03/01/2023
Live News
#राष्ट्रधर्म_कीर्तन_महोत्सव दि. ५ ते ९ जाने. २०२३ ला संपन्न होणार
गत १० वर्षा पासुन महाल परिसरातील सुरू असलेला कीर्तन महोत्सव या वर्षी, दि. ५ जानेवारी ते ९ जानेवारी २०२३ पर्यंत संपन्न होणार आहे.
या वर्षी या परिसराला जगद्गुरू देवनाथ महाराज कीर्तन परिसर असे नाव देण्यात येणार असुन प्रवेशद्वारांना ह.भ.प. श्री श्यामसुंदरबुवा हरदास व समर्थसद्गुरू सीताराम महाराज दत्त दरबार, रेशीमबाग यांचे नावाने राहणार आहे. हे वर्ष भारतातील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे या वर्षीच्या कीर्तन महोत्सवाचे विषय १८५७ ते १९४७ भारतीय स्वातंत्र्याची गौरव गाथा कीर्तन स्वरूपात अशी राहणार असुन दि.५ जाने. २०२३ रोजी या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन प.पू. आचार्य श्री. जितेंद्रनाथ महाराज, देवनाथ मठ अंजनगाव सुर्जी यांचे शुभ हस्ते व श्री भूनेश्वर पेठे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचप्रमाणे मा. श्री दिपकजी खिरवडकर संचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व मा. श्री राघवेंद्र महेंद्रीकर संचालक खादी ग्रामोद्योग आयोग यांचे प्रमुख उपस्थितीत. या दिवशी सौ. अवंतीका टोळे या १८५७ चे स्वातंत्र्य समर या विषयावर कीर्तन सादर करतील. या महोत्सवात नागपूरातील ५ नामवंत मान्यवरांचा सत्कार आयोजीत असुन या पहील्या दिवशी योगगुरू श्री रामभाऊ खांडेव यांचा सत्कार होईल.
दि. ६ जाने. २०२३ रोजी कीर्तन महोत्सवाचे दूसरे पुष्प लोकमान्य ते महात्मा या विषयावर श्री श्रेयस व मानसी बडवे जुगलबंदी स्वरूपात कीर्तन सादर करतील. या दिवशी दिपप्रज्वलन स्वामी ज्ञानमुर्त्यानंदजी, रामकृष्ण मठ, धंतोली यांचे हस्ते होईल. या दिवशी मा. आमदार प्रविण दटके, शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मा. संजय जीभेंडे, अध्यक्ष नागपूर नागरिक सह. बैंक लि. हे प्रमुख उपस्थित राहतील व या दिवशी विशेष सत्कार मा. श्री राजेंद्र आठवले, राष्ट्रीय उपाध्यक्ष बिल्डर्स असो. ऑफ इंडिया यांचा होईल.
दि. ७ जानेवारी २०२३ रोजी कीर्तन महोत्सवाचे तिसरे पुष्प, ह.भ.प. श्री संकेत भोळे क्रांतीकारक पर्व या विषयावर सादर करतील. या दिवशीचे दिपप्रज्वलन प.पू. श्री विजय काका पोफळी यांचे हस्ते व मा. खासदार श्री कृपाल तुमाने, रामटेक लोकसभा क्षेत्र, मा. आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मा. श्री कार्तीक शेंडे, संचालक विठोबा इंडस्ट्रिज लि. यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. या दिवशी सत्कारमुर्ती मा. अॅड फिरदोस जी मिर्झा यांचा विशेष सत्कार होईल.
दि. ८ जानेवारी २०२३ रोजी कीर्तन महोत्वाचे चौथे पुष्प ह.भ.प. संदिप मांडके स्वातंत्र्य लढयाचे. अंतीम पर्व या विषयावर सादर करतील या दिवशीचे दिप प्रज्वलन श्रद्धेय स्वामी प्रणवानंदजी, आर्ट ऑफ लीव्हींग, बंगलौर यांचे शुभहस्ते होईल. या प्रसंगी मा. आमदार विकास कुंभारे, मध्य विधान सभा क्षेत्र, मा. श्री डॉ. संजयजी दूधे, प्र-कुलगुरू रातुम नागपूर विद्यापीठ, मा. श्री डॉ. उपेंद्र कोठेकर संघटनमंत्री भाजपा विदर्भ हे प्रमुख उपस्थित राहतील. या दिवशी सोमालवार शिक्षण संस्था, श्री मधुकरराव व प्रकाश सोमलवार तसेच न्यू इंग्लीश हाय.असो. चे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे व सचिव श्री अजेय धाक्रस त्याच प्रमाणे सुप्रसिद्ध व्यवसायी श्री व सौ. भैय्याजी रामभाऊजी रोकडे (रोकडे ज्वेलर्स) यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.
दि. ९ जानेवारी २०२३ रोजी या कीर्तन महोत्सवाचे पाचवे पुष्प ह.भ.प. श्री चारूदत्त आफळे फाळणीची शोकांतिका व स्वतंत्र भारत या विषयावर सादर करतील या प्रसंगी दिप प्रज्वलन श्री शिवयोगी श्रद्धेय दत्ता महाराज, शिवशक्ती पीठ, उमरेड यांचे हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती, मा. श्री श्रीधरराव गाडगे सह संघचालक रा.स्व. संघ नागपूर महानगर, मा. श्री बी.सी. भरतीया सी.ए. राष्ट्रीय अध्यक्ष कॅट, नवी दिल्ली यांची राहील. या दिवशी विशेष सत्कार मा. श्री. डॉ. पी.के. देशपांडे हृदय शल्य चिकित्सक व मा. सौ. डॉ. सुलभा देशपांडे नेत्ररोग तज्ञ यांचा होईल.
या पाच दिवसीय कीर्तन महेत्सवाचे मंच संचालन सौ. स्मिता खनगई या करणार असुन कीर्तन साथसंगत, श्री श्रीधर कोरडे-मृदंग, श्री हर्षद पायघन-तबला, श्री धनराज यावलकर- व्हायोलीन, व अमरावतीचे श्री योगेश बोडे-सतार वर करणार आहे. र-संवादिनी, श्री निशीकांत देशमुख- या महोत्सवात खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने नव उद्योजकांना माहिती व तंत्रज्ञानासंबंधी विशेष दालन राहणारा आहे.
या संपूर्ण कीर्तन महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी नागपूरच्या राष्ट्रधर्म प्रेमी बंधूभगीनींनी तन-मन-धन पूर्वक सहकार्य करावे. व हा राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव सफल करावा अशी विनंती. या महोत्सवाचे संयोजक श्री श्रीपाद रिसालदार शुभप्रेरक ह.भ.प. श्री दिगंबरबुवा नाईक, ह.भ.प. रविंद्रबुवा साधु, श्री किशोर धाराशिवकर, श्री अनिल देव, श्री संजय चिंचोळे, श्री अशोक हरिदास, श्री मनोज वैद्य, श्री सतीश कविश्वर, श्री पुष्कर लांभे, श्री निरंजन रिसालदार, श्री सौरभ महाकाळकर, श्री आबा खांडवे, श्री योगेश ढोक यांनी केली आहे.