफिक्स / सुयश ग्राफिक्स

#बाप्पामाझा

सिंदुरचर्चित धवळे अंग,चंदन उटी खुलवी रंग, बघता मानस होते दंग,जीव जडला चरणी तुझिया, आधी वंदू तुज मोरया🌺🌺🙏🏻🙏🏻सुप्रसिद्ध मु...
09/08/2026

सिंदुरचर्चित धवळे अंग,चंदन उटी खुलवी रंग, बघता मानस होते दंग,
जीव जडला चरणी तुझिया, आधी वंदू तुज मोरया🌺🌺🙏🏻🙏🏻

सुप्रसिद्ध मुर्तीकार:- सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्टस)

फोटो सौजन्य :- अमेय राव

#बाप्पामाझा

डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा,संकटाला बळ देई अवतार देवाचा...!!🙏🌺मूर्तिकार :- सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्ट्स)वाशीचा विघ्न...
04/08/2026

डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा,
संकटाला बळ देई अवतार देवाचा...!!🙏🌺

मूर्तिकार :- सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्ट्स)

वाशीचा विघ्नहर्ता 2025

फोटो सौजन्य :- अमेय राव

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे |माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ||माझे चित्त विरे मनोरथ पुरे...
01/08/2026

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे |
माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ||
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे |
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे.…!!🌺🙏

🌺!!! आज संकष्टी चतुर्थी !!! 🌺
🌺!!! चंद्रोदय :- ० ९ : ३७ मि. !!!🌺

फोटो सौजन्य :- सुयश ग्राफिक्स

#संकष्टी #चतुर्थी

श्री गणेशा नमन करुया, आरंभी शुभ कार्याच्यादे सद्बुद्धि, रिद्धी सिद्धी, सुरभी शुभ लाभाच्या...!!🌺🙏फोटो सौजन्य :- अमेय राव ...
30/07/2026

श्री गणेशा नमन करुया, आरंभी शुभ कार्याच्या
दे सद्बुद्धि, रिद्धी सिद्धी, सुरभी शुभ लाभाच्या...!!🌺🙏

फोटो सौजन्य :- अमेय राव

सुप्रसिद्ध मुर्तीकार:- सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्टस)

छायेत ज्यांच्या मिळते शिष्यांना त्रिभुवनातील ज्ञानामृत,ते गुरू म्हणजे आपल्या जीवनातील साक्षात भगवंताचे रूप..!गुरुपौर्णिम...
28/07/2026

छायेत ज्यांच्या मिळते शिष्यांना त्रिभुवनातील ज्ञानामृत,
ते गुरू म्हणजे आपल्या जीवनातील साक्षात भगवंताचे रूप..!

गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!🪷🌷🙏🏻

फोटो सौजन्य : - सुयश ग्राफिक्स

Address

Https://goo. Gl/maps/uTDnmGRWuRXbv7Mo 7
Navi Mumbai
400703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vashicha Vighnaharta -वाशीचा विघ्नहर्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Vashicha Vighnaharta -वाशीचा विघ्नहर्ता:

Shortcuts

Share

Category