तुका म्हणे

तुका म्हणे तुका म्हणे ह्या पेजवर आपण तुकोबांचे रसाळ अभंग वाचू शकतात.

तुका म्हणे (अ.क्र. - ३३५१)एक ब्रम्हचारी गाढवा झोंबता |हानोनिया लाथा पळाले ते ||१||गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले |तोंड काळे...
24/11/2024

तुका म्हणे (अ.क्र. - ३३५१)

एक ब्रम्हचारी गाढवा झोंबता |
हानोनिया लाथा पळाले ते ||१||

गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले |
तोंड काळे झाले जगामाजि ||२||

हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले |
तुका म्हणे गेले वायांचि ते ||३||

अर्थ -
एकदा एक ब्रम्हचारी काम वेदना सहन न झाल्याने गाढवासोबत अतिप्रसंग करू लागला असता ते गाढव त्याला लाथा हानून पळाले. ||१||

अशा प्रकारे त्या ब्रम्हचाऱ्याला कामसुखही मिळाले नाही आणि त्याचे ब्रम्हचर्यही वाया गेले. जगामध्ये अब्रू मात्र गेली. तो दोन्हीकडून हुकला. ||२||

तुकोबा म्हणतात, जनहो तुमच्याही बाबतीत असे घडायला नको. अशाश्वताच्या मागे कितीही धावले तरी ते मिळणार नाहीच मात्र शाश्वतही दुरावणार हे नक्की. हे होऊ नये म्हणून आत्ताच जागे व्हा. ||३||

| राम कृष्ण हरि |
#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय

आज तुकाराम बीज अर्थात तुकोबांच्या वैकुंठगमनाचा दिवस.संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेले एक आगळे वेगळ...
27/03/2024

आज तुकाराम बीज अर्थात तुकोबांच्या वैकुंठगमनाचा दिवस.

संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेले एक आगळे वेगळे रसायन आहे. तुकाराम हे व्यक्तिमत्व कितीही समजून घेतले तरी एका अंगातून त्याची मांडणी करताच येत नाही. कारण तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम आहेत. आस्तिक असो अथवा नास्तिक परंतु तुकोबांचा विचार मानत नाही असा मनुष्य किमान ह्या महाराष्ट्राच्या मातीत तरी सापडणे अशक्यच. आपल्या रोखठोक शैलीत सत्य मांडण्याची हातोटी गवसलेले तुकोबा हे सर्व संतांच्या मेळ्यात शीर्षस्थानी असण्याचेही कारण हेच आहे.

तुकोबांचे व्यक्तिमत्व अनेक आयामांनी युक्त आहे. नुसते तुकाराम नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर शांत सात्विक व्यक्तीमत्व उभे राहते. कलियुगात वेदांचा (यज्ञ कर्मांचा) मार्ग लोप पावल्याने मनुष्याच्या उद्धारासाठी संतांनी भक्तीचा मार्ग विस्तृत बनवला. तुकोबांनी त्यांच्या अख्ख्या जीवनात सर्वाधिक पुरस्कार भक्तीमार्गाचाच केल्याचे दिसून येते.

भक्तीचा पुरस्कार करणारे तुकोबा ढोंग, दंभ, पाखंड यावर कडाडून हल्ला चढवतात. तुकोबांना देव, धर्म मान्य आहे परंतु त्याचे ढोंग अजिबात मान्य नाही. याचप्रमाणे देवाला, त्याच्या भक्तांना, संतांना व संतांच्या वचनांना न मानणाऱ्या पाखंड्यांनाही तुकोबा झोडपून काढतात. मनुष्याच्या जातीपेक्षा त्यांना त्याची भक्ती अधिक मोलाची वाटते. म्हणून एखादा अभक्त मनुष्य जातीने उच्च असला तरी तुकोबांना तो आवडत नाही मात्र जातीने नीच असलेला एखादा मनुष्य मनापासून ईश्वरभक्ती करत असेल तर तुकोबांना तो वंदनीय वाटतो.

व्यवसायाने वाणी (दुकानदार) असलेल्या तुकोबांनी विरक्तीमुळे आपल्याकडील सर्व संपत्ती गोरगरीबांना वाटून टाकली आणि पोटापुरतीच जवळ ठेवली. तुकोबांनी रचलेली गाथा म्हणजे त्यांच्या अध्यात्मिक, सामाजिक व व्यावहारिक अनुभवांचे चालते बोलते रूप आहे. भक्तीचे मर्म समजून न घेता केवळ कर्मठपणालाच मानणाऱ्या तत्कालीन धर्मपंडितांकडून तुकोबांची गाथा देखील इंद्रायणीत बुडवण्यात आली. मात्र तुकोबांची भक्ती खरी होती. म्हणून पांडूरंगाला गाथेच्या वह्या कोरड्या वरती काढून द्याव्या लागल्या. यानंतर मात्र तुकोबांची कीर्ती जिकडे तिकडे पसरली. तुकोबांना सुरूवातीला त्रास देणाऱ्या रामेश्वर शास्त्रींसारख्या लोकांनी ह्या प्रसंगानंतर तुकोबांचे शिष्यत्व स्वीकारले आणि स्वतःचे कल्याण करून घेतले.

