14/09/2025
सध्याची परिस्थिती पाहता लिंगायत समाजा मधील अनेक लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, कोणी येत आहे लिंगायत ही एक जात आहे, कोणी येत आहे लिंगायत हा एक हिंदू धर्मातील भाग आहे, कोणी येत आहे विरशैव लिंगायत हा वेगळा जात किंवा वेगळा धर्म आहे, अरे चालय तरी काय काही कळेल का या सर्व सामान्य लिंगायत समाजातील व्यक्ती ना समजेल का, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपण समाजाला कोणाच्या पण दावणीला नेवुन बांधणार का ?
अरे थोडी तरी लाजा बाळगा आज पर्यंत कोणी धर्म मान्यते साठी लढले कोणी आरक्षण साठी लढले, कोणी समाजाच्या विकासासाठी लढले, कोण म्हणतंय लिंगायत हा धर्म आहे धर्म ला आरक्षण नसतं जातीला आरक्षण असत , तुम्हीच म्हणताय लिंगायत धर्म आहे तुम्हीच म्हणताय लिंगायत जात आहे, आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या नादात समाजाचा वापर का करताय ,अरे समाजाला सांगताय काय करताय समाजाला का गोंधळात टाकताय ?
माझं समाजातील पुढार्यांना ना आव्हान आहे सर्वात अगोदर आपली भुमिका स्पष्ट आपण कागदोपत्री लिहून आपले म्हणणे स्पष्ट करा .
१)लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे.
२) विरशैव लिंगायत धर्म आहे
३) हिंदू विरशैव लिंगायत धर्म आहे
४) विरशैव लिंगायत धर्म नसून जात आहे.
असे अनेक प्रकारचे मुद्दे घेऊन जे लोकांची दिशाभूल करत आहात ना ते अगोदर आपण कागदोपत्री लिहून सोशल मीडिया च्या माध्यमातून स्पष्ट करावे व त्यांच मुद्दावर काम करावे.
कृपया लिंगायत धर्मातील समाजातील व्यक्तींची दिशाभूल करु नका 🙏
लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म होता व आमच्या साठी स्वतंत्र धर्मच आहे फक्त संविधानिक मान्यता मिळने बाकी आहे आणि ते लवकरच मिळवण्यासाठी योग्य ते कार्य चालू आहे.
( लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे या बद्दल कोणाला माहिती हवी असल्यास संपर्क किंवा मेसेज करु शकता )
शरण सोमनाथ हजापुरे