20/02/2025
प्रेस नोट.
*नविन नाशिक सकल मराठा समाज नाशिक शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*
नविन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमुर्ती चौक येथील कामटवाडा सर्कल या ठिकाणी शिवजनमोत्सव सोहळा वर्ष २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी शिवजनमोत्सवाचे अवचित्य साधून
दिनांक १२/०२/२०२५ वार बुधवार पासून चित्रकला,निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १५/०२/२०२५ वार शनिवार चांदशी येथील सहारा केअर सेंटर येथील वयस्कर लोकांना भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १६/०२/२०२५ वार रविवार उंटवाडी स्मशान भुमी या ठिकाणी वृक्ष रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
दिनांक १८/०२/२०२५ वार मंगळवार रोजी आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, सिनेट सदस्य सागर वैद्य, डी जी सूर्यवंशी यांच्या हस्ते आरोग्य शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ५०० ते ७०० लोकांनी आपल्या तपासणी करून घेतली
यावेळी पोवाडा गायन स्पर्धा तसेच बक्षीस वितरण करण्यात आले तसेच
Aspirant English Medium School.
यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित ३० विद्यार्थी तसेच
Dance Elite studio येथील लहान मावळ्यांचा डान्स कार्यक्रम ठेवण्यात येऊन नविन नाशिक मधील कलाकारांना वाव देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला
नंतर या ठिकाणी
श्री दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा तसचे अफजल खान याचा वध यावर आधारित ३० कलाकारांचा जिवंत देखावा दाखवण्यात आला
मध्यरात्री १२ वाजता दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अंबड पोलिस स्टेशन चे पोलिस अधिकारी राकेश हांडे साहेब,आव्हाड दादा तसेच पिसआय नितीन फुलपगारे यांच्या हस्ते महापुजन करण्यात आले.
यावेळी सकाळी आमदार सिमा ताई हिरे,रश्मी हिरे,महेश हिरे,दिनकर पाटील, प्रा प्रशांत पाटील सर, डी जी सूर्यवंशी,दिनकर आण्णा पाटील,नानासाहेब महाले,अण्णा पाटील,युवा नेते अजय बागुल,रंजन ठाकरे,अर्जुन नाना पगारे,सुधाकर भाऊ बडगुजर,मुरली तात्या भामरे,रवी पाटील,काँग्रेस चे आकाश छाजेड,बी जे पी चे नाशिक प्रदीप पेशकर,श्याम कुमार साबळे,सतीश बापू सोनवणे,दिलीप भामरे,संतोष ठाकूर,सौ सोनाली राजे पवार, चंचल साबळे,संजय भामरे,सुनील जगताप,
प्रशांत जाधव, ऍड अजिंक्य गीते,अनिल मटाले,संतोष सोनपसारे,आशिष नाना हिरे,बाळासाहेब गीते,विजय पाटील,विश्राम बापू सोनवणे,राम पाटील पंकज पाटिल,प्रितम भामरे,श्याम पाटील, भरत पाटील,अमित खांडे,उमेश चव्हाण,नितीन माळी,प्रकाश पाटील, डॉ वैभव महाले,पवन मटाले,योगेश पाटील सर्व पक्षाचे नविन नाशिक मधील सर्व पद धिकारी,विविध मान्यवरांचे हस्ते पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला,यावेळी अंबिका मिञ मंडळ संचलित डॉ डी एस आहेर प्राथमिक विद्यालय, डॉ शालंताई बोरसे माध्यमिक विद्यालय,विद्या विकास माध्यमिक विद्यालय,मुकेश भाई पटेल प्राथमिक विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल
सरस्वती गुलाबराव पाटिल प्राथमिक माध्यमिक विद्यालय यांच्या विद्यार्थी कडून वेशभूषा तसेच लेझिम पथकाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी विद्यार्थी यांनी शिवरायांन बद्दल आपले मनोगत व्यक्त केले, बादशाह ढोल पथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी यांनी मैदानी खेळ करून दाखवले.
या नंतर नविन नाशिक मधील सर्व पत्रकार बंधु यांना सन्मान चिन्ह तसेच शिवरायांचे पुस्तक यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.
तसेच यावेळी नविन नाशिक सकल मराठा समाज कडून चार मुल दत्तक घेण्याचे अध्यक्ष अक्षय पाटील व माधवी पाटील यांनी जाहीर केले.तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी ४.३० वाजेपासून लेझर शो द्वारे मिरवणूक सदृश्य कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते यावेळी नविन नाशिक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष दे सन्मानिय अक्षय पाटिल,महिला अध्यक्ष सौ माधवी विजय पाटिल,कार्यअध्यक्ष प्रशांत आहिरे महिला, कार्यअध्यक्ष जयश्री आशिष हिरे,शीतल ताई भामरे, सौ अरुणा ताई पाटील,सौ शीला ताई भागवत,सौ दिपीका पाटील, सौ साधना मटाले,अमोल खैरनार,अमोल पाटील,योगेश जाधव,जय पवार, योगेश आहिरे, रविराज पाटील,शुभम महाले,हर्षल मराठे,उमेश धामणे
सुधाकर टाव्हरे,देवा हिरे,केतन चव्हाण,सागर पाटील,दर्शन चव्हाण,गौरव भदाणे,कल्पेश पाटिल,केतन चव्हाण,सागर पाटील,पप्पू पाटिल,महेश चव्हाण,राजेंद्र मराठे,आदींसह नविन नाशिक सकल मराठा समाजाचे पद धिकारी उपस्थित होते यावेळी बाळासाहेब गीते यांनी प्रास्ताविक केले तसेच आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे खजिनदार योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले..
टीप सोबत छायाचित्र पाठवत आहोत छायाचित्रासह बातमी प्रसारित करावी ही विनंती.