10/03/2018
*🌾🌳जय आदिवासी🌳🌾*
*"जय आदिवासी" फक्त या घोषणा दिल्याने खरचं आदिवासी लोकांचा विजय होतो का?मला पडलेला प्रश्न,मी Maddy (मॅडी) एक आपल्यातलाच आदिवासी युवक माझ्या बाबतीत मला नाही सांगायचे कुणालाच कारण मला कोणतेही प्रसिद्धी नकोय.*
*खरं तर आपण आदिवासी लोक इतर समाजा सारखे जल्लोषाने "जय आदिवासी" असे घोषवाक्य देऊन आदिवासी दिन फक्त साजरा करतो पण त्यानंतर पूर्ण वर्ष वाया घालवितो त्या पूर्ण वर्षात आपण काय करतो समाजासाठी हे मला महत्वाचे वाटते,कारण इतर समाज आपला दिवस किंवा समाजासाठी काढलेला वर्षातून एक दिवस साजरा करतात व त्या दिवशी समाजासाठी आपण काय करायचे व कसे करायचे ह्या गोष्टींचा ठराव होत असतो.*
*या लिहण्या मागचे कारण असे कि प्रत्येक आदिवासी व्यक्तीने समाजासाठी योगदान द्यावे असे मला वाटते,पण या धावपळीच्या युगात शक्य नाही पण हे देखील तितकेच खरे कि अशक्य नाही,माझा मांडलेला विषय गंभीर आहे आपण आदिवासी लोक मागासवर्गीय आहोत मला आपण मागासवर्गीय आहोत या वरून विषय नाही मांडायचा पण आपल्या आदिवासी या मधून कुणी पुढे जातोय ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण पुढे गेलेल्या व्यक्ती ने आपण ज्या समाजामुळे पुढे आलो आहोत याचा भान ठेवून आपल्या समाजाला आपल्या सोबत किंवा आपल्या पेक्षा पुढे कसा नेता येईन याचा विचार केलाच पाहिजे असे मला वाटते या साठी मला लिहावेसे वाटले.*
*असो हे सगळे लिहणारा समाजासाठी तरी काय करतोय त्याची उत्सुकता सगळ्यांनाच नाही पण जो सक्षम असून सुद्धा समाजासाठी काहीच करत नाही त्याला नक्कीच वाटणार आहे पण अश्या लोकांचे मला त्यांचे मन दुखवायचे नाही व लिहण्यामागे असा हेतू देखील नाही,तर हे सगळे लिहण्यामागे त्यांनी देखील आपल्या समाजासाठी समाजकार्य व समज सेवा यासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून मी माझे मत मांडत आहे.*
*मी maddy जात:आदिवासी धर्म:आदिवासी वय :34 मी तमाम धडगावं तालुक्यातील लोकांची सेवा करू इच्छितो ही सेवा मी व माझ्या मित्रांच्या फाऊंडेशन च्या मार्फत करण्याचे ठरविले आहे,यासाठी मला प्रेरणा खालील प्रमाणे मिळाली आहे.*
*1)हुडल फाऊंडेशन रोषमाळ चे अध्यक्ष:श्री.बापू एल पावरा*
*2)गवलाई फाऊंडेशन वडफळ्या चे अध्यक्ष:श्री.सुनिल जी पावरा*
*3)शारदाई फाऊंडेशन चे अध्यक्ष:श्री.जगदिश एल पावरा*
*4)रमाई फाउंडेशन चे अध्यक्ष: श्री. संजय डी. पावरा*
*विषय असा आहे की आज पर्यंत असे निदर्शनात आले की आपली लोक/माणसे यांचे नोकरी कारण असो किंवा मुलाखत तसेच स्पर्धा परीक्षा व इंजि/डॉ. नीट इ.साठी नासिक येथे जाणे होते,असे असताना ज्यांचे नातेवाईक आहे किंवा ज्यांच्या कडे हॉटेल /लॉज मध्ये राहण्यासाठी/जेवणासाठी पैसे असतात अशी मंडळी आपली व्यवस्था करून घेतात पण जी लोक जेमतेम बससाठी भाडे जमा करून पोटाला चिमटा मारून उपाशी राहून मुलाखत /परीक्षा देतात व बस स्टँड सारख्या ठिकाणी हिवाळा,पावसाळा ,उन्हाळा अशा वातावरणात रात्र किंवा दिवस घालवतात यासाठी वरील फाऊंडेशन चे सिंहाचा वाटा घेऊन मोठे पाऊल उचलत आहे तरी तमाम धडगावं वासी यांना सांगण्यात अत्यंत आनंद होतो की अश्या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा यासाठी आपण कोणत्या कारणासाठी नासिक येथे जातो त्याचे कारण पत्रक दाखवून आपली नाशिक येथे मुक्काम तसेच जेवणाची व्यवस्था मोफत करून घेण्यासाठी फाऊंडेशनशी संपर्क साधायचा आहे व त्याच्या नियम व अटी माहिती करून घ्यायचे आहे यामागे संस्था चा कोणताही हेतू साध्य करणे व पैसे कमविणे नाही यात कुठलाही खर्च नाही ही फक्त जनसेवा आहे त्यासाठीच संस्था कार्यरत आहे.*