फाल्गुन वद्य द्वितीया शके १५७१ (इ.स.१६४९) सोमवारच्या दिवशी तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. वैकुंठगमनापुर्वी तुकोबांनी त्यांच्या टाळकरी लोकांसह इंद्रायणीच्या काठावर नांदूरकी वृक्षाखाली कीर्तन केले. तुकोबांच्या वैकुंठगमन समयी तेथे तुकोबांचे सगळे टाळकरी शिष्यमंडळ उपस्थित होते. तुकोबांचे दोन्ही पुत्र महादेव आणि विठोबा यांनी पुढे होऊन तुकोबांना नमस्कार केला व वडीलांचे आशीर्वाद घेतले. महादजीपंत कुलकर्णी देहूकर, गंगाधर बाबा मवाळ तळेगावकर, संताजी तेली जगनाडे चाकणकर, तुकोबांचे बंधू कान्होजी, मालजी गाडे येलवाडीकर, कांडोपंत लोहकरे लोहगावकर, गवारशेठ वाणी, मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर, आबाजीपंत लोहगावकर, रामेश्वरशास्त्री भट्ट महूळकर, कोंडपाटील लोहगावकर, नावजी माळी लोहगावकर, शिवबा कासार लोहगावकर आणि सोनबा ठाकूर ह्या सर्व टाळकऱ्यांचा व कीर्तनाला उपस्थित असलेल्या श्रोत्यांचा निरोप घेऊन तुकोबा गरुड विमानाने वैकुंठाला गेले.

तुकोबांच्या वैकुंठगमनावर सध्याच्या काळात अनेक स्वयंघोषित बुद्धीवादी शंका घेतात. मात्र त्यांच्या शंकांना कसलाही आधार नाही. कारण हे स्वयंघोषित बुद्धीवादी एकतर अध्यात्मशास्त्रातील संज्ञा न जाणता विमान, वैकुंठ ह्या संज्ञांचा अर्थ व्यावहारिक भौतिक जीवनाशी जोडतात आणि दुसरे म्हणजे अशा शंका उठवून राजकीय अजेंडे, ब्राह्मणद्वेषाची पेरणी व त्याआडून हिंदूंदू धर्मावर आघात हे त्यांचे मुख्य उद्देश असतात. यात सत्यशोधकता व श्रद्धा यांचा कुठेही लवलेश नसतो.

वैकुंठ हे आकाशातील असे एखादे ठिकाण मुळीच नाही की जेथे पृथ्वीवरून एखाद्या साधनाने जाता येईल. तुकोबा ज्या विमानाने वैकुंठाला गेले ते विमान म्हणजे हवेत उडणारे एखादे वाहनही मुळीच नाही. ती अध्यात्मिक परिभाषा आहे. विश्वात जिथे जिथे आकाश (space) आहे तिथे तिथे काळाची सत्ता चालते. म्हणजे विश्वात कोणत्याही ठिकाणी असणारी वस्तू अथवा पदार्थ हा नाशवान आहे. काळें खादला अवघाचि आकार । ह्या तुकोबांच्या अभंगात ह्याबद्दल स्पष्टपणे बोललेले आहे. शिवाय वैकुंठ म्हणजे काय याबद्दल श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतही सांगितले - न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः । अर्थात त्या माझ्या परमधामात सूर्य, चंद्र व अग्नी यांची किरणेदेखील पोहचत नाहीत. जर वैकुंठात सूर्य - अग्नीच्या किरणांनाही प्रवेश नसेल तर तेथे भौतिक पदार्थांची गती कशी असणार ? एवढी साधी गोष्ट आहे. म्हणून तुकोबांचे विमानाने झालेले वैकुंठगमन ही व्यावहारिक भौतिक जीवनातील घटना नसून ती अध्यात्मिक घटना आहे व तिचा उलगडा गाथेच्या सखोल अभ्यासातूनच होतो.

