Banjarasamaj.com

Banjarasamaj.com The biggest web portal designed for Banjara Samaj . Aiming to bring All banjara community people under one roof and connect togather

01/09/2024
किनवट तालुक्यातील महिलांसाठीबंजारा विव्हिंग आर्टवर आधारीत तीस दिवसाचे मोफत प्रशिक्षण नांदेड दि. 13 :-  महाराष्ट्र लघु उद...
15/03/2020

किनवट तालुक्यातील महिलांसाठी
बंजारा विव्हिंग आर्टवर आधारीत तीस दिवसाचे मोफत प्रशिक्षण

नांदेड दि. 13 :- महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ द्वारा पुरस्कृत आणि मिटकॉन नांदेड कार्यालयामार्फत आयोजित किनवट तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी बंजारा विविंग आर्टवर आधारित 30 दिवसीय निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात 16 मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020 या कालावधीत नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात बंजारा विविंग आर्टमधील तंत्र, विविध टाक्याचे प्रकार, टाक्याचे संयोजन व कामाची पद्धत, विविध आकृत्याचे रेखाटन व रंगसंगती, बंजारा विविंग आर्टसाठी आवश्यक विविध उपकरणांची माहिती, कापडाची निवड अशी तांत्रिक माहिती त्याच बरोबर विविध शासकीय योजनाची माहिती, शासनाचे औद्योगिक धोरण याची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करण्यासाठी प्रशिक्षणार्थी किनवट तालुक्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे अशी आहे. प्रशिक्षणार्थीची नांदेड येथे निवासी राहण्याची तयारी असवी. त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थीस 150 रुपये प्रति दिवस याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे.

इच्छुक प्रशिक्षणार्थी शाळेचा दाखला, गुणपत्रक, रेशनकार्डची प्रत, पासपोर्ट छायाचित्र, आधारकार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला आदी माहितीसह मिटकॉन कन्सल्टन्सी ॲन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. तळमजला उद्योग भवन इमारत, औद्योगिक वसाहत शिवाजीनगर, नांदेड येथे मुख्य व्यवस्थापक राहुल शेळके मो. 9764173848, 7020248518 व सहायक सुभाष जाधव मो. 9822740364 वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य व्यवस्थापक, मिटकॉन नांदेड यांनी केले आहे.

*"बंजारा समाजाचे प्रेरणास्थान"*: हरित क्रांतीचे जनक 💎ना.वसंतरावजी नाईक साहेब 💎महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर  सव्वाअकर...
01/07/2016

*"बंजारा समाजाचे प्रेरणास्थान"*: हरित क्रांतीचे जनक 💎ना.वसंतरावजी नाईक साहेब 💎

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सव्वाअकरा वर्ष राहिलेल्या महानायक, वर्षानुवर्षे बंजारा हृदयावर राज करणारे हरित क्रांतीचे प्रणेते, ना.वसंतरावजी फुलसींग नाईक साहेब, यांची 103 वी जयंती.
महाराष्ट्राची जडणघडण करण्यात वसंतरावजी नाईक साहेब यांचा फार मोठा सोनेरी वाटा आहे.
महाराष्ट्राला शेतीच्या आघाडीवर समृद्ध करण्यातही नाईक साहेबांचे नाव हिरव्या पानांवर लिहले जाईल.
शेती आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा देताना स्वावलंबनाचा महामंत्र मा.वसंतरावजी नाईक साहेब यांनीच दिला आणि म्हणून महाराष्ट्र '' मिलो-मुक्त झाला"!
केवढी हि दूरदृष्टी आणि केवढा निश्चयी स्वभाव!
खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राच्या सकारात्मक बांधणीत नाईक साहेबांचा फार मोठा वाटा आहे.
या महान व्यक्तीमत्वाला त्यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐💐
*💐"

19/06/2016

आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी तांडा नं.2 ता.पैठण जि.औरंगाबाद या शाळेची 15 जूनच्या मुख्यमंत्र्यासमवेतच्या दूरचित्रवाणी संवाद (Video conference) निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील ०६ शाळांपैकी एक वरवंडी तांडा आहे. खडकाळ माळरानावरील वंचितांच्या शाळेचा हा सन्मान आहे.मुख्यमंत्री फडणवीससाहेबांना त्यासाठी धन्यवाद.