*वाचकांना एक नम्र विनंती आहे पत्रक पूर्णपणे वाचावे कारण असे आहे की एक पैसा न घेता ह्या संस्था हि गोष्ट करू शकते पण प्रश्न असा आहे की ज्यांना आपण आपल्या सेवेसाठी नेमणूक करतो त्यांना आपण आपला लोकप्रतिनिधी करतो त्यांना आपण बहुमूल्य वेळ देतो आपले मत देतो तसेच कार्यकर्ता देखील बनतो अशी कार्य करण्याकरिता यापैकी कुणीही पुढारी पुढाकार घेत नाही याचे मोठे दुःख वाटते.*
*उदा.आज आपली लोक नंदुरबार जिल्हा पूर्ण तसेच धुळे,नाशिक, मुंबई, पुणे इ.ठिकाणी जास्तीत जास्त नोकरी व शिक्षण तसेच दवाखाना या निमित्ताने जातात जातांना सगळ्यात प्रथम प्रश्न असा कि राहायचे कुठे?याचे अगदी सोपे उत्तर असून निवारण करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही हे सगळ्यांना दिसून येते,आज मी maddy, बापू पावरा,सुनिल पावरा,जगदीश पावरा,संजय पावरा इ.मिळून नाशिक येथे प्रायोगिक तत्वावर गरजूंना जेवण व राहणे हि सुविधा मोफत करू इच्छितो अर्थात धडगाव तालुक्यातील नाशिक येथे परीक्षा व मुलाखती साठी येणार्या प्रत्येक आदिवासी बंधू व भगिनींना मोफत राहाण्याची सोय व जेवनाची 9 मार्च पासून. या विषयासाठी गृप तयार केला आहे. तरी मार्गदर्शन करावे. तसेच आम्ही सुरुवात केलेल्या उपक्रमाचे कुणी जर अनुकरण करत असेल तर आमचा आंनद हा गगनात मावेनासा होणार आहे सगळ्या गोष्टी शक्य आहे फक्त इच्छा असावी मी कुणाचेही नाव घेत नाही आपण सर्वच समजूतदार व हुशार आहोत आपण नेमणूक केलेल्या व आपल्या लोकप्रतिनिधी मधून फक्त एकाने जरी विचार केला तर मी वरील सांगितलेल्या गोष्टी शक्य आहे उदा.वरील सांगितलेल्या शहरात जर एक-एक समाजमंदिर जर उभे केले तर काय होईल याचा विचार कुणीच करत नाही फक्त आपली प्रॉपर्टी कशी करता येईल यात व्यस्त असतात जर समाज मंदिर तयार झाले तर याचे फायदे पुष्कळ स्वरूपात आहे जसे राहण्याची सोय सगळ्यांची होईल तसेच तिथे आपल्यातलाच एक राखण म्हणून नेमला तर त्याच्या परिवाराची उपजीविका होईल तसेच हि गुंतवणूक एकदाच करावी लागणार आहे त्यानंतर रिकाम्या वेळेत आपण भाडे तत्वावर देऊन त्याची घरपट्टी,विजबील,पाणीपट्टी इ.खर्च देखील आपण करू शकतो फक्त सुरुवात कुणीतरी करण्याचा आहे आम्ही तर केली आहेच सर्व काही वाचकांच्या हातात आहे व सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे,नंतरची माहिती पुढील पत्रकात प्रसिद्ध करण्यात येईल...................*
*🌾🌳जय आदिवासी🌳🌾*
*आपलाच maddy*
*9423955680*
*संस्थेची पुढील संकल्पना:-*
*1)गरजूंना परीक्षा शुल्क भरूण देने.*
*2)गरजूंना परीक्षा तसेच मुलाखतीसाठी भाडे देणे.*
*3)गरजूंना परीक्षा फार्म भरून देण्यासाठी स्वतंत्र कॉम्प्युटर सेंटर उभारणे.*
*4)दवाखाना व औषधी साठी योग्य मार्गदर्शन देणे.*
*हि संकल्पना आपला आदिवासी समाजाचा विकास होण्यासाठी आहे,व प्रत्येक आदिवासी व्यक्तीच्या सहकार्याची आवश्यकता आहे.*
*क्रुपया ग्रुप मध्ये सहभागी व्हावे ही विनंती*
Follow this link to join