सासरला असलेली मुलगी दिवाळीच्या वेळेस जशी माहेरहून कुणीतरी तिला मूळ लावण्यासाठी येईल याची जशी वाट पाहत असते, तसे तुकोबा वैकुंठाहून केव्हा विठ्ठल त्यांना नेण्यासाठी येईल याची निरंतर वाट पाहत असत. याचे उत्कट दर्शन आपल्या गाथा वाचताना होते. "पैल कोण दिसे गरूडाचे वारिके । विठ्ठलासारिखे चतुर्भुज ।।" मला वैकुंठाला नेण्यासाठी गरूडावर बसून पलिकडून विठ्ठलासारखे चतुर्भुज दिसणारे कुणीतरी येत असल्याचे दिसत आहे, असे तुकोबा म्हणतात.
"आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ।।" आम्ही वैकुंठवासी लोक ऋषींची वचने प्रत्यक्ष जगून दाखवण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत, असे तुकोबा म्हणतात. जे तुकोबा वैकुंठाहून पृथ्वीवर येऊ शकतात, ते पुन्हा वैकुंठाला जाऊ शकणार नाहीत का ?

वैकुंठगमनाप्रसंगी तुकोबांनी अनेक अभंग रचलेले व गायले आहेत. त्यापैकीच एक अभंग म्हणजे "सकळही माझी बोळवण करा । परतुनी घरा जावे तुम्ही ।।" हा आहे. तुम्ही सगळे लोक मला निरोप द्या आणि तुमच्या घरी निघून जा असे तुकोबा ह्या अभंगात म्हणतात.
"याजसाठी केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ।।" माझा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठीच मी आयुष्यभर भक्तीचा एवढा अट्टहास केल्याचे तुकोबा म्हणतात.
"आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी ।" ह्या अभंगातून तुकोबा स्पष्टपणे आपण वैकुंठाला जात असल्याचे म्हणतात.

तुकोबांच्या निर्याणसमयाचे अनेक अभंग गाथेत आजही उपलब्ध आहेत. ह्या देशाच्या मातीत आजपर्यंत अनेक आत्मज्ञानी व ग्रंथांचे रचनाकार कवी होऊन गेले. अनेक सिद्ध पुरूष, योगी, महायोगी, भक्त, ज्ञानी व कर्मयोग्यांना ह्या देशाने पाहिले; परंतु स्वतःचे शरीर ब्रह्मलोकात नेणारा तुकाराम एकटाच ह्या धरतीने बघितला. म्हणून तुकोबांबद्दल एवढेच बोलावेसे वाटते - "धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।"

तुकाराम बीजेच्या समस्त वारकरी बंधूना व विठ्ठलभक्तांना हार्दिक शुभेच्छा.

© गजानन जगदाळे

https://www.facebook.com/share/p/2ZDa873wAZsJcbZr/?mibextid=Nif5oz

22/01/2024

संत तुकोबांनी भविष्य जाणून ३५० वर्षांपुर्वी कदाचित ह्या अभंगांची रचना केली नसेल ना ? नक्की वाचा. 👇🏻

झालें रामराज्य काय उणें आम्हांसी ।
धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी ॥१॥

राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये ।
दळितां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥

स्वप्नींही दुःख कोणी न देखे डोळां ।
नामाच्या गजरें भय सुटलें कळीकाळा ॥३॥

तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें ।
तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥४॥

अर्थ-

आता रामराज्य झाले आहे. त्यामुळे आम्हाला कशाचीच उणीव राहिली नाही. धरणी आता चांगले पीक धरू लागली आहे आणि गाई म्हशी सुद्धा खुप दूध देऊ लागल्या. ||१||

आम्ही जेवताना, दळताना, कांडताना किंवा कोणतेही काम करताना राम राम असे ओव्यांमधून सतत म्हणत राहू. ||२||

रामराज्य आल्याने कुणाला स्वप्नात सुद्धा दु:खाचे दर्शन होत नाही. रामनामाच्या भयाने कलियुगाला भय सुटले आहे. ||३||

तुकोबा म्हणतात, रामाने आम्हाला सगळे काही सुख दिले. त्यामुळे आमची गर्भवासाची कटकट टळली. ||४||

| राम कृष्ण हरि |

(तुकाराम गाथा,
अ.क्र. - ३५५१, जात्यावरील ओवीचा अभंग)

🙏🏻👣🙏🏻

▪️ ही आहे हम्पी येथील विरूपाक्ष मंदिरातील नटराजाच्या रूपात उभ्या असलेल्या शिवशंकरची पाषाणातील मुर्ती. हिंदू सभ्यतेचा इति...
27/05/2023

▪️ ही आहे हम्पी येथील विरूपाक्ष मंदिरातील नटराजाच्या रूपात उभ्या असलेल्या शिवशंकरची पाषाणातील मुर्ती. हिंदू सभ्यतेचा इतिहास हा कागदांपेक्षा अधिक दगडांमध्ये सापडतो, असे म्हणतात ते उगीच नाही. ही मुर्ती इ.स.पुर्व ७ व्या शतकातील आहे.
▪️ चित्रात दाखवलेल्या ह्या नटराज शिवाच्या डाव्या हातात राजदंड (सेंगोल) स्पष्टपणे दिसत आहे. ह्या सेंगोलच्या वर नंदी विराजमान आहे.
▪️ ह्या मुर्तीवरून लक्षात येते की, राजदंड, धर्मदंड किंवा सेंगोल हा केवळ राजांकडूनच धारण केला जातो असे नसून, सृष्टीच्या निर्मात्याने, आदिपुरूष शंकराने तो निर्माण केलेला व धारण केलेला आहे.
▪️ धर्म शब्दाचा अर्थ "सर्वांना धारण करणारा विचार" असा होतो. म्हणजेच सर्व जीवमात्रांचा सांभाळ करण्यासाठी प्रसंगी दया व प्रसंगी शासन यांचे ते प्रतिक आहे.
▪️ हा दंड भगवान शिवाचे / विष्णूचे व त्याचा प्रतिनिधी मानल्या गेलेल्या सम्राटाचे अबाधित ऐश्वर्य व सार्वभौम सत्ता यांचे प्रतिक आहे.
▪️ प्रजेचे पालन करताना हा धर्मदंड वेळोवेळी राजाला त्याच्या प्रजेच्या प्रती असलेल्या कर्तव्याची व राजधर्माची जाणीव करून देत असतो.
▪️ असाच सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ साली इंग्रजांचा व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन कडून सत्तेचे हस्तांतरण म्हणून पंडित नेहरूंना देण्यात आला होता, जो नंतर त्यांनी संसदेत न ठेवता प्रयागराज मधील एका संग्रहालयात चालण्याची काठी (Walking stick) म्हणून ठेवून दिला.
▪️ राजदंडाला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. २८ मे रोजी होणाऱ्या नवीन संसद हस्तांतरणावेळी हा सेंगोल प्रयागराज मधील संग्रहालयातून काढून पुन्हा एकदा भारताच्या नव्या संसदेत स्थापन केला जाणार आहे.
▪️ पुर्वी भारतात राजेशाही होती म्हणून हा राजदंड राजा धारण करीत असे. आता मात्र भारतात लोकशाही असल्याने येथे एखादी व्यक्ती राजा नसून भारताची संसद हीच येथील राजा आहे. म्हणून हा राजदंड संसदरूपी सम्राटाकडे असणेच योग्य आहे व तसेच होणारही आहे.
▪️ अनेक लोक अफवा पसरवत आहेत की, मोदी स्वतःला राजा समजतात म्हणून त्यांनी हा सेंगोल स्वतः जवळ ठेवण्याचे ठरवले आहे; पण यात काही तथ्य नाही. हा सेंगोल संसदेत राहणार असून देशाची सर्वोपरी सत्ता संसदेकडेच असणार आहे. पंतप्रधान हा संसदेचा व भारतीय लोकशाहीचा सेवक आहे.
▪️ थोडक्यात सेंगोल किंवा राजदंड अथवा धर्मदंड हा केवळ राजाकडून धारण केला जातो असे नसून यांची परंपरा आदिपुरूष भगवान शंकरांपासून आहे व तीच पुढे भारतात राहणार आहे.

आज तुकाराम बीज अर्थात तुकोबांच्या वैकुंठगमनाचा दिवस.संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेले एक आगळे वेगळ...
09/03/2023

आज तुकाराम बीज अर्थात तुकोबांच्या वैकुंठगमनाचा दिवस.

संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेले एक आगळे वेगळे रसायन आहे. तुकाराम हे व्यक्तिमत्व कितीही समजून घेतले तरी एका अंगातून त्याची मांडणी करताच येत नाही. कारण तुकोबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम आहेत. आस्तिक असो अथवा नास्तिक परंतु तुकोबांचा विचार मानत नाही असा मनुष्य किमान ह्या महाराष्ट्राच्या मातीत तरी सापडणे अशक्यच. आपल्या रोखठोक शैलीत सत्य मांडण्याची हातोटी गवसलेले तुकोबा हे सर्व संतांच्या मेळ्यात शीर्षस्थानी असण्याचेही कारण हेच आहे.

तुकोबांचे व्यक्तिमत्व अनेक आयामांनी युक्त आहे. नुसते तुकाराम नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर शांत सात्विक व्यक्तीमत्व उभे राहते. कलियुगात वेदांचा (यज्ञ कर्मांचा) मार्ग लोप पावल्याने मनुष्याच्या उद्धारासाठी संतांनी भक्तीचा मार्ग विस्तृत बनवला. तुकोबांनी त्यांच्या अख्ख्या जीवनात सर्वाधिक पुरस्कार भक्तीमार्गाचाच केल्याचे दिसून येते.