अवघ्या २७ घरांचा तांडा...संपूर्ण उसतोड करणारा बंजारा समाज...परिसरातील ५ गावची मुले ३ कि.मी.ची पायपीट करत शाळेत येतात म्हणून शाळेची पटसंख्या १७२...एकदा वीजेचा बिघाड झाला की ६-६ महिने वीज गायब परंतु आज १००% सौरऊर्जेवर चालणारी स्वयंप्रकाशित शाळा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध... याच उसतोड कामगारांनी चार लक्ष रूपयांची वर्गणी शाळेच्या विकासासाठी दिली.आणि आज हीच शाळा संपूर्ण सुविधा असणारी डिजीटल शाळा बनली आहे.

शाळेत किमान ३० विविध उपक्रम...
१००० पुस्तकांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आदर्श वाचनालय...
१००० विद्यार्थी बसू शकतील एवढे मोठे हरीतग्रुह (Green shade).....
रविवारी सुट्टीतही शाळा भरावी यासाठी आसुसलेले प्रचंड ऊर्जा असणारी जिज्ञासू ज्ञानपिपासू लाडकी मुलं...उन्हाळी सुट्टीत गावक-यानी झाडांना स्वतःच्या लेकरापेक्षाही जास्त जपलं वाढवलं... नोकरीचे फक्त १२ महिने शिल्लक असतानाही तरूणाला लाजवेल या उत्साहाने काम करणारे आदर्श मुख्याध्यापक...व सर्व जिगरबाज शिक्षक....
आता सर्वांना उत्सुकता आहे ती १५ जूनच्या व्हिडीओ कॉन्फरन्सची....शाळेच्या या यशस्वी वाटचालीचे खरे शिलेदार लाडके शिक्षणप्रेमी ग्रामस्थ...विद्यार्थी...शिक्षक...मुख्याध्यापक हेच..
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
चला आपणही वरवंडी तांड्याच्या काळेसर व त्याच्या सहका-यांचा वसा घेऊया त्यांनी त्यांच्या शाळेसाठी जे कष्ट उपसले आपणही आपल्या शाळेसाठी असेच परिश्रम करू या.चला जि.प.शाळांना अतुल्य अन् अजोड बनवूया.

22/10/2015

दसरा....💐
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दस-याच्या मनपूर्वक शुभेच्छा

जगदिश बा. सकवान
व सकवान परिवार

27/09/2015

!! गणपती बाप्पा मोरया !!
!! पुढच्या वर्षी लवकर या...!!
सर्व गणेशभक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा......!!!

23/09/2015
25/03/2015
Today is the birthday of our founder member Jagdish Sakwan. Wishing you many many happy returns of the day . :)
12/06/2014

Today is the birthday of our founder member Jagdish Sakwan.
Wishing you many many happy returns of the day . :)

HAPPY HOLI
18/03/2014

HAPPY HOLI

बंजारा समाजाची ही संस्कृती टिकून राहावी यासाठी औरंगाबादेत लेंगी नृत्याचं खास आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत कर्नाटकसह मर...
18/03/2014

बंजारा समाजाची ही संस्कृती टिकून राहावी यासाठी औरंगाबादेत लेंगी नृत्याचं खास आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत कर्नाटकसह मराठवाडा, विदर्भातील स्त्री-पुरुष संघांनी सहभाग घेतला. बंजारा समाजांच्या या गाण्यांमधून समाज प्रबोधनच कामही केलं जातं आहे

Address

Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Banjarasamaj.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share