भक्तीचा पुरस्कार करणारे तुकोबा ढोंग, दंभ, पाखंड यावर कडाडून हल्ला चढवतात. तुकोबांना देव, धर्म मान्य आहे परंतु त्याचे ढोंग अजिबात मान्य नाही. याचप्रमाणे देवाला, त्याच्या भक्तांना, संतांना व संतांच्या वचनांना न मानणाऱ्या पाखंड्यांनाही तुकोबा झोडपून काढतात. मनुष्याच्या जातीपेक्षा त्यांना त्याची भक्ती अधिक मोलाची वाटते. म्हणून एखादा अभक्त मनुष्य जातीने उच्च असला तरी तुकोबांना तो आवडत नाही मात्र जातीने नीच असलेला एखादा मनुष्य मनापासून ईश्वरभक्ती करत असेल तर तुकोबांना तो वंदनीय वाटतो.

व्यवसायाने वाणी (दुकानदार) असलेल्या तुकोबांनी विरक्तीमुळे आपल्याकडील सर्व संपत्ती गोरगरीबांना वाटून टाकली आणि पोटापुरतीच जवळ ठेवली. तुकोबांनी रचलेली गाथा म्हणजे त्यांच्या अध्यात्मिक, सामाजिक व व्यावहारिक अनुभवांचे चालते बोलते रूप आहे. भक्तीचे मर्म समजून न घेता केवळ कर्मठपणालाच मानणाऱ्या तत्कालीन धर्मपंडितांकडून तुकोबांची गाथा देखील इंद्रायणीत बुडवण्यात आली. मात्र तुकोबांची भक्ती खरी होती. म्हणून पांडूरंगाला गाथेच्या वह्या कोरड्या वरती काढून द्याव्या लागल्या. यानंतर मात्र तुकोबांची कीर्ती जिकडे तिकडे पसरली. तुकोबांना सुरूवातीला त्रास देणाऱ्या रामेश्वर शास्त्रींसारख्या लोकांनी ह्या प्रसंगानंतर तुकोबांचे शिष्यत्व स्वीकारले आणि स्वतःचे कल्याण करून घेतले.

फाल्गुन वद्य द्वितीया शके १५७१ (इ.स.१६४९) सोमवारच्या दिवशी तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. वैकुंठगमनापुर्वी तुकोबांनी त्यांच्या टाळकरी लोकांसह इंद्रायणीच्या काठावर नांदूरकी वृक्षाखाली कीर्तन केले. तुकोबांच्या वैकुंठगमन समयी तेथे तुकोबांचे सगळे टाळकरी शिष्यमंडळ उपस्थित होते. तुकोबांचे दोन्ही पुत्र महादेव आणि विठोबा यांनी पुढे होऊन तुकोबांना नमस्कार केला व वडीलांचे आशीर्वाद घेतले. महादजीपंत कुलकर्णी देहूकर, गंगाधर बाबा मवाळ तळेगावकर, संताजी तेली जगनाडे चाकणकर, तुकोबांचे बंधू कान्होजी, मालजी गाडे येलवाडीकर, कांडोपंत लोहकरे लोहगावकर, गवारशेठ वाणी, मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर, आबाजीपंत लोहगावकर, रामेश्वरशास्त्री भट्ट महूळकर, कोंडपाटील लोहगावकर, नावजी माळी लोहगावकर, शिवबा कासार लोहगावकर आणि सोनबा ठाकूर ह्या सर्व टाळकऱ्यांचा व कीर्तनाला उपस्थित असलेल्या श्रोत्यांचा निरोप घेऊन तुकोबा गरुड विमानाने वैकुंठाला गेले.

तुकोबांच्या वैकुंठगमनावर सध्याच्या काळात अनेक स्वयंघोषित बुद्धीवादी शंका घेतात. मात्र त्यांच्या शंकांना कसलाही आधार नाही. कारण हे स्वयंघोषित बुद्धीवादी एकतर अध्यात्मशास्त्रातील संज्ञा न जाणता विमान, वैकुंठ ह्या संज्ञांचा अर्थ व्यावहारिक भौतिक जीवनाशी जोडतात आणि दुसरे म्हणजे अशा शंका उठवून राजकीय अजेंडे, ब्राह्मणद्वेषाची पेरणी व त्याआडून हिंदूंदू धर्मावर आघात हे त्यांचे मुख्य उद्देश असतात. यात सत्यशोधकता व श्रद्धा यांचा कुठेही लवलेश नसतो.

वैकुंठ हे आकाशातील असे एखादे ठिकाण मुळीच नाही की जेथे पृथ्वीवरून एखाद्या साधनाने जाता येईल. तुकोबा ज्या विमानाने वैकुंठाला गेले ते विमान म्हणजे हवेत उडणारे एखादे वाहनही मुळीच नाही. ती अध्यात्मिक परिभाषा आहे. विश्वात जिथे जिथे आकाश (space) आहे तिथे तिथे काळाची सत्ता चालते. म्हणजे विश्वात कोणत्याही ठिकाणी असणारी वस्तू अथवा पदार्थ हा नाशवान आहे. काळें खादला अवघाचि आकार । ह्या तुकोबांच्या अभंगात ह्याबद्दल स्पष्टपणे बोललेले आहे. शिवाय वैकुंठ म्हणजे काय याबद्दल श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेतही सांगितले - न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः । अर्थात त्या माझ्या परमधामात सूर्य, चंद्र व अग्नी यांची किरणेदेखील पोहचत नाहीत. जर वैकुंठात सूर्य - अग्नीच्या किरणांनाही प्रवेश नसेल तर तेथे भौतिक पदार्थांची गती कशी असणार ? एवढी साधी गोष्ट आहे. म्हणून तुकोबांचे विमानाने झालेले वैकुंठगमन ही व्यावहारिक भौतिक जीवनातील घटना नसून ती अध्यात्मिक घटना आहे व तिचा उलगडा गाथेच्या सखोल अभ्यासातूनच होतो.

सासरला असलेली मुलगी दिवाळीच्या वेळेस जशी माहेरहून कुणीतरी तिला मूळ लावण्यासाठी येईल याची जशी वाट पाहत असते, तसे तुकोबा वैकुंठाहून केव्हा विठ्ठल त्यांना नेण्यासाठी येईल याची निरंतर वाट पाहत असत. याचे उत्कट दर्शन आपल्या गाथा वाचताना होते. "पैल कोण दिसे गरूडाचे वारिके । विठ्ठलासारिखे चतुर्भुज ।।" मला वैकुंठाला नेण्यासाठी गरूडावर बसून पलिकडून विठ्ठलासारखे चतुर्भुज दिसणारे कुणीतरी येत असल्याचे दिसत आहे, असे तुकोबा म्हणतात.
"आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ।।" आम्ही वैकुंठवासी लोक ऋषींची वचने प्रत्यक्ष जगून दाखवण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत, असे तुकोबा म्हणतात. जे तुकोबा वैकुंठाहून पृथ्वीवर येऊ शकतात, ते पुन्हा वैकुंठाला जाऊ शकणार नाहीत का ?

वैकुंठगमनाप्रसंगी तुकोबांनी अनेक अभंग रचलेले व गायले आहेत. त्यापैकीच एक अभंग म्हणजे "सकळही माझी बोळवण करा । परतुनी घरा जावे तुम्ही ।।" हा आहे. तुम्ही सगळे लोक मला निरोप द्या आणि तुमच्या घरी निघून जा असे तुकोबा ह्या अभंगात म्हणतात.
"याजसाठी केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ।।" माझा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठीच मी आयुष्यभर भक्तीचा एवढा अट्टहास केल्याचे तुकोबा म्हणतात.
"आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी ।" ह्या अभंगातून तुकोबा स्पष्टपणे आपण वैकुंठाला जात असल्याचे म्हणतात.

तुकोबांच्या निर्याणसमयाचे अनेक अभंग गाथेत आजही उपलब्ध आहेत. ह्या देशाच्या मातीत आजपर्यंत अनेक आत्मज्ञानी व ग्रंथांचे रचनाकार कवी होऊन गेले. अनेक सिद्ध पुरूष, योगी, महायोगी, भक्त, ज्ञानी व कर्मयोग्यांना ह्या देशाने पाहिले; परंतु स्वतःचे शरीर ब्रह्मलोकात नेणारा तुकाराम एकटाच ह्या धरतीने बघितला. म्हणून तुकोबांबद्दल एवढेच बोलावेसे वाटते - "धन्य म्हणवीन इहलोकी लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ।।"

तुकाराम बीजेच्या समस्त वारकरी बंधूना व विठ्ठलभक्तांना हार्दिक शुभेच्छा.

© गजानन जगदाळे पाटील

तुका म्हणे  - (अ.क्र. - ३३४)सकळांच्या पाया माझी विनवणी ।मस्तक चरणी ठेवितसे ।।१।।अहो श्रोते वक्ते सकळही जन ।बरें पारखून ब...
02/09/2022

तुका म्हणे - (अ.क्र. - ३३४)

सकळांच्या पाया माझी विनवणी ।
मस्तक चरणी ठेवितसे ।।१।।

अहो श्रोते वक्ते सकळही जन ।
बरें पारखून बांधा गाठी ।।२।।

फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
तेथे मी हमाल भारवाही ।।३।।

तुका म्हणे चाली जाली चहू देशी ।
उतरला कसी खरा माल ।।४।।

अर्थ -

तुम्हा सर्वांच्या पायांवर मी माझे डोके ठेवून विनंती करत आहे. ।।१।।

येथे बसलेल्या श्रोत्यांनो, वक्त्यांनो आणि लोकांनो ! तुम्ही जे काही घ्याल ते नीट पारखून मगच घ्या. ।।२।।

मी येथे हरिनामाच्या मालाचे भांडार फोडले आहे. हा सर्व माझ्या धन्याचा म्हणजे विठ्ठलाचा माल असून तो वाहून नेणारा मी केवळ हमाल तेवढा आहे. ।।३।।

तुकोबा म्हणतात, ह्या मालाची चलती सगळीकडे झाली आणि माल कसाला उतरला. ।।४।।

।राम कृष्ण हरि।

#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय

तुका म्हणे  - (अ.क्र. - २११)आचरणा ठाव । नाही अंगी स्वतः भाव ।।१।।करवी आणिकांचे घात ।खोडी काढूनि पंडित ।।२।।श्वानाचिये पर...
29/08/2022

तुका म्हणे - (अ.क्र. - २११)

आचरणा ठाव ।
नाही अंगी स्वतः भाव ।।१।।

करवी आणिकांचे घात ।
खोडी काढूनि पंडित ।।२।।

श्वानाचिये परी ।
मिष्टान्नासि विटाळ करी ।।३।।

तुका म्हणे ऐसा ।
सटवेचि ना पांचा दिसा ।।४।।

अर्थ -

स्वतः कडे कोणत्याही आचरणाचा पत्ता नसणारा अथवा स्वतःच्या अंगी कसलाही भक्तीभाव नसणारा...।।१।।

शब्दज्ञानी वाचाळ पंडित इतरांच्या खोडी काढण्यात व घात करण्यात तरबेज असतो. ।।२।।

कुत्रा ज्याप्रमाणे पवित्र अन्नाला शिवून त्याला अपवित्र बनवतो त्याप्रमाणे शब्दपंडित चांगले तत्त्वज्ञान तोंडाने बोलून प्रत्यक्षात मात्र त्याविरोधात आचरण करून एकप्रकारे त्या ज्ञानाला अपवित्रच बनवत असतो. ।।३।।

तुकोबा म्हणतात, अशा वाचाळांना सटवाई पाचव्या दिवशीच का नेत नाही ? ।।४।।

।राम कृष्ण हरि।

#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय

तुका म्हणे  - (अ.क्र. - १९४)स्वप्निचिया गोष्टी । मज धरिले होते वेठी । जालिया सेवटी । जागे लटिके सकळ ।।१।।वाया भाकिली करू...
28/08/2022

तुका म्हणे - (अ.क्र. - १९४)

स्वप्निचिया गोष्टी । मज धरिले होते वेठी । जालिया सेवटी । जागे लटिके सकळ ।।१।।

वाया भाकिली करूणा । मूळ पावावया सीणा । राव रंक राणा । कैचे स्थानावरी आहे ।।२।।

सोसिले ते अंगे । खरे होते नव्हता जागे । अनुभवही सांगे । दुःखे डोळे उघडीले ।।३।।

तुका म्हणे संती । सावचित्त केले अंगी । नाही तरी होती । टाळी बैसोनि राहिली ।।४।।

अर्थ -

स्वप्नातील गोष्टींना खरे समजून त्यात अनुभवास येणाऱ्या सुखदुःखांनी वेठीस धरल्याप्रमाणे मी व्यावहारिक जगाच्या सुखदुःखांत वेठीस धरलो गेलो होतो; मात्र शेवटी हे जग स्वप्नाप्रमाणे मिथ्या असल्याचे माझ्या प्रत्ययास आले. ।।१।।

जिथे मी पुर्वीपासूनच होतो तेथेच पोहचण्यासाठी मी करूणा भाकली हा मोठा शीणच झाला म्हणायचा. इथे कोणीही राव, रंक अथवा राजा असल्याचे माझ्या अनुभवास येत नाही. हे सगळे मिथ्या असून सर्व काही आपापल्या स्थानावर व्यवस्थित आहेत. ।।२।।

जे स्वप्नात अनुभवले, ते प्रत्यक्ष जागे झाल्यावर प्रत्ययास येत नाही. मात्र तरीही त्याचे अनुभव मनुष्य सांगतो. दुःखाने मनुष्याचे डोळे उघडतात हे मात्र निश्चित. ।।३।।

तुकोबा म्हणतात, संतांनी मला सावध केले म्हणून मी अज्ञाननिद्रेतून जागा झालो अन्यथा इतरांप्रमाणे माझीही अज्ञानरूपी टाळी घट्ट बसलेलीच होती. ।।४।।

।राम कृष्ण हरि।

#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय

तुका म्हणे  - (अ.क्र. - ११९)उपदेश तो भलत्या हाती ।जाला चित्ती धरावा ।।१।।नये जाऊ पात्रावरी ।कवटी सार नारळी ।।२।।स्त्री प...
27/08/2022

तुका म्हणे - (अ.क्र. - ११९)

उपदेश तो भलत्या हाती ।
जाला चित्ती धरावा ।।१।।

नये जाऊ पात्रावरी ।
कवटी सार नारळी ।।२।।

स्त्री पुत्र बंदीजन ।
नारायण स्मरविती ।।३।।

तुका म्हणे रत्नसार ।
परि उपकार चिंधीचे ।।४।।

अर्थ -

चांगल्या गोष्टींचा उपदेश करणारा कोणीही असला तरी तो उपदेश ग्रहण करावा. (कारण आपल्याला उपदेशांशी कर्तव्य असते, व्यक्तीशी नाही.) ।।१।।

पात्र कसे दिसते यावरून अन्नाची परिक्षा करू नये. कारण वरवर करवंटी व शेंड्या दिसणारे नारळ देखील आतून मधूर पाण्याने भरलेले असते. ।।२।।

स्त्री पुत्र आणि नातेवाईक हे बंधनात अडकवणारे असले तरी ईश्वराचे स्मरणही तेच करवतात हे लक्षात घ्यावे. (कारण ते मनुष्याशी स्वार्थीपणाने वागतात व त्यामुळे मनुष्याला त्या नात्यांतील फोलपणा लक्षात येऊन मनुष्य परमार्थाच्या वाटेला लागतो.) ।।३।।

तुकोबा म्हणतात, कापडाची चिंधी साधारण दिसत असली तरी ती मौल्यवान रत्न सांभाळते हे तिचे उपकारच आहेत. ।।४।।

।राम कृष्ण हरि।

#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय

जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ।। ह्या तुकोक्तीप्रमाणे कीर्तन करणारे कुणी कीर्तनकार माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये असल...
29/05/2022

जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ।। ह्या तुकोक्तीप्रमाणे कीर्तन करणारे कुणी कीर्तनकार माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये असल्यास किंवा ओळखीतील असल्यास कृपया नाव सुचवा.
कीर्तनकार बुवांकडून पूर्ण मोफत सेवा अपेक्षित मुळीच नाही. प्रवासाचा खर्च व अन्य खर्च निश्चितपणे दिला जाईल.

संपर्क - गजानन जगदाळे,
9766865109

15/05/2022

स्वतःला देवाचे बाप म्हणवणारे भविष्यात जन्माला येतील म्हणून तुकोबांनी आधीच एक अभंग लिहून ठेवलाय.

--------------------------------------------------------------------
एक म्हणती आम्ही देवचि पै झालो ।
ऐसे नका बोलो पडाल पतनी ।।१।।

एक म्हणति आम्ही देवचि पै रूपे ।
तुमचिया बापे न चुके जन्म ।।२।।

देवे उचलिली स्वमुखे मेदिनी ।
तुमचेनि गोणी नुचलवे ।।३।।

देवे मारियेले दैत्य दानव मोठे ।
तुमचेनि न तुटे तृण मात्र ।।४।।

राया विठोबाचे पद जो अभिळासी ।
पातकाची राशी तुका म्हणे ।।५।।

अर्थ -

काही लोक कोणत्याही अनुभवाशिवाय केवळ अहम् ब्रह्मास्मि म्हणत आम्ही देव झालो आहोत असे सांगतात. मात्र त्यांनी असे म्हणू नये. कारण असे म्हणणारा नरकात पडतो. ।।१।।

काहीजण म्हणतात, आम्ही देवस्वरूपच आहोत. मात्र जन्म आणि मरण त्यांच्या बापालाही चुकत नाही. ।।२।।

देवाने वराह अवतारात अख्खी पृथ्वी स्वतःच्या दाढांवर उचलली होती. तुमच्याकडून मात्र साधी गोणी उचलली जात नाही. ।।३।।

देवाने मोठमोठाले दैत्य मारले आहेत. तुमच्याकडून साधी गवताची काडी तुटत नाही. ।।४।।

तुकोबा म्हणतात, जो विठ्ठलाच्या पदाची अभिलाषा बाळगतो तो पातकाची राशी (ढीग) असतो. ।।५।।

- तुकाराम गाथा - (अ.क्र. - ३२२४)

बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळसिद्धी ।।श्रीराम जयराम जयजय रामश्रीराम नवमीच्या सर्व रामभक्तांना हार्दिक ...
10/04/2022

बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळसिद्धी ।।
श्रीराम जयराम जयजय राम

श्रीराम नवमीच्या सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Address

Nashik

Telephone

+919766865109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तुका म्हणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to तुका म्हणे:

